एखाद्या देशाचे सशस्त्र दलच तिथली शांतता बिघडवणारे कृत्य करू शकते ही वस्तुस्थिती बहुतेक निरीक्षकांना विचित्र वाटू शकेल. परंतु अनेक धोरणकर्त्यांनी या मुद्द्याचा गांभिर्याने विचार केला आहे. चांगले नौदल म्हणजे युद्धाला चिथावणी देणे नव्हे. तर ही शांततेची खात्रीशीर हमी आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांनी 1902 मध्ये केले होते. रणनीतीचा सिद्धांत मांडणारे जॉन मियरशेइमर यांनी त्यांच्या 2004 च्या ‘मॅग्नम ओपस द ट्रॅजेडी ऑफ ग्रेट पॉवर पॉलिटिक्स’ या पुस्तकात या मताचा पुनरुच्चार केला आहे. प्रचंड मोठे सागरी प्रदेश हे आंतरराष्ट्रीय संघर्षांमधले नैसर्गिक अडथळे आहेत. यामुळे ऊर्जेच्या प्रक्षेपणातही समस्या निर्माण होतात, असे मियरशेमर यांचे म्हणणे आहे. जलशक्तीला आळा घालणे या तत्त्वाचे स्पष्टीकरण देताना त्यांनी ही संकल्पना मांडली आहे.
चांगले नौदल म्हणजे युद्धाला चिथावणी देणे नव्हे. तर ही शांततेची खात्रीशीर हमी आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांनी 1902 मध्ये केले होते.
सध्याच्या बहुध्रुवीय जगात सर्व स्तरांवरच्या नौदल युद्धाची शक्यता बोलून दाखवली जाते. समुद्रातल्या गुप्त कारवाया, पाणबुडी युद्धामध्ये मानवरहित वाहनांचा वापर हे एक वास्तव आहे. यामुळे वाढत्या आव्हानांना सामोरे जावे लागते आहे. आंतरराष्ट्रीय संघर्षात सागरी प्रदेश अडथळे बनतात या गृहितकालाही यामुळे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळेच विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी अशा गुप्त समुद्री कारवाया वेगाने केल्या जाऊ शकतात. मानवरहित सागरी वाहने हे या कारवायामधले सर्वात प्रभावी साधन ठरू शकते.
मानवरहित सागरी वाहने आणि गुप्त कारवाया
शीतयुद्धाच्या सुरुवातीच्या काळात मानवहरित सागरी वाहनांचा विकास सुरू झाला. आज वापरात असलेले अनेक प्रकारचे लष्करी तंत्रज्ञान हेही शीतयुद्धाच्या काळातच वापरले गेले. अमेरिकेच्या नौदलाच्या संशोधन कार्यालयाने 1950 च्या दशकात पहिल्यांदा मानवरहित सागरी वाहने म्हणजे UUV विकसित केली होती. अशी वाहने 2003 मध्ये लष्करी संदर्भात वापरली जात होती. उम्म कासर या इराकी बंदराजवळ समुद्रतळाच्या खाणी साफ करून हे बंदर निकामी करण्यासाठी संयुक्त सैन्याने UUV वापरली होती. तेव्हापासून जगभरातील अनेक देशांनी पाणबुडी युद्ध आणि गुप्चचर मोहिमांमध्ये UVV ची उपयुक्तता ओळखली आहे. त्याचबरोबर अशी सागरी वाहने ही गुप्त कारवाईचे साधनही आहेत. अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या आराखड्यानुसार अशा मोहिमा नियोजित मोहिमा म्हणून आखल्या जातात. या मोहिमा स्पष्टपणे समोर येत नाहीत आणि त्या उघड झाल्याच तर अधिकृत सरकार त्याची जबाबदारी नाकारू शकते.
अमेरिकेच्या नौदल संशोधन कार्यालयाने 1950 च्या दशकात पहिल्यांदा मानवरहित सागरी वाहने म्हणजे UUV विकसित केली होती. अशी वाहने 2003 मध्ये लष्करी संदर्भात वापरली जात होती. उम्म कासर या इराकी बंदराजवळ समुद्रतळाच्या खाणी साफ करून हे बंदर निकामी करण्यासाठी संयुक्त सैन्याने UUV वापरली होती.
अशा मोहिमांचा प्रभाव पूर्णपणे लपून राहू शकत नाही. त्यामुळेच या मोहिमांद्वारे धोरणात्मक वर्चस्व साध्य करणे आणि राजकीय लढाईसाठी त्याचा वापर करणे शक्य होते. UUV चे त्या त्या देशांना अनेक फायदे होतात. अशा वाहनांची विल्हेवाट समुद्रतळाशी लावता येते किंवा त्याचा सुगावा सहजासहजी लागू शकत नाही. पण त्याच वेळी या मोहिमांमधून प्रतिस्पर्ध्याला संदेश देता येतो आणि त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा हेतू साध्य होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात धोरणात्मक वर्चस्वही निर्माण होते.
CNI ला धमकी
सध्याची परस्परांवर अवलंबून असलेली जागतिक व्यवस्था पाहता समुद्राखालील पायाभूत सुविधांचा (CNIs) प्रसार हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे एक नवे क्षेत्र आहे. लष्करी उद्देशांसाठी UUV ची वाढ समुद्राखालील पायाभूत सुविधांच्या नेटवर्कशी जुळलेली आहे. या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा समुद्राखालच्या गुप्त कारवाया आणि मोहिमांद्वारे प्रकट होऊ शकते. सप्टेंबर 2022 मध्ये नॉर्डस्ट्रीम पाइपलाइन लगत झालेल्या स्फोटामुळे युरोपियन देशांना रशियाच्या नैसर्गिक वायूचा होणारा पुरवठा अंशतः विस्कळीत झाला. तसेच जानेवारी 2022 मध्ये आर्क्टिकमधील स्वालबार्ड द्वीपसमूह ते नॉर्वेजियन मुख्य भूभाग यांना जोडणाऱ्या फायबर-ऑप्टिक केबल्स रशियाने तोडल्या. हे दोन्ही हल्ले मानवरहित सागरी वाहनांचा वापर करूनच करण्यात आले. ही उदाहरणे पाहिली तर समुद्राखालील पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक संसाधनांची पुरवठा साखळी किंवा डेटा फायदा मिळवण्याचे साधन म्हणून व्यत्यय आणण्यासाठी UUV चा कसा वापर होतो हेच दिसून येते. यापैकी प्रत्येक प्रकरणात व्यत्ययाचा प्रभाव नाट्यमय होता आणि त्यामागे राजकीय हेतू होता. परंतु त्याच वेळी अशा गुप्त कारवायांमागे कोण आहे हे अधिकृतरित्या समजत नव्हते. लष्करी उद्देशांसाठी UUV ची वाढ समुद्राखालील पायाभूत सुविधांच्या नेटवर्कशी जुळलेली आहे. या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही समुद्राखालच्या गुप्त कारवाया आणि मोहिमांद्वारे प्रकट होऊ शकते.
अशा प्रकारच्या हवाई उपकरणांप्रमाणे UUV स्वस्तही आहेत. त्यामुळे गैरसरकारी हल्लेखोरांसाठी अशी सागरी वाहने आकर्षक पर्याय आहेत. अशा हल्लेखोरांकडे फारशी क्षमता नसली तरी UUV च्या मदतीने ते विरोधी देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकतात. मार्च 2024 मध्ये लाल समुद्रात तीन प्रमुख फायबर-ऑप्टिक केबल्सची तोडफोड झाली. ही यंत्रणा युरोपला आशिया आणि आफ्रिकेशी जोडते. त्यावरचा हल्ला हौथी अतिरेक्यांनी केला असावा, असा दावा करण्यात आला. हौथी अतिरेक्यांच्या येमेनमधील संघटनेला इराणचा पाठिंबा आहे. हौथी अतिरेक्यांनी या हल्ल्याची जबाबदारी नाकारली असली तरी याच अतिरेक्यांनी समुद्राखालील 'आत्मघातकी ड्रोन'चा वापर केला होता. हे ड्रोन स्वस्त आहेत. त्यांच्या किंमती 2 हजार अमेरिकी डाॅलर्स एवढ्या कमी आहेत. त्यामुळे अशी उपकरणे गैरसरकारी हल्लेखोरांच्या फायद्याची आहेत. अशा हल्ल्यांचे पुरावे नष्ट करता येतात. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय राजकारणावर मोठा प्रभाव पाडता येतो. मानवरहित सागरी वाहनांची उपयुक्तता सुरक्षेच्या दृष्टीने घातकच आहे परंतु त्यांच्या कमी किंमतींमुळे समुद्राखाली गुप्त कारवाया वेगाने करता येतात.
भविष्यातील परिणाम
आंतरराष्ट्रीय धोरणात्मक स्पर्धेत सागरी क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध गुप्त कारवाईसाठी UUV चा वापर ही निर्णयकर्त्यांसाठीही महत्त्वाची बाब आहे. त्यांना UUV ची वाढ लक्षात घेऊन धोरणे आखावी लागणार आहेत. गुप्त कारवाईसाठी अशा सागरी वाहनांची उपयुक्तता लक्षात घेता अनेक देश UUV साठी अधिक गुंतवणूक करतील. यात खोल समुद्रातल्या शोधमोहिमांचा आणि त्यासाटी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
UUV च्या व्यत्ययामुळे देशांच्या फौजा तैनात करण्याचा व्यापक धोरणात्मक हेतूही कळू शकतो. याबाबतीत आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पेच निर्माण होऊ शकतो. जानेवारी 2021 मध्ये इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी पुरावा म्हणून दक्षिण चीन समुद्रात रोखलेल्या चीनी UUV मध्ये संग्रहित असलेली हायड्रोग्राफिक माहिती जारी केली. या पुराव्यामुळे चीनने आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचे उल्लंघन केल्याचे उघड झाले. रशियाच्या 'पोसेडॉन' जहाजांचे उदाहरण पाहिले तर स्टेल्थ तंत्रज्ञान हा UUV अभियांत्रिकीचाच एक भाग आहे. सरकारे समुद्राखाली पाळत ठेवण्याच्या अत्याधुनिक प्रणालींद्वारे स्टेल्थ तंत्रज्ञानाच्या नवीन प्रकारांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.
खाजगी शस्त्र विक्रेते, गुन्हेगारी उद्योग आणि सरकारे असे सर्वच जण सागरी वाहनांच्या या बाजारपेठेवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे स्पर्धा वाढू शकते आणि शेवटी विक्री खर्च देखील कमी होतो. त्यामुळे UUV चा प्रसार सुलभ होईल.
कमी खर्च आणि अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे समुद्राखालील आत्मघातकी ड्रोनची बाजारपेठ वाढणार आहे. त्यांची किंमत तर कमी असतेच पण अशी सागरी वाहने हल्ल्यानंतर संपुष्टात येतात. त्याचे कोणतेही पुरावे मागे उरत नाहीत. समुद्राखालील पायाभूत सुविधांवर सागरी वाहनांच्या हल्ल्यांचे पुरावे मिळवणे अधिक कठीण होण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या सैन्याने रशियाशी सुरू असलेल्या युद्धात अशी उपकरणे वापरली आहेत. त्याचप्रमाणे 2021 मध्ये इस्रायलच्या ऊर्जेच्या पायाभूत सुविधांवर आणि फायबर-ऑप्टिक केबल्सवर हल्ला करणाऱ्या हौथींसारख्या अतिरेक्यांनी याची झलकच दाखवून दिली. त्यामुळे अशा वाहनांची मागणी वाढते आहे. खाजगी शस्त्र विक्रेते, गुन्हेगारी उद्योग आणि सरकारे हे सर्वच घटक या बाजारपेठेवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे ज्यामुळे स्पर्धा वाढू शकते आणि शेवटी विक्री खर्च देखील कमी होतो. या कारणांमुळे UUV चा प्रसार सुलभ होण्याची शक्यता आहे.
कोणत्याही जबाबदारीशिवाय केलेले हल्ले आणि प्रतिस्पर्ध्यांवर प्रभावीपणे मात करण्याची संधी यामुळे अशा गुप्त कारवाया एक वाढता आकर्षक पर्याय आहे. सध्याच्या बहुध्रुवीय आणि परस्परांवर अवलंबून असलेल्या जगात धोरणकर्त्यांचा कल हा पर्याय निवडण्याकडे असेल. कारण यात कमी खर्चात जास्त फायदे आहेत. सध्या सागरी क्षेत्राचा वापर अधिकाधिक आंतरराष्ट्रीय धोरणात्मक स्पर्धेसाठी होऊ लागला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत राजकीय पटलावर जुळवून घेण्यासाठी गुप्त कारवायांचा हा पर्याय चांगला आहे. अशा गुप्त कारवाया देशांना धोरणात्मक लाभ मिळवून देतील आणि त्यांचे एकमेकांवरचे अवलंबित्वही कमी करतील. त्यामुळेच पाण्याखालच्या सागरी वाहनांची मागणी आणि पुरवठा वाढतच जाणार आहे.
अर्चिश्मन गोस्वामी हे ऑक्सफर्ड विद्यापीठाचे MPhil इंटरनॅशनल रिलेशन प्रोग्रॅमचे पदव्युत्तर विद्यार्थी आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.