Author : Jacob Ninan

Published on Aug 14, 2023 Commentaries 0 Hours ago

सॉफ्टवेअर सेवा उद्योगात AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेला महत्त्व प्राप्त होत आहे. त्यामुळे भारतातील टेक कंपन्या याला कसे सामोरे जातात त्यावर या क्षेत्रातली रोजगार निर्मिती अवलंबून आहे.

AI मुळे सॉफ्टवेअर क्षेत्रात होणारे आमूलाग्र बदल

सॉफ्टवेअर सेवा उद्योगात अभूतपूर्व परिवर्तन होते आहे. नव्याने विकसित होणारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान या उद्योगाची स्वरूपच बदलून टाकणार आहे. यामुळेच टेक कंपन्या आपल्या अनेक दशकांपासून यशस्वी ठरलेल्या व्यवसायाच्या मॉडेलचे पुनर्मूल्यांकन करत आहेत. AI, Blockchain आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर, जागतिक स्तरावरच्या आर्थिक घडामोडी, भू-राजकीय अशांतता, काही काळापुरतीच रोजगाराची हमी देणारी आणि कामाचे स्वरूप सतत बदलवत ठेवणारी अर्थव्यवस्था, साॅफ्टवेअर उद्योगातल्या नव्या सेवा यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती होते आहे. यामुळेच हे क्षेत्र संक्रमणाच्या एकेक टप्प्यातून जाते आहे. AI, Blockchain आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) अशी तंत्रज्ञाने विकसित झाल्याने हे बदल महाकाय स्वरूपाचे असणार आहेत.

1967 मध्ये TCS ची सुरुवात

सॉफ्टवेअर उद्योगाने 1960 च्या दशकात जागतिक स्तरावर आकार घेतला आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सॉफ्टवेअर विकास, देखभाल आणि तंत्रज्ञानाच्या वापरासाठी अनेक प्रकारचे व्यवसाय निर्माण झाले. भारतात 1967 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ची मुंबईत स्थापना झाली आणि या उद्योगाचा प्रसार झाला. Burroughs सोबतच्या भागीदारीनंतर TCS ही 10 वर्षांनंतर भारतातील पहिली सॉफ्टवेअर सेवा निर्यातदार कंपनी बनली. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारने IT क्षेत्राला प्राधान्य दिल्यापासून TCS, Infosys, Wipro आणि HCL यांसारख्या भारतीय कंपन्यांनी त्यांचा प्राथमिक व्यवसाय म्हणून सॉफ्टवेअर सेवा वितरीत केली आणि जागतिक स्तरावर आपली ठसा उमटवला.

जागतिक स्तरावर सॉफ्टवेअर उद्योगाने 1960 च्या दशकात आकार घेतला आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सॉफ्टवेअर विकास, देखभाल आणि प्रकाशनासाठी व्यवसाय समाविष्ट केले.

2021-22 मध्ये भारताची सॉफ्टवेअर सेवांची निर्यात 17.2 टक्क्यांनी वाढून 156.7 अब्ज अमेरिकी डाॅलर इतकी झाली आहे. यामध्ये व्यावसायिक क्षेत्रातली निर्यात धरलेली नाही. ती ही लक्षणीय आहे. भारतातल्या IT-बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (BPM) क्षेत्रात मार्च 2022 पर्यंत 48 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला. सॉफ्टवेअर उत्पादनांबद्दलच्या राष्ट्रीय धोरण 2019 नुसार भारत सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रात 10 हजार तंत्रज्ञान स्टार्टअप कंपन्या निर्माण करेल. यामध्ये टियर 2 आणि 3 टाउनमधील 1 हजार कंपन्यांचा समावेश आहे. यामुळे 2025 पर्यंत 35 लाख नोकऱ्या निर्माण होतील आणि भारतीय विद्यापीठांमधून पदवीधर झालेल्या तरुणांना याचा मोठा लक्षणीय फायदा मिळेल.

ChatGPT मुळे नवे आव्हान

हा आशादायक वाढ निर्देशांक भारताच्या सॉफ्टवेअर सेवा क्षेत्राच्या प्रगतीचे लक्षण आहे. आता मात्र नव्या तंत्रज्ञानामुळे कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन हे आव्हान टेक कंपन्यांसमोर आहे. 2023 हे वर्ष या आघाडीवर फारच आव्हानात्मक आहे. अनेक आयटी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचारी वर्गात कपात केली आहे. स्टॅबिलिटी एआयचे सीईओ इमाद मोस्ताक यांनी तर असे भाकीत केले आहे की भारतातील अनेक कोडर AI मुळे त्यांच्या नोकऱ्या गमावतील. कारण सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी आता खूपच कमी लोकांची आवश्यकता आहे. सॉफ्टवेअर उत्पादनांवरील राष्ट्रीय धोरण 2019 मध्ये भारत सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रात 10,000 तंत्रज्ञान स्टार्टअप्स निर्माण करेल, ज्यात 1,000 टियर 2 आणि 3 शहरांमध्ये आहेत, ज्यामुळे 2025 पर्यंत 3.5 दशलक्ष रोजगार निर्माण होतील.

या सगळ्या कंपन्यांसमोर सारखेच आव्हान आहे. ते म्हणजे प्रकाशाच्या वेगाने फिरत असलेल्या तंत्रज्ञानातील बदलांना सामोरे जाण्यासाठी आपल्या व्यवसायाच्या स्वरूपात बदल कसा करायचा? विशेषत: गेल्या 6-9 महिन्यांत, ChatGPT ने आपल्या AI क्षमतेमुळे जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ChatGPT, AI चॅटबॉट हे मानवी प्रॉम्प्टवर आधारित प्रश्नांची उत्तरे देणार्‍या सहाय्यकासारखे काम करतात. विपणन आणि अभियांत्रिकी यांसारख्या वैविध्यपूर्ण उद्योगांमधील कल्पना आणि सर्जनशील प्रक्रिया यामुळे सतत बदलत राहतात.

दुसरे एक साधन आहे GitHub Copilot. या तंत्रज्ञानाने प्रमुख सॉफ्टवेअर भाषांमध्ये कोडिंगची क्षमता विकसित केली आहे. त्यामुळे AI वर आधारित कोड विकासनाच्या क्षेत्रात क्रांती केली आहे. त्याचप्रमाणे, Databricks ने एक AI टूल निर्माण केले आहे. हे टूल इंग्रजी इनपुट स्वीकारते आणि आवश्यक कोड तयार करून देते.

ही साधने आज कुणासाठीही उपलब्ध आहेत. भारतीय बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (बीपीओ) उद्योगाद्वारे दीर्घकाळापासून चांगली ग्राहक सेवा ही चॅटबॉट्सच्या प्रगतीची साक्ष आहेत. ही सेवा माणसांच्या जागी तंत्रज्ञानाची नियुक्ती करते आहे आणि ती आता या क्षेत्राचे भविष्य म्हणून ओळखली जाते.

माणसांच्या जागी यंत्रे या साधनांचा सतत वापर होत असल्याने त्यामध्ये माहितीचे संकलन होत राहते. त्याचबरोबर हे तंत्रज्ञान मानवी प्रतिक्रियांमधून शिकत राहते! त्याचा जेवढा वापर होईल तेवढ्या त्यात सुधारणा होत राहतील आणि ते अचूक होत जाईल. हे तंत्रज्ञान कदाचित आज परिपूर्ण नसेल परंतु ते सध्या प्रायोगिक अवस्थेत आहे आणि त्याची शिकण्याची क्षमता जलद असल्यामुळे ते पुरेसेही आहे. सॉफ्टवेअर सेवा व्यवसाय प्रामुख्याने त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येवर तसेच वेगवेगळ्या विभागांवर अवलंबून असतो. मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये सहसा हजारो कर्मचारी असतात. अनेक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे योग्य साधने असली तर या कंपन्यांची कमाईही वाढते. या स्थितीत भारतीय आयटी कंपन्यांना मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे.

नेहमीच्या आणि पारंपरिक स्पर्धकांव्यतिरिक्त आता या क्षेत्रात अशा काही कंपन्या उतरल्या आहेत ज्या विशिष्ट ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी AI वर आधारित साधने विकसित करत आहेत. सॉफ्टवेअर सेवा कंपन्यांच्या पारंपारिक ग्राहकांना या समान साधनांमध्ये प्रवेश आहे. यापैकी अनेक ओपन-सोर्स प्रकार आहेत.

ते देखील आता या साधनांचा लाभ घेऊ शकतात आणि AI च्या क्षमतेमुळे कमी संसाधनामध्ये मोठी झेप घेऊ शकतात. अशा प्रकारे एआय टूल्ससह काम करणारी आणि कमी कर्मचारी असलेली कंपनी सॉफ्टवेअर सेवा व्यवसाय मॉडेलमध्ये आमूलाग्र बदल घडवू शकते. या कंपन्या कमी किंमतीत जास्त सेवा देऊ शकतात. मानवी क्षमता विरुद्ध AI यामधल्या संतुलनामुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होईल आणि एआयचा फायदा घेणाऱ्या आणि न घेणाऱ्या कंपन्यांमध्ये स्पष्टपणे फरक जाणवू लागेल. AI च्या साधनांचा वापर करून सॉफ्टवेअर डेव्हलपर्सनी 30 ते 50 टक्क्यांनी आपली उत्पादकता वाढल्याची नोंद केली आहे.

नवीन AI वर आधारलेल्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रात सामावून घेण्यासाठी कंपन्यांना सध्याच्या व्यवसायाच्या मॉडेलमध्ये बदल करणे आवश्यक आहे.

एआय टूल्सचा वापर करून कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढवण्याची संधी आहे. त्यामुळे कंपन्या आता कर्मचाऱ्यांची भरती करताना जास्तीत जास्त कौशल्यं असणाऱ्यांना प्राधान्य देतील. त्याबरोबरच या कर्मचारी भरतीची खरंच आवश्यकता आहे का याचाही या कंपन्या विचार करतील. या बदललेल्या व्यावसायिक वातावरणासाठी आवश्यक कौशल्यांचा संच देखील भिन्न असेल. व्यवसाय प्रक्रिया, डेटा आणि AI मार्फत संसाधनांमध्ये प्रवेश असलेल्या सॉफ्टवेअर सेवा कंपन्यांना यापुढे चांगली संधी असेल. उत्पादकता वाढवण्यासाठी AI ची मदत नवे संशोधन, नव्या कल्पना ही बदलत्या काळाची गुरुकिल्ली आहे. या नवीन AI आधारित संरचनेमध्ये चांगला लाभांश देणार्‍या बिझनेस मॉडेलवर पुन्हा काम करणे आवश्यक आहे. या बदलांना सामोर जाण्यासाठी केवळ टेक कंपन्याच नव्हे तर आर्थिक संस्था, सरकारे आणि नागरी समाज यासारख्या इतर भागधारकांकडूनही पुढाकाराची आवश्यकता आहे.

याचे नेमके परिणाम अजून दिसून आलेले नाहीत पण अनेक टेक कंपन्यांनी AI हा एक महत्त्वाचा घटक असल्याचे मान्य करून त्या दिशेने काम सुरू केले आहे. AI मुळे नोकऱ्यांची संधी 2025 पर्यंत AI हे 97 दशलक्ष नव्या नोकर्‍या निर्माण करेल, असे भाकित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने केले आहे. स्वयंचलित यंत्रणा, AI आणि परिणामी कर्मचारी आणि नव्या तंत्रज्ञानामध्ये कामाची नवीन विभागणी होईल, असेही या फोरमने म्हटले आहे. पण त्याचबरोबर AI मुळे 15 उद्योग आणि 26 अर्थव्यवस्थांमध्ये लक्षणीय बदल होतील आणि 85 दशलक्ष नोकर्‍या निरर्थक बनतील, असाही या फोरमचा दावा आहे.

सॉफ्टवेअर सेवा उद्योगात AI ला महत्त्व प्राप्त होत असताना भारतातील टेक कंपन्या ही ‘माणूस विरुद्ध यंत्र’ अशी तारेवरची कसरत कशी पेलतात यावरच इथल्या सॉफ्टवेअर सेवा उद्योगाचे भवितव्य अवलंबून आहे. आणि त्यावरच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपण कसे आणि किती रोजगार निर्माण करतो हेही अवलंबून असणार आहे.

जेकब निनान हे Kottackal Business Solutions Private Ltd या सॉफ्टवेअर उत्पादन विकास कंपनीचे सह-संस्थापक आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.