-
CENTRES
Progammes & Centres
Location
इथिओपियामधील नाजूक शांतता पुन्हा एकदा तुटू लागली आहे आणि यावेळी, अफ्रिकेच्या हॉर्नमध्ये उभ्या असलेल्या व्यापक प्रादेशिक युद्धापासून आपण फक्त एका चुकीच्या पावलाच्या अंतरावर आहोत.
Image Source: Getty
अफ्रिकेच्या हॉर्न प्रदेशावर आणखी एका प्रादेशिक युद्धाची भीती सतत घोंगावत आहे, आणि घटना घडत जाण्याचा क्रम पाहता एखाद्या आधीच अनुभवलेल्या (déjà vu) अस्वस्थ जाणिवेने ही भीती अधिकच तीव्र झाली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये, इथिओपियन नॅशनल डिफेन्स फोर्स (ENDF) आणि टिग्राय पिपल्स लिबरेशन फ्रंट (TPLF) या विद्रोही गटांच्या आघाडीदरम्यान युद्ध सुरू झाले. हे युद्ध जवळपास दोन वर्षे चालले, ज्यात ६ लाख लोकांचा मृत्यू झाला आणि आणखी ९ लाख इथिओपियन लोक विस्थापित झाले. मार्च 2022 मध्ये अनिश्चित कालावधीसाठी एक मानवतावादी शांती करार करण्यात आला, पण सप्टेंबरपर्यंत पुन्हा लढाई सुरू झाली. नोव्हेंबर 2022 मध्ये आणखी एक शांतता करार झाला, जो थोड्याच काळासाठी म्हणजे सुमारे दोन वर्षे टिकला.
मागील युद्धात, इथिओपियन सरकारच्या सैन्याने शक्तिशाली आणि सुसज्ज असलेल्या टिग्राय पीपल्स लिबरेशन फ्रंट (TPLF) आणि त्याच्या सहयोगी गटांसोबत, ज्यात ओरोमो लिबरेशन आर्मी (OLA) समाविष्ट होते, लढाई केली. त्या वेळी इरिट्रिया सरकारच्या बाजूने उभे राहिले होते आणि त्यांनी TPLF ला दाबण्यास मदत केली होती. मात्र, यावेळी, इरिट्रियाने आपली भूमिका बदलल्यासारखे दिसते आणि ते ENDF विरुद्ध वेगवेगळ्या विद्रोही गटांना पाठिंबा देत असल्याचे समोर येत आहे.
इथिओपियन सरकारच्या सैन्याने शक्तिशाली आणि सुसज्ज असलेल्या टिग्राय पीपल्स लिबरेशन फ्रंट (TPLF) आणि त्याच्या सहयोगी गटांसोबत, ज्यात ओरोमो लिबरेशन आर्मी (OLA) समाविष्ट होते, लढाई केली.
इरिट्रियाच्या भूमिकेतील बदल हा अपेक्षितच होता. ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट करताना, इरिट्रिया, पूर्वीची इटालियन कॉलनी (वसाहत) होती. ज्यास 1962 मध्ये इथिओपियाने आपल्या अधीन केले. इथिओपियाविरुद्ध तीन दशकांच्या लढाईनंतर, इरिट्रियाने 1993 मध्ये स्वातंत्र्य मिळवले, ज्यामुळे इथिओपिया भू-निर्वाह झाले. 2018 मध्ये सत्तेवर येणारे इथिओपियन पंतप्रधान अबी अहमद अली यांनी इथिओपिया आणि इरिट्रिया यांच्यातील राजनैतिक संबंध सुधारले किंवा नॉर्मलायझ केले.
संबंध सुधारल्यानंतर, इरिट्रिया ने TPLF विरुद्ध सुरु झालेल्या युद्धाच्या दरम्यान अबी यांच्या नेतृत्वाखालील इथिओपियन सरकारला समर्थन दिले. तरीही, अबी यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये इरिट्रियााशी चर्चा न करता युद्ध समाप्त करण्याचा निर्णय घेतला, ज्याला 'प्रिटोरिया करार' (Cessation of Hostilities Agreement) म्हटले जाते. यामुळे इरिट्रिया नाराज झाले, आणि त्यांच्या निराशेचे प्रतिबिंब इरिट्रियन राष्ट्राध्यक्ष इसायास अफवेरकी यांनी कराराचे वर्णन करत असताना दिसले - 'टेकोलिफना' (आपण निराश झालो आहोत). जरी प्रिटोरिया करारात 'परदेशी सैन्यांचा माघार' घेण्याचा उल्लेख होता, तरी इरिट्रियाने या करारावर स्वाक्षरी केली नव्हती आणि त्यांनी इथिओपियामध्ये काही सैन्य ठेवले होते.
त्यानंतर, आणखी एक लष्करी गट, ज्याला 'फानो' म्हणून ओळखले जाते, हा एक जातीय-राष्ट्रीयवादी गट आहे, जो अंहाराचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करतो (इथिओपियाचा दुसरा सर्वात मोठा जातीय गट, ज्याने TPLF विरुद्ध राष्ट्रीय सैन्याच्या सोबत लढा दिला) हा गट एप्रिल 2023 पासून राष्ट्रीय सैन्याविरुद्ध लढत आहे. 'फानो' हे नाव ढोबळमानाने स्वातंत्र्यसेनानी म्हणून अनुवादित करता येते, आणि 1930 च्या दशकात इटालियन फॅसिस्ट सत्ताधारींविरुद्ध इथिओपियामध्ये स्वयंसेवी सैन्याच्या यशस्वी मोहिमेपासून यांचा उगम झालेलाआहे.
फानोने सरकारविरुद्ध शस्त्र उचलले कारण त्यांना प्रिटोरिया करारापासून वगळले गेले आहे, अशी त्यांची भावना होती. प्रिटोरिया कराराच्या एक महत्त्वाचा कलमाने सर्व प्रादेशिक सैन्य गट जसे की TPLF, फानो आणि OLA यांना विस्कळीत केले. फानोने या मागणीला त्यांच्या अस्तित्वासाठी धोका मानला, विशेषत: टिग्राय आणि ओरोमिया या प्रतिस्पर्धी प्रादेशिक गटांकडून संभाव्य आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर.
फानोने सरकारविरुद्ध शस्त्र उचलले कारण त्यांना प्रिटोरिया करारापासून वगळले गेले आहे, अशी त्यांची भावना होती.
त्यानंतर, जानेवारी 2024 मध्ये, पंतप्रधान अबी अहमद यांनी सोमालियापासून वेगळे झालेले प्रदेश सोमालिलँड यांच्यासोबत एक वादग्रस्त करार करून रेड सी बंदर मिळवण्याचा आपला हेतू जाहीर केला. याला प्रत्युत्तर म्हणून इरिट्रियाने इजिप्त आणि सोमालिया यांच्यासोबत एक सुरक्षा करार केला, ज्याद्वारे इथिओपियाच्या संभाव्य सीमावादात्मक (irredentist) पावलांचा सामना करता येईल. त्यानंतर इथिओपियाने इरिट्रिया सीमेजवळ सैन्याची तैनाती केली आणि इरिट्रियाने देशव्यापी लष्करी तयारी सुरू केली, ज्यामुळे अफ्रिकेच्या हॉर्न प्रदेशात तणाव वाढला असून युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.
जरी प्रिटोरिया करारामुळे टिग्रायचा राष्ट्रीय सैन्याशी असलेला संघर्ष संपला, तरी यामुळे टिग्रायमध्ये दोन गट पडले — TPLF आणि टिग्राय अंतरिम प्रशासन (TIA). शांतता करारानंतर, एक सर्वसमावेशक अंतरिम प्रशासन स्थापन करण्यात आले, ज्याला इथिओपियन सरकारसोबत शांततेत संवाद साधून मतभेद सोडवण्याचा अधिकार देण्यात आला. मात्र, सत्तेचा प्रभाव कमी होईल या भीतीने आणि अंतरिम प्रशासन टिग्रायच्या हिताविरुद्ध काम करत असल्याचा आरोप करत, TPLF मधील एक गट ज्याचे नेतृत्व सध्या TPLF चे अध्यक्ष देब्रेचिओन गेबरमायकेल करत आहेत त्यांनी अंतरिम सरकारविरोधात बंड केले आणि केंद्र सरकारने नियुक्त केलेले अंतरिम अध्यक्ष गेतेच्यू रेडा यांना सत्तेवरून हटवले. या गटाकडून इरिट्रियाशी हातमिळवणी करून केंद्र सरकारविरोधात लढा देण्याची शक्यता विशेषतः सध्या फारच जास्त आहे. एकंदर, इथिओपिया आणि इरिट्रिया हे प्रतिस्पर्धी गटांना पाठिंबा देत असल्याचे दिसत असताना, टिग्रायमध्ये आणखी एक अप्रत्यक्ष (proxy) युद्ध सुरू झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
हे इथिओपियन "ग्राऊंडहॉग डे" म्हणजे दर काही वर्षांनी एकदा टिग्रायने नेतृत्व केलेले बंड उफाळून येणे, यावर दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. इथिओपियाच्या संविधानातील अनुच्छेद ३९ प्रत्येक प्रदेशाला स्वातंत्र्य घोषित करण्याचा अधिकार देते आणि त्या प्रदेशातील खाजगी लष्कराला राष्ट्रीय सैन्याच्या समांतर कार्य करण्याची मुभा देखील देते. ही प्रादेशिक सत्तेची विभागणी इथिओपियाच्या राष्ट्राच्या स्थैर्यासाठी एक मोठे आव्हान ठरत आहे.
इथिओपियाच्या संविधानातील अनुच्छेद ३९ प्रत्येक प्रदेशाला स्वातंत्र्य घोषित करण्याचा अधिकार देते आणि त्या प्रदेशातील खाजगी लष्कराला राष्ट्रीय सैन्याच्या समांतर कार्य करण्याची मुभा देखील देते.
अफ्रिकेच्या हॉर्नमध्ये शांततेचा मार्ग फक्त स्थानिक देशांपुरता मर्यादित न ठेवता, मध्यपूर्वेतील देशांचाही सहभाग असावा. तुर्कि आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांची या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे, आणि त्यामुळे ते या भागात अस्थिरता येऊ देण्यास अनिच्छुक असतील. इजिप्त हा देखील या भागातील एक महत्त्वाचा देश आहे. जरी एक दुर्बल इथिओपिया हे इजिप्तसाठी फायदेशीर ठरू शकते, विशेषतः नाईल नदीच्या पाण्याच्या वाटपावरून आणि ग्रँड इथिओपियन रिनेसाँस डॅम (GERD) वरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, तरी जर हा संघर्ष नियंत्रणाबाहेर गेला, तर ही परिस्थिती इजिप्तलाही मोठा फटका देऊ शकते. याशिवाय, रेड सी जलमार्गात गोंधळ माजल्यास सुएझ कालव्यातून होणाऱ्या व्यापारावर परिणाम होईल जो इजिप्तच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे.
मागच्या वेळेस, इथिओपियाने तुर्कि आणि चीनमध्ये तयार झालेल्या ड्रोनच्या साहाय्याने TPLF ला नियंत्रणात ठेवले. मात्र यावेळी, विशेषतः फानो सारख्या विद्रोही गटांकडेही अवजड तोफखाने आणि आधुनिक शस्त्रसज्ज प्रणाली आहेत. जर हे बाह्य घटकांनी आपले स्वार्थी हितसंबंध जपण्यासाठी वेगवेगळ्या विद्रोही गटांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यास, त्याचा परिणामी म्हणून एक न संपणारे गृहयुद्ध (सिव्हिल वॉर) होऊ शकते.
इथिओपियामध्ये पुन्हा एकदा "ग्राऊंडहॉग डे" ची पुनरावृत्ती होत आहे. मात्र यावेळी परिस्थिती अधिक गंभीर असून, त्याचे परिणाम संपूर्ण प्रादेशिक स्थैर्यावर होतील. जर इथिओपिया आणि इरिट्रिया यांच्यात पुन्हा संघर्ष भडकला, तर त्याचे परिणाम या आधीच अस्थिर असलेल्या प्रदेशावर दूरगामी ठरू शकतात. यामुळे उरलेले सूदान पूर्णपणे नष्ट होऊ शकते, चाड अस्थिर होऊ शकतो, आणि साहेलपासून रेड सीपर्यंत एक अस्थिरतेचा परिसर (कॉरिडॉर) निर्माण होऊ शकतो. संपूर्ण प्रदेश अत्यंत नाजूक समतोलावर उभा आहे, आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने अजून एक युद्ध सुरू होण्याच्या आधीच अफ्रिकेच्या हॉर्नमध्ये संघर्ष टाळण्यासाठी पावले उचलणे ही काळाची गरज आहे.
समीर भट्टाचार्य हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये असोसिएट फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Samir Bhattacharya is an Associate Fellow at ORF where he works on geopolitics with particular reference to Africa in the changing global order. He has a ...
Read More +