संकलन- शोबा सुरी
ही जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त प्रकाशित केलेली मालिका मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचे सखोल विश्लेषण करते, तसेच आरोग्यसेवा, कामाची ठिकाणे आणि सामाजिक प्रणालींमधील आव्हानांवर लक्ष केंद्रित करते. या मालिकेची सुरुवात आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावरील महत्त्वपूर्ण ओझ्याचा शोध घेऊन, संकटकाळात अनुकूल वातावरण निर्मितीवर जोर देऊन होते. ही मालिका लवचिक आणि सर्वसमावेशक वातावरणाचे महत्त्व अधोरेखित करणारी, मानसिक तंदुरुस्तीला प्राधान्य देणाऱ्या कार्य संस्कृतीची पुनर्कल्पना करणारी आहे. वाढत्या मागणीला सामोरे जाण्यासाठी मानसिक आरोग्य उपचारांमध्ये प्रगती करून, नवीन उपचारात्मक दृष्टिकोनांनी बघण्याची गरज आहे.
अन्न असुरक्षितता आणि मानसिक आरोग्य यांच्यातील दुवा देखील ह्या मालिकेमध्ये अभ्यासाला गेला आहे. गरीबी आणि मानसिक आरोग्य आव्हानांचे चक्र खंडित करण्यासाठी एकत्रित हस्तक्षेपांच्या आवश्यकतेवर भर दिला जातो. शिवाय, जागतिक हवामान बचावाच्या रणनीती मध्ये मानसिक आरोग्याचा विचार करण्याच्या आवाहनासह, हवामान बदल आणि मानसिक आरोग्य यांच्यातील मध्य अधोरेखित केला जातो. ही मालिका कामाच्या ठिकाणी न्यूरो-पीडित व्यक्तींना सामावून घेण्याचे महत्त्व अधोरेखित करते, आणि त्यांच्या सर्वसमावेशकता आणि समर्थनाला प्रोत्साहन देते.