Author : Priya Shah

Published on Aug 13, 2023 Commentaries 0 Hours ago

सरकार, गुंतवणूकदार, कंपन्या आणि उद्योजकांकडून एकत्रित पाठबळ मिळाले, तर संशोधन आणि विकासविषयक क्लायमेट टेक (हवामान तंत्रज्ञान) स्टार्ट-अप्सना त्यांची मूलभूत तंत्रज्ञान अधिक विस्तारण्यासाठी तसेच कार्बन उत्सर्जनात घट साधण्यासाठीची मोठी संधी मिळू शकेल.

क्लायमेट टेक क्षेत्रातल्या संशोधन आणि विकासाची आवश्यकता

क्लीनटेक क्षेत्राचा फुगा पहिल्यांदा फुटला तो २०व्या दशकाच्या मध्यात. त्यावेळी सिलिकॉन व्हॅलीतील नवीकरणीय ऊर्जा स्टार्ट-अप्समध्ये  (सौरपवनहायड्रो)  गुंतवणूकदारांनी प्रचंड गुंतवणूक केली होती. यांपैकी अनेक स्टार्ट-अप कंपन्या त्यावेळी बंद पडल्याआणि त्यामागे चिनी उत्पादकांकडून स्वस्त दरात करता येत असलेली आयात ते तेल आणि नैसर्गिक वायूच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली घट अशी असंख्य कारणं होतीआणि याचमुळे त्यावेळी क्लीनटेक उत्पादनांना फारच कमी प्रतिसाद मिळाला. पण या पडझडीमागचं या ही पलिकडचं महत्वाचं कारण होतंते म्हणजे व्हेंचर कॅपिटल फंड कंपन्यांनी (भांडवल भागीदार पतपुरवठा कंपन्या) आपल्याला जलद परतावा मिळू शकेल याबाबतीत कमालीच्या अवास्तव अपेक्षा ठेवल्या होत्या. वास्तवात डीप टेक स्टार्ट-अप्सना (बॅटरीसेल किंवा पॅनल उत्पादक) त्यांची वाढ आणि विस्तारासाठी थोडा अधिकचा काळ लागतोआणि तीच या क्षेत्राची गरजही आहेआणि दीर्घकालीन परीघात या क्षेत्रात प्रचंड नफा मिळवून देण्याची क्षमताही आहे. पण असं असलं तरीदेखील या क्षेत्रातून तातडीनं नफा मिळू शकत नसल्याचा अनुभव आल्यानंतर मात्र  गुंतवणूकदारांनी गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात गुंतवणूक करणं टाळलं हीच वस्तुस्थिती आहे.

पण आतासुमारे दोन दशकांच्या कालावधीनंतरहे क्षेत्र पुन्हा जोरदार पुनरागमन करू पाहतंय. आणि त्याला क्लायमेट टेक (हवामान तंत्रज्ञान)‘ अशी नवी ओळखही मिळाली आहे. विशेष म्हणजेया क्लायमेट टेकच्या (हवामान तंत्रज्ञान) या नव्या लाटेत विशेष ऊर्जा वितरणपर्यावरण निर्मितीगतिशीलताअवजड उद्योगतसेच अन्न आणि जमिनीचा वापर अशा कार्बन उत्सर्जनाशी संबंधीत सर्व क्षेत्रांमध्येकार्बन उत्सर्जनाचे स्रोत कमी करण्यासंबंधी काम करणाऱ्या बहुविध स्टार्ट-अप्सचा अंतर्भाव आहे. म्हणूनचक्लायमेट टेक (हवामान तंत्रज्ञान) हे क्लिन टेक तंत्रज्ञानापेक्षाही अधिक व्यापक आहे. ही एक अशाप्रकारची व्यापक संकल्पना आहेज्यात केवळ ऊर्जा संक्रमणावरच नाहीतर अर्थव्यवस्थेशी निगडीत विविध क्षेत्रांच्या कार्बनमुक्तीवर भर दिला गेला आहेमहत्वाचे म्हणजे हवामनबदलाचे जे आव्हान आपल्यासमोर उभे राहीले आहेत्याची वास्तवातली गुंतागुंत आणि त्याची व्याप्ती किती मोठी असू शकते याचे वास्तवदर्शी प्रतिबिंबच या संकल्पनेअंतर्गत उमटलेले दिसते. प्राइस वॉटरहाउस कूपर ने प्रकाशित केलेल्या स्टेट ऑफ क्लायमेट टेक या त्यांच्या अहवालानुसार२०२० या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपासून (H2 2020) ते २०२१च्या पहिल्या तिमाहीपर्यंत (H1 2021) क्लायमेट टेक (हवामान तंत्रज्ञान) स्टार्टअप्स क्षेत्रात व्हेंचर कॅपिटल फंडिंग कंपन्यांनी तब्बल 87 अब्ज अमेरिी डॉलर्सपेक्षा अधिक रकमेची गुंतवणूक केली आहे.

क्लायमेट टेक (हवामान तंत्रज्ञान) हे क्लिन टेक तंत्रज्ञानापेक्षाही अधिक व्यापक आहे. ही एक अशाप्रकारची व्यापक संकल्पना आहे, ज्यात केवळ ऊर्जा संक्रमणावरच नाही, तर अर्थव्यवस्थेशी निगडीत विविध क्षेत्रांच्या कार्बनमुक्तीवर भर दिला गेला आहे, महत्वाचे म्हणजे हवामनबदलाचे जे आव्हान आपल्यासमोर उभे राहीले आहे, त्याची वास्तवातली गुंतागुंत आणि त्याची व्याप्ती किती मोठी असू शकते याचे वास्तवदर्शी प्रतिबिंबच या संकल्पनेअंतर्गत उमटलेले दिसते.

क्लायमेट टेकच्या (हवामान तंत्रज्ञान) या नव्या लाटेत वाढत असलेल्या गुंतवणूकीचं एक मूलभूत वैशिष्ट्य म्हणजेहे क्षेत्र पारंपारिक‘ पद्धतीच्यामालमत्तेतल्या गुंतवणूकीत कपात करत जाण्यासारख्या (asset-light tech investing) पद्धतीपेक्षा वेगळी आहे. इथे आवश्यक असलेली विविध सॉफ्टवेअर वा अॅप्लिकेशन वापरण्यासाठीचे विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म [ Enterprise Software as a Service (SaaS)] तसेच प्रारुप बाजारपेठांची सोय आहेजी क्लायमेट टेक (हवामान तंत्रज्ञान) क्षेत्रातल्या विविध कंपन्यांसाठीत्यांच्याकडील उपकरणे तसेच सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्सना हवामनाविषयक तंत्रज्ञानाशी संबंधीत ऑपरेटिंग सिस्टीममधून उपलब्ध असलेल्या  सेवा पुरवणारे (middleware) अतिरीक्त सॉफ्टवेअर म्हणून कामी येऊ शकते. गेल्या ५ वर्षांच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तामशीन लर्निंगरोबोटिक्स आणि भू-स्थानिक माहितीसाठ्याची साठवण यासंदर्भातल्या तंत्रज्ञानात कमालीची प्रगती झाली आहे. आणि यामुळेही क्लायमेट टेक (हवामान तंत्रज्ञान) स्टार्ट-अप्स जलदगतीने वाढण्यास मदत होत आहे. पण भौतिक स्वरुपातली उत्पादनेउत्पादन प्रक्रिया आणि विज्ञानाविषयक पायाभूत सोयीसुविधांच्या निर्मिती प्रक्रियेतली (deep science) नाविन्यपूर्णता यातून एकाचवेळी मोठ्याप्रमाणात कार्बन उत्सर्जनातली घट करता येते. त्यामुळेच संशोधन आणि विकासप्रक्रीयेवर सर्वाधिक भर देणं आवश्यक असल्याचं तत्व आपल्याला पाळावं लागेल. महत्वाचं म्हणजे हेचक्लायमेट टेक (हवामान तंत्रज्ञान) क्षेत्रातल्या गुंतवणूकीचं यशस्वी प्रारुप तयार करण्यासाठीच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक तत्व आहे.

बहुतेक गुंतवणूकदारांच्या दृष्टीने प्रत्यक्षात गुंतवणूकीच्या अंमलबाजवणीचे नेमके स्वरुप ठरवण्याकरता त्यासंबंधातली प्रबंधात्मक आखणी तयार करणे आवश्यक आहे. अशा प्रकारची प्रबंधक आखणी करतानात्यात उद्योगांसंबंधीचे नकाशामापन करणे,  पुरवठा आणि मागणीशी संबंधीत घटक समजून घेणेनियामकांचे स्वरुप उत्पातकांसाठीचे की उत्पादनासाठीचे आहे(headwinds / tailwinds), स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेच्यादृष्टीने किमान निकष काय आहेतबाजारपेठेतले मुख्य कल काय आहेत अशा बाबींचा समावेश असायला हवा. मात्र क्लायमेट टेकच्या बाबतीतप्रबंधनात्मक आखणी करताना त्यातकार्बनमुक्ती कशी साधली जाऊ शकतेकोणत्या क्रिया-प्रक्रिया हरीत‘ क्रिया प्रक्रिया असू शकतीलकिंवा कोणत्या क्रिया प्रक्रिया कमी उर्जा तसेच पाण्याचा कमी वापर करता येण्यासारख्या असू शकतीलतसेच आपल्याकडच्या साधन सामग्रीचा पुनर्वापर आणि पुनर्निमितीसाठीची परस्परांशी जोडलेली गोलाकार व्यवस्था कशी उभारता येईल याचा सखोल विचार करणे आवश्यक आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचं झालं तरया हार्डवेअर तंत्रज्ञानासाठी अगदी गर्भीत आणि सखोल संशोधन आणि विकास तसेच वैज्ञानिक प्रक्रिया अंगिकारणंआणि त्याच्या संभाव्य परिणामांच्या स्वरुपाविषयचे आराखडे मांडणं इथे अत्यावश्यक असणार आहे.

क्लायमेट टेक (हवामान तंत्रज्ञान) स्टार्ट-अप्सची ही दुसरी लाट म्हणजे या दशकात बुडबुडा होऊ नये याची सुनिश्चिती करणाऱ्या आधारस्तंभांपैकी गुंतवणूकदार हा एक आधारस्तंभ आहे. संशोधन आणि विकास प्रक्रियेत नाविन्यता असणं आणि तिने वेग पकडण्याच्यादृष्टीनं शैक्षणिक विद्यापीठेदेखील एक मजबूत आधारस्तंभाराखीच गरजेची असणार आहेत. त्यादृष्टीनं या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांकरता उत्पादन आणि नमुना चाचणीकरता आवश्यक प्रयोगशाळेची उपलब्धता आणि गरजेची उपकरणं तसेच इतर साधन सामग्रीही उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. याअनुषंगानं पाहीलं तर भारतातीलआयआयटी मद्रास मधील मद्रासचे राष्ट्रीय दहन संशोधन आणि विकास केंद्र (NCCRD / National Centre for Combustion Research and Development) हे एका उत्कृष्ट उष्मायन प्रयोगशाळेसंबंधीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. या केंद्रात या क्षेत्रातल्या उद्योगांसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना विकसित करण्यासाठी अंतराळ अभियंतेवाहन मोटरविषयक संशोधक आणि औष्णिक उर्जा तज्ञांना सोबत घेऊन निरंतर काम सुरू असते. याव्यतिरिक्तभारतीय गाभा विज्ञान संशोधन संस्थेअंतर्गतचे (Indian Institute of Science’s Core) भारतीय विज्ञान तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी सुविधा केंद्र (Stem) आणि टाईम (Time) /e bf इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या कोअरस्टेम आणि टाइम् विभाग उत्पादनांची पूर्व चाचणी केलेल्या (IP-led) स्टार्ट-अप्सना त्यांच्या उत्पादनांना व्यावसायीक स्वरुप मिळवून देणेबाजारपेठांच्या आवश्यकतेनुसार उत्पादनांची रचना करणेव्यवसाय नियोजन आणि कॉर्पोरेट भागीदारी उपलब्ध करून देण्यात मदत करत आहेत. त्याचप्रमाणे पुण्यातील व्हेंचर सेंटर हे पदार्थरसायनं आणि जैविक विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातलेभारतातील सर्वात मोठे विज्ञानाधारित इनक्यूबेटर आहे.

प्रबंधक आखणी करताना, त्यात उद्योगांसंबंधीचे नकाशामापन करणे,  पुरवठा आणि मागणीशी संबंधीत घटक समजून घेणे, नियामकांचे स्वरुप उत्पातकांसाठीचे की उत्पादनासाठीचे आहे(headwinds / tailwinds), स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेच्यादृष्टीने किमान निकष काय आहेत, बाजारपेठेतले मुख्य कल काय आहेत अशा बाबींचा समावेश असायला हवा.

अर्थातभारताला अजूनही हवामान तंत्रज्ञान क्षेत्रासाठी समर्पित संशोधन आणि विकासविषक आणि विज्ञानाविषयक पायाभूत सोयीसुविधांच्या निर्मिती प्रक्रियेसाठीची (deep science) इनक्यूबेटर तयार करण्याची आवश्यकता आहेत्यासोबतच उद्योग आणि धोरणकर्त्या भागधारकांसाठीचा सुयोग्य दुवा निर्माण करणेही गरजेचे आहे. अमेरिकेत प्रयोगशाळेतल्या नवकल्पना प्रत्यक्ष बाजारपेठांमध्ये उतरवणाऱ्याएलिमेंटल आणि ज्यूल्स हे दोन क्लायमेट टेक (हवामान तंत्रज्ञान) इनक्यूबेटर आहेतज्या प्रयोगशाळेतल्या नवकल्पनांना प्रत्यक्ष बाजारपेठांमध्ये स्थान मिळवून देतात. याशिवायस्टॅनफोर्डमध्ये नव्यानेच सुरू झालेले डोएर स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी आणि कोलंबियातले क्लायमेट स्कूल या संशोधनसाठीच्या प्रयोगशाळा तयार करत आहेत. महत्वाचे म्हणजे या सर्वात मोठ्या जागतिक कंपन्या या प्रयोगशाळांमधल्या अशा काही नव नवकल्पनांवर उत्सुकतेने लक्ष ठेवून आहेतज्यांचा अंतिमतः त्यांच्या मूल्यसाखळ्यांमध्ये समावेश करता येऊ शकेल. उद्योग विश्वातल्या ग्रीनटाऊन लॅब्स आणि एमआयटीच्या क्लायमेट कोलॅब यांच्यासारख्या संस्था हवामानविषयक विज्ञानाधारित वचनबद्धता दाखवणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत भागीदारी घडवून आणत आहेत.

भारतातील कंपन्याही शून्य कार्बन उत्सर्जनाच्या स्थितीत पोहण्याच्या उद्देशाने भारतातही परस्पर सहकार्याने प्रकल्प उभारण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. अलिकडेच बीसीजी अर्थात बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने आपला सर्वेक्षण अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार वेदांताजेएसडब्ल्यू उद्योग समुहअदानी ट्रान्समिशनआदित्य बिर्ला उद्योग समुह आणि महिंद्रासह अनेक भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांनी २०२५० किंवा त्याआधी स्वतःला शुन्य कार्बन उत्सर्जनाच्या स्थितीत पोहोचण्याचा संकल्प केला असल्याचे म्हटले आहे. ही स्थिती गाठण्याच्या प्रक्रियेत हे उद्योग जीवाश्म इंधनांच्या ऐवजी केवळ नवीकरणीय ऊर्जा प्रणालीचाच मार्ग स्विकारणार आहेत असे नाहीतर त्याही पलिकडेतापमान वाढीमुळे बिघडली परिस्थिती पूर्ववत करणेइमारतींना ऊर्जा कार्यक्षम करणेकचऱ्याचा पुनर्वापर आणि पुरवठादार मूल्य साखळ्यांमध्ये कार्बनमुक्तीचे उद्दीष्ट समोर ठेवून काम करणार आहेत.

क्लायमेट टेकविषयक (हवामान तंत्रज्ञान) नवोन्मेशाशी संबंधीत संशोधन आणि विकास प्रक्रियेला वेग देण्याच्यादृष्टीने काही घटक /  बाबी अत्यंत महत्वाचे असणार आहेत. १) उद्योजकतेविषयक अतिशय सक्षम परिसंस्था आणि विज्ञानाविषयक पायाभूत सोयीसुविधांच्या निर्मितीसाठीचे (deep science) प्रतिभा कौशल्य २) अशा कंपन्या ज्या शाश्वत विकासाच्या जबाबदारीपूर्ण धोरणाचे नेतृत्व करत आहेत / करू शकतील आणि ज्यांची स्वच्छ ऊर्जेवर आधारीत अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी काळाच्या पुढचे नव तंत्रज्ञान वापरण्यासाठी उत्सुक आहेतआणि iii) प्रारुपाची निर्मिती तसेच प्रयोगशाळांसाठी खाजगी संस्था किंवा सरकारी योजनांच्या माध्यमातून सहकार्याच्या स्वरुपातले जोखीम भांडवल उपलब्ध करून देणे. याच संदर्भाने पाहीले तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST), वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग (DSIR) तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) या अशा काही सरकारी संस्था आहेतज्या स्टार्ट अपना अनुदानाच्या स्वरुपात निधी उपलब्ध करून देऊनत्यांच्या वाढीसाठी सहकार्य करू शकतात. इथे एक बाब लक्षात घ्यायला हवीती म्हणजे ५-७ वर्षांच्या आत परताव्याच्या कल्पनेवर आधारलेली मानसिकता बदलून ९ ते १० वर्षांच्या मर्यादेच्या कल्पनेला धरूनएकदा का व्हेंचर कॅपिटलमध्ये गुंतवणूकदारांसाठीचा मार्ग मोकळा करता आलाआणि त्याच्या जोडीने सरकारगुंतवणूकदारकंपन्या आणि उद्योजकांकडून पाठबळ मिळालेतर संशोधन आणि विकासविषयक क्लायमेट टेक (हवामान तंत्रज्ञान) स्टार्ट-अप्सना त्यांची मूलभूत तंत्रज्ञान अधिक विस्तारण्यासाठी तसेच कार्बन उत्सर्जनात घट साधण्यासाठीची मोठी संधी मिळू शकेल.

भारताला अजूनही हवामान तंत्रज्ञान क्षेत्रासाठी समर्पित संशोधन आणि विकासविषक आणि विज्ञानाविषयक पायाभूत सोयीसुविधांच्या निर्मिती प्रक्रियेसाठीची (deep science) इनक्यूबेटर तयार करण्याची आवश्यकता आहे, त्यासोबतच उद्योग आणि धोरणकर्त्या भागधारकांसाठीचा सुयोग्य दुवा निर्माण करणेही गरजेचे आहे. 

ब्लॅकरॉक या जगातील सर्वात मोठ्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी फिंक यांनी सांगितल्याप्रमाणेया पुढचे १,००० युनिकॉर्न हे क्लायमेट टेकमधले (हवामान तंत्रज्ञान) असतील. यात हरीत हायड्रोजन वीज परावर्तक (green hydrogen electrolysers), विद्युत घट पुनर्निर्मितीबांधकामविषयक हरीत साधन सामग्रीची निर्मितीनव कृषी तंत्रज्ञान आणि परस्पराशी जोडलेली वर्तुळाकार अन्नसाखळीउर्जा साठवण या सगळ्याशी संबंधित तंत्रज्ञानाशी जोडलेले स्टार्ट अप असतील असं फिंक यांनी म्हटलं आहे. खरे तर आपल्याकडच्या प्रमुख भागधारकांना याच दिशेने पुढचं पाऊल उचलण्यासाठी प्रवृत्त करण्याच्यायादृष्टीने आपल्यासाठी हा अगदी योग्य काळ आणि योग्य जागाही आहे. यामुळे क्लायमेट टेक क्षेत्रात (हवामान तंत्रज्ञान) कार्यरत असलेल्या संशोधन आणि विकासविषक स्टार्ट-अप्सना व्यावसायिक उद्योजगतेच्या मार्गावर अधिक स्थीरस्थावर करणं आणि त्यांच्या विस्तार आणि यशाचा मार्ग अधिक प्रशस्त करण्याच्या दिशेनं वाटचाल करणं शक्य होईल.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.