Published on Jun 24, 2019 Commentaries 0 Hours ago

तंत्रज्ञानाचा इतिहास तसा फार काही भरवशाचा नाही त्यामुळे तंत्रज्ञानाच्या संभाव्य परिणामांकडे केवळ शक्यता आहेत, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल.

डिजिटल भविष्य कोणाच्या हाती?

शहरी जीवन जगणा-यांचे आयुष्य विविध उपकरणांनी व्यापले आहे. सेन्सर्स, बिग डेटा आणि कनेक्टेड उपकरणांमुळे शहरी भागातील लोक माहितीने अधिकाधिक श्रीमंत होत आहेत. याचा योग्य फायदा उठवला गेला तर स्थिरता आणि लवचिकतेच्या दिशेने नागरी जीवनाची दमदार वाटचाल होईल, यात शंका नाही.

शहर समजून घेण्याचे तीन मार्ग आहेत. एक म्हणजे त्या शहरामध्ये पायाभूत आणि नागरी सुविधांचा स्तर काय आहे हे पाहणे, दुसरे म्हणजे त्या शहरातले सामाजिक सहजीवन कसे आहे आणि तिसरे म्हणजे शहराबद्दल लोकांची मते काय आहेत, त्यांना काय वाटते शहराबद्दल, हे जाणून घेणे. शहरतज्ज्ञ, नगररचनाकार, आर्किटेक्ट्स, विकासक आणि नगर निजोयनकर्ते हे साधारणतः पहिल्या मार्गाचा अवलंब करतात. तर समाजशास्त्रज्ञ, राजकीय आणि अर्थशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि सांस्कृतिक विचारसरणीचा पगडा असणारे हा सर्व वर्ग दुस-या मार्गाच्या नजरेतून शहराकडे पाहात असतो. तर कविमनाचे लोक, तत्त्वज्ञ, लोकसंगीताचे दर्दी असलेले आणि सृजनशील मनाचे लोक या सगळ्यांचा कल शहर समजून घेण्यासाठी तिस-या मार्गाकडे मोठ्या प्रमाणात असतो. तथापि, हे सर्व झाले सरधोपट, सर्वमान्य मार्ग. परंतु शहर समजून घेण्याचा आणखी एक चौथा पर्याय उपलब्ध आहे.

डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, कनेक्टेड सेन्सर्स आणि बिग डेटा या सगळ्याच्या माध्यमातूनही शहराची नस पकडता येऊ शकते. एखाद्या गोष्टीचा कल समजून घेण्याची ही नवीन पद्धत आहे परंतु असे असले तरी पारंपरिकदृष्ट्या जी पद्धत आपण अवलंबलेली असते तिला ही छेद देणारी आणि म्हणूनच हानिकारक आहे. कारण नगर नियोजनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पारंपरिक आहे. शहर विकासाच्या दृष्टीने काय गोष्टी आवश्यक आहेत, त्यासाठी कोणत्या गोष्टींचे नियोजन करणे गरजेचे आहे वगैरे यासंदर्भात आपली काही ठोस परंतु चौकटीतले विचार असतात. परंतु या नव्या पद्धतीत ही परिमाणे कुचकामी ठरलेली आढळतात. थोडक्यात त्यामुळे नागरीकरणाचा चेहरा बदलू शकतो. तिची हानिकारक शक्ती अमर्याद आहे. विविध डिजिटल तंत्रज्ञानांच्या उपलब्धतेमुळे लोकं परस्परांना अशक्य अशा पद्धतींनी कनेक्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे संपर्काच्या अनेक पारंपरिक भिंती कोसळू लागल्या आहेत.

शहराकडे पाहण्याचा हा जो चौथा दृष्टिकोन आहे त्याला नेहमीच डेटा सायन्स, बिग डेटा ऍनालिटिक्स किंवा इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) असे संबोधले जाते. सद्यःस्थितीत ही विशेषणे एकात्मिक शासनाच्या व्याखेत चपखलपणे बसण्यापेक्षा स्थानदर्शकतेची भूमिका मोठ्या प्रमाणावर निभावतात. जेव्हा परिणामकारकता एका रेषेत आणि एक रेषीय नसलेल्या संरचनेत आणायचा विचार झालेला नसतो तसेच नागरीकरण, सोशल इंजिनीअरिंग, नगर रचना आणि विकास हे मुद्दे विकसित झालेले नसतात, अशावेळी हा चौथा मार्ग सर्वोत्तमपणे उमगलेला असल्याचे वास्तव अधोरेखित होते. त्याचप्रमाणे हा वाढता जोडबंध तोडून नागरी स्थिरता आणि लवचिकता यांची नवनवीन प्रारुपे तयार होतील ह समजून घेण्याकडे कल वाढीस लागणे गरजेचे आहे. यासाठी आपण पुढील प्रश्नांची उत्तरे शोधायलाच हवीत : नागरी स्थिरता आणि लवचिकता म्हणजे काय आणि चौथा मार्ग म्हणजे नेमके काय?

शहरी परिभाषा आणि तिच्या व्यावहारिक स्वरुपात स्थिरता आणि लवचिकता म्हणजे दोन गोष्टी. एक म्हणजे शहर प्रणालीची रचना, तिचे व्यवस्थापन आणि तिचे कार्यान्वयन अशा पद्धतीने व्हावे की, या प्रणालीत अंतर्भूत असलेले स्रोत पुनर्निर्माणक्षम असावेत जे ‘घ्या, बनवा, नष्ट करा’ हे विद्यमान प्रारूप बदलून त्याचे ‘घटवा, पुनर्वापर करा, नव्याने शिका, दुरुस्त करा आणि पुनरुत्पादन करा’, या तत्त्वावर आधारित प्रारूपात रुपांतर करतील. याचा अर्थ असा की, शहराच्या प्रणालीशी निगडीत असलेले व्यवसायाचे कोणतेही लहान-मोठे प्रारूप एकरेषीय न राहता ते प्रणालीमध्ये वर्तुळाकार असावे.

शहरी स्थिरतेची आदर्श स्थिती अशी लहान-मोठ्या वर्तुळाकार अर्थव्यवस्थांशीच निगडीत असावी ज्यांचा संबंध त्यातील अंतर्भूत असलेल्या गोष्टी कमीतकमी कार्बन उत्सर्जन करून कमी कचरा निर्माण करतील, याच्याशी असेल. थोडक्यात कार्बनशून्य किंवा उणे कार्बन शहरी प्रणाली, जी बायोडिग्रेडेबल साहित्याचा अधिकाधिक वापर करेल, ही सर्वोच्च ऊर्जा कार्यक्षम असेल.

शहरांची व्यवस्थापन प्रणाली अशा पद्धतीने आखली आणि चालवली जायला हवी की ज्यात स्वतःतील त्रुटी स्वतःच कमी करून वेळेनुसार कोणत्याही मोठ्या आपत्तीला तोंड देताना त्यात झरझर बदल घडवून आणता येऊ शकतील जेणेकरून सर्वांच्याच ते हिताचे ठरेल. यातून एक चांगली गोष्ट घडेल की कोणत्याही नैसर्गिक वा मानवनिर्मित संकटातून शहर तातडीने सावरेल. नागरी स्थिरता आणि लवचिकता या एकाच नाण्याच्या दोन बाजूही आहेत कारण अंतिमतः त्यांचा ग्राहक नागिरकच असतो. या दोन्ही संकल्पनांचे उत्तम उदाहरण म्हणजे देवनारची कचराभूमी. कचरा व्यवस्थापनातील ‘घ्या, बनवा, नष्ट करा’ या प्रारूपाचे हे सर्वोत्तम उदाहरण. तसेच दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचून सार्वजनिक वाहतूकव्यवस्था ठप्प पडते, यातून नागरी व्यवस्थापन प्रणालीत लवचिकतेचा अभाव असल्याचे स्पष्ट होते.

आता वळू या दुस-या प्रश्नाकडे : चौथा मार्ग पाच स्तरांपासून बनला आहे. पहिला स्तर म्हणजे पाया. त्यात समुद्र आणि जमिनीखालून गेलेल्या ऑप्टिक केबल्स, मोबाइल टॉवर नेटवर्क्स, इंटरनेट प्रोटोकॉल्स आणि डिजिटल व्यवहार ज्यावर चालतात ते स्टँडर्ड्स यांचा समावेश होतो. दुस-या स्तरामध्ये सोर्स कोड्स, सॉफ्टवेअर इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऍप्लिकेशन्स इकोसिस्टीममधील सिस्टिम्स यांचा समावेश होतो. तिसरा स्तर हा बिझनेस डोमेन असतो, ज्यात संस्था, कंपन्या आणि नागरिक यांच्यातील व्यवहारांचा समावेश होतो. चौथा स्तर स्मार्ट सेन्सर्स आणि व्हर्च्युअल व ऑगमेंटेड रिऍलिटी टूल्सचा बनलेला असतो जे नागरी जागांमध्ये इनबिल्ट वा नॉन बिल्ट असतात. इतर चार स्तरांमधून डेटा पॉइंट्स वेगळे काढून ते एकत्रित करत शहरी लोकांमधील पद्धतींचे अंतर्गत दर्शन घडवून त्याचे विश्लेषण कसे करावे, हे पाचवा स्तर शिकवतो. या पाचव्या स्तराला डेटा सायन्स, बिग डेटा ऍनालिटिक्स किंवा इंटरनेट ऑफ थिंग्ज असे संबोधले जाते. तसेच याच पाचव्या स्तराला व्यापक प्रमाणात चौथा मार्ग असेही संबोधले जाते. परंतु आता आपण पाहिल्याप्रमाणे चौथा मार्ग हा या पाच दृष्टिकोनांचा समूह आहे. या समूहाच्या आधारावरच नागरी जीवनातील स्थिरता आणि लवचिकता हे ज्या पायावर रचले गेले आहेत, त्यांची प्रारूपे तयार होतात. तर प्रत्यक्षात हे काय करू शकतात?

यात किमान तीन तरी शक्यता आहेत ज्या चौथ्या मार्गातून निर्माण होऊ शकतात आणि नगररचनाकार, धोरणकर्ते आणि समुदाय गटांनी निर्भीडपणे त्यांचा अवलंब केला तर त्यातील अंतःशक्तींचा वापर सध्या बाल्यावस्थेत असलेल्या डेटा संरक्षण, प्रायव्हसी आणि सदुपयोग या नियमांच्या अधीन राहून करता येऊ शकेल. या तीनही शक्यता डेटाशी संबंधित जागतिक आणि राष्ट्रीय अधिनियमांच्या चौकटीवर अवलंबून आहेत, ज्यांची सुरुवात सदुपयोग धोरणाच्या चौकटीत राहून सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून डिजिटल व्यवहारांसाठी रचलेल्या निदान काही डेटा पॉइंट्सपासून करता येऊ शकेल.

प्रथम टप्पा म्हणजे सेन्सर्स, डिजिटल आणि डेटा इन्फ्रास्ट्रक्चर यांची स्थापना करणे जे लहान परंतु परस्परांशी निगडीत अर्थव्यवस्थांची मालिका निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे, यामुळे आपल्या नागरी प्रणालीचे पुनरुत्थान होईल जेणेकरून ही प्रणाली शक्य तितक्या लवकर कार्बनशून्य अवस्थेकडे वाटचाल करण्यास सक्षम होईल. याचा अर्थ असा असेल की आपल्या भल्यामोठ्या नागरी प्रणालीचे पुनर्अभियांत्रिकीकरण आणि पुनर्रचना केली जावी जेणेकरून रिसोर्स इनपुट्स, सिस्टीम युसेज, युटिलायझेशन कपॅसिटी यांचे डेटा पॉइंट्स – गर्दीच्या आणि कमी गर्दीच्या दोन्ही वेळचे – अनावश्यकता आणि कार्यक्षमता (विशेषतः ऊर्जा कार्यक्षम) यांची मोजमाप करता येऊ शकेल आणि त्यांचे एकत्रिकरण करून ख-या अर्थाने निर्णय घेण्याची वेळ येईल त्यावेळी त्यांचा समूह उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरू शकेल.

अनेक मोठ्या शहरांमध्ये या पद्धतींची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी वर्तुळाकार अर्थव्यवस्थेच्या तत्त्वांवर आधारित व्यवसायाचे प्रारूप तयार करण्याच्या दृष्टिकोनातून तिची अंमलबजावणी केली जात नाही. स्विडिश वेस्ट टू एनर्जी सिस्टीम ही एक उल्लेखनीय योजना असून वर्तुळाकार अर्थव्यवस्थेच्या तत्त्वांच्या दिशेने तिने स्वतःच्या पुनरुत्थानाची वाटचाल सुरू केली आहे. प्रत्येक शेजा-याला सेन्सर्स, डेटा सिस्टीम्स, सॉफ्टवेअर आणि अल्गोरिदम यांचा वावर (ऍक्सेस) असतो ज्यातून किती कचरा निर्माण झाला आणि किती वेगळा झाला हे स्पष्ट होऊन त्यातला किती पुनर्वापरात येऊ शकतो किंवा पुनर्वापर अर्थव्यवस्थेत पुन्हा किती प्रमाणात पाठवला गेला, हे स्पष्ट होते.

हा डेटा हेही दर्शवतो की, ऊर्जानिर्मितीसाठी किती प्रमाणात कचरा जाळण्यात आला, यात वीजनिर्मिती आणि उष्णता निर्माण या दोन्ही कारणांसाठी वापरण्यात आलेल्या कच-याचा समावेश होतो. या डेटाचे विश्लेषण राष्ट्रीय पातळीवरही केले जाऊ शकते किंवा अगदी घरगुती पातळीवरही हा प्रयोग राबवला जाऊ शकतो. अशा प्रकारची एकाचवेळी वैश्विकता आणि विवरणता टाकाऊ वस्तूंच्या संकलनाचे आणि वर्गीकरणाचे एकमेवाद्वितीय असे व्यवसायाचे प्रारूप तयार करण्यास उद्युक्त करू शकते, ज्याचा उपयोग विविध समुदायांच्या कल्याणासाठी करता येऊ शकेल. कारण या प्रयोगाच्या माध्यमातून हे प्रारूप मूळ धरून समुदायात आपले अस्तित्व निर्माण करू शकेल आणि त्यातून समुदायाचेच भले होईल.

दुसरे म्हणजे आपल्या रिटेल अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे, विशेषतः स्रोतांचा आणि कच्च्या मालाच्या मुळाचा व त्याचे उत्पादन करणा-या लोकांचा शोध घेणे. त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्या उत्पादनाचा साखळीतील इतर भागांशी मेळ जुळवून देणे, यात त्या उत्पादनाशी संबंधित लोक आणि पायाभूत सुविधा यांचा समावेश असावा आणि अंतिम उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोणती पद्धत वापरली गेली, हे दर्शवणे. अशा प्रकारच्या पुनरुज्जीवनामध्ये अगदी स्पष्टपणे चौथ्या मार्गाचे सर्व पाचही स्तर एकात्मिक असावे लागतात आणि त्यांचा परस्परांमध्ये स्पष्ट, पारदर्शी आणि थेट संवाद असावा. याचा अर्थ असा असेल की, सेन्सर्स, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, इंटरनेट कनेक्शन्स, उपकरणे (डिव्हायसेस), सॉफ्टवेअर सिस्टीम्स आणि ब्लॉक चेनप्रमाणे तंत्र हे सर्व परस्परांशी सूत्रबद्ध असावे.

वर्तुळात्मक अर्थव्यवस्थेचे ब्लॉक्स उभे करण्यात, विशेषतः पुनर्वापरासंदर्भातील दृष्टिकोन, स्थापित आणि व्यवस्थापित झाले आणि वर्तमान व्हॅल्यू चेनमध्ये एकात्मिक झाले, जे सद्यःस्थितीत एकरेषीय आहेत आणि ते ‘घ्या, बनवा आणि नष्ट करा’ या उत्पादन, वितरण आणि खप या प्रारूपाशी अभिमुख असतील, या सगळ्याची पुनरुज्जीवनाशी खात्री करून घेणे अतिशय आव्हानात्मक असेल.

याची दोन उत्तम उदाहरणे आहेत : एक म्हणजे आयकेईए. आयकेईए त्यांच्या उत्पादनांचे मूळ कोणते आहे याविषयी गोष्टी रचून त्यांना प्रसिद्धी देत आहेत. स्टॉकहोममधील आयकेईएच्या अनेक स्टोअर्समध्ये उत्पादनांशी निगडीत क्यूआर कोड किंवा बारकोड आहेत. त्यामुळे तुम्ही क्यूआर कोड स्कॅन केले किंवा मग डाऊनलोड केले वा व्हिडीओ स्ट्रीम केला तर त्यातून त्या उत्पादनाचा मूळ स्रोत काय हे समजते, संबंधित उत्पादनासाठी कच्चा माल कोठून आणण्यात आला, त्याचे पक्क्या उत्पादनात रुपांतर करून ते स्टोअरमध्ये कसे आणण्यात आले, यासंदर्भातील सर्व माहिती तात्काळ उपलब्ध होते. यातून ग्राहकांमध्ये उत्पादनाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा उद्देश असतो. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून उत्पादन प्रक्रियेत कार्बन वापराचे प्रमाण किती होते हे स्पष्ट करणे आणि ग्राहकांना त्यांच्या निवडीसाठी योग्य पर्याय उपलब्ध करून देणे हा या सर्व प्रक्रियेमागील मुख्य उद्देश आहे.

दुसरे उदाहरण आहे रिट्युना ब्रँडचे. रिसायकलिंग आणि अपसायकलिंग या दुहेरी तत्त्वांवर आधारित या स्टोअरचा कारभार आहे. स्टॉकहोमच्या सीमेवर हे स्टोअर आहे. काहीही टाकाऊ नसून प्रत्येक गोष्ट अनमोल आहे, या तत्त्वावर आधारलेले या स्टोअरचे व्यवसाय प्रारूप आहे. लोकांनी त्यांना नको असलेल्या वस्तू आमच्याकडे जमा कराव्या, असे आवाहन हे स्टोअर करते. या टाकाऊ वस्तूंवर स्टोअर प्रक्रिया करते आणि त्यातून विक्रीयोग्य वस्तूंची निर्मिती करते. मग स्टोअर त्या वस्तूची विक्री अशा ग्राहकांना करते की ज्यांना त्या वस्तूची खरोखर गरज आहे किंवा ते त्या वस्तूच्या शोधात आहेत. असे करत असताना रिट्युना संपूर्ण उत्पादनाच्या आयुष्याचा माग ठेवण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचे सेन्सर्स आणि सॉफ्टवेअर सिस्टीम्सचा वापर करते.

तिस-या स्थानावर आहे एकत्रित प्रारुपांचे विविध संच तयार करणे ज्यांचा कल विशेषतः स्थानिक आणि हायपरलोकल पातळ्यांवर जादा क्षमतांचा फायदा घेऊन पुनरुज्जीवित करण्याकडे असेल. ही प्रारुपे समुदाय आणि गटांच्या वास्तविक गरजा पूर्ण करण्यासाठी सुयोग्य असतील. अजूनही हा भाग तितकासा प्रकाशात आलेला नाही आणि त्याभोवतालची व्यवसाय प्रारुपे अद्याप स्थिर नाहीत. परंतु मूळ तत्त्व अतिशय तगडे आहे आणि बिग डेटा इंजिनांशी जेवढ्या मोठ्या प्रमाणात सॉफ्टवेअर सिस्टीम्स जोडलेल्या असतील, सेंटिमेंट अल्गोरिदम्स आणि जेवढ्या म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता उदयाला येतील, तेवढ्या प्रमाणात व्यवसाय प्रारूप स्थिर होईल.

एक चांगले उदाहरण – अद्याप तगडे व्यवसाय प्रारूप नसल्यास – म्हणजे लोकल आणि हायपरलोकल व्यवसायांची मागणी जगभरातील स्टार्ट-अप्सकडून केली जाते आहे जेणेकरून त्यांना समुदायांच्या वास्तविक गरजा योग्य किमतीत पूर्ण करता येऊ शकतील. अनेक एकत्रिकरण प्रारुपांनाही हे करणे शक्य होते कारण ते एकात्मिकदृष्ट्या केवायसी गरजांशी संलग्न असतात आणि राष्ट्रीय स्तरावर केवायसी ही डिजिटल आयडेंटिटी सिस्टीम आहे. याचे चांगले उदाहरण म्हणजे स्विडिश टॅक्स सिस्टीम. स्विडिश कररचना सूक्ष्म आणि लघु उद्योगांपर्यंत (साधारणतः एकल उद्योग) पोहोचू शकते आणि त्यांचे संबंध थेट स्थानिक कर अधिका-यांशी येतात – व्यक्तिगत आणि मोठ्या संस्थांच्या बाबतीतही – त्यामुळे करउद्दिष्टे पूर्ण होण्यास मदत होते. परिणामी नवीन महसूल वाहिन्या निर्माण होतात आणइ लोकल व हायपरलोकल समुदाय व्यवसाय प्रारुपांचे बिजारोपण होते.

तंत्रज्ञानाचा इतिहास तसा फार काही भरवशाचा नाही त्यामुळे या केवळ शक्यता आहेत, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. परंतु या तीन शक्यता ख-याही आहेत कारण त्यांनी आता मुळं धरली आहेत आणि त्या कायमस्वरूपी टिकणार आहेत. तथापि, मुख्य प्रश्न उरतोच : नागरी स्थिरता आणि लवचिकतेसाठी आपले नगररचनाकार या शक्यतांच्या कसोटीवर उतरून जोमदार, लवचिक आणि योग्य अशी नियमावली आणि सुशासन प्रणाली आखतील काय? आपण याचा विचार करायलाच हवा आणि समान तत्वाने या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे.

(स्वामिनाथन रामनाथन हे उप्प्साला विद्यापीठातील वरिष्ठ रिसर्च फेलो आहेत. फ्युचर अर्बनिझम्स विभागाचे, एक असा विभाग ज्यात दीर्घ कालावधीतील बहुशाखीय संशोधन केले जाते ज्याच्या केंद्रस्थानी भारत आणि आशियातील शहरांमधील स्थिरता आणि लवचिकतेच्या मुद्दे असतात, ते प्रमुख आहेत.)

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.