Published on Oct 27, 2023 Commentaries 0 Hours ago

नायजरमधील सत्तापालटामुळे प्रादेशिक अस्थिरता निर्माण होण्याआधी आणि पूर्ण युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी प्रादेशिक आफ्रिकी गटांनी मुत्सद्देगिरीद्वारे उपाय शोधण्याचा प्रयत्न करायला हवा.

बंडानंतरचे नायजर

३० महिन्यांत बरेच काही होऊ शकते. फेब्रुवारी २०२१ मध्ये, जेव्हा राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बझौम यांची पश्चिम आफ्रिकी राष्ट्र असलेल्या नायजर या देशाचे १०वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली, तेव्हा हा या देशासाठी एक आनंदाचा क्षण होता. १९६० मध्ये फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नायजरचे हे पहिले शांततापूर्ण, लोकशाही संक्रमण होते. गेल्या दोन वर्षांत, बझौम इस्लामी अतिरेक्यांच्या विरुद्ध स्थिर प्रगती करत आहेत; त्यांचे सशस्त्र दलांशी चांगले संबंध असल्याचे दिसत होते; आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना अमेरिका आणि फ्रान्स या दोन्ही देशांचा पाठिंबा होता.

१९६० मध्ये फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नायजरचे हे पहिले शांततापूर्ण, लोकशाही संक्रमण होते.

तरीही, घटनांच्या अस्वस्थ उलथापालथीत, जेव्हा लष्करी उठावाद्वारे राष्ट्राध्यक्ष बझौम यांची राजवट हटविण्यात आली तेव्हा नायजर अराजकतेच्या गर्तेत फेकले गेले. परिणामी, राजकीय चित्र पालटले आणि त्यामुळे तेथील नागरिक व संपूर्ण जग स्तब्ध झाले. अनिश्चितता आणि अराजकता वाढवून देशाच्या सीमा वेगाने बंद करण्यात आल्या.

सत्तापालटाचा उलगडा

आफ्रिकेतील अशांत साहेल प्रदेशात, नायजर अलिकडच्या काही वर्षांत तुलनेने स्थिर आहे. २६ जुलैपर्यंत तो स्थिर होता, त्या दिवशी नायजरच्या राष्ट्राध्यक्षांच्या अंगरक्षकांपैकी काही सदस्यांनी नियामे येथील राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्याला वेढा घातला आणि राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या घरात ताब्यात घेण्यात आले. नंतर, सैन्याच्या वेगवेगळ्या शाखांचे प्रतिनिधित्व करणार्‍या बंडखोरांनी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर घोषित केले की, त्यांनी सरकार पाडले आहे. आणि दोन दिवसांनंतर, २८ जुलै रोजी, नायजरच्या राष्ट्राध्यक्षांच्या अंगरक्षकांच्या तुकडीचे कमांडर, ५९- वर्षीय जनरल अब्दौरहमाने ओमर त्चियानी यांनी एका दूरचित्रवाणी भाषणात नेतृत्वाचा दावा केला.

जरी जनरल त्चियानी यांनी सत्तापालटाचे कारण वाईट सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थापन आणि अतिरेक्यांशी लढण्यात सरकारला आलेले अपयश हे दिले असले तरी खरे कारण अस्पष्ट आहे. असे दिसते की, अध्यक्ष बाझौम यांनी जनरल त्चियानी यांना अध्यक्षीय रक्षकांच्या कमांडरच्या पदावरून बडतर्फ करण्याची योजना आखली होती. याचा जनरल यांनी घेतलेला बदला होता का? असू शकतो. नायजरच्या समृद्ध युरेनियम खाणींवर नियंत्रण ठेवण्याच्या लढाईशीही या बंडाचा संबंध असू शकतो.

नायजर महत्वाचे का आहे?

नायजर हा युरेनियमचा जगातील सातवा सर्वात मोठा उत्पादक आहे. युरेनियम अणुऊर्जेसाठी, कर्करोगाच्या उपचारांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा किरणोत्सर्गी धातू असून आण्विक उद्योगासाठी लागणारा एक प्रमुख कच्चा माल आहे. नायजर हा युरेनियमचा प्रमुख पुरवठादार देश आहे- फ्रान्सच्या युरेनियमच्या १५ टक्के गरजा आणि युरोपीय युनियनच्या एक पंचमांश गरजा नायजर भागवतो. समजून घेण्याजोगे असे की, सत्तापालट युरोपमधील ऊर्जा सुरक्षेबद्दलची चिंता वाढवत आहे.

खरे तर, संयुक्त राष्ट्रांनी मालीमधील १३ हजार कर्मचाऱ्यांची शांतता मोहीम मागे घेण्यासाठी नायजरचा वापर रसद पुरवठा तळ म्हणून करण्याची योजना आखली आहे आणि २०२३ च्या अखेरीस ही योजना पूर्ण होणार होती.

इस्लामवादी अतिरेक्यांच्या विरोधातील लढ्यात नायजर हा पश्चिमेचा एक महत्त्वाचा सहयोगी आहे. सध्या, अमेरिकेचे नायजरमध्ये १,१०० सैन्य आणि एक नियामे आणि दुसरी अगाडेझमध्ये दोन ड्रोन साइट्स आहेत. अमेरिकेने ड्रोन तळांच्या बांधकामासाठी सुमारे ११० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली, शिवाय त्यांच्या देखभालीसाठी वर्षाकाठी ३० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स खर्च केले. नायजरमध्ये फ्रान्सचेही १,५०० लष्करी कर्मचारी आहेत. खरे तर, संयुक्त राष्ट्रांनी मालीमधील १३ हजार कर्मचाऱ्यांची शांतता मोहीम मागे घेण्यासाठी नायजरचा वापर रसद पुरवठा तळ म्हणून करण्याची योजना आखली आहे आणि २०२३ च्या अखेरीस ही योजना पूर्ण होणार होती.

‘रशिया घटक’

म्हणीनुसार, राजकारणात योगायोग नसतात. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन सेंट पीटर्सबर्ग येथे आफ्रिकी राष्ट्रप्रमुखांच्या आणि मंत्र्यांच्या मेजवानीत व्यग्र असताना नायजरमध्ये सत्तापालट झाला. या घटनाक्रमाने युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मायखाइलो पोडोल्याक यांना रशियावर सत्तापालट केल्याचा सार्वजनिकपणे आरोप करण्यास प्रवृत्त केले. जरी रशियाने अधिकृतरीत्या नायजरला घटनात्मक सुव्यवस्था शक्य तितक्या लवकर पुनर्संचयित करण्याचे आवाहन केले असले तरी, सत्तापालटाची वेळ आणि बंडानंतरच्या काही दिवसांत रस्त्यावर रशियन झेंडे फडकवले गेल्याने निश्चितपणे संशयाचे जाळे निर्माण झाले आहे.

 रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन सेंट पीटर्सबर्ग येथे आफ्रिकी राष्ट्रप्रमुख आणि मंत्र्यांच्या मेजवानीत व्यग्र असताना नायजरमध्ये सत्तापालट झाला.

दरम्यान, वॅग्नर समूहाचे संस्थापक, प्रिगोझिन यांनी उघडपणे सत्तापालट साजरा केला आणि वसाहतवादाच्या वारशावर दोषारोप केला. वॅगनर यांच्यासाठी, सत्तापालटाच्या प्रयत्नांच्या यादीतून व्यवसायाची संधी दिसून येते. त्यांच्या सैन्याने आधीच माली आणि सुदानमध्ये, तसेच जवळच्या मध्य आफ्रिकी प्रजासत्ताकात आणि लिबियामध्ये उघडपणे काम केले आहे आणि आता, नायजर त्यांचा सर्वात मौल्यवान प्राप्ती बनू शकते.

 फ्रान्सविरोधी मजबूत लाट

सत्तापालटानंतर काही दिवसांनी, हजारो निदर्शकांनी देशाच्या राजधानीतून रशियन ध्वज घेऊन कूच केले आणि त्यांच्या देशाची संपत्ती लुटल्याबद्दल फ्रान्सची निंदा केली. संतप्त निदर्शक जमावाने फ्रेंच दूतावासाचा काही भाग पेटवून दिला. यांतून संपूर्ण प्रदेशात एक वेगळा नमुना दिसून येतो. या सर्व पूर्वीच्या फ्रेंच वसाहतींमध्ये सध्या सत्तापालट होत आहे, त्यात एका गोष्टीत साम्य आहे: फ्रान्सचा नकार आणि त्यांची नव-वसाहतवादी धोरणे. माली हा फ्रान्सविरुद्ध बंड करणारा पहिला देश होता, त्यानंतर बुर्किना फासो आणि आता नायजर यांनी बंड केले. फ्रान्सबद्दल सर्वसामान्यांचे मत आधीच वाईट होते. लष्करी नेते ‘बळीचा बकरा’ तंत्र अवलंबू शकतात. ते नागरिकांच्या फ्रेंचविरोधी भावना बळकट करण्यासाठी समर्थन देतात.

प्रादेशिक युद्धाची भीती

सैन्याच्या कारवाईवर आफ्रिकी युनियन आणि पश्चिम आफ्रिकी प्रादेशिक गट, पश्चिम आफ्रिकी देशांचा आर्थिक समुदाय यांच्याकडून तीव्र टीका झाली. पुढे, पश्चिम आफ्रिकी देशांच्या आर्थिक समुदायाने- सत्ता काबीज करणाऱ्या लष्करी समूहाला बाझौम यांना ताबडतोब सोडून देण्याचे आवाहन केले आणि लोकशाही शासन पुनर्संचयित करण्यासाठी मुदत दिली. त्याचप्रमाणे अमेरिकेने आणि फ्रान्सने नायजरशी संबंध तोडले. प्रत्युत्तर म्हणून, नायजरमधील सत्ता काबीज करणाऱ्या लष्करी समूहाने १९७७ ते २०२० दरम्यानचे फ्रान्ससोबतचे सर्वच्या सर्व पाच लष्करी करार रद्द केले.

संतप्त निदर्शक जमावाने फ्रेंच दूतावासाचा काही भाग पेटवून दिला.

दुसरीकडे, शेजारील बुर्किना फासो आणि माली यांनी अभूतपूर्व कारवाई केली, जिथे त्यांनी घोषित केले की, शेजारच्या नायजरमध्ये झालेला परकीय लष्करी हस्तक्षेप हा त्यांच्याविरूद्धच्या युद्धाची घोषणा मानली जाईल. या प्रदेशातील गिनी या देशानेही अलीकडेच बंड अनुभवले आहे, त्यांनी नायजरमधील सत्ता काबीज करणाऱ्या लष्करी समूहाच्या बाजूने स्वतंत्र विधान जारी केले.

नायजर, बुर्किना फासो आणि माली यांची नायजेरिया आणि फ्रान्सशी टक्कर झाली तर, हा विकसित होणारा धोकादायक संघर्ष अखेरीस संपूर्ण साहेल प्रदेशाला घेरून कदाचित उत्तर आफ्रिकेतील लिबिया, अल्जेरिया आणि इजिप्त यांसारख्या देशांमध्ये पसरेल. जरी संभाव्य प्रादेशिक युद्धाच्या बाबतीत फ्रान्स आणि रशिया थेट लढाईत सहभागी होणार नाहीत, तरीही विरोधी गटांना दिला जाणाऱ्या प्रारंभीच्या पाठिंब्यामुळे मोठा विनाश घडेल. देश बाजू निवडण्यासाठी झुंजत असताना, प्रादेशिक युद्धाचा धोका मोठा आहे.

नायजरमधील बंडाचे भौगोलिक राजकारण

साहेल प्रदेशाला बर्‍याच काळापासून वाईट प्रशासन, नागरी संघर्ष आणि हिंसक अतिरेकीवादाचा सामना करावा लागला आहे. नायजरमधील हा तीन वर्षांतील आठवा सत्तापालट असून लोकांच्या चिंतेचा, वेदनांचा काळ लांबला आहे. नायजरमधील सैन्य सत्तेवर आपली पकड राखण्यात यशस्वी ठरल्यास, ते उत्तर आफ्रिकेतील सुदान व्यतिरिक्त चार पश्चिम आफ्रिकी राष्ट्रांमध्ये खाकी राजवटीचे प्रतिनिधित्व करेल. या क्षेत्रातील वाढत्या इस्लामी बंडखोरीला रोखण्यात फ्रान्स आणि इतर परकीय शक्तींचे सैन्य-नेतृत्व कसे अयशस्वी ठरले, हेदेखील यांतून स्पष्ट होते. आफ्रिकी खंडात वाईट प्रशासन, भ्रष्टाचार आणि त्रासाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर असल्याने, या प्रदेशातील आणि त्यापलीकडेही अनेक आफ्रिकी देशांना अखेरीस अशाच लष्करी सत्तापालटाचा अनुभव येऊ शकतो.

प्रत्युत्तर म्हणून, नायजर देशात सत्ता काबीज करणाऱ्या लष्करी समूहाने १९७७ ते २०२० दरम्यान फ्रान्ससोबत झालेले पाचही लष्करी करार रद्द केले.

पुढे वाटचाल करताना, जरी या वादावर मुत्सद्देगिरीने तोडगा निघण्याची आशा धूसर असली तरी, पश्चिम आफ्रिकी देशांच्या आर्थिक समुदायासह, आंतरराष्ट्रीय समुदायाने कोणतीही घाईघाईने कारवाई करण्यापूर्वी सावध राहायला हवे आणि मुत्सद्देगिरी व वाटाघाटींद्वारे उपाय शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. अन्यथा, आधीच अस्थिर असलेल्या या प्रदेशात, नायजरमधील ही राजकीय अशांतता वाढून प्रादेशिक युद्धात नक्कीच परावर्तित होईल, ज्यामुळे इस्लामवाद्यांना त्यांचे दहशतवादी जाळे वाढवणे सोपे होईल.

बंडानंतर नायजरचे भविष्य

नायजरचे दोन सर्वात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे- सत्तापालट होण्यापूर्वी, एक सदोष लोकशाही होती, जी निवडून आलेल्या आणि निर्दयी जिहादी हिंसाचाराला वास्तविक वैधता देऊ शकली नाही. मात्र, सत्तापालटामुळे नायजरच्या दोन मूलभूत समस्यांचे निराकरण होऊ शकते. यामुळे नायजरमधील लोकशाही पुन्हा सुरू होऊ शकते, जी वास्तविक एकल-पक्षीय प्रणालीद्वारे दबली गेली होती आणि यामुळे अधिक प्रभावी सुरक्षा धोरण तयार होऊ शकते.

नायजरचे दोन सर्वात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे- सत्तापालट होण्यापूर्वी, एक सदोष लोकशाही होती, जी निवडून आलेल्या आणि निर्दयी जिहादी हिंसाचाराला वास्तविक वैधता देऊ शकली नाही.

नजरकैदेत असताना, नायजरचे पदच्युत अध्यक्ष बझौम यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’साठी लिहिताना स्पष्टीकरण दिले, “लोकशाही बहुलवाद आणि कायद्याचे राज्य याविषयीच्या आदरासह, आमच्या सामायिक मूल्यांसाठी लढा हाच गरिबी आणि दहशतवादाच्या विरोधात शाश्वत प्रगती करण्याचा एकमेव मार्ग आहे”. नायजरमधील प्रत्येकजण, मग ते सत्तापालटाचे समर्थन करणारे असो किंवा नसो, त्यांच्याशी सहमत असतील की नायजरमध्ये त्वरित नागरी राजवट परतून आणि कदाचित त्यांची राज्यघटना बदलून एक उदाहरण स्थापित करणे आवश्यक आहे.

हे मान्य की, या विशाल देशाच्या भविष्यासाठी आशावादी अंदाज वर्तवणे या क्षणी जवळपास आत्यंतिक आशावादी वाटू शकते. मात्र, नायजरमध्ये, बंडाच्या माध्यमातून लोकशाही पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया यापूर्वी घडली आहे. खरे तर, १९६० मध्ये फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नायजरमधील सध्याचा सत्तापालट हा पाचवा सत्तापालट आहे. आणि मागील तीन प्रसंगी- १९९६ (विरोध), १९९९ आणि २०१० मध्ये- नायजरमधील लोकशाही अधिक मजबूत झाली. आता इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. संघर्षाचे शांततापूर्ण निराकरण आणि नागरी प्रशासनाची पुनर्स्थापना या आशेने जगाची नायजरवर बारीक नजर राहील. वॅक्लाव हॅवेल यांनी एकदा म्हटल्याप्रमाणे, “आशा म्हणजे काहीतरी चांगले होईल याची खात्री नाही, परंतु काहीतरी कसे घडले याची पर्वा न करता, त्याला काहीतरी अर्थ प्राप्त होतो, हे निश्चित.”

समीर भट्टाचार्य विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनचे वरिष्ठ संशोधन सहकारी आहेत.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.