Author : Prateek Tripathi

Expert Speak War Fare
Published on May 14, 2024 Updated 0 Hours ago

हायपरसोनिक शस्त्रास्त्रांची वाढती प्रासंगिकता लक्षात घेता, भारताने त्यांच्या विकासासाठी आणि या शस्त्रास्त्रांना प्रतिबंध करण्यासाठीच्या प्रयत्नांना गती देण्याची गरज आहे.

हायपरसोनिक शस्त्रे आणि युद्धाची तत्त्वे बदलाच्या मार्गावर?

युद्धाचे क्षेत्र तंत्रज्ञानातील नवकल्पनांमुळे सतत विकसित होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि ड्रोन यांसारखे उदयोन्मुख तंत्रज्ञान सध्याच्या युगातील युद्धतंत्रावर वर्चस्व गाजवत आहेत. युक्रेनमधील युद्ध, इस्रायल-हमास युद्ध आणि लाल समुद्रातील संकट हे सर्व युद्धभूमीवरील तंत्रज्ञानाच्या वाढत्या व्यापक प्रभावाचे पुरावे आहेत. हायपरसोनिक शस्त्रास्त्रांचा वाढता प्रसार हे याचे विशेष स्वारस्यपूर्ण उदाहरण आहे. युक्रेन युद्धात रशियाने किमान तीन प्रसंगी त्यांचा वापर केल्यामुळे आणि येमेनमधील हुथी व उत्तर कोरिया यांनी अलीकडेच त्यांची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केल्यामुळे, भविष्यातील युद्धात हायपरसॉनिक शस्त्रे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

हायपरसोनिक शस्त्रे म्हणजे काय?

हायपरसोनिक शस्त्रे अशी आहेत जी मॅक 5 पेक्षा जास्त वेगाने प्रवास करू शकतात, म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा (330 मीटर/से) पाचपट वेगाने. हे दोन प्रकारचे आहेत: हायपरसोनिक ग्लाइड व्हेइकल्स (HGVs), ते सामान्य बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांप्रमाणे रॉकेटमधून डागले जाऊ शकतात. हायपरसॉनिक ग्लाइड व्हेईकल (एचजीव्ही) हे नेहमीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांप्रमाणेच, लक्ष्याकडे जाण्यापूर्वी रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाते, तर हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रात त्यांचे लक्ष्य गाठल्यानंतर स्क्रॅमजेट्स नावाच्या एअर-ब्रीदिंग इंजिनद्वारे त्यांच्यात संपूर्ण उड्डाणभर पुरेल इतके इंधन असते.

रशियाने युक्रेन युद्धात किमान तीन प्रसंगी त्यांचा वापर केल्यामुळे आणि येमेनचे हुथी व उत्तर कोरिया या दोहोंनी अलीकडेच त्यांची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केल्यामुळे, भविष्यातील युद्धात हायपरसॉनिक शस्त्रे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

२०व्या शतकाच्या मध्यापासून हायपरसोनिक शस्त्रे अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांकडे हा वेग फार पूर्वीपासून आहे. आजच्या हायपरसॉनिक क्षमतांमधील बदल आहे तो म्हणजे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांहून विपरीत, ‘एचजीव्ही’ त्यांच्या लक्ष्यापर्यंत पॅराबॉलिक प्रक्षेपणाचे अनुसरण करत नाही, ज्यामुळे त्यांचा पृथ्वीच्या वातावरणात खूप लवकर आणि कमी उंचीवर प्रवेश होतो. मार्गदर्शित उड्डाणांतर्गत प्रगत इव्हेसिव्ह मॅन्युव्हर्स चालवताना ते नंतर त्यांच्या लक्ष्याकडे सरकतात. या व्यतिरिक्त, ‘एचजीव्ही’चा पल्ला हजारो किलोमीटरपर्यंत असू शकतो, ज्यामुळे ते प्रभावीपणे आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या (आयसीबीएम) समतुल्य बनतात. हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रे कमी उंचीवर उडतात, सामान्यत: जमिनीपासून सुमारे २०० फूट उंचीवर, आणि त्यांच्यात वर्धित कुशलता व गतीदेखील असते. परिणामी, हायपरसोनिक शस्त्रे बहुतांश पारंपरिक संरक्षण प्रणालींना मागे टाकू शकतात आणि त्यांचा शोध घेणे हे एक गंभीर आव्हान आहे. उदाहरणार्थ, स्थळ-आधारित रडार त्यांचे उड्डाण होईपर्यंत खूप वेळ त्यांना शोधू शकत नाही. ते पारंपरिक आणि आण्विक दोन्ही शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत, या वस्तुस्थितीमुळेच धोका वाढतो.

स्रोत : दि इकोनॉमिस्ट

जागतिक स्तरावरील उपक्रम आणि प्रगती

ऑस्ट्रेलिया, भारत, फ्रान्स, जर्मनी, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया आणि जपानसह अनेक देश सक्रियपणे हायपरसोनिक शस्त्रे तंत्रज्ञान विकसित करत असले तरी, अमेरिका, चीन आणि रशिया यांनी आजमितीस यामध्ये सर्वाधिक प्रगती केली आहे. याचे प्राथमिक कारण म्हणजे, विशेषत: चीन आणि रशियाच्या बाबतीत, अमेरिकेने २००१ मधील अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र करारातून माघार घेतल्याचे दिसते आणि अमेरिका त्यांच्यावर सोडलेली कोणतीही क्षेपणास्त्रे सहजपणे रोखू शकते ही वाढती चिंता आहे.

    अमेरिका

उपक्रम

विभाग

तपशील

पारंपरिक अचूक हल्ले

अमेरिकेचे नौदल

अमेरिकेच्या नौदलाचा सीपीएस कार्यक्रम हा सर्वात महत्वाचा आणि सर्वात जास्त अर्थसहाय्यित हायपरसोनिक शस्त्रास्त्रांचा उपक्रम आहे. त्याअंतर्गत जून २०२२ मध्ये घेण्यात आलेली पहिली चाचणी अयशस्वी ठरली, तर २०२३ साठी नियोजित त्यानंतरच्या दोन चाचण्या या- उड्डाणाआधी करण्यात येणाऱ्या चाचण्या अयशस्वी ठरल्याने रद्द करण्यात आल्या. मात्र, २०२५ सालापर्यंत काही पाणबुड्यांवर आणि विनाशिकांवर सीपीएस तैनात करण्याची नौदलाची योजना आहे.

हायपरसोनिक हवेतून मारा करणारे ओएएसयुडब्ल्यू (हलो)

अमेरिकेचे नौदल

अमेरिकेच्या नौदलाने २०२३ मध्ये हलो प्रोग्रामही सुरू केला, जो त्याच्या एफ/ए-१८ लढाऊ जेटशी सुसंगत असण्याची शक्यता आहे.

एजीएम-१८३ हवेतून मारा करणारे रॅपिड रिस्पॉन्स वेपन (ARRW)

अमेरिकेचे हवाई दल 

अमेरिकेचे हवाई दल ‘एआरआरडब्ल्यूउपक्रमाद्वारे हायपरसोनिक तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पूर्णपणे कार्यरत एआरआरडब्ल्यू’  प्रोटोटाइपची पहिली चाचणी यशस्वी झाली असली तरी, तेव्हापासून  एआरआरडब्ल्यूच्या उड्डाण चाचण्यांच्या नोंदी मिश्र स्वरूपाच्या आहेत. २०२३ मध्ये उपक्रम विसर्जित करण्यात स्वारस्य व्यक्त करूनही, अमेरिकेच्या हवाई दलाने मार्च २०२४ मध्ये गुआम येथे अलीकडे घेतलेल्या चाचणीमुळे त्याचे पुनरुत्थान होऊ शकते.

हायपरसोनिक अटॅक क्रूझ मिसाइल (एचसीएएम)

अमेरिकेचे हवाई दल

अमेरिकेच्या हवाई दलाने २०२२ मध्ये एचसीएएम उपक्रमही सुरू केला.

लांब पल्ल्याचे हायपरसोनिक शस्त्र (एलएचआरडब्ल्यू) अथवा डार्क ईगल

अमेरिकेचे लष्कर

टॅक्टिकल बूस्ट ग्लाइड (टीबीजी)

डीएआरपीए

हायपरसोनिक एअर-ब्रीदींग वेपन कॉन्सेप्ट (एचएडब्ल्यूसी)

  डीएआरपीए

 

चीन

उपक्रम

माहिती

डीएफ-१७

चीनने डीएफ-१७ च्या अनेक यशस्वी चाचण्या केल्या आहेत, हे एक मध्यम-श्रेणी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून ज्याची रचना विशेषतः एचजीव्हीचा मारा करण्यासाठी केलेली आहे, ज्याचा पल्ला अंदाजे १,००० ते १,५०० मैल इतका आहे.

डीएफ- ४१

डीएफ- ४१-आयसीबीएमची चाचणी केली गेली आहे आणि पारंपरिक किंवा आण्विक एचजीव्ही वाहून नेण्यासाठी त्यात बदल केला जाऊ शकतो.

डीएफ- झेडएफ

डीएफ- झेडएफ एचजीव्हीची सुमारे १,२०० मैलांच्या श्रेणीसह, २०१४ सालापासून किमान नऊ वेळा चाचणी केली गेली आणि २०२० मध्ये ते तैनात करण्यात आले.

स्टारी स्काय २ (अथवा झिंग काँग-२)

अमेरिकी संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांच्या मते, चीनने ऑगस्ट २०१८ मध्ये स्टारी-स्काय २या अणु-सक्षम हायपरसॉनिक वाहन प्रोटोटाइपची यशस्वी चाचणी केली. डीएफ-झेडएफहून वेगळे, ‘स्टारी स्काय-२ हे वेव्हरायडर आहे, ज्याला प्रक्षेपणानंतर वेग प्राप्त करण्यासाठी उर्जा स्त्रोताची गरज असते आणि ते त्याच्या स्वत:च्या शॉकवेव्ह्सपासून उड्डाणाला गती मिळवते. काही अहवालांनुसार, स्टाररी स्काय-२ हे २०२५ सालापर्यंत कार्यान्वित होऊ शकते.

 रशिया

उपक्रम

माहिती

अवांगार्ड

अवांगार्ड हे आयसीबीएमवरून लाँच केलेले एचजीव्ही आहे, जे त्यास प्रभावीपणे अमर्यादित श्रेणीप्रदान करते. असे म्हटले जाते की, हे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे आणि रशियन वृत्त सूत्रांनुसार, डिसेंबर २०१९ मध्ये ते लढाऊ कामगिरीसाठी दाखल करण्यात आले.

३एम२२ टीसरकॉन

रशिया ३एम२२ टीसरकॉनवरही काम करत आहे, जे युद्धनौकेतून डागले जाणारे हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे, ज्याची कमाल रेंज सुमारे ६२५ मैल आहे. हे जानेवारी २०२३ मध्ये सोव्हिएत युनियन गोर्शकोव्हच्या ताफ्याच्या प्रोजेक्ट २२३५० ॲडमिरलवर तैनात करण्यात आले होते.

किन्झल

या व्यतिरिक्त, रशियाने युक्रेनमध्ये किन्झल आधीच मैदानात उतरवले आहे, हे इस्कंदर क्षेपणास्त्रातून बदल करण्यात आलेले हवेतून प्रक्षेपित होणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. रशियन प्रसारमाध्यमांचा दावा आहे की, किन्झलकडे माख १० या यूनिटची सर्वोच्च गती आहे, ज्याची श्रेणी १२०० मैलांपर्यंत आहे, तसेच त्यात अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे.

भारताची प्रगती

ब्राह्मोस एरोस्पेस ब्रह्मोस-२ क्षेपणास्त्रावर काम करत आहे, जे रशियन ३एम२२ टीसरकॉननंतर तयार केले गेले आहे. मात्र, या प्रकल्पाला अनेक विलंबांचा सामना करावा लागला आहे, आता हे २०२८ मध्ये तैनात होणे अपेक्षित आहे.

समांतर पातळीवर, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था २००८पासून हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल (एचएसटीडीव्ही)वर काम करत आहे, जे २० किमीपर्यंत उंची गाठण्यासाठी स्क्रॅमजेट्सचा वापर करते, ज्याचा वेग माख ६ पर्यंत पोहोचतो. ‘एचएसटीडीव्ही’ची पहिली यशस्वी चाचणी जून २०१९ मध्ये करण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये ३० किमी उंचीपर्यंत माख ६ पर्यंतच्या वेगाने आणखी एक यशस्वी प्रात्यक्षिक करण्यात आले. शेवटची चाचणी २७ जानेवारी २०२३ रोजी घेण्यात आली. हायपरसॉनिक क्षमता प्रदर्शित करणारे रशिया, अमेरिका आणि चीन नंतरचे भारत हे चौथे राष्ट्र आहे.  

अग्नी-५ हे एचजीव्ही असू शकते, असे वृत्त असले तरी, ‘डीआरडीओ’ने अशी क्षमता असल्याचे नाकारले आहे. या व्यतिरिक्त, ‘शौर्य’ आणि ‘सागरिका’ क्षेपणास्त्रे हायपरसॉनिक वेगापर्यंत पोहोचू शकतात, परंतु त्यांची वैशिष्ट्ये अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसारखी आहेत आणि ती हायपरसोनिक शस्त्रांच्या श्रेणीत येत नाहीत.

अखेरची चाचणी २७ जानेवारी २०२३ रोजी घेण्यात आली. हायपरसॉनिक क्षमता प्रदर्शित करणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीननंतरचा चौथा देश आहे.

फेब्रुवारी २०२४ मध्ये, आयआयटी कानपूरने भारतातील पहिल्या हायपरसॉनिक चाचणी सुविधेचे उद्घाटन केले, ज्यात १० किमी/से वेगाने क्रूझ क्षेपणास्त्रांसाठी चाचणी व्यासपीठ आहे. याला ‘डीआरडीओ’अंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि एरोनॉटिकल संशोधन व विकास मंडळाने निधी उपलब्ध करून दिला आहे आणि ज्याला आगामी अंतराळ आणि संरक्षण प्रकल्प, उदाहरणार्थ- ब्राह्मोस-२ उपक्रमासाठी हायपरसॉनिक परिस्थितीचे अनुकरण करण्यास सक्षम केले जाईल.

हायपरसोनिक प्रतिबंधाची आवश्यकता

आधी चर्चा केल्याप्रमाणे, सध्याच्या संरक्षण यंत्रणांद्वारे हायपरसॉनिक शस्त्रांचा माग काढणे आणि रोखणे अत्यंत कठीण आहे, या वस्तुस्थितीमुळे ती शस्त्रास्त्रांचे गुंतागुंतीचे स्वरूप बनते. अमेरिकेने समुद्र-आधारित टर्मिनल (एसबीटी) क्षमतेसह सुसज्ज एजिस जहाजे विकसित केली आहेत, जी क्षेपणास्त्राच्या उड्डाण मार्गाच्या उत्तरार्धात काही हायपरसोनिक जोखिमांचा सामना करू शकतात, ज्याला ‘टर्मिनल फेज’ म्हणून ओळखले जाते. हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या जोखिमेचा सामना करण्यासाठी ‘एजिस एसबीटी’ हे एकमेव सक्रिय संरक्षण आहे.

अमेरिकेची स्पेस डेव्हलपमेंट एजन्सी (एसडीए) ट्रॅकिंग लेयर नक्षत्रावर काम करत आहे, ज्याकडे बॅलिस्टिक आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रांविरोधी संरक्षण कवच म्हणून काम करण्यासाठी सेन्सर्सचे जागतिक नेटवर्क म्हणून पाहिले जाते. मिसाइल डिफेन्स एजन्सी (एमडीए)च्या राष्ट्रीय सुरक्षा मिशनअंतर्गत, नियुक्त युएसएसएफ-१२४ मध्ये हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यासाठी रचना केलेले सहा उपग्रह समाविष्ट आहेत. यापैकी चार ‘एसडीए’ ट्रॅकिंग लेयरसाठी आहेत तर आणखी दोन ‘एमडीए’च्या स्वतःच्या हायपरसोनिक आणि बॅलिस्टिक ट्रॅकिंग स्पेस सेन्सर (एचबीटीएसएस) प्रोग्रामसाठी आहेत, जो अलीकडेच सुरू झाला आहे. ‘एचबीटीएसएस’ सेन्सर्सची रचना धोक्यांचा जास्तीत जास्त विश्वास ठेवता येईल, इतका उच्चतम माग काढण्यासाठी आणि इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांना डेटा प्रदान करण्यासाठी केली गेली आहे, जी त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न करेल. ट्रॅकिंग लेयर आणि एचबीटीएसएस हे दोन्ही नियोजित बहुस्तरीय क्षेपणास्त्र-संरक्षण चित्राचे भाग आहेत. हायपरसोनिक शस्त्रे रोखण्यासाठी ‘एचबीटीएसएस’ दाखवू पाहत असलेले फायर कंट्रोल तंत्रज्ञान आवश्यक आहे.

भारताचा विचार केल्यास, ब्राह्मोस-२ आणि ‘एचबीटीएसएस’ प्रकल्प हाती घेत असताना, त्यांच्या हायपरसॉनिक क्षमतांच्या विकासाच्या दृष्टीने निश्चितपणे स्वागतार्ह पावले आहेत, हायपरसॉनिक संरक्षणाच्या क्षेत्रात अशी कोणतीही तत्परता दर्शवली गेली नाही. ‘डीआरडीओ’ने जमीन-आधारित बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स (बीएमडी) उपक्रमाचा टप्पा-१ पूर्ण केला आहे आणि सध्या द्वितीय टप्प्यावर काम करत आहे. एप्रिल २०२३ मध्ये, डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने समुद्रावर आधारित इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीही घेतली आहे.

हायपरसोनिक शस्त्रे त्यांच्या गतीमुळे आणि कुशलतेमुळे भविष्यकालीन युद्धात प्रमुख भूमिका बजावण्याकरता सज्ज आहेत, ज्यामुळे त्यांना शोधणे विशेषतः कठीण ठरते, आण्विक शस्त्रे वाहून नेण्याचीही त्यांची क्षमता आहे, याचा वेगळा उल्लेख करण्याची गरज नाही. चीनकडून सतत निर्माण होणारा धोका आणि हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांच्या विकासातील त्यांचा वाढता पराक्रम लक्षात घेता, भारताने केवळ हायपरसॉनिक शस्त्रास्त्रेच नव्हे तर प्रतिबंधात्मक शक्तीबाबतही आपल्या प्रयत्नांना गती देण्याची गरज आहे. ‘डीआरडीओ’ने त्यांच्या ‘बीएमडी’ कार्यक्रमात हायपरसॉनिक संरक्षणाचा समावेश करणे विवेकपूर्ण ठरेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)देखील अवकाश-आधारित सेन्सर्स विकसित करण्यासाठी एक सक्षम संस्था म्हणून काम करू शकते, जे संभाव्यतः अमेरिकेच्या ‘एसडीए’ क्षेत्रात सुरू असलेल्या प्रकल्पाच्या धर्तीवर विकसित केले जाऊ शकते.


प्रतीक त्रिपाठी हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये ‘सेंटर फॉर सिक्युरिटी स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजी’चे संशोधन सहाय्यक आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.