Author : Jaya Thakur

Published on May 15, 2020 Commentaries 0 Hours ago

झुनॉसिस म्हणजे प्राण्यांकडून माणसांकडे होणारे संक्रमण हा जागतिक आरोग्यासामोरचा आजचा सर्वात महत्त्वाचा आणि वाढत चाललेला धोका आहे.

मानवजातीला धोका ‘झुनॉसिस’चा!

कोरोनाकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघता येते का पाहू या. जरा असा विचार करू की, हा विषाणू आपल्यापर्यंत कसा पोहचला? याचे सरळसाधे उत्तर असे की, तो चीनमधल्या एका मांसविक्री करणाऱ्या बाजारातून माणसाच्या शरिरात आणि तिथून जगभर पसरला. या उत्तराचे दोन भाग आहेत. एक वटवाघूळ किंवा तशाच कोणत्या एखाद्या प्राण्याकडून तो माणसाच्या शरिरात आला हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे त्या माणसाकडून जगभरातील माणसाकडे पोहचला. पहिल्या भागाचा विचार केला तर, काही माणसे असे प्राणी खातात किंवा त्यांच्या संपर्कात येतात म्हणून असे रोग माणसाकडे येतात. दुसरा भाग म्हणजे जागतिकीकरणामुळे सारे जग एकमेकांना असे जोडले आहे की, असे संक्रमण सर्दी-खोकला अशा माध्यमातून जगभर पसरू शकते. म्हणजेच माणसाच्या सवयी आणि आजचे जागतिकीकरण या दोन्ही गोष्टींमुळे कोरोना आज जगभर थैमान घालतो आहे.

जागतिकीकरणाची चाके पुन्हा उलटी फिरतील असे आता तरी वाटत नाही. पण प्राण्यांकडून होणारे संक्रमण कसे टाळता येईल, हे गांभीर्याने पाहायला हवे. प्राण्यांकडून होणाऱ्या या संक्रमणाचा अभ्यास करणाऱ्या प्रक्रियेला अर्थात ‘झुनॉसिस’ला समजून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखांमधून करूया.

झुनॉसिस म्हणजे काय?

जेव्हा एखादा विषाणू त्याच्यापासून संक्रमित होणाऱ्या इतर सजीवानंतर, मानवाला संक्रमित करू लागतो तेव्हा या प्रक्रियेला ‘झुनोसिस’ असे म्हणतात. झूनोसिसशी संबंधित घटना यापूर्वी ही घडल्या आहेत आणि भविष्यातही घडणार आहेत. गुरे आणि पाळीव प्राण्यांशी  असलेल्या जवळीकमुळे, पक्षांपासून पसरणारा ताप ( एव्हियन इन्फ्लुएन्झा / avian influenza) आणि गुरे, शेळ्या, मेंढ्या यांच्यापासून पसरणाऱ्या तापाचा म्हणजेच अँथ्रॅक्स सारख्या रोगांचा प्रादुर्भाव याधीही झाले आहे. उदाहरण म्हणून पाहायचे तर, प्राण्यांच्या आतड्यात विषाणूची बाधा झाली असेल, तर त्यांच्या मांसामुळे टायफाईड किंवा पॅराटायफाईड सारखे आजार होता. किटकांपासूनही झुनॉटिक्स सारख्या संक्रमणाची प्रक्रिया होणे ही देखील एक सामान्य बाब आहे.

पण,  या झूनॉसिस प्रक्रियेतून आलेल्या जीवघेण्या नोव्हेल विषाणूंच्या संक्रमणांकडे नव्याने पाहायला हवे. ही संक्रमणे कुठून आली असावीत, त्याबाबचे स्पष्टीकरण केवळ आपल्याला आजपर्यंत अज्ञात असलेल्या आणि इतर कोणाचाही हस्तक्षेप होत नसलेल्या जंगलांमध्ये शिरण्यामागे, मानवाचे जे हेतू आहेत त्यात दडलेली आहेत. या सगळ्या प्रक्रियेत मानवाचा नव्या वनस्पती, प्राणी आणि मूळातच रोगकारक परिस्थितीचे भंडार असलेल्या जगाशी आला. मागच्या शतकात मानवाला एच.आय.व्ही. आणि इबोला सारखे झालेले संसर्ग हे देखील या झूनॉसिस प्रक्रियेतूनच झालेले आहेत. या दोन्ही संसर्गाला कारणीभूत असलेले विषाणू आफ्रिका खंडातल्या वन्य प्राण्यांपासून (चिंपांझी आणि वटवाघळांपासून) तिथल्या माणसांपर्यंत पोहचले. याचा संबंध आपण ‘बुश मांस’च्या सेवनाशी जोडला जाऊ शकतो. आफ्रिकेच्या जंगलामधल्या वन्य जीवांचे मांस माणसांच्या खाण्यासाठी वापरले जाते त्याला ‘बुश मांस’ असे म्हटले जाते.

उष्ण कटिबंधीय क्षेत्रात येणाऱ्या आफ्रिका, आशिया, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक वनक्षेत्रात आजही ही प्रथा सुरू आहे. बुश मांसचा व्यापार १९९० च्या दशकात वाढला आणि त्यामुळे अनेक चिंपांझी आणि माकडांच्या इतर प्रजाती, वटवाघळे, टोड (बेडकासारखे प्राणी) तसेच उंदीर आणि सशांसारखे असंख्य प्राणी मारले गेले आहेत. बुश मांसासाठी होणारी कत्तल आणि त्याचा व्यापर ही बाब जैवविविधतेसाठी धोका असल्याचा विचारला २००५ च्या सुमारास मान्यता मिळू लागली. वाढत्या लोकसंख्येमुळे वनक्षेत्र घटत गेले, त्यासोबतच मांसाची मागणी वाढत गेली. यामुळे शिकाऱ्यांनी आपला मोर्चा याआधी त्यांनी ज्या जंगलांमध्ये शिरकाव केला नव्हाता तिकडे वळवला. त्यातूनच रोगजंतूचा संसर्ग झालेल्या प्राण्यांशी संपर्क होण्याची शक्यता आणि त्यातून नव्या विषाणूंचे इतर प्रजातींमध्ये संक्रमण होण्याची शक्यता वाढली.

झूनॉसिसच्या प्रक्रियेतून झालेले  एचआयव्हीचे (ह्युमन इम्युनोडेफिसेएंसी व्हायरस) संक्रमण, हे कट हंटर गृहितक (कट हंटर हापोथिसिस) म्हणून प्रसिद्ध आहे. एचआयव्ही हा चिंपांझींमध्ये आढळणाऱ्या सिमियन इम्युनोडेफिसेएंसी व्हायरससारखाच आहे. या विषाणूच्या संक्रमाणाबाबत विसाव्या शतकाच्या पहिल्या टप्प्यात ज्या विचाराला मान्यता मिळाली तो असा होता की, एचआयव्हीने संक्रमित असलेल्या चिंपांझीचे मांस काढताना, त्याच्यातले विषाणूंचा, त्या शिकाऱ्याच्या उघड्या जखमेशी संपर्क आला, आणि त्यातून तो विषाणू त्याच्या शरीरात शिरला. एचआयव्ही या विषाणूच्या स्वरुपात बदल होऊन त्याचे सध्याचे स्वरुप अस्तित्वात यायला म्हणजे त्याच्या उत्परिवर्तनाला (mutation) साधारण अर्ध्या शतकाचा काळ लागला असावा. महत्वाचे म्हणजे या विषाणूच्या उत्परिवर्तनाची प्रक्रिया अजूनही सुरु आहे. ईबोला या विषाणूची झूनॉसिसची प्रक्रियाही जवळपास एचआयव्हीसारखीच आहे. आणि आधी जसे म्हटले आहे, त्याप्रमाणे सध्याच्या कोविड – १९ या साथीच्या रोगाला जबाबदार असलेल्या सार्स-कोव्ह-२ (SARS-CoV-2) हा विषाणूही प्रकारच्या आंतरप्रजातीय संक्रमणाच्या अवस्थेतून गेला असावा असे मानले जात आहे.

झूनॉसिसच्या प्रक्रियेवर कसे नियंत्रण ठेवता येऊ शकेल?

कोविड१९ चा उद्रेक झाल्यानंतर चीनमधल्या मांसविक्रीच्या बाजारात सामान्यतः खाल्ले जात नाहीत, अशा वन्य प्राण्यांच्या मांस विक्रीसाठी उपलब्ध असण्याबद्दल, आता अनेक वाद विवाद केले जात आहेत. वुहानच्या ज्या बाजारातून या आजाराचा प्रादुर्भाव झाला असे मानले जात आहे, त्या बाजारातला जो वन्य जीवांचा विभाग आहे, तिथे साप, बीव्हर, साळिंदर, तसेच मगरींच्या लहान पिल्लांसह वटवाघळूळ आणि पँगोलिनसारखे  अनेक वन्यजीव आणि त्यांच्या प्रजाती विकल्या जातात, त्यांची कत्तलही केली जाते. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या बाजारांवर आता देखरेख ठेवली जाणार हे ही स्पष्टच आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एखादी खाद्यान्नाची बाजारपेठ निरोगी असावी यासाठी ती कशा पद्धतीने चालवली गेली पाहीजे, याबद्दल मार्गदर्शक तत्वेही घालून दिलेली आहेत. मांसविक्रीच्या बाजारातून प्राणी पक्षांपासून होणारा एव्हियन इन्फ्लूएन्झाचा संसर्ग टाळता यावा, या बद्दलच्या दस्तऐवजात सर्व मार्गदर्शक सूचनांचा समावेश आहे. पिंजरे स्वच्छ करणे, संबंधित प्राण्यांच्या कत्तलखान्यांच्या जागचे वातावरण स्वच्छ असणे, मांस विक्रेते आणि ते हाताळणाऱ्यांनी वैयक्तिक संरक्षक उपकरणांचा (पीपीई) वापर करणे, विविध प्रकारच्या मांसाचा परस्परांशी संबंध येऊन त्यांना संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी अशा बाजारांचे विभागीकरण करणे, मांसविक्रीच्या बाजारांमध्ये कशा प्रकारे कामे करायला हवी याबाबत प्रशिक्षण देणे, तसेच संपूर्ण बाजारांवर देखरेख ठेवणे अशा असंख्य सूचनां या दस्तऐवजात प्राधान्यक्रमाने मांडलेल्या आहेत. जर या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले गेले असते, तर आज आपण ज्या संकटाचा सामना करत आहोत, कदाचित ते संकट उद्भवलेच नसते.

एकाच देशाला दोष देणे किंवा त्या देशातल्या मांस विक्री बाजारांवर नियंत्रण ठेवणे, ही काही भविष्यातल्या झूनॉसिसच्या प्रक्रियांवर नियंत्रण मिळवण्यासाठीची किंवा त्या रोखण्याची योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना असू शकत नाही. कारण, याआधीच नमूद केल्याप्रमाणे, भारतारख्या अनेक विकसनशील देशांमध्ये मांसविक्रीचे बाजार ही सामान्य गोष्ट आहे. तर अनेक देशांमध्ये अन्न म्हणून वन्य जीवांची कत्तल करून त्यांचे मासं खाणे ही देखील सामान्य बाब आहे. खरेतर खाण्याच्या पिण्याच्या या सवयींमागे, पारंपरिक खाण्याच्या सवयी ते दारिद्र्याशी संबंधित अनेक जटिल कारणे आहेत.

जंगलांमध्ये केलेल्या हस्तक्षेपामुळे झुनॉसिस घडते का? घडले का?

१९८० पासून झूनोसिसचे प्रमाण कसे वाढले, याबाबतचे आपले संशोधन स्मिथ एट अल यांनी २०१४ मध्ये प्रकाशित केले. झुनॉसिस म्हणजे “जागतिक आरोग्यासामोरचा सर्वात महत्त्वाचा आणि वाढत चाललेला धोका आहे” असे जोन्स एट अल यांनी म्हटले आहे. तर, वाढत्या प्राणीसंग्रहीचा जंगलाशी संबंध असू शकतो, वाढती जंगलतोड, वन परिसंस्थेवरचा वाढत चाललेला ताण तसेच मानव आणि वन्यजीवांमधली वाढती जवळीक याच्या झूनॉसिसचा संबंध आहे, असे डेव्हिड क्वाम्मेन यांच्यासारख्या काही तज्ज्ञांचे मत आहे. एक अशी पर्यावर्णीय परिसंस्था जी सुदृढ आणि निरोगी आहे, (उदारणार्थ – कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय असलेली प्राचीन जंगले) तेव्हा त्यापासून मानवाला काही फायदे मिळत असतात.

अशा जंगलांमुळे पोषण चक्र, जमीन घडण्याची प्रक्रिया सुरळीत राहण्यात, तसेच आपली सांस्कृती टिकवून ठेवण्यासाठी  आवश्यक असलेल्या प्राथमिक गोष्टी उपलब्धता आणि नियमनातही या जंगलांची मदत होत असते. आजारांचा प्रादुर्भाव रोखणे ही देखील या वनाद्वारे होणाऱ्या नियमन प्रक्रियेतलीच महत्वाची गोष्ट आहे. रोगराई पसरवू शकणारे जीवजंतू आणि विषाणूची संघटित प्रक्रिया रोखून त्या मानवाशी संपर्क होऊ न देण्याच्या माध्यमातून अशा प्रकारचे नियमन सुरु असते. पण जेव्हा अशा वनांच्या परिसंस्थेत हस्तक्षेप केला जातो, तेव्हा प्राण्यांच्या वर्तनातही बदल होतात, त्यांचा मानवासह इतर पाळीव प्राण्यांशी संपर्कही वाढू लागतो, आणि त्यातूनच एखाद्या विषाणूचा एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संसर्ग होण्याचा धोकाही वाढत असतो.

जंगलात मिळणाऱ्या फळांवर जगणारी वटवाघळांना, त्यांच्या मूळ अधिवासाची जागा उध्वस्त होऊ झाल्याने, मानव राहत असलेल्या परिसरातल्या फळझाडांकडे वळावे लागले. यातून त्यांचा इतर पाळीव प्राण्यांशीही संपर्क आणि जवळीकही वाढली आणि त्यासोबतच निपाह आणि हेंड्रा यांसारख्या विषाणूंचा एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत होणारा संसर्गही वाढला.

भारताने अधिक दक्ष राहण्याची गरज का आहे

भारतात पश्चिम बंगाल, ईशान्यकडची राज्ये आणि केरळच्या काही भागांसह भारताचा लक्षणीय भुभाग वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या आजारांशी संबंधित झुनॉसिसच्या प्रक्रियेच्या दृष्टीने धोक्याच्या शक्यतेत असलेला भाग आहे. दक्षिण आशियातल्या इतर देशांप्रमाणेच भारतातही मांसविक्रीचे अनेक बाजार आहेत. मांसविक्रीच्या या बाजारांमध्ये (विशेषतः ईशान्य भारतातले मांसविक्रीचे बाजार) सामान्यतः न खाल्ल्या जाणारे वन्य जीव आणि त्यांचे मांस विकले जाते. (अर्थात त्यातलेही असंख्य प्राणी  वन्यजीव कायद्यांतर्गत संरक्षित आहेत). अर्थात अशी स्थिती ही दुर्दैवाने, अशा प्रकारच्या झुनॉसिसच्या प्रक्रियेसाठी पोषक आहे, जी सध्या सुरु असलेल्या महामारीला कारणीभूत ठरलेल्या कोरोना विषाणूच्या बाबतीतही घडली असल्याचे मानले जाते.

कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट येईल का?

चीन लॉकडाऊनमधून हळूहळू बाहेर येतोय. त्याचाच भाग म्हणून वुहान प्रांतातले मांस विक्री करणारे अनेक बाजारही आता सुरु होऊ लागले आहेत. (मात्र वुहुानच्या ज्या घाऊक मासळी बाजार,जिथे पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडले होते, तो बाजार सोडून). विशेषतः दक्षिण आशियाई देश, नाशवंत वर्गवारीत येणारे ताजे मासे, मांस अन्न संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, अशा देशांमधे मांस विक्रीचे बाजार अगदी जागो जागी दिसून येतात. चिनीमधल्या मांस विक्रीच्या बाजारांमध्ये जगभरात सामान्यतः खाल्ले जातात अशा प्राण्यासह, जे प्राणी सामान्यतः खाल्ले जात नाहीत अशा वटवाघळं, पँगोलिन असे जीवही विक्रीसाठी उपलब्ध असतात.

चीनचा विचार केला तर ही त्यांच्या दैनंदिन जीवनपद्धतीतली एक महत्वाची बाब आहे. मात्र दुर्दैवाने, सप्टेंबर २०१९ च्या सुमारास, अशाच एका जीवातून, शक्यतो वटवाघुळ किंवा पँगोलीन, यांचा तिथल्या उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांशी असा काही संपर्क आला, की त्यातून वटवाघळाच्या लाळेमधला हा जीवघेण्या विषाणूचा प्रसार होऊन त्याची इतरही प्रजातींना बाधा झाली, आणि त्यामार्गे नंतर माणसांमध्ये हा संसर्ग वेगाने पसरला. कोरोनाच्या संसर्गाला कारणीभूत ठरलेले मांसविक्रीचे हे बाजार पुन्हा एकदा सुरु होत असल्याने, या बाजारांमुळे पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट येईल का? असा प्रश्न जग, एका दहशतीखालीच विचारू लागले आहेत.

आपण काय करू शकतो?

अर्थात सध्याच्या संकटातून संपूर्ण जग हळूहळू निश्चितच बाहेर पडेल. पण त्याचवेळी ज्या ज्या देशांमध्ये मांसविक्रीचे बाजार आहेत, जिथे जिथे जंगलांमधला हस्तक्षेप वाढला आहे, आणि जिथे जिथे सामान्यतः न खाल्ल्या जाणाऱ्या वन्य जीवांचे आणि बूश मांस खाण्याची प्रथा आहे, त्या देशात, झुनॉसिसच्या च्या प्रक्रियेमुळे कधीही रोगराईचा उद्रेक होऊ शकतो ही शक्यता कायमच गृहीत धरायला हवी. सध्याचा साथीचा रोग हा काही शेवटचा साथीचा रोग नाही. झूनॉसिस तसेच प्राण्यांपासून होणारे आजार ही एक एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती पूर्णपणे टाळता येणार नाही. पण योग्य खबरदारी घेऊन त्याची गती मंद किंवा नियंत्रित करता येते शकते.

भविष्यातल्या अशा प्रकारच्या संकटाच्या किंवा धोक्याच्या घटनांशी समर्थपणे लढा द्यायचा असेल तर त्यासाठी झूनॉसिसची प्रक्रिया आणि धोक्यांबाबत व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. मांसविक्रीच्या बाजारातल्या सर्व क्रिया प्रक्रिया जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार केल्या जात आहेत की नाही यावर देखरेख ठेवणे, बुश मांसच्या सेवनासारख्या प्रथा बदलून खाण्याच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तसेच वन्य जीवांच्या व्यापारावर निर्बंध आणण्यासाठी प्रभावी धोरणे राबवणे अशा उपाययोजना आपल्याला कराव्या लागणार आहेत.

अर्थात या सगळ्या उपाययोजना आणि प्रक्रिया संपूर्ण जगासाठी आवश्यक आहेत, पण भारत अशा उपाययोजनांची सुरुवात करणारा देश अशी स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी भारताला आहे. त्यासाठी आपल्याकडचा लॉकडाऊन संपल्यानंतर आपण भविष्यातल्या संभाव्य झुनॉसिसच्या प्रक्रियेवर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक धोरण अवलंबवायला हवे. कारण, जेव्हा केव्हा अशा प्रकारची झुनॉसिसची प्रक्रिया झाल्याने एखादा साथीचा रोग वेगाने पसरु लागेल, तेव्हा तो रोखण्यासाठी संपूर्ण देशात दोनेक महिन्यांकरता लॉकडाऊन जाहीर करावा लागण्यापेक्षा, केवळ काही प्रथा, परंपरा आणि सवयींवचं नियंत्रण आणि त्यावरची देखरेख ही नक्कीच सोयीस्कर बाब आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.