-
CENTRES
Progammes & Centres
Location
तरुणाईचा योग्य वापर करून घेण्यासाठी SDG फ्रेमवर्कमध्ये एक समग्र दृष्टीकोन, मानसिक, भावनिक आणि शारीरिक कल्याण समाविष्ट करणे, तरुणांच्या भांडवलाला चालना देण्यासाठी आवश्यक आहे.
हा लेख "जागतिक मानसिक आरोग्य दिन 2024" या निबंध मालिकेचा भाग आहे.
तरुणांचे स्वास्थ्य हा राष्ट्रीय विकासाचा एक मूलभूत चालक आहे, जो आर्थिक प्रगती आणि समाजाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. विशेषतः ग्लोबल साउथमध्ये गेल्या काही दशकात आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्नामध्ये लक्षणीय प्रगती झाली असताना, तरुणांचे मानसिक आरोग्य हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे जिथे पुढील प्रगती आवश्यक आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांचे निवारण केल्याशिवाय, हे देश संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs), द्वारे नमूद केलेली सामायिक उद्दिष्टे साध्य करू शकत नाही. विशेषतः एसडीजी 3, ज्याचे उद्दिष्ट ‘उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य’ सुनिश्चित करणे आहे.
विशेषतः ग्लोबल साउथमध्ये गेल्या काही दशकात आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्नामध्ये लक्षणीय प्रगती झाली असताना, तरुणांचे मानसिक आरोग्य हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे जिथे पुढील प्रगती आवश्यक आहे.
मानसिक आरोग्य हे SDG 3 चा अविभाज्य घटक म्हणून ओळखले जात आहे आणि लक्ष्य 3.4 चे उद्दिष्ट मानसिक आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे आणि 2030 पर्यंत असंसर्गजन्य रोगांमुळे होणारे अकाली मृत्यू एक तृतीयांश कमी करणे हे आहे. युवकांचे कल्याण, निरोगी जीवन सुनिश्चित करणे आणि सर्व वयोगटांसाठी निरोगी आणि सुदृढता वाढवणे यावर स्पष्टपणे लक्ष केंद्रित करणे, अनेक युवा-केंद्रित मापदंडांवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
पौगंडावस्था हा मानसिक आरोग्य विकसित करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण ह्या वयात तरुण लोक निरोगी झोप, नियमित व्यायाम, भावनिक नियमन आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये यासारख्या आवश्यक सामाजिक आणि भावनिक सवयी स्थापित करतात. हा एक महत्त्वपूर्ण विकासाचा टप्पा आहे, जो महत्त्वपूर्ण शारीरिक, भावनिक आणि सामाजिक बदलांनी चिन्हांकित आहे, जो दीर्घकालीन मानसिक आरोग्य स्थापित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण कालावधी बनवतो. सकारात्मक मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी घरामध्ये, शाळांमध्ये आणि समुदायांमध्ये पोषक वातावरण आवश्यक आहे.
तथापि, पौगंडावस्थेतील अनेक जोखीमच्या घटकांना सामोरे जावे लागते, ज्यात प्रतिकूलता, समवयस्कांचा दबाव आणि स्व:ची ओळख आदींचा समावेश होतो, ज्याने तणाव वाढू शकतो. मीडियाचा प्रभाव, लैंगिकता, हिंसा आणि कठोर पालकत्व, मानसिक आरोग्याच्या आव्हानांमध्ये वाढ करतात, विशेषत: समाजातील असुरक्षित गटांसाठी जे सामाजिक भेदभाव, गैरसमजुती किंवा अस्थिर परिस्थितीचे शिकार असतात. जुने आजार, अपंगत्व किंवा बालविवाह आणि बहिष्काराचा सामना करणाऱ्या किशोरवयीन मुलांनाही ह्या वाढीव तणावाचा सामना करावा लागतो. ज्यात प्रतिकूलता, समवयस्कांचा दबाव आणि स्व:ची ओळख आदींचा समावेश होतो, ज्याने तणाव वाढू शकतो.
किशोरवयीन मुलांना अनेक जोखीम घटकांचा सामना करावा लागतो, ज्यात प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणे, समवयस्कांचा दबाव आणि स्वता:ची ओळख शोधणे यांचा समावेश आहे, या सर्व गोष्टींमुळे तणाव वाढू शकतो.
जागतिक पातळीवर 5 वर्षांखालील मृत्यू रोखण्यासारख्या क्षेत्रात प्रगती असूनही, तरुणांच्या मानसिक आरोग्य सेवांमध्ये यश मिळणे हे आव्हानात्मक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अंदाजानुसार जगभरातील सातपैकी एक किशोरवयीन व्यक्ती मानसिक विकारांनी ग्रस्त आहे. ही विषमता कोविड-19 महामारीमुळे वाढली आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर तरुणांमध्ये चिंता, नैराश्य आणि एकलकोंडेपणाचे प्रमाण वाढले आहे. खालील आकृती ही 2000 ते 2019 या काळात जागतिक आत्महत्येच्या दरात 36 टक्के घट झाली आहे, हे दर्शवते. ज्यामुळे आत्महत्या प्रतिबंधक प्रयत्नांमध्ये काही प्रगती दिसून येते. तथापि, 58 टक्के आत्महत्या वयाच्या 50 च्या आधी होतात. ह्याचे वर्गीकरण उत्पन्नाच्या पातळीनुसार वेगळे केले जाते, ज्यातून दर्शविते की कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये विविध वयोगटातील विशेषतः 15-50 मधील वयोगटामध्ये आत्महत्या मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे.
आकृती 1: वयोगटातील आत्महत्या आणि उत्पन्न स्तर, 2019
स्रोत: जागतिक मानसिक आरोग्य अहवाल, WHO, 2022
तरुणांच्या विकासासाठी आणि मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी मानसिक आरोग्य सेवेच्या उपलबद्धता सुनिश्चित करणे महत्वाचे आहे. चांगले मानसिक आरोग्य असलेले तरुण अर्थपूर्ण शिक्षणामध्ये गुंतण्याची, सामाजिक संबंध निर्माण करण्याची आणि त्यांच्या देशाच्या क्रयशक्ती मध्ये योगदान देण्याची अधिक शक्यता असते. याउलट, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ जसे की नैराश्य किंवा तीव्र ताण, हे शैक्षणिक प्राप्ती आणि सामाजिक एकात्मतेत आवाहनात्मक ठरू शकतात आणि तरुण व्यक्तीच्या पूर्ण क्षमतेपर्यंत काम करण्यात अडथळे म्हणून येतात. खालील तकत्यातील तपशीलवार वर्णनाप्रमाणे, पारंपारिक मनुष्यबळ दृष्टीकोनाच्या पलीकडे, तरुणांच्या विकासाला चालना देण्यासाठी एक आंतरिक सुधारणेची आवश्यकता आहे जी मानसिक आरोग्याचा सर्वांगाने विचार करून अवलंबली जाईल.
(नोट: GPT-4o चा उपयोग विविध स्त्रोतांकडून मिळालेल्या निष्कर्षांचा सारांश देण्यासाठी केला गेला आहे. नंतर माहिती संपादित केली जाते आणि लेखकाने परिभाषित केलेल्या संबंधित स्तंभ श्रेणींमध्ये ठेवली जाते.)
नैराश्य, चिंता आणि आत्महत्या यासह तरुणांमध्ये उपचार न केलेले मानसिक आरोग्य समस्या, सामाजिक आणि आर्थिक ओझ्यास कारणीभूत ठरतात आणि राष्ट्रीय विकासाच्या प्रयत्नांना हानी पोहोचवतात. तरुणांच्या मानसिक आरोग्यामध्ये गुंतवणूक करणारे देश अधिक चांगला कर्मचारी सहभाग, शैक्षणिक यश आणि एकूण उत्पादकता अनुभवतात. डब्ल्यूएचओचा अंदाज आहे की नैराश्य आणि चिंता विकारांमुळे गमावलेल्या उत्पादकतामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला दरवर्षी सुमारे US$ 1 ट्रिलियनचे नुकसान होते.
उदाहरणार्थ, जर्मनी, फ्रान्स आणि स्वित्झर्लंड यांसारख्या उच्च-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, जेथे सार्वजनिक आरोग्य सेवांवर केला जाणारा खर्च GDP च्या 11 टक्क्यांहून अधिक आहे, मानसिक आरोग्य सेवा अधिक सुलभ आहेत, तेथे निरोगी आणि अधिक उत्पादक तरुण लोकसंख्या आहे(OECD, 2021) . याउलट, 2023 युथ डेव्हलपमेंट इंडेक्स (YDI) हे उघड करते की उप-सहारा आफ्रिकेसारख्या प्रदेशांनी तरूणांच्या विकासात प्रगती केली असताना, त्यांना तरुण बेरोजगारीचा उच्च दर आणि मनुष्यबळ विकासाच्या निम्न पातळीचा अनुभव आला.
विकसित आणि विकसनशील राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांच्यातील भागीदारी, साधनांची देवाणघेवाण ही मानसिक आरोग्य असमानता दूर करण्यासाठी समन्वयित प्रयत्नांना सुलभ करू शकतात.
SDG 3 चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, प्रत्येक देशाने तरुणांच्या मानसिक आरोग्यासाठी बहु-आयामी दृष्टीकोन अवलंबला पाहिजे, ज्यात मानसिक आरोग्यासंबंधित सोईंचा समावेश असला पाहिजे. यामध्ये मानसिक आरोग्य सेवांची वाढलेली उपलब्धता, पूर्वग्रह कमी करणे आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे आरोग्य सेवा प्रणालींमध्ये समाविष्ट आहे ना याची खात्री करणे फायद्याचे आहे. विकसित आणि विकसनशील राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांच्यातील भागीदारी, साधनांची देवाणघेवाण ही मानसिक आरोग्य असमानता दूर करण्यासाठी समन्वयित प्रयत्नांना सुलभ करू शकतात.
अंतिमत:, तरुणांचे मानसिक आरोग्य ही केवळ सार्वजनिक आरोग्याची समस्या नाही; ती एक आर्थिक आणि सामाजिक गरज आहे. मानसिक आरोग्यातील सोई-सुविधांमध्ये गुंतवणूक करून, राष्ट्रे अधिक सक्षम तरुण लोकसंख्या विकसित करू शकतात, ज्यामुळे शाश्वत विकास आणि दीर्घकालीन आर्थिक वाढ होऊ शकते. युवाशकतील चालना देण्यासाठी SDG फ्रेमवर्कमध्ये एक समग्र दृष्टीकोन, मानसिक, भावनिक आणि शारीरिक कल्याणासाठी समाविष्ट करणे आवश्यक आहे.
सौम्य भौमिक ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये असोसिएट फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Soumya Bhowmick is a Fellow and Lead, World Economies and Sustainability at the Centre for New Economic Diplomacy (CNED) at Observer Research Foundation (ORF). He ...
Read More +