-
CENTRES
Progammes & Centres
Location
जागरूकतेचा अभाव, खाद्यतेलाच्या गगनाला भिडलेल्या किंमती आणि वापरून उरलेल्या स्वयंपाकाच्या तेलाची विल्हेवाट लावण्यासाठी व्यावसायिक मार्ग उपलब्ध नसल्याने आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असतानाही खाद्यतेलाचा पुन्हा पुन्हा वापर करण्यास लोकांना भाग पाडले जात आहे.
अन्न सुरक्षेच्या संदर्भाने अन्न आणि पोषणमूल्य या दोन विषयांवर जेव्हा एकाच सुरात चर्चा केली जाते, तेव्हा कधीकधी दोहोंमधील भिन्नता धूसर होते. योगायोगाने शाश्वत विकास उद्दिष्ट आराखड्यामध्ये अन्न व पोषणमूल्य सुरक्षेला उद्दिष्टांच्या द्वितीय टप्प्यांतर्गत स्थान देण्यात आले आहे, तर आरोग्यासंबंधी स्थितीचा उद्दिष्टांच्या तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. अर्थातच, अन्नाचे पोषणमूल्य हा घटक उद्दिष्टांच्या तिसऱ्या टप्प्याचे अविभाज्य अंग आहे. अन्न आणि पोषणमूल्य सुरक्षेसाठी अन्नाचे केवळ प्रमाण पुरेसे नाही, हे त्यातून स्पष्ट होते.
शाश्वत विकास उद्दिष्टांच्या द्वितीय आणि तृतीय टप्प्यांदरम्यानचे भेद हे मूल्यसाखळीच्या संदर्भात चांगल्या पद्धतीने स्पष्ट केले आहेत. यामध्ये खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतींना उत्तर म्हणून सामान्यतः स्वयंपाकासाठीच्या तेलाची शिफारस केली जाते. जागतिक बाजारपेठेतून (भारत आयात खाद्यतेलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.) आणि संपूर्ण मूल्य साखळीमध्ये जागरूकता कमी असल्याने किंमतीबाबत धोकादायक स्थिती निर्माण होते.
त्याचे आरोग्यावर खरेचच प्रतिकूल परिणाम होतात. स्वयंपाकाच्या तेलामुळे कर्करोग, हृदयरोग आणि अन्य अवयवांची हानी यांसारख्या अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकते. आरोग्यावर होणाऱ्या अशा परिणामांमुळे भारतामध्ये स्वयंपाकाच्या तेलाचा वापर करण्यावर तांत्रिकदृष्ट्या बंदी आहे.
भारतातील अन्न सुरक्षा नियामक असलेल्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या अंदाजानुसार भारतात उत्पादित होणाऱ्या स्वयंपाकाच्या तेलापैकी सुमारे साठ टक्के तेलाचा घरगुती आणि व्यावसायिक पुनर्वापरातून अन्नसाखळीत पुन्हा समावेश होतो.
खरे तर वापरून उरलेले स्वयंपाकाचे तेल इतके सर्रास पुन्हा पुन्हा वापरले जाते, की त्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होते. अगदी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण २०२२ नुसार अन्न सुरक्षा निर्देशांकाबाबत उत्तम कामगिरी करणाऱ्या तमिळनाडूसारख्या राज्यातील चित्रही निराशाजनक आहे. तमिळनाडूतील तेरा जिल्ह्यांतील एका ग्राहकहितरक्षण गटाने अलीकडेच केलेल्या सर्व्हेमध्ये आढळले, की सुमारे दहापैकी एक खाद्यपदार्थ विक्रेता खाद्यतेलाचा अगदी शेवटच्या थेबापर्यंत पुन्हापुन्हा वापर करीत असतो, तर पाचपैकी एक विक्रेता स्वयंपाकासाठी वापरून उरलेल्या तेलात न वापरलेले तेल मिसळत असतो. यावरून अन्न सुरक्षा निर्देशांकात खालच्या स्तरावर असलेल्या राज्यांमधील स्थितीची चांगलीच कल्पना करता येऊ शकते.
‘द ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशन’ आणि ‘कोवान ॲडव्हायझरी ग्रुप’ यांनी संयुक्तपणे नुकत्याच केलेल्या अभ्यासात, ग्राहकांमध्ये चांगली जागरूकता असूनही देशातील प्रमुख महानगरांमध्ये वापरून उरलेल्या स्वयंपाकाच्या तेलाचा पुन्हा पुन्हा सर्रास वापर केला जातो, असे दिसून आले आहे. नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या महानगरांमधील पाचशेपेक्षा अधिक खाद्य व्यावसायिकांचा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेनुसार, विशेषतः लहान लहान रेस्टॉरंटसह अन्य खाद्य पदार्थ विक्रेते खाद्यतेलाचा शेवटच्या थेंबापर्यंत पुन्हापुन्हा वापर करतात, असे दिसून आले.
मोठ्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटकडून स्वयंपाकाच्या तेलाच्या वापरासंबंधीचा अहवाल नियमीतपणे देण्यात येत नाही, असेही या अभ्यासातून दिसून आले. याचा अर्थ, या घटकांकडून पदार्थ बनवताना स्वयंपाकाच्या विषारी तेलाचा पुन्हा पुन्हा वापर केला जातो किंवा अन्य प्रकारच्या खरेदीदारांना त्याची बेकायदा विक्री केली जाते, असे यातून सूचित होते. खाद्यतेलाच्या किंमती आणि कमी उद्योग व्यावसायिकांमध्ये अन्न सुरक्षा नियमांबाबत जागरूकतेचा अभाव या स्वयंपाकाच्या तेलाच्या वापराला कारणीभूत ठरणाऱ्या दोन गोष्टी आहेत. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने काढलेले निष्कर्ष पाहता चेन्नईमध्ये जागरूकता अधिक असल्याने आणि स्वयंपाकाच्या तेलाची विल्हेवाट लावण्यासाठी व्यावसायिक मार्ग उपलब्ध असल्याने या तेलाचा वापर पुन्हा पुन्हा करण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र या अभ्यासातील निरीक्षणांनुसार, हे तत्त्व नवी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांच्यासाठी लागू होत नाही.
अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला या संकटाची किंवा या धोक्याची कल्पना आहे. जैवइंधन, साबण किंवा नैसर्गिक तेल अथवा प्राण्यांच्या चरबीपासून तयार केलेला रासायनिक घटक (ओलीओकेमिकल) या उद्योगांकडे स्वयंपाकाच्या तेलाला अन्न पुरवठा साखळीपासून लांब ठेवून या संकटाशी लढा देण्यासाठी सन २०१८ च्या जून महिन्यात स्वयंपाकाच्या तेलाचा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापर करण्याचा उपक्रम सुरू केला. मात्र चालू वर्षी म्हणजे २०२२ मध्ये अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने संभ्रमात टाकणारे पाऊल मागे घेतले आणि नियमांची अंमलबजावणी करण्याच्या नियंत्रण क्षमतेच्या अभावामुळे त्याचा वापर लांबणीवर टाकण्यासाठी स्वयंपाकाचे उरलेले तेल न वापरलेल्या तेलात मिसळण्यास परवानगी दिली.
ओआरएफ-कोवान यांच्याकडून करण्यात आलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष म्हणजे, मूल्य साखळीतील सर्व भागधारकांसाठी एक थेट आवाहन आहे. ते म्हणजे, भारत सरकार आणि अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने मान्य केलेल्या योग्य खाद्य चळवळीला चालना देण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने खालील चार गोष्टींची आम्ही शिफारस करतो.
या उपाययोजना साथरोगाशी लढा देण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकतात; तसेच आपल्या नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे व सुरक्षित, निरोगी व शाश्वत अन्न पुरवठा साखळी तयार करणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकतात.
हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Nikhil Goveas is Head of Special Projects at Koan Advisory Group a New Delhi-based consultancy. Nikhil leads Koan's work on agriculture and sustainability.
Read More +Dr Nilanjan Ghosh is Vice President – Development Studies at the Observer Research Foundation (ORF) in India, and is also in charge of the Foundation’s ...
Read More +Oommen C. Kurian is Senior Fellow and Head of Health Initiative at ORF. He studies Indias health sector reforms within the broad context of the ...
Read More +