Published on Oct 07, 2023 Commentaries 0 Hours ago

आव्हानांवर मात करण्यासाठी SDG 4 लक्ष्यांना आणि तरुणांना सक्षम करण्यासाठी व्यापक शैक्षणिक सुधारणा आवश्यक आहेत. तरुणांना पुढे नेण्यासाठी संधी देण्यासाठी हे प्रयत्न आवश्यक आहेत.

SDG 4 (गुणवत्ता शिक्षण): तरुणांना सक्षम करण्यासाठी व्यापक शैक्षणिक सुधारणा आवश्यक

आज तरुणांसमोरील आव्हाने अभूतपूर्व आहेत. महामारीने दिलेल्या लॉकडाऊनमुळे गमावलेल्या शैक्षणिक संधींपासून ते वाढत्या हवामानाच्या संकटापर्यंत, धोकादायक आभासी जागा आणि भू-राजकीय संघर्षांमुळे निर्माण झालेल्या अन्न आणि ऊर्जा सुरक्षेबद्दलची चिंता, यासारख्या अनेक समस्यांना त्यांना सामोरे जाणारे अडथळे आहेत. जे अतिशय गुंतागुंतीचे आणि एकमेकांशी जोडलेले आहेत. तथापि, जगभरातील तरुण लोक या आव्हानांना सामोरे जात आहेत. विविध संस्कृती भौगोलिक आणि विकास स्थिती विचारात घेणारे नाविन्यपूर्ण उपक्रम आजची तरुणाई शोधत आहे. शाश्वत विकास लक्ष्य (SDG) 4 विकास साधण्यासाठी दर्जेदार शिक्षणावरील भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. आधुनिक जगात तरुणांच्या भरभराटीसाठी, सर्वसमावेशक आणि न्याय्य दर्जाचे शिक्षण सुनिश्चित करणे, सर्वांसाठी आजीवन शिकण्याच्या संधींना प्रोत्साहन देणे’ हे उद्दिष्ट आहे.

Table 1: SDG 4 Scores (2023) 

Regions/Groupings SDG 4 Scores (out of 100)
Eastern Europe and Central Asia 87.9
East and South Asia 90.0
Latin America and the Caribbean 86.3
Middle East and North Africa 69.8
Oceania 58.0
OECD members 95.5
Small Island Developing States 75.5
Sub-Saharan Africa 41.4

Note: The 2023 SDG 4 scores are based on the following indicators:

1. Participation rate in pre-primary organised learning (% of children aged 4 to 6)

2. Net primary enrollment rate (%)

3. Lower secondary completion rate (%)

4. Literacy rate (% of the population aged 15 to 24)

5. Tertiary educational attainment (% of the population aged 25 to 34)

6. PISA score (worst 0-600 best)

7. Variation in science performance explained by socio-economic status (%)

8. Underachievers in science (% of 15-year-olds)

Source: Sustainable Development Report 2023, SDSN

शिक्षणात तंत्रज्ञानाची पुनर्कल्पना

COVID-19 साथीच्या रोगाने जागतिक स्तरावर शिक्षण प्रणाली विस्कळीत झाली आहे. ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शालेय वर्षे गमावली आहेत, त्याचा परिणाम म्हणजे शैक्षणिक असमानता वाढली आहे. यामुळे जागतिक स्तरावर उत्तर आणि दक्षिण यांच्यातील अंतर अधिकच वाढले आहे. महामारीच्या काळामध्ये निर्बंध व्यापक झाल्यामुळे, शाळा बंद कराव्या लागल्या, ज्यामुळे SDG 4 लक्ष्यांच्या प्राप्तीवर परिणाम झाला आहे. आरोग्याच्या चांगल्या पायाभूत सुविधा असलेले काही देश आणि प्रगत शैक्षणिक सुविधांमुळे शाळा पुन्हा सुरू करू शकतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, प्रगत अर्थव्यवस्थेतील मुलांनी 2020 मध्ये सरासरी 15 शालेय दिवस गमावले आहेत. याउलट, उदयोन्मुख-बाजारातील अर्थव्यवस्थांसाठी ही संख्या सरासरी 45 दिवसांपर्यंत वाढली तर सर्वात गरीब राष्ट्रांमधील मुलांसाठी ही संख्या तब्बल 72 दिवस इतकी होती. विकसित आणि विकसनशील देशांमधील शैक्षणिक नुकसानीतील या असमानता दूर करणे हे महामारीनंतरच्या पुनर्प्राप्ती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बनले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची दीर्घकालीन समष्टि आर्थिक संरचना ते निर्धारित करतात ज्यामध्ये तरुणाई महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

मानवी भांडवल उभारणीत सुधारणा करण्यासाठी आणि न्याय्य दर्जाचे शिक्षण मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षणातील संरचनात्मक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तंत्रज्ञान हे एक शक्तिशाली साधन ठरले आहे. त्यात ज्ञानाच्या प्रवेशाचे लोकशाहीकरण करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे शिक्षण अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक बनते. विशेषतः संसाधन-मर्यादित देशांमध्ये हा फरक जाणवत असतो. साथीच्या काळात शैक्षणिक तंत्रज्ञान (एडी-टेक) प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापराने तरुणांना दूरस्थ शिक्षण, परस्परसंवादी सामग्री आणि वैयक्तिकृत शिक्षण अनुभवांद्वारे त्यांचा अभ्यास पूर्ण करण्यात मदत करणारे ठरली आहे. शैक्षणिक तंत्रज्ञानातील प्रगती महत्त्वाची भूमिका बजावणारी ठरली आहे. शैक्षणिक संसाधने (OERs), ऑनलाइन अभ्यासक्रम आणि डिजिटल लायब्ररी विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या सोयीनुसार वापरत आहेत. महामारीच्या काळाचा विचार केल्यास हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त होते.

शैक्षणिक तंत्रज्ञानातील प्रगती महत्त्वाची असली तरी सुद्धा काही वेळा तंत्रज्ञान अपूर्ण पडते. स्थानिक आणि संदर्भित शिक्षण देण्यासाठी मानवी घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आहेत. एड-टेक प्लॅटफॉर्म शैक्षणिक सामग्रीमध्ये प्रवेश प्रदान करत असताना, त्यांना प्रभावी शैक्षणिक धोरणे आणि शिक्षकांच्या समर्थनासह पूरक असले पाहिजे. विशेषतः विकसनशील देशांमध्ये जेथे पायाभूत सुविधांच्या मर्यादा कायम असू शकतात, अशा ठिकाणी, मिश्रित शिक्षण (ऑनलाइन आणि वैयक्तिक सूचना एकत्र करून) शिक्षणाला गती देऊ शकते आणि सुलभता वाढवू शकते.

सहकार्य, गंभीर विचार आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांना चालना देण्यासाठी पीअर लर्निंग देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अशाप्रकारे, शिक्षण प्रणाली तरुणांना एकत्र काम करण्याची, ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची आणि एकमेकांकडून शिकण्याची संधी निर्माण करून समुदायाची भावना वाढवू शकते, सामाजिक एकसंधता वाढवू शकते. शिवाय, जागतिक नागरिकत्व, वित्त आणि पर्यावरण यांसारख्या परिमाणांचा विचार करून, शैक्षणिक सुधारणांमध्ये धोरणनिर्मिती हे सर्वसमावेशकतेच्या स्त्रीवादी तत्त्वांद्वारे मार्गदर्शन केले पाहिजे. आर्थिक साक्षरता आणि उद्योजकीय शिक्षण तरुणांना गुंतागुंतीच्या आर्थिक परिदृश्यता नेव्हिगेट करण्यासाठी आणि सामाजिक आणि पर्यावरणीय आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी कौशल्याने सुसज्ज करू शकते.अभ्यासक्रमांची मांडणी करताना पारंपरिक पर्यावरणीय ज्ञान आणि सांस्कृतिक वारसा यांचा समावेश करणे आवश्यक आहे.

शिक्षण प्रणाली शाश्वतता आणि पर्यावरणीय सांस्कृतिक विविधतेबद्दल अभ्यासक्रमातून सखोल जागरूकता निर्माण केली जाऊ शकते. तथापि, पारंपारिक संस्कृती अनेकदा आधुनिक शैक्षणिक तंत्रांचा प्रतिकार करताना दिसतात. मात्र नाविन्यपूर्ण पध्दती स्वीकारण्यासाठी उत्तरोत्तर बदलले पाहिजेत ही भूमिका महत्त्वाची ठरते. यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे, त्यामध्ये समुदायांची संवाद साधणे, त्यांच्या श्रद्धांचा आदर करणे, पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक क्षमतांमधील अंतर कमी करणारे शैक्षणिक कार्यक्रम तयार करणे आवश्यक आहे. वेगाने बदलणाऱ्या समाजात भरभराटीसाठी समकालीन कौशल्यांच्या शिक्षणासह सांस्कृतिक जतनाचा समतोल साधणे हे तरुणांना सुसज्ज करण्यासाठी महत्त्वाचे आहे.

सर्वसमावेशक शैक्षणिक सुधारणांची गरज

तरुण मुलीच्या समोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी शैक्षणिक सुधारणा सर्वसमावेशक असायला पाहिजे. ज्यामध्ये बालपणापासून ते उच्च शिक्षण आणि पुढे आयुष्यभर उपयोगी पडेल अशा शिक्षणाचा समावेश असावा. बालपणीचे हे शिक्षण भविष्यातील शिक्षण आणि विकासाचा पाया निर्माण करते. खेळ-आधारित शिक्षण, संज्ञानात्मक विकास आणि सामाजिक-भावनिक कौशल्ये यांना प्राधान्य देऊन सरकारने गुणवत्तापूर्ण कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाने विचार, सर्जनशीलता, समस्या सोडवणे आणि डिजिटल साक्षरता विकसित केली पाहिजे. मूल्यमापन रॉट मेमोरिझेशन आणि प्रमाणित चाचणीच्या पलीकडे गेले पाहिजे. वास्तविक-जगातील अनुप्रयोग आणि प्रकल्प-आधारित शिक्षण समाविष्ट केले पाहिजे. विविध वयोगटांना शिक्षित करण्यासाठी त्यानुसार धोरणे तयार करणे आवश्यक आहे. लहान मुलांना त्यांच्या शिक्षणात अधिक खेळकर वाटतील अशा घटकांची आवश्यकता असते. शिवाय, तरुण लोकांकडे असलेल्या कौशल्यांवर आधारित शिक्षण प्रणालीचे मूल्यांकन केले पाहिजे. ट्रेंड्स इन इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स अँड सायन्स स्टडी (टीआयएमएसएस) सारखी आंतरराष्ट्रीय मूल्यांकने विद्यार्थ्यांच्या गंभीर विषयांमधील प्रवीणतेबद्दल महत्वपूर्ण अंतर्दृष्टी प्रदान करतात. ज्यांच्या हातामध्ये धोरण निर्माण करण्याची क्षमता आहे त्यांनी आवश्यक क्षेत्र ओळखून शिक्षणातील परिणाम वाढवण्यासाठी संसाधनांचे समर्थन करणे आवश्यक आहे.

शैक्षणिक सुधारणांसाठी मान्यता हे आणखी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. तरुणाई मधील कौशल्य अचूकपणे दाखविण्यात अनेक वेळा पदवी आणि डिप्लोमा सहशिक्षणाची पारंपरिक प्रमाणपत्रे अपयशी ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. जसजसे उद्योग आणि जॉब मार्केट विकसित होत आहेत, क्रेडेन्शियलिंगसाठी अधिक समग्र दृष्टिकोनाची मागणी वाढत आहे. तरुणाई मधील कौशल्याचे क्षमता आधारित मूल्यांकन डिजिटल बॅज आणि प्रमाणपत्र अधिक सूक्ष्म आणि ठळकपणे प्रतिनिधित्व देऊ शकतात. सक्षमता-आधारित शिक्षण आणि पर्यायी क्रेडेन्शियल्सकडे हे वळण औपचारिक शिक्षण आणि नियोक्त्यांना आवश्यक कौशल्ये यांच्यातील अंतर कमी करू शकते.

आव्हानांवर मात करण्यासाठी आणि SDG 4 लक्ष्यांना पुढे नेण्यासाठी संधींचा फायदा घेण्यासाठी, तरुणाईला सक्षम करण्यासाठी सर्व समावेशक शैक्षणिक सुधारणांची आवश्यकता निर्माण झाली आहे. मानवी भांडवलाची निर्मिती वाढविण्यासाठी, शिक्षण आणि कौशल्य विकासातील गुंतवणूक, तंत्रज्ञानाचा लाभ घेणे, सर्वसमावेशक आणि न्याय्य शिक्षण वातावरणाला चालना देणे आणि विविध सांस्कृतिक दृष्टीकोन स्वीकारणे या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. तरुण वर्ग त्यांना आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य आणि मूल्य आत्मसात करून 21व्या शतकातील अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग दाखवू शकतात.

सौम्या भौमिक ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या सेंटर फॉर न्यू इकॉनॉमिक डिप्लोमसीची असोसिएट फेलो आहेत.

अनघ चट्टोपाध्याय एम.स्टॅट, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, कोलकाता येथे कार्यरत आहेत.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Soumya Bhowmick

Soumya Bhowmick

Soumya Bhowmick is a Fellow and Lead, World Economies and Sustainability at the Centre for New Economic Diplomacy (CNED) at Observer Research Foundation (ORF). He ...

Read More +
Anagh Chattopadhyay

Anagh Chattopadhyay

Anagh Chattopadhyay has completed his M.Stat from Indian Statistical Institute Kolkata India and is currently a PhD candidate at the Johns Hopkins Bloomberg School of ...

Read More +