Published on May 16, 2023 Commentaries 0 Hours ago
जबाबदार एडटेक तयार करण्याची गरज

कोविड महामारीने जगभरातील सामाजिक परस्परसंवादाचे स्वरूप आमूलाग्र बदलले आहे. लॉकडाऊनमुळे लोक त्यांच्या घरातच बंदिस्त झाल्याने, या परिस्थितीत जगणे सोईस्कर करण्याचा प्रयत्न करणार्‍या पर्यायी उपायांचा झपाट्याने करण्यात आलेला अवलंब संप्रेषण आणि कामापासून ते आरोग्य आणि वाणिज्य या सर्व संदर्भांमध्ये दिसून आला आहे. या बदलामध्ये, विशेषतः शिक्षणामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

कोरोना महामारीने शैक्षणिक प्रक्रियेमधील कर्मचारी व्यवस्थापनापासून ते अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकनापर्यंतच्या सर्व पैलूंमध्ये डिजिटल साधनांच्या एकत्रीकरणाला गती दिली आहे. खरेतर याचे फायदे बहुविध आहेत. व्हर्च्युअल रिअॅलिटी (ए/व्हीआर) द्वारे विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षणाच्या माध्यमातून  शिक्षण अधिक पारदर्शक बनवण्यात एडटेकने महत्त्वाची भूमिका बजावली आहे तसेच शिकण्याच्या या एकूण अनुभवातही चांगला बदल झालेला आहे असा दावा एडटेकच्या समर्थकांकडून केला जात आहे. शिवाय, अशा उपायांमुळे सर्व वयोगटांना सर्वसमावेशकतेने शिकण्याच्या संधी खुल्या करणे, उच्च कौशल्य प्राप्त करू इच्छिणाऱ्यांसाठी प्रवेशाचे संस्थात्मक अडथळे दूर करणे व त्याद्वारे सक्षम आणि चपळ कार्यबल तयार करून शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्यात मदत होणार आहे. याचा परिणाम म्हणजे असमानता कमी करण्यास मदत होईलच पण त्यासोबत सामाजिक समावेशासही चालना मिळेल.

परंतू, एडटेकविषयी असलेल्या जोखमीच्या प्रकाशात या दाव्यांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. तज्ञांना ही ‘एडटेक सोल्युशनिझम’ बाब रिडक्शनिस्ट वाटते. तज्ञांच्या मतानुसार, अध्यापन-अध्ययन प्रक्रियेतील गुंतागुंत कमी करून सामग्री निर्मिती आणि एक कार्यक्षम शिक्षण वातावरण तयार करण्यासाठी तांत्रिक हस्तक्षेप आणि शिक्षणाचे परिणाम यांच्यातील परस्परसंबंध साधेसोपे आहेत. सध्याची एडटेक सोल्यूशन्स अध्यापनशास्त्राची गैर-रेखीयता प्रतिबिंबित करत नाहीत आणि यातील अनियंत्रित वाढ “मशीन वर्तनवाद” म्हणजेच मशीन मेकॅनिझमच्या संस्कृतीला कारणीभूत ठरू शकते. या प्रकारात शिक्षण कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि एक्स्ट्रीम बिहेविअरल प्रॅक्टीसद्वारे निर्धारित केले जाते. परिणामी यात विद्यार्थ्यांचा शिक्षणाप्रती ओढ कमी होऊ शकते. पुढे, स्वतः एडटेकच्या परिणामकारकतेबद्दल फारसा पुरावा नाही आणि जबाबदार नियमन न करता बाजार-चालित दृष्टीकोन डिजिटल डिव्हाईड वाढवण्याचा धोका असू शकतो.

एडटेकची वाटचाल प्रामुख्याने नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्थेला उत्प्रेरित करण्याच्या क्षमतेवर केंद्रित असल्याचे दिसते. शिक्षणात जे काही बिघडले आहे ते सुधारण्याची क्षमता एडटेकमध्ये आहे, अशाप्रकारच्या  दैवीकरणामुळे मानवी एजन्सी, स्वायत्तता, गोपनीयता आणि कल्याण यांच्यावरील तंत्रज्ञानाच्या परिणामांशी निगडीत समस्यांपासून लक्ष वळवले जात आहे. इतर इंटरनेट प्लॅटफॉर्मप्रमाणे, एडटेक प्लॅटफॉर्म डेटा गोळा करतात आणि शिकणाऱ्याचा अनुभव वैयक्तिकृत करण्यासाठी अल्गोरिदम वापरतात. एडटेकशी संबंधीत डेटाचे संकलन आणि वापर यावरील सुरक्षा उपाय आजच्या नियमांमध्ये समाविष्ट नाहीत. यामुळे क्लिनीकल प्रोफायलींग, हायपर नज आणि वापरकर्त्यांना मॅनिप्युलेट करणे यांसारख्या प्रकारांना चालना मिळते. मूड आणि तणाव पातळीचे निरीक्षण करण्यासाठी आणि अंदाज लावण्यासाठी बायोमेट्रिक डेटा (हृदयाचे ठोके आणि रेटिनाच्या हालचाली) गोळा करणार्‍या काही एडटेक उत्पादनांचे अहवाल हे विद्यार्थ्यांवर पाळत ठेवण्याच्या संस्कृतीचे लक्षण आहेत, ज्याची योग्य वेळेस तपासणी न केल्यास त्याचे समस्याग्रस्त परिणाम दिसू शकतात.

इंटरनेटमध्ये एआय आणि मेटाव्हर्सच्या लोकप्रियतेसह एक प्रतिमान बदल होत असताना, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञांनी खोल अनिश्चिततेच्या परिस्थितीत एडटेक प्रशासनाच्या भविष्यासाठी योजना आखणे आवश्यक आहे.

लहान बालके आणि पौगंडावस्थेतील मुले अशा अनुप्रयोगांचे प्राथमिक लाभार्थी असल्याने व उत्पादनात आणि नियमन दोन्हीमध्ये एकसमान अल्पवयीन आणि तरुण सुरक्षा उपायांचा अभावामुळे त्यांना हानी पोहोचण्याचा धोका अधिक आहे. यूकेमधील फाईव्ह राइट्स फाउंडेशन या बालहक्क संस्थेने एडटेक प्लॅटफॉर्ममुळे उद्भवू शकणार्‍या धोक्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण केले आहे. यात सामग्री जोखीम (अयोग्य सामग्रीशी संपर्क), संपर्क जोखीम (असामाजिक व्यक्तींच्या संपर्कात येण्याचा धोका) आणि करार जोखीम (व्यापक डेटा संकलनाशी संबंधित चिंता) यांचा समावेश आहे. सध्या एकूण इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये मुलांचे प्रमाण एक तृतीयांश इतके आहे. असे असूनही बहुतेक एडटेक सोल्यूशन्समध्ये बालके- केंद्रित डिझाईन्सचा अभाव असल्याने डिजिटल शिक्षणाच्या भविष्याबद्दल चिंताजनक चित्र निर्माण झाले आहे.

याशिवाय, सरकारे एडटेकचा वाढता वापर करत असताना, त्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी, विक्रेत्यांसाठी आधारभूत आवश्यकता आणि योग्य देखरेख यंत्रणा या महत्त्वाच्या बाबींचा धोरणात्मक नियोजनात विचार करणे आवश्यक आहे. अर्थात याचा एडटेक मार्केटच्या स्पर्धात्मकतेवर दीर्घकालीन परिणाम होणार आहेच पण त्यासोबत आभासी मक्तेदारी निर्माण होण्यासही प्रतिबंध होणार आहे. शेवटी, इंटरनेटमध्ये एआय आणि मेटाव्हर्सच्या लोकप्रियतेसह एक प्रतिमान बदल होत असताना, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञांनी खोल अनिश्चिततेच्या परिस्थितीत एडटेक प्रशासनाच्या भविष्यासाठी योजना आखणे आवश्यक आहे.

पुढील वाटचाल

सकारात्मक नवोपक्रमासोबतच जोखीमा वाढतच जाणार आहेत, हे आज पॉवर एडटेक तंत्रज्ञानाच्या जनरेटिव्ह स्वरूपातून दिसून आले आहे. परंतू, हानी कमी करण्याच्या उद्देशाने क्लॅम्पडाउन ठेवल्यास त्यांच्या क्षमतेचा उपयोग करण्याच्या शक्यतांनाच बाधा येणार आहे. आधीच झालेले नुकसान पूर्ववत करू पाहणाऱ्या एक्स-पोस्ट यंत्रणांवर आपण अवलंबून राहू शकत नाही. ही उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करणारे पुनरावृत्ती आणि सहयोगी मार्ग तयार करणे ही काळाची गरज आहे. म्हणून आपण जबाबदारीने एडटेकमध्ये नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

पुढील वाटचालीत अशा फ्रेमवर्कला एडटेक गव्हर्नन्समध्ये समाकलित करण्याची तातडीची गरज आहे. असे केल्यास शिक्षणाचे भविष्य न्याय्य, सर्वसमावेशक आणि सुरक्षित असेल आणि अति-नियमनामुळे नावीन्यपूर्णतेला बाधा येणार नाही.

याचा अर्थ काही कारवाई करण्यात आलीच नाही असे नाही. इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स’ (आयईईई) द्वारे वयानुरूप डिझाइन आणि डेटा गव्हर्नन्स फ्रेमवर्क तसेच यूकेचा वयानुरूप डिझाइन कोड, युनायटेड स्टेट्सचा चिल्ड्रन ऑनलाइन गोपनीयता संरक्षण कायदा आणि ऑस्ट्रेलियन ई-सेफ्टी कमिशनरची सुरक्षा यावर सेट केलेले मानक -बाय-डिझाइन तत्त्वे या संदर्भात आशादायक उदाहरणे आहेत. प्रवेशयोग्य दर्जेदार शिक्षणासाठी स्वयं-नियामक आचारसंहिता विकसित करण्यासाठी भारतीय एडटेक कंन्सोर्शिअमचे प्रयत्न हे यासाठी आवश्यक असलेल्या अभिनव प्रशासनाच्या दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे. पुढे, एआय आणि डिजिटल सेवांवर इयूद्वारे व्यापक जोखीम-आधारित फ्रेमवर्क देखील या उदयोन्मुख नियामक उपक्रमाला आकार देण्यास मदत करतात.

हे सर्व प्रयत्न करण्यात येत असले तरीही एकत्रित कारवाईला मोठा वाव आहे. जबाबदार नवनिर्मितीतेचे दृष्टीकोन हे धोरणकर्ते आणि तंत्रज्ञांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करू शकतात जे पुढे योग्य फ्रेमवर्क विकसित करू शकतात. खाली वापरण्यात आलेले  फ्रेमवर्क हे अपेक्षा, प्रतिक्षेप, समावेश आणि प्रतिसाद या चार आयामांचा विचार करते.  हेच पुढे जर एडटेकवर लागू केले गेले तर ते सुरक्षित डिजिटल शिक्षणासाठी सक्षम मार्ग तयार करू शकतात.

वर देण्यात आलेले फ्रेमवर्क हे नियामकांना धोरणाचा मार्ग ठरवण्यासाठी टेम्पलेट म्हणून काम करतात. देशाच्या संदर्भाचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यानंतर त्याचा विनियोग करणे आवश्यक आहे. पुढील वाटचालीत अशा फ्रेमवर्कला एडटेक गव्हर्नन्समध्ये समाकलित करण्याची तातडीची गरज आहे. असे केल्यास शिक्षणाचे भविष्य न्याय्य, सर्वसमावेशक आणि सुरक्षित असेल आणि अति-नियमनामुळे नावीन्यपूर्णतेला बाधा येणार नाही.

सिद्धांत चॅटर्जी हे धोरण सल्लागार आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.