Author : Shoba Suri

Published on Sep 16, 2023 Commentaries 0 Hours ago

असंसर्गजन्य रोगांमुळे ओढवणाऱ्या मृत्यूदरात लक्षणीय घट होण्याकरता प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचार यांचे संयोजन होणे आवश्यक आहे.

महिलांमध्ये असंसर्गजन्य रोगांचे वाढते प्रमाण

असंसर्गजन्य रोगांमुळे वर्षाकाठी ४१ दशलक्ष मृत्यू होतात. हे प्रमाण जगभरातील सर्व मृत्यूंच्या ७४ टक्के इतके आहे.

असंसर्गजन्य रोगांसंबंधित कारणांनी ओढवणाऱ्या मृत्यूंपैकी ७७ टक्के मृत्यू हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. बहुसंख्य असंसर्गजन्य रोगांमुळे ओढवणारे मृत्यू हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारांमुळे होतात. यांत दर वर्षी १७.९ दशलक्ष लोकांचा मृत्यू ओढवतो. त्यापाठोपाठ कर्करोग हा घातक रोग ठरला असून त्यामुळे ९.३ दशलक्ष मृत्यू ओढवतात. श्वसनासंबंधीच्या तीव्र रोगांनी ४.१ दशलक्ष मृत्यू होतात, आणि मधुमेहाने २० लाख (यात किडनी रोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचा समावेश करण्यात आला आहे) मृत्यूमुखी पडतात. सर्व असंसर्गजन्य रोगा-संबंधीच्या मृत्यूंपैकी ८० टक्क्यांहून अधिक अकाली मृत्यू या चार रोगांमुळे होतात.

स्त्रिया आणि मुलींना विशेषत: धोका आहे, कारण त्यांच्यातील प्रत्येकी तीनपैकी दोघींचा मृत्यू असंसर्गजन्य रोगांमुळे होतो, हा आकडा १६.८ दशलक्ष मृत्यूंच्या समतुल्य आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील महिलांच्या आरोग्याच्या समस्या गेल्या तीन दशकांमध्ये लक्षणीय बदलल्या आहेत. ज्यांना समृद्धीचे रोग मानले जात होते, ते असंसर्गजन्य रोग आता विकसनशील आणि विकसित अशा दोन्ही देशांमधील महिलांमध्ये मृत्यूचे आणि अपंगत्वाचे मुख्य कारण बनले आहे. ‘लॅन्सेट’च्या मते, १८६ देश-प्रदेशांचा अभ्यास केल्यानंतर, १६४ देशांमधील स्त्रिया (८८ टक्के) आणि १६५ देशांमधील पुरुष (८९ टक्के) वयाच्या सत्तरीच्या आधी संसर्गजन्य रोगांमुळे, मातृत्व, प्रसूतिपूर्व आणि पोषणासंबंधित रोगांनी मरण्याची शक्यता जास्त होती.

आकृती १: जागतिक पातळीवर असंसर्गजन्य रोगांचे वय आणि लिंग यांवर असलेला भार.

आकृती १ वरून हे स्पष्ट होते की, वयानुसार आरोग्य बिघडलेल्या पुरुषांपेक्षा स्त्रियांना असंसर्गजन्य रोग जडण्याची शक्यता अधिक असते. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या विकारांमुळे दर वर्षी स्त्रियांमध्ये ३५ टक्के मृत्यू होतात (तीन महिलांपैकी एक) आणि महिलांच्या आजाराचे निदान कमी प्रमाणात होते आणि त्यांच्यावर उपचारही कमी केले जातात. असा अंदाज आहे की, २०४५ सालापर्यंत, २०१७ च्या तुलनेत २० ते ७९ वयोगटातील ३०८ दशलक्ष अधिक स्त्रिया मधुमेहाने ग्रस्त असतील. स्त्रिया आणि मुलींमधील प्रत्येकी तीनपैकी दोन मृत्यू या विकारांनी होतात आणि या लोकसंख्येला मृत्यू आणि अपंगत्व येण्यामागचे हे मुख्य कारण आहे.

प्रामुख्याने कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील स्त्रिया आणि मुली, वारंवार संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांमुळे, तसेच पुनरुत्पादन संबंधीच्या आरोग्याच्या समस्यांमुळे विकारांचे तीनपट ओझे अनुभवतात. असंसर्गजन्य रोगांमुळे जडणारी विकृती आणि मृत्यू यांमुळे महिलांना समाजातील सामाजिक-सांस्कृतिक स्थितीशी तडजोड करावी लागते आणि त्यांच्या आरोग्यावर व विकासावर याचा आयुष्यभर परिणाम होतो. महिलांना आणि मुलींना नैराश्य आणि एखाद्या भयावह घटनेमुळे उद्भवणाऱ्या मानसिक समस्या उद्भवण्याची अधिक शक्यता असते. या दोन्हींचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन नकारात्मक प्रभाव पडतो.

केवळ त्यांच्या वैयक्तिक आरोग्यापलीकडे, या विकारांचा महिलांवर आणि मुलांवर लक्षणीय प्रभाव पडतो. मानवी लोकसंख्येतील रोगपरिस्थितिविज्ञान संशोधन आणि एपिजेनेटिक (डीएनए अनुक्रमात बदलांचा समावेश नसलेल्या, मात्र इतर प्रभावांमुळे झालेली पेशींची किंवा जीवांची वैशिष्ट्ये) प्रक्रियेचे सुधारित ज्ञान आता सूचित करते की, जन्मपूर्व घटना मधुमेह आणि इतर असंसर्गजन्य विकारांच्या विकासाला हातभार लावू शकतात. कुपोषण, विलंबाने होणारा शारीरिक व आकलनविषयक विकास तसेच प्रौढत्वात जडणारा मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या विकारांसह असंसर्गजन्य रोग, हे सर्व कुपोषित मातेच्या पोटी जन्म घेतल्याने संभवणारे धोके आहेत.

असंसर्गजन्य रोगांमुळे जडणारी विकृती आणि मृत्यू यांमुळे महिलांना समाजातील सामाजिक-सांस्कृतिक स्थितीशी तडजोड करावी लागते आणि त्यांच्या आरोग्यावर व विकासावर याचा आयुष्यभर परिणाम होतो.

तंबाखूचा वापर, हानीकारक मद्य पदार्थांचा वापर, कमी प्रतीचे अन्न, शारीरिक निष्क्रियता आणि घरातील व सभोवतालच्या प्रदुषणाला महिला आणि मुलींना जे तोंड द्यावे लागते, ते पुरुष आणि मुलग्यांपेक्षा वेगळे आहे. प्रामुख्याने या गोष्टी लांच्छन आणि सामाजिक नियमांमुळे घडतात. जगात सुमारे ३७ टक्के प्रौढ पुरुष आणि ९ टक्के प्रौढ महिला धूम्रपान करतात.

असंसर्गजन्य रोगांच्या जोखमीच्या घटकांचे प्रदर्शन आणि असुरक्षितता पुरुषांकरता व महिलांकरता बदललेली दिसून येते. पुरुषांच्या तुलनेत, महिला लठ्ठ होण्याची शक्यता जास्त असते. जादा वजन किंवा लठ्ठपणा ही आरोग्याची गंभीर चिंता आहे आणि ती अनेक असंसर्गजन्य रोगांशी संबंधित आहे. यांमुळे विकृती, अपंगत्व आणि मृत्यूचा धोका वाढलेला आहे.

यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारांमध्ये वाढ होते, जसे की- हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांसंबंधीचा हृदयरोग, उच्च रक्तदाब, पक्षाघात, प्रकार २ मधुमेह आणि अनेक कर्करोग, ज्यामध्ये रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या ऊतींसंबंधीचा कर्करोग, कोलन आणि मूत्रपिंडाचा कर्करोग, हे मृत्यूचे प्रमुख जोखीम घटक आहेत. लठ्ठपणा आणि निष्क्रियता यांसारख्या जोखीम घटकांमुळे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये सरासरी असंसर्गजन्य विकार होण्याची जोखीम असलेले घटक जास्त असतात, जे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक सामान्यपणे असल्याचे दिसून आले आहे.

असंसर्गजन्य रोगांमुळे आरोग्य सेवेचा मोठाला खर्च, गमावलेली उत्पादकता आणि आपत्तीजनक खर्च उद्भवतात. जगातील गरीबांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे आणि असंसर्गजन्य रोगांवर किमान उपचार परवडू शकतील अशा गटात त्या येतात.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांमध्ये वाढ होते, जसे की- हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांसंबंधीचा हृदयरोग, उच्च रक्तदाब, पक्षाघात, प्रकार २ मधुमेह आणि अनेक कर्करोग, ज्यामध्ये रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या ऊतींसंबंधीचा कर्करोग, कोलन आणि मूत्रपिंडाचा कर्करोग, हे मृत्यूचे प्रमुख जोखीम घटक आहेत.

तिच्या आरोग्याचे परिणाम, त्या महिलेच्या मुलांच्या असुरक्षिततेवर आणि आरोग्यावर होतात.  कुपोषित मातांच्या पोटी जन्मलेल्या मुलांमध्ये कुपोषणाचा धोका, जन्माच्या वेळेस अपुरे वजन आणि प्रौढावस्थेत असंसर्गजन्य रोगांची अधिक संवेदनशीलता दिसून येते. त्यामुळे निरोगी भावी पिढ्यांकरता महिलांची स्थिती क्षेमकुशल असणे महत्त्वाचे आहे. ‘शाश्वत विकास २०३०’च्या अजेंडामध्ये असंसर्गजन्य रोग ही सार्वजनिक आरोग्याविषयीची एक महत्त्वाची चिंता म्हणून ओळखली गेली आहे. ‘शाश्वत विकास ध्येय ३’च्या लक्ष्य ३.४ मध्ये, २०३० सालापर्यंत असंसर्गजन्य रोगांद्वारे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण एक तृतीयांश कमी करण्याची हाक देण्यात आली आहे. ‘शाश्वत विकास ध्येय ३’चे लक्ष्य ३.४- ३५ देशांमध्ये पूर्ण केले जाईल (महिलांसाठी १९ टक्के आणि पुरुषांसाठी १६ टक्के), ३० ते ७० वयोगटातील कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे विकार, श्वसनासंबंधीचे तीव्र विकार आणि मधुमेह यांमुळे मृत्यू होण्याच्या संभाव्यतेत, २०१५ च्या तुलनेत एक तृतीयांश घट होण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

‘शाश्वत विकास ध्येय ३.४ लक्ष्यापर्यंत पोहोचताना, असंसर्गजन्य रोगांसंबधीच्या मृत्युदरात लक्षणीय घट होण्यासाठी प्रतिबंध, लवकर निदान होणे आणि उपचार यांचे संयोजन आवश्यक आहे. महिलांना आरोग्य विमा आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या संवेदनशील आरोग्य धोरणांची गरज आहे. परिवर्तनीय बदल घडवून आणण्यासाठी जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर गुंतवणूक आणि वचनबद्धता आवश्यक आहे.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Shoba Suri

Shoba Suri

Dr. Shoba Suri is a Senior Fellow with ORFs Health Initiative. Shoba is a nutritionist with experience in community and clinical research. She has worked on nutrition, ...

Read More +