१ ऑगस्ट २०२३ रोजी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ने ९६ वा वर्धापनदिन साजरा केला. वीस हजाराच्या बंडखोर सैन्याने तीन हजारच्या सैन्यावर मात करत नानचांग शहराचा ताबा मिळवला. यालाच नानचांगचा उठाव असे संबोधले जाते. पीपल्स लिबरेशन आर्मीची स्थापना नानचांगच्या उठावानंतर करण्यात आली. नानचांग उठावाने चिआंग काई शेकच्या कोमिंगतांग विरूद्ध सशस्त्र कम्युनिस्ट या संघर्षाची पहिली ठिणगी पडली. यासोबतच या उठावामुळे कम्युनिस्ट चायनीज पक्षाचा (सीसीपी) क्रांती घडवून आणण्याच्या दृढ संकल्प दिसून आला व त्यासोबत यातून पीएलएचा जन्मही झाला. आज पीएलएच्या स्थापनेला ९६ वर्षे पूर्ण झाली आहेत व सेंट्रल मिलीटरी कमिशनचे चेअरमन क्षी जिनपींग यांनी २०१५ मध्ये लष्करात घडवून आणलेल्या सुधारणांना ८ वर्षे पूर्ण होत आहेत. सध्या पीएलए हे इंडो पॅसिफीकमधील सर्वात मजबूत सैन्य म्हणून गणले गेले आहे.
नानचांग उठावाने चिआंग काई शेकच्या कोमिंगतांग विरूद्ध सशस्त्र कम्युनिस्ट या संघर्षाची पहिली ठिणगी पडली. यासोबतच या उठावामुळे कम्युनिस्ट चायनीज पक्षाचा (सीसीपी) क्रांती घडवून आणण्याच्या दृढ संकल्प दिसून आला व त्यासोबत यातून पीएलएचा जन्मही झाला.
२०१७ मध्ये क्षी यांनी पीएलएच्या उद्दिष्टांमध्ये तीन महत्त्वाच्या मुद्द्यांची भर घातली. यात २०२० पर्यंत मॅकनायझेशन, २०३५ पर्यंत इन्फोर्मेटायझेशन व २०५० पर्यंत चीनच्या लष्कराचे वर्ल्ड क्लास फोर्समध्ये रूपांतर यांचा समावेश आहे. या यादीत २०२१ रोजी पीएलएच्या १०० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधण्यासाठी व चीनची लष्करी आधुनिकीकरणाची मोहीम प्रगतीपथावर राहणे सुनिश्चित करण्यासाठी, २०२७ च्या शंभराव्या वर्धापन वर्षानिमित्त लष्करी उभारणीचे उद्दिष्ट साध्य करणे हा शॉर्ट टर्म माईलस्टोनही समाविष्ट करण्यात आला आहे. यावरून २०१७ पर्यंत तैवानवर पूर्णपणे ताबा मिळवण्याचा क्षी यांचा प्रयत्न आहे, असे काही तज्ञांचे मत आहे.
आठ वर्षांमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांचा विचार करता, सध्या पीएलए हळूहळू या सुधारणा प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. यात चीनच्या लष्करी सुधारणांचे स्वरूप विकसित होत असून त्यात आता संघटनात्मक बदलांपेक्षा मानवी घटकांवर अधिक भर दिला जात आहे. चीनी लष्करात पुढील ५ ते ७ वर्षांमध्ये करण्यात येणाऱ्या सुधारणांचे चार महत्त्वाचे पैलू आहेत. महामारीमुळे अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीमुळे पुढील काही वर्षांमध्ये पीएलएच्या लष्करी आधुनिकीकरणाच्या वेगातही मंदी येईल असा काहींचा कयास होता. पण या विरूद्ध चीनी सैन्यात अलिकडच्या वर्षांत वाढ दिसून आली आहे. अर्थात याला काही अंशी संरक्षण बजेटमधील वाढही जबाबदार आहे. २००० ते २०१६ मध्ये चीनचे लष्करी बजेट दरवर्षी सुमारे १० टक्क्यांनी वाढलेले आहे. आता हीच वाढ अलीकडे दरवर्षी सुमारे ५-७ टक्क्यांनी कमी झाली आहे. २०२३ च्या बजेटमध्ये ७.२ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. ही वाढ अंदाजे १.५५ ट्रिलीयन युआन म्हणजेच २०१३ च्या वाढीच्या दुप्पट आहे. गेल्या वर्षीची वाढ ७.१ टक्के इतकी होती या तुलनेत यावर्षीची वाढ अधिक आहे. चीन हा डेटा हाताळणे (मॅनिप्युलेशन) व रोखण्यासाठी (विथहोल्डींग) प्रसिद्ध आहेच, याचा खर्च सहजपणे संरक्षण बजेटमध्ये पहायला मिळतो. अशा प्रकारे, संरक्षण डेटाचे ब्रेकअप अत्यंत संदिग्ध असल्याने तसेच सध्याच्या संरक्षण बजेट अंतर्गत चीनी सामरिक शस्त्रागार, मिलिशिया, सायबर क्षमता, आर अँड डी आणि लष्करी तंत्रज्ञानाला निधी दिला जातो की नाही हे निर्धारित करणे कठीण आहे. सापेक्ष मंदी असूनही पीएलएच्या उद्दिष्टपूर्तीच्या केंद्रस्थानी असलेल्या मॉडर्न हेवी मेटल प्लॅटफॉर्म्सची खरेदी सुरू आहे. यात अडव्हांस सबमरिन्स, क्रुझर्स अँड डिस्ट्रॉयर्स, स्टेल्थ फायटर्स, लाईट बॅटल टँक्स आणि नवीन रणनितीक क्षेपणास्त्र क्षमतांचा समावेश आहे.
संरक्षण डेटाचे ब्रेकअप अत्यंत संदिग्ध असल्याने तसेच सध्याच्या संरक्षण बजेट अंतर्गत चीनी सामरिक शस्त्रागार, मिलिशिया, सायबर क्षमता, आर अँड डी आणि लष्करी तंत्रज्ञानाला निधी दिला जातो की नाही हे निर्धारित करणे कठीण आहे.
मानवी घटकांवर आधारित कौशल्याचा पुरवठा अपुरा असल्याने मागणी व पुरवठ्यात घट दिसून येत आहे. परिणामी, सध्या चीनमध्ये आधुनिकीकरणामध्ये मशीन्ससोबत काम करणाऱ्या मानवी घटकावरही लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. यात महाविद्यालयीन शिक्षित तरूणांची भरती करणे, समाजातील विविध घटकांना आकर्षित करण्यासाठी वेतनवाढ व अन्य फायदे यांची अंमलबजावणी केली जात आहे. तसेच, २०४९ पर्यंत पीएलएला जागतिक दर्जाच्या तोडीस नेण्यासाठी कर्मचारी धोरणाच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे. हा बदल २०२१ मध्ये अंमलात आणण्यात आलेली वर्षातून दोनदा भरती, नोंदणीकृत सैन्याच्या भरतीतील बदल, ऑफिस कॉर्प्सच्या शिक्षण प्रणालीमध्ये बदल, कमिशन कॉर्प्सच्या भूमिका आणि जबाबदार्यांमधील बदल यातून दिसून येत आहेत.
२०२० च्या चायनीज पीपल्स लिबरेशन आर्मी जॉईंट ऑपरेशन आऊटलाईन (ट्रायल) या लष्करी दस्तऐवजामध्ये सीएमसीने ध्येयपूर्तीसाठी सैन्याचे आधुनिकीकरण व कर्मचाऱ्यांची गुणवत्ता सुधारणे या दोन उद्दिष्टांना अधोरेखित केले आहे. या उच्च स्तरीय कायद्यामध्ये भविष्यात चीनला कोणत्या युद्धाला सामोरे जावे लागेल तसेच अशा परिस्थितीत पीएलएने कशाप्रकारे नवीन परिस्थिती हाताळावी व संयुक्त ऑपरेशन्सशी निगडीत आव्हानांना कसे तोंड द्यावे यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, पीएलएसाठी स्थानिक किंवा प्रादेशिक युद्धांमध्ये आधुनिक उपकरणे आणि उपलब्ध बळासह एकात्मिक संयुक्त ऑपरेशन कसे करावे हे समजून घेण्याची रूपरेषा यामध्ये देण्यात आली आहे.
२०४९ पर्यंत पीएलएला जागतिक दर्जाच्या तोडीस नेण्यासाठी कर्मचारी धोरणाच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे.
२०२१ पासून पीएलएने संरक्षण एकत्रिकरणावर (डिफेंस मोबिलायझेशन) भर देण्यास सुरुवात केली आहे. यात शांततेच्या काळात तसेच स्थानिक पातळीवर संघर्षाच्या काळातही उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून विकास साध्य करणे शक्य आहे. यामध्ये स्थानिक स्तरावर नॅशनल डिफेंस मोबिलायझेशन ऑफिसेस (एनडीएमओ) तयार करणे व त्यांचे सक्षमीकरण करणे तसेच संघर्षाच्या काळात सैन्य आणि संसाधने एकत्रित करण्यासाठी सक्षमीकरण करणे, पीएलएला लॉजिस्टिकमध्ये मदत करणे, लष्करी आणि नागरी संस्थांमध्ये समन्वय स्थापित करणे यांसारख्या बाबी समाविष्ट आहेत.
सक्तीचे आधुनिकीकरण, कर्मचारी धोरण सुधारणा, एकात्मिक संयुक्त ऑपरेशन क्षमता साध्य करणे, आणि चीनच्या मोबिलायझेशन सिस्टीममध्ये सुधारणा करण्याव्यतिरिक्त, पीआरसीने आपले धोरणात्मक शस्त्रागार, सायबर आणि अंतराळ क्षमता, धोरणात्मक लॉजिस्टिक क्षमता आणि सीमा संरक्षण क्षमतांमध्ये सातत्याने गुंतवणूक केलेली दिसून आली आहे. ही गुंतवणूक पुढील पाच ते सात वर्षे अशीच चालू राहणार आहे. अशाप्रकारे, ९६ वर्षे पूर्ण केलेल्या पीएलएमध्ये गेल्या ८ वर्षांत अथक परिश्रमातून करण्यात आलेल्या लष्करी सुधारणा व सातत्याने लष्कराच्या आधुनिकीकरणावर करण्यात येणारी गुंतवणूक यावरून चीन हा राष्ट्रीय सुरक्षा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी किती गंभीरपणे पावले उचलत आहे हे स्पष्ट झाले आहे.
सुयश देसाई हे चीनच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणांचा अभ्यास करणारे संशोधन आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.