Author : K. V. Kesavan

Published on Apr 26, 2019 Commentaries 0 Hours ago

दुसरे महायुद्धानंतर नव्याने उभा राहिलेला जपान पारंपारिक राजकीय सत्तेच्या हस्तांतरणानंतर नव्या युगात प्रवेशतोआहे. यानिमित्त जपानी राजकीय अवकाशाचा घेतलेले वेध.

नव्या युगाच्या उंबरठ्यावर जपान

जपानचे विद्यमान सम्राट अकिहितो आपले उत्तराधिकारी नारुहितो यांच्यासाठी एक मोलाचा वारसा मागे सोडून जात आहेत.

जपान एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभा आहे. जपानचे विद्यमान सम्राट अकिहितो ३० एप्रिल रोजी राजसत्तेवरून पाय उतार होत आहेत. १ मे रोजी त्यांचे ज्येष्ठ पुत्र राजकुमार नारुहितो यांना सन्मानाचा राजमुकुट प्रदान केला जाईल. सम्राटांनी पायउतार होण्याची जपानच्या २०० वर्षांच्या इतिहासातील ही एक अद्भुत अशी पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे१९८९ पासून या वर्षीच्या ३० एप्रिल पर्यंत व्यापलेल्या हेसी युगाचा औपचारिक अस्त होईल.

हेसी युगाकडून नव्या रीवा युगाकडे सत्तेचे हस्तांतरण होण्याची ही घटना म्हणजे जपानच्या युद्धोत्तर इतिहासातील आणि राजकारणातील एक मैलाचा दगड आहे. मावळते सम्राट अकिहितो यांनी काळाच्या पडद्यावर एक अमिट ठसा उमटवला आहे. त्यांनी मागे ठेवलेला हा वारसा म्हणजे त्यांच्या उत्तराधीकाऱ्यासाठी त्यांनी घालून दिलेला एक नवा मापदंड आहे. दुसर्या महायुद्धाच्या काळात जपान आणि जपानच्या नागरिकांना ज्या अमानुष छळाला तोंड द्यावे लागले त्याच्या कटू आठवणींची शिदोरी अकिहितोंच्या गाठीशी होती, तशी ती नारुहितो यांच्याकडे नाही. त्यांचा जन्म १९३४ सालचा, ते युद्ध-पूर्व जपान आणि युद्धोत्तर जपान या दोन कालखंडाना जोडणारा सेतू झाले आहेत. युद्धाच्या काळात त्यांन टोकियोच्या बाहेर आसरा घ्यावा लागला. युद्ध समाप्त झाल्यानंतर ते जेंव्हा टोकियो शहरात परत आले तेंव्हा त्यांनी पाहिलं की शहर पूर्णतः उध्वस्त झालेलं होतं. १९४५ साली जपानने संपूर्ण शरणागती पत्करली होती. तेंव्हा ते फक्त ११ वर्षांचे होते, तरीही देश ज्या गंभीर परिस्थितीतून गेला होता त्याची त्यांना कल्पना होती. सुरुवातीच्या सहयोगी व्यावसायिक कालावधीच्या दरम्यान (१९४५-५२) राजेशाहीच्या सामान्य प्रणालीवर मोठा परिणाम झाला आणि विशेष परिणाम झाला तो कोवळ्या वयातल्या राजकुमारावर. पहिली गोष्ट जनरल डग्लस मॅकअर्थर यांच्या अधिपत्याखालील सहयोगी व्यावसायिक मंडळाने राजेशाही पद्धती सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला, त्याच्याशी संबधित होती. विजयी सहयोगी मंडळातील सदस्यांच्या मतात याबाबीवरून फुट पडली होती. परंतु, सुरुवातीपासूनच मॅकअर्थर यांना राष्ट्रीय ऐक्याचे प्रतिक असलेली पद्धत म्हणून राजेशाहीच हवी होती. त्यांना “मानवतावादी सम्राटशाही” अभिप्रेत होती ज्यामुळे देश एकजुटीने राहील. ज्यामुळे त्यांना अनेक दशके देशातील जनतेपासून दूर राहावे लागले त्या दैवी वलयापासून सम्राटाला मुक्त करण्यासाठी त्यांनी १९४७ च्या नव्या संविधानासोबातच, अनेक प्रभावी उपाय अंमलात आणले. दुसरी गोष्ट म्हणजे, सहयोगी मंडळाच्या अधिकाऱ्यांनीच तरुण अकीहीतोच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण उदारमतवादी वातावरणात झाली पाहिजे याकडे विशेष लक्ष पुरवले. त्याला इंग्लिश भाषा आणि पाश्चिमात्य संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी त्यांनी एलिझाबेथ ग्रे व्हिनिंग या अमेरिकन शिक्षिकेची नेमणूक केली. आयुष्याच्या एका अत्यंत अवघड वळणावर तरुण अकीहीतोच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यात लेडी विनिंग यांचा मोलाचा वाटा आहे.

१९८९ साली वयाच्या ५५व्या वर्षी अकिहितो सम्राट पदावर विराजमान झाले. जपानच्या युद्धोत्तर स्वीकारलेल्या संविधानानुसार “राज्याचे आणि प्रजेच्या एकतेचे प्रतिक असलेला” तो पहिला सम्राट होता. तीस वर्षांच्या आपल्या कार्यकाळात संविधानानुसार “या संविधानात नमूद केलेल्या राज्यातील काही घडामोडीच्या बाबतीतच सम्राट आपले अधिकार बजावेल आणि शासनाशी सबंधित बाबींशी त्याचा संबध असणार नाही,” या संविधानाने त्यांना ठरवून दिलेल्या भूमिकेशी ते ठाम राहिले.

संविधानाने मर्यादा घातल्या असल्या तरी तीन ते चार क्षेत्रात त्यांनी जो वारसा निर्माण केला त्याबद्दल सम्राट अकिहितो कायम स्मरणात राहतील. पहिली गोष्ट म्हणजे, त्यांनी स्वतःच्या शांत आणि प्रतिष्ठीत मार्गाने जनता आणि सम्राट यातील दरी मिटवण्याचा प्रयत्न केला, सम्राटाच्या भूमिकेची त्यांनी पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. या अर्थानेच जपानची जनता त्यांना “जनतेचा सम्राट” म्हणून संबोधते. राजघराण्यात विशिष्ट राजेशाही कुटुंबातच होणार्या विवाह संबधांच्या कर्मठ परंपरेला छेद देत, त्यांनी टेनिस कोर्ट वर भेट झालेल्या मिशिको शोडा, या सामान्य कुटुंबातून आलेल्या महिलेशी विवाह केला. त्यांच्या पावलावर पावले टाकीत त्यांच्या दोन्ही मुलांनी देखील सामान्य कुटुंबातील मुलींशीच विवाह केला.

दुसरी बाब म्हणजे, सामान्य जनतेशी जोडून घेण्याच्या त्यांच्या तीव्र इच्छेमुळे जपान मधील सर्वच्या सर्व ४७ राज्यांत त्यांनी प्रवास केला. त्यांच्या हेसी राजवटीत, जपानवर अनेकवेळा नैसर्गिक आपत्तींचे संकट कोसळले. जपान १९९५ साली हंशीन-अवाजी भुकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीतून गेला. सम्राट अकिहितो आणि सम्राज्ञी मिशिको यांनी या आपत्तीग्रस्त प्रदेशाला भेट दिली आणि आपादग्रस्तांना आधार आणि मदत देण्याचा प्रयत्न केला. २०११ मध्ये जें देशावर भूकंप, त्सुनामी आणि फुकोशिमा येथील अणुउर्जा अपघात, असे तिहेरी संकट आले तेंव्हा, अकिहितो यांनी देशावर आलेल्या या संकटांच्या मालीकांबाबत देशाला उद्देशून बोलण्याचे एक विलक्षण पाउल उचलले. एकाच वेळी आलेल्या तिन्ही आपत्तींत बळींच्या वाढत्या संख्येबद्दल त्यांनी सखोल चिंता व्यक्त केली. यामुळे त्यांचे जनतेशी दृढ नाते निर्माण केले. त्याचप्रमाणे २०१६ मध्ये कुमामाटो येथे झालेल्या भुकंपानंतर या सम्राट आणि साम्राज्ञीने आपदग्रस्त लोकांना भेट दिली. आपदग्रस्तांना त्यांच्या भेटीनंतर उत्साह यायचा.

त्याचप्रमाणे अकीहोतो यांना ७०% अमेरिकेच्या लष्करी छावण्या आणि सुविधा असलेल्या ओकिनावा राज्यातील जनतेच्या कायदेशीर वैफल्याची कल्पना आहे. अकिहितो आणि त्यांची पत्नी मिशिको यांनी या बेटांना तब्बल १४ वेळा भेट दिली आहे. दशकाहूनदेखील जास्त जुन्या असलेल्या त्यांच्या दु:खाच्या तीव्रतेची कल्पना असल्याने १९९६ साली त्यांनी ओकिनावा जनतेसाठी आवाज उठवून शासनाच्या कारभारात दाखल न देण्याची परंपरा देखील मोडीत काढली. ते म्हणाले, “ओकिनावा प्रश्नी जपान सरकार आणि अमेरीकन सरकार यांच्यात चर्चा होईल आणि जनतेच्या आयुष्यात आनंद आणणारा मार्ग नजरेत येईल अशी मला अशा आहे.”

तिसरी गोष्ट म्हणजे, अकिहितो शांततेचे पुरस्कर्ते आहेत. आशियातील अनेक भागातील युद्धापूर्वी जपानी लष्कराच्या हालचालींबाबत त्यांनी वेळोवेळी तीव्र नारजी व्यक्त केली आहे. उदाहरणार्थ, २०१५ साली जपानच्या शरणागतीला ७० वर्षे पूर्ण झाल्याची दखल घेत असताना, सम्राट अकिहितो स्पष्टपणे म्हणाले होते, जपानने दुसर्या युद्धाच्या वेळी आशियातील ज्या ज्या भागात चढाई केली होती, त्याबाबत विचार करावा. जपानने मंचुरियन घटनेनंतर सुरु झालेल्या युद्धाचा अभ्यास करण्याची आणि त्यातून धडा घेण्याची अतिशय आवश्यकता असल्याचे त्यांचे ठाम मत होते. पंतप्रधान अबे यांच्यापेक्षा सम्राटांचे हे वक्तव्य अधिक सरळ असल्याचे अनेकांचे मत होते. दुसर्या युद्धात जे जे मारले गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अकिहितो यांनी आशियातील चीन, फिलीपाइन्स, पॅसिफिक बेटातील पालाउ आणि सैपान अशा अनेक देशांना भेट दिली आहे.

२०१३ मध्ये या शाही जोडप्याने भारताला दिलेल्या भेटीची आठवण भारतीय अतूट आदराने काढत असतात. या भेटीने दोन्ही देशातील भागीदारीला मोलाची प्रेरणा दिली.

चौथी बाब म्हणजे, युद्धानंतर जपानच्या शांततेच्या भूमिकेला पूर्णतः वाहून घेणे. पंतप्रधान अबे यांनी घेतलेल्या सुरक्षे सबंधित काही विधायी उपाय राबवले त्याबाबत अकिहितो फारच नाराज होते. पंतप्रधान अबे यांच्या कडून जोरदार समर्थन मिळत असलेल्या सामुहिक संरक्षणाच्या हक्काबाबत ते नाराज होते.

अकिहितो, हे त्यांचे वारसदार नारुहितो यांच्यासाठी फार मोलाचा वारसा ठेवून जात आहेत. नारुहितो हे १९६० साली जन्मलेले असल्याने त्यांना युद्धातील काळाची पुरेशी कल्पना नाही. उलट युद्धानंतर सुरु झालेल्या अर्थव्यवस्थेच्या भरभराटीच्या काळात ते मोठे झालेत आणि त्याचं शिक्षणदेखील इंग्लंड मध्ये पूर्ण झालं आहे. अलीकडेच त्यांचा ५९ व्या जन्मदिनी त्यांनी आपल्या मात्यापित्यांचा वारसा पुढे चालवण्याचा दृढ निश्चय बोलून दाखवला. “शाही कुटुंबासाठी बदलत्या काळानुसार जे काही आवश्यक आहे त्याचा पाठपुरवा करण्याचा मी प्रयत्न करेन,” असेही ते ठामपणे म्हणाले.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.