Author : Rajeev Jayadevan

Published on Nov 20, 2023 Commentaries 3 Hours ago

तरुण प्रौढांमध्ये मृत्यूचे अचानक प्रमाण वाढलेली आहे असे एका अभ्यासातून समोर आलेले आहे. यागोष्टीचे मात्र covid-19 लसीकरणाची फारसा संबंध नसून जीवनशैलीशी बरेच काही जुळणारे आहे.

तरुण प्रौढांमधील अचानक वाढलेल्या मृत्यूचे गूढ

जेव्हापासून covid-19 च्या साथीच्या रोगाची सुरुवात झाली तेव्हापासून तुलनेने तरुण प्रौढांमध्ये अचानक मृत्यूचे प्रमाण वाढले असून ही सार्वजनिक चिंतेचा विषय झाली आहे. या विषयाचा काही अभ्यासकांनी असा अंदाज लावला आहे की कोविड-19 च्या लसीकरणाशी याचा संबंध जोडला आहे. कोविड-19 ची नवीन आता तसेच लसीकरण लक्षात घेता वरील आधाराला एक प्रकारे सहाय्य मिळाले आहे. या लेखातून वरील विषयावरील स्पष्टता प्रदान करण्यात आली आहे असून साथीच्या आजारापूर्वीच्या संबंधित वैज्ञानिक आधाराचा सारांश दिलेला आहे. त्याबरोबरच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या माध्यमातून केलेल्या नवीन संशोधनावर चर्चा देखील करतो.

तरुण प्रौढांचे मृत्यू अचानक का होत आहेत?

वयोमानानुसार वृद्ध लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असते, ही गोष्ट खरी असली तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की निरोगी तरुणांचा देखील अचानक मृत्यू होऊ शकतो. अशा काही घटनांमध्ये मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदनानंतर अभ्यासातून समोर येते. भूतकाळात, पूर्व चेतावणी किंवा स्पष्ट कारणाशिवाय अचानक मरण पावलेल्या तरुण प्रौढांवर अशा स्वरूपाचे अभ्यास करण्यात आले आहेत.

या अभ्यासामध्ये असे देखील आढळून आले आहे की, सर्वात तरुण प्रौढांमधील अचानक मृत्यू अनेक कारणांमुळे होत असतात. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे मृत्यू सर्व हृदयाशी संबंधित नाही. अशा मृत्यू मधील काही गोष्टी शवविच्छेदनानंतरही जवळपास पाच ते दहा टक्के अस्पष्ट राहतात. हृदयाच्या गतीशी संबंधित असलेल्या गोष्टींमध्ये भारताच्या संदर्भात बोलायचे झाल्यास अन्य कारणांमध्ये संक्रमण स्ट्रोक आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि श्वसन या आजारांचा समावेश होतो. 2011 मध्ये केलेल्या सर्व विच्छेदनाच्या अभ्यासात असे उघड झाले आहे की, ज्यामध्ये विशेषतः 18-35 वर्षे वयोगटातील भारतातील लोकांमध्ये अचानक मृत्यूचा प्रामुख्याने विचार केला गेला आहे. याबरोबरच, वृद्ध वयोगटांमध्ये, आकस्मिक मृत्यूचे मोठे प्रमाण हृदयाशी संबंधित कारणांमुळे होतात. 20 ते 30 वयोगटातील आकस्मिक मृत्यूचे कारण तपासण्यासाठी 2002 मध्ये भारतात शवविच्छेदनाच्या संदर्भातील एक अभ्यास प्रसिद्ध झाला आहे, यामध्ये असे म्हटले आहे की 77 टक्के मृत्यू हे कोरोनरी हृदयरोगामुळे झालेले होते; या अभ्यासामध्ये आणखी काही कारणे दिली आहेत ज्यामध्ये, एओर्टोआर्टेरिटिस, कार्डिओमायोपॅथी आणि स्ट्रोक यांचा समावेश आहे.

मृत्यूचे खरे कारण केवळ शवविच्छेदन अभ्यासातून उघड झाले आहे. पूर्वी, पूर्व चेतावणी किंवा स्पष्ट कारणाशिवाय अचानक मरण पावलेल्या तरुण प्रौढांवर अशा स्वरूपाचे अभ्यास करण्यात आले आहेत.

भारतात तरुण प्रौढांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता किती?

अभ्यासा असा सांगतो की दक्षिण आशियातील हृदयविकाराचे निम्मे झटके हे 52 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना येतात. याचे अंशता कारण म्हणजे पाश्चात्य देशांप्रमाणेच भारताची लोकसंख्या तुलनेने तरुण आहे. ज्याचे सरासरी वय केवळ 28 वर्ष आहे. याचा एक अर्थ असा निघतो की भारताची निम्मे लोकसंख्या 28 वर्षापेक्षा कमी आहे, म्हणजेच भारतामध्ये तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे.

2011 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका महत्त्वाच्या संशोधन पेपरमध्ये केरळमधील अनेक गावांमध्ये पाच वर्षांत मृत्यूचे नमुने आढळून आले. 1,61,942 लोकसंख्येतील 4,271 मृत्यूंचे विश्लेषण केल्यानंतर, लेखकांना असे आढळून आले की 35-44 वर्षे वयोगटातील तरुण प्रौढांमध्ये, कोरोनरी धमनी रोगामुळे मृत्यूची वार्षिक शक्यता पुरुषांमध्ये प्रति 100,000 व्यक्तींमध्ये 59 आणि महिलांमध्ये 17 प्रति 100,000 होती. या वयोगटातील पुरुषांमध्ये दरवर्षी 1:1,700 मृत्यूच्या जोखमीचे प्रमाण आहे. मोठ्या लोकसंख्येला लागू केल्यास, मृत्यूची एकूण संख्या लक्षणीय असण्याची शक्यता आहे. वाढत्या वयानुसार हा धोका वाढत जातो, विशेषत: उपखंडात पारंपारिक कोरोनरी जोखीम घटक सामान्य आहेत.

कोविड लसीकरणाचा परिणाम

गेल्या काही वर्षातील अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की, कोविड-19 हा केवळ श्वसनाचा आजार किंवा सामान्य सर्दी नाही. रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तरांवर परिणाम करू शकणारा हा आजार आहे. साथीच्या रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, कोविड-19 मुळे होणारे मृत्यू न्यूमोनिया, फुफ्फुसांच्या गुठळ्या, हृदयरोग, मायोकार्डिटिस, सेप्सिस, मूत्रपिंड निकामी होणे आणि पक्षाघातामुळे झाले आहेत.

या अभ्यासामध्ये एका वर्षात 6.5 टक्के असा उच्च मृत्यू दर आढळून आला आहे. विशिष्ट जोखीम घटकांमध्ये वय-विशिष्ट कारणे आणि पूर्व-अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय परिस्थितींचा समावेश होतो.

आयसीएमआरच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासात कोविड-19 पासून वाचल्यानंतर भारतभरातील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झालेल्या 14,419 लोकांचा कोर्स आढळून आला. या अभ्यासामध्ये एका वर्षात 6.5 टक्के असा उच्च मृत्यू दर आढळून आला आहे. विशिष्ट जोखीम घटकांमध्ये वय-विशिष्ट कारणे आणि पूर्व-अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय परिस्थितींचा समावेश होतो. या विलंबित मृत्यूची मुख्य कारणे म्हणजे हृदय आणि फुफ्फुसाचे आजार होय. लसीकरण न झालेल्या लोकांच्या तुलनेत त्यांच्या नंतरच्या एका वर्षाच्या कालावधीत लसीकरण झालेल्या लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी असल्याचे या अभ्यासामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

आकस्मिक मृत्यूंवरील ताज्या ICMR अभ्यासात काय आढळले?

ICMR च्या दुसर्‍या अभ्यासात 18 ते 45 या वयोगटातील 729 अशा व्यक्तींचा शोध घेण्यात आला ज्यांचे स्वास्थ्य चांगले असूनही त्यांचा अचानकपणे मृत्यू झाला होता. 1 ऑक्टोबर 2021 आणि 31 मार्च 2023 दरम्यान झालेल्या मृत्यूंचा अभ्यास करण्यात आला होता. ज्यामध्ये मुळात डेल्टा कालखंडाच्या शेवटच्या भागाचा समावेश होता—कोविड-19 च्या डेल्टा प्रकाराच्या प्रसाराने चिन्हांकित केलेला कालावधी—ओमिक्रॉन युगातील संक्रमण. मागील ICMR अभ्यासाप्रमाणे हे संशोधन निवडकपणे कोविड-19 असलेल्या लोकांकडे पाहत नसून अचानक मृत झालेल्या मृत्यूचा अभ्यास करणे हे विशेष काम आहे.

मरण पावलेल्या 729 लोकांची तुलना वय, लिंग आणि स्थानिकतेच्या 2,916 नियंत्रणांशी केली गेली आहे. त्याच लोकसंख्याशास्त्रीय गटातील इतर लोकांच्या तुलनेत अचानक मरण पावलेल्यांमध्ये विशिष्ट जोखीम घटक आहेत का हे शोधण्याचा उद्देश होता. जोखीम घटक ओळखले गेले ते म्हणजे धूम्रपान, जास्त मद्यपान आणि मृत्यूच्या काही काळापूर्वी तीव्र शारीरिक क्रियाकलाप. याशिवाय ज्यांना कोविड-19 मुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, कुटुंबात आकस्मिक मृत्यूचा इतिहास असलेले लोक आणि लसीकरण न केलेल्या व्यक्तींनाही अचानक मृत्यू होण्याची शक्यता असते.

अभ्यासात असे म्हटले आहे की लसीकरणामुळे अचानक मृत्यूचा धोका वाढला नाही. याउलट, लेखकांनी नोंदवले आहे की लसीकरणामुळे प्रौढांमधील अचानक मृत्यूचा धोका कमी झाला आहे.

या सगळ्याचा अर्थ काय?

कोविड-19 लसीकरणामुळे तरुणांचा मृत्यू होत असल्याच्या सामान्यतः ऐकलेल्या आरोपांना या अभ्यासाने खोटे ठरवले आहे. अशी विधाने सोशल मीडियावर वारंवार अग्रेषित केली जातात आणि प्रत्येक वेळी प्रख्यात व्यक्तीचे अचानक निधन झाल्यावर, कारण काहीही असले तरी ते पुन्हा प्रसारित केले जातात.

विकसनशील देशांमधील तरुण प्रौढांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांबद्दल आधीच काय माहित होते याची पुष्टी देखील अभ्यासाने केली आहे: तंबाखू आणि अल्कोहोलचा वापर हे ओळखले जाणारे जोखीम घटक आहेत. हे मूळतः द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या INTERHEART अभ्यासात दर्शविले गेले होते.

तरुण लोकांमध्ये अचानक मृत्यूचा धोका कसा कमी करायचा?

1.  तंबाखूचा वापर आणि मद्यपान टाळा.

   छातीत दुखणे किंवा धाप लागणे अशी लक्षणे आढळल्यास, कारण निश्चित करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार कृती करावी.

2.  संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैलीसह नियमित व्यायाम दीर्घकालीन आरोग्यास प्रोत्साहन देत राहते.

3.  ज्यांना लहान वयात हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास आहे, त्यांना अतिरिक्त चाचण्यांची आवश्यकता असू शकते आणि त्यांनी त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.

4.  लठ्ठपणा, रक्तातील साखर, बीपी आणि एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी यासारख्या बदलण्यायोग्य जोखीम घटकांवर नियंत्रण केल्याने हृदयविकाराचा संपूर्ण धोका कमी होईल.

5. नवीनतम ICMR अभ्यास दर्शवितो की लसीकरण केल्याने अचानक मृत्यूचा धोका वाढतो याची काळजी करण्याची गरज नाही. दुसरीकडे, कोविड-19 स्वतःहून भविष्यात अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढवते.

6. यामध्ये लाँग कोविड-संसर्गानंतर आठवडे किंवा महिने टिकणारी एकापेक्षा जास्त प्रदीर्घ लक्षणे असणे-तसेच वाढलेले मृत्युदर, विशेषत: ज्यांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असते त्यांच्यामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे, कोविड-19 चा धोका कमी करण्याच्या धोरणांना एक प्रकारे मदत होईल.

COVID-19 नंतरचा व्यायाम धोकादायक आहे का?

यासंदर्भात अभ्यास असे सांगतो की, नियमित क्रियाकलाप, नियमित व्यायाम आणि कठोर व्यायाम यामध्ये फरक करणे महत्त्वाचे आहे. नेहमीच्या क्रियाकलापांमध्ये प्रासंगिक चालणे आणि घरगुती कामे करणे समाविष्ट आहे. नियमित व्यायामामध्ये वेगवान चालणे, हलके जॉगिंग आणि पोहणे यांचा समावेश होतो. कठोर व्यायामाच्या उदाहरणांमध्ये अर्ध-मॅरेथॉन धावणे किंवा व्यायामशाळेत जड वजन उचलणे यासारखे तीव्र व्यायाम करणे समाविष्ट आहे.

व्यायाम ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे आणि थोडासा व्यत्यय आरोग्यावर परिणाम करणार नाही.

ज्यांना अलीकडेच COVID-19 चा सामना करावा लागला आहे, अशा बहुतेक लोकांमध्ये नियमित क्रियाकलाप लवकर पुन्हा सुरू केला जाऊ शकतो. परंतु त्यांनी व्यायाम पुन्हा सुरू करण्याबाबत तुलनेने सावध असले पाहिजे. जर व्यक्तीची तब्येत चांगली असेल, कोविड-19 सौम्य असेल,  कोणतीही लक्षणे उरलेली नसतील, तर नियमित व्यायाम 7-14 दिवसांनी पुन्हा सुरू केला जाऊ शकतो. शरीराच्या प्रतिसादाचे काळजीपूर्वक निरीक्षण करून हळूहळू सुरुवात करणे, आठवड्यांच्या कालावधीत हळूहळू वाढ करणे चांगले राहणार आहे. नियमित व्यायाम ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे, थोडासा व्यत्यय आरोग्यावर परिणाम करणार नाही, म्हणून यासंदर्भात सौम्य आणि सूक्ष्मदृष्टिकोन घेणे नेहमीच शहाणपणाचे ठरणार आहे.

दुसरीकडे, अंतर्निहित आरोग्य स्थिती असलेले लोक, ज्यांना लक्षणे जाणवतात आणि ज्यांना COVID-19 नंतर कठोर व्यायाम करायचा आहे त्यांनी त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

ICMR च्या ताज्या अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, तीव्र शारीरिक क्रियाकलाप आणि गंभीर COVID-19 हे तरुण प्रौढांमध्ये अचानक मृत्यूचे धोकादायक घटक म्हणून ओळखले गेले आहेत. त्यामुळेच ज्या व्यक्तींना COVID-19 चा गंभीर त्रास झाला आहे, त्यांनी व्यायाम करताना अधिक सावध राहण्याचा सल्ला वैद्यकीय अभ्यासकांनी दिलेला आहे. त्यांनी विशेषतः कठोर किंवा अनैतिक व्यायामापासून नेहमीच सावध राहिले पाहिजे.  सुरक्षितपणे व्यायाम करण्याबद्दल एखाद्या डॉक्टरशी संपर्क साधने त्यांच्यासाठी शहाणपणाचे ठरणार आहे.

डॉ. राजीव जयदेवन हे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोचीन शाखेचे माजी अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय IMA कोविड टास्क फोर्सचे सह अध्यक्ष देखील आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Rajeev Jayadevan

Rajeev Jayadevan

Dr Rajeev Jayadevan MD DNB MRCP (UK) ABIM (Medicine New York) is a former president of the Cochin Chapter of the Indian Medical Association. He ...

Read More +