Author : Kriti M. Shah

Published on Mar 26, 2021 Commentaries 0 Hours ago

पाकिस्तानी लष्कराच्या गुप्तचर संस्थांकडून आणि त्यांच्या प्रसारमाध्यमांकडून त्यांच्या जनतेच्या मनात भारताबद्दल द्वेषाचे विष पसरवण्याचे काम केले जात आहे.

पुलवामा आणि बालाकोटची दोन वर्षे

पुलवामा हल्ल्याला १४ फेब्रुवारी रोजी दोन वर्षे झाली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. यात ४६ भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर लागोपाठ घडामोडी घडल्या. बालाकोटमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर भारताने सर्जिकल स्ट्राइक केला. त्यानंतर भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानाच्या पायलटला पाकिस्तानी सैन्याने कैद केले. त्यानंतर त्याची सुटका केली. प्रत्येक वर्षी पाकिस्तान जगाला आणि आपल्या लोकांना ‘परोपकारी शांततेच्या वृत्तीचे’ आहोत हे पटवून देत आहे. पाकिस्तानचा जल्लोषाचा सूर आणि आपल्या शेजाऱ्यांच्या ढोंगीपणा आणि दुटप्पीपणाची आपल्याला आठवण करून देण्यासाठी बालाकोट स्ट्राइक आणि त्यानंतरचे परिणाम विश्लेषकांद्वारे पुनर्विचार करण्यायोग्य आहेत.

फेब्रुवारी -मार्च २०१९ मधील घडामोडी हा एक महत्वाचा धडा आहे, की त्या किती प्रमाणात धारणा तयार झाली आहे आणि वर्णनात्मक आहेत. गेल्या आठवड्यात पाकिस्तानने सोशल मीडियावर जल्लोष साजरा केला. कारण त्यांनी ठाम समजूत करून घेतली होती की, आपण ‘जिंकलो’ आहोत. भारतीय हवाई दलाच्या पायलटला परत करताना काहीतरी करायला हवे असे वाटत होते ते पाहायला मिळाले नाही, उलट याउलट त्यांची कृती परोपकारी वृत्ती दाखवणारी होती, जी भारताला अपमानित करणारी दिसून आली. जर, ती कृती पाकिस्तानच्या लक्ष वेधून घेणाऱ्या कथानकात चपखल बसणारी नसेल तर, वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे दिसते.

याची कोणतीही आठवण नसल्याचे पाहायला मिळते, एक म्हणजे, पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रचंड दबाव असल्यामुळे पायलटला कोणतीही इजा पोहोचू न देता, त्याची तातडीने सुटका करण्यात आली. दुसरे म्हणजे, भारताच्या संभाव्य प्रत्युत्तरामुळे जनरल बाजवा हे ‘भीतीने थरथर कापत’ असल्याची जाणीव झाली. तिसरे म्हणजे, त्यांनी एफ १६ लढाऊ विमान कसे गमावले. चौथे म्हणजे, काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्याचा त्यांचा हेतू होता, तो कसा पूर्ण करता आला नाही. पाचवे म्हणजे, पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या संघटनेने कशी स्वीकारली. लक्षात राहण्यासारखी एकमेव घटना म्हणजे, पाकिस्तान लष्कराकडून भारतीय सैनिकाची केलेली वापसी. पाकिस्तानी लष्कराच्या गुप्तचर संस्थांकडून आणि त्यांच्या प्रसारमाध्यमांकडून त्यांच्या जनतेच्या मनात भारताबद्दल द्वेषाचे विष पसरवण्याचे काम केले जात आहे.

पाकिस्तानच्या परोपकाराची उदात्त कहाणी आश्चर्यकारक, पुनरावृत्ती आणि साफ हास्यास्पद आहे; तसेच तर्कहीन आणि विवेकशून्य आहे. उरी हल्ल्यानंतर २०१६ मध्येही सर्जिकल स्ट्राइक झाला होता. त्यावेळीही पाकिस्तानने ती बाब फेटाळून लावली. भारताने सर्जिकल स्ट्राइक किंवा बालाकोटमध्ये असे काही घडल्याचे साफ नाकारले होते.

शेवटी पाकिस्तानच तो. आपल्या भूमीत दहशतवादी सक्रिय असल्याचे जर ते वारंवार नाकारू शकतात, तर ते भारताने सर्जिकल स्ट्राइक करून त़्यांचा खात्मा केला, हे का स्वीकारतील? म्हणूनच, त्यांच्या सैन्याला त्यांच्या हवाई क्षेत्रात भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची गरज भासली आणि त्यांनी ते केलं, कारण भारतीय पायलट त्यांच्या ताब्यात होता. त्यांनी याकडे आपला विजय म्हणून पाहिले आणि त्याला प्रत्युत्तरादाखल केलेली कारवाई असे गोंडस नाव दिले.

फेब्रुवारी -मार्च २०१९ च्या घडामोडींच्या कहाणीचे कारण म्हणजे, त्यांनी विजयी झाल्याची धारणा निर्माण केली. खोटेनाटे रचले गेले, जे पाकिस्तानच्या मनातच खोलवर रुजलेले आहे. आम्ही पायलटला परत केले आणि आम्ही काही चुकीचे केलेच नाही. पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्याची भारताला एकच संधी आहे, ती म्हणजे पाकिस्तान सरकार त्यांच्यासोबत जो ‘डाव’ खेळत आहे, तो त्यांनी ओळखायला हवा, असे अपेक्षित आहे. पण त्यांच्या सोशल मीडियाच्या चमूने आणि विकत घेतलेल्या मीडियाने असे काही घडू शकते, याच्या शक्यताही संपवल्या.

या कारणांमुळे अलीकडेच झालेल्या शस्रसंधीच्या घोषणेकडे अत्यंत सावध आणि संशयी दृष्टिने पाहणे महत्वाचे आहे. ज्यावेळी दोन्ही बाजूंनी सर्व करारांवर, सामंजस्यावर आणि सर्व सेक्टर तसेच नियंत्रण रेषेवरील शस्रसंधीचे काटेकोर पालन करण्यावर सहमती दर्शवलेली आहे, तर ती भारताला तात्पुरता दिलासा देणारी बाब आहे. परंतु ते सर्व बाबतीत शक्य होणार नाही.

या परिस्थितीवर निराशावादी नाही, तर वास्तववादी आहोत. त्याचे कारण म्हणजे पाकिस्तानची काश्मीर मुद्द्यावरील भूमिका किंवा पाकिस्तान पुरस्कृत दहशवादाच्या मुद्द्यावरील भारताची भूमिका बदललेली नाही. आम्ही शांतता कायम राखल्याचे अमेरिकेनेही म्हटले असल्याचे पाकिस्तानला जगाला विशेषतः फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सला (FATF),ज्यांनी त्यांना ग्रे लिस्टमध्ये टाकले आहे, त्यांना हे दाखवून देण्याची गरज आहे. वास्तविक वाद असताना, करार हे जाहीररित्या दिलेले आश्वासन आहे आणि ती हितावह बाब ठरते.

पाकिस्तानच्या चुकांवरून भारताला चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. यात कोणतीच शंका नाही, परंतु दोन्ही देशांच्या नेत्यांकडे आवाहन करण्यासाठी त्यांच्या देशातील क्षेत्र आहे, पण राजकीय पक्षांचा अजेंडा त्यांच्या एक देश या दृष्टिकोनावर थेट परिणाम करतो. अनेक वर्षांपासून पाकिस्तान हा भारताची धर्मनिरपेक्षता केवळ फार्स असल्याचा प्रसार करत आहे. आंतरराष्ट्रीय संस्था पाकिस्तानला गांभीर्याने घेत नाहीत. भारताची धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही प्रतिमा आहे, त्यात मोठी दरी निर्माण होत असून, देशासह पाश्चिमात्य देशांत सत्तारूढ भाजप सरकारवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. यावरून असे दिसून येते की, भारत सरकारकडून काहीही सांगितले जात असले तरी, आपल्या प्रतिमेला हानी पोहोचवत आहे. त्याउलट ‘मी तर असेच म्हणालो होतो,’ असे शस्त्र पाकिस्तानकडून वापरले जात आहे.

पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे झाली आहे. यानिमित्त हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे, की आपल्या विरोधकामध्ये बदल झालेला नाही. तो आहे तसाच आहे. वास्तवात नसलेल्या गोष्टींचा प्रसार करणे हाच त्याचा हेतू आहे. आणखी एक म्हणजे तो नेहमीच आपण पीडित आहोत, आणि फसवणूक झाली आहे असे भासवत असतो, तरीही आम्हीच विजेता आहोत, असे छातीठोकपणे सांगत असतो. म्हणूनच, त्या दृष्टिकोनातून शस्त्रसंधी करार झालाच पाहिजे आणि ती स्वागतार्ह बाब आहे. परंतु, आपल्या सुरक्षेसह खबरदारी घेणेही तितकेच गरजेचे आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Kriti M. Shah

Kriti M. Shah

Kriti M. Shah was Associate Fellow with the Strategic Studies Programme at ORF. Her research primarily focusses on Afghanistan and Pakistan where she studies their ...

Read More +