Published on Aug 21, 2023 Commentaries 0 Hours ago

अलिकडच्या काळात भारताने आपल्या सुरक्षाविषयक भागिदारींचा मोठा विस्तार केला आहे, पण भारताच्या सुरक्षाविषयक गरजा लक्षात घेता अशा प्रकारचे सुरक्षाविषयक सहकार्य पुरेसे ठरेल का हाच खरा प्रश्न आहे. 

संयुक्त लष्करी सरावांशी संबंधीत उपक्रमांमध्ये भारताचा वाढता सहभाग

भारतीय लष्कर गेले काही आठवडे आणि महिने आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये गुंतलेले होते. भारतीय लष्कराने स्वतःला अनेक देशांसोबत संयुक्त आणि बहुराष्ट्रीय लष्करी सरावांसाठी जोडून घेतले आहे. ही खरे तर कौतुकास्पद बाब आहे. प्राथमिक पातळीवर हे सगळे उपक्रम भारताच्या धोरणात्मक भागीदार देशांसोबतच होत असले तरीदेखील, ही बाब म्हणजे सुरक्षाविषयक सहकार्यात इतर देशांसोबत जोडून घेण्याच्याबाबतीत भारत विश्वासार्हतेने पुढे वाटचाल करू लागला असल्याचे ठळक निदर्शक आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात, भारतीय आणि अमेरिकी सैन्याने “युद्ध अभ्यास” हा संयुक्त लष्करी सरावाचा उपक्रम राबवला. केले. हा सराव भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष सीमा रेषा असलेल्या असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळच्या ठिकाणी झाला. हा सराव म्हणजे भारत आणि अमेरिकेमधील घनिष्ट धोरणात्मक आणि सुरक्षाविषयक भागीदारीचे प्रतिबिंब असल्याचे नक्की म्हणता येईल. या संयुक्त सरावाची १८ वी पुनरावृत्ती, अर्थात ‘युद्ध अभ्यस २२’ उत्तराखंडमधील औली इथे आयोजित करण्यात आली होती. परस्परांच्या सर्वोत्तम पद्धती, डावपेच, तंत्र  आणि कार्यपद्धती एकमेकांशी सामायिक करणे हा या सरवाच्या आयोजनामागचा उद्देश होता असं या सरावाबाबत भारतीय लष्करानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं होतं. या सरावात अमेरिकेच्या ११व्या हवाई तुकडीतल्या दुसऱ्या ब्रिगेडचे सैन्य आणि भारतीय लष्करातील आसाम रेजिमेंटच्या सैनिकांनी या सरावात भाग घेतला होता. या सरावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि शांतीसैनिकांशी संबंधीत सरावावर भर दिला गेला होता. त्यासोबतच नैसर्गिक आपत्तीच्या काळात “जलद आणि समन्वयाधारीत मदत पोचवण्यासाठी मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणशी (एचएडीआर) [Humanitarian Assistance and Disaster Relief (HADR)] संबंधीत  राबवायच्या मोहीमा हा देखील या सरावाचा भाग होता. या सरावात क्षेत्र प्रशिक्षणाशी संबंधीत वर्गवारीत एकात्मिक लढाऊ गटांची निश्चिती, मनुष्यबळाची वाढ (force multipliers), टेहळणी / देखरेख व्यवस्थेची उभारणी आणि कार्यान्वयन,  मोहीमांमध्ये प्रत्यक्ष कार्यरत दळणवणीय साधनांची निश्चिती, डोंगराळ प्रदेशातील युद्धकौशल्ये, पिडीतांची सुटका आणि खडतर भूप्रदेश तसेच प्रतिकून हवामानाच्या परिस्थितीत लढाऊ वैद्यकीय मदत अशा विविध प्रकारच्या सरावांचा समावेश होता. भारतातील अमेरिकन दूतावासाने या सरावाबाबत आपल्या ट्विटर संदेशात असे म्हटले होते की, “युद्ध अभ्याससारख्या संयुक्त लष्करी सरावामुळे भारत – प्रशांत क्षेत्राबद्दलची आमची वचनबद्धता अधिक दृढ होते, परस्पर क्रियाशिलतेत सुधारणा होते आणि त्यासोबतच अमेरिका आणि भारतामधील संरक्षणविषयक भागीदारीही एका नव्या उंचीवर पोहोचते”

दोन्ही देशांमध्ये सकारात्मक लष्करी संबंध विकसित करणे, परस्परांच्या सर्वोत्तम पद्धती एकमेकांसोबत सामाईक करणे आणि “संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतात अंमलबजावणी करारानुसार अर्ध वाळवंटीय प्रदेशात बहु-क्षेत्रीय मोहीमा हाती घेत, त्यांचे एकत्रीतरित्या कार्यान्वयन करण्याच्या क्षमतेला चालना देणे” हे या सरावाचे उद्दिष्ट होते.

एकीकडे हा युद्ध अभ्यास सराव चालू असतानाच, भारतीय सैन्याने ऑस्ट्रेलिया या आपल्या आणखी एका धोरणात्मक भागीदार देशासोबत सराव सुरू केला होता.  पाकिस्तानसोबतच्या सीमेलाच लागून असलेल्या पश्चिम भारतातील राजस्थानमध्ये ऑस्ट्रा हिंद हा २८ नोव्हेंबरला सुरू झालेला सराव दोन आठवडे चालला. भारतीय तसेच ऑस्ट्रेलियाच्या लष्कराच्या तुकड्यांनी या सरावात भाग घेतला. दोन्ही देशांमध्ये सकारात्मक लष्करी संबंध विकसित करणे, परस्परांच्या सर्वोत्तम पद्धती एकमेकांसोबत सामाईक करणे आणि “संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतात अंमलबजावणी करारानुसार अर्ध वाळवंटीय प्रदेशात बहु-क्षेत्रीय मोहीमा हाती घेत, त्यांचे एकत्रीतरित्या कार्यान्वयन करण्याच्या क्षमतेला चालना देणे” हे या सरावाचे उद्दिष्ट होते. या सरावात आधुनिक काळातील अद्ययावत उपकरणे, बटालीयन / कंपनी स्तरावरवरच पिडीतांची सुटका आणि दळणवळाचे नियोजन करण्यासह परिस्थितीविषयक अधिकाधिक अचूक माहिती उपलब्ध करून देता यावी यासाठी नेमबाजांसाठीच्या (स्नायपर / sniper) आवश्यक शस्त्र व उपकराणांसह, देखरेख आणि टेहळणीसाठीची तसेच संवादाची उपकरणे अशा घटकांचा समावेश केला होता, असं या सरावासंदर्भात भारतीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं होतं.

याच दरम्यान, महाराष्ट्रातल्या देवळाली इथे भारतीय आणि सिंगापूर सैन्याने “एक्सरसाईज अग्नी योद्धा” च्या १२व्या आवृत्तीचे आयोजन केले होते. भारत आणि सिंगापूरच्या लष्कराचा हा द्विपक्षीय सराव १३ नोव्हेंबरला सुरू झाला आणि ३० नोव्हेंबरला त्याची समाप्ती झाली.  या सरावाबाबत भारतीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, हा सराव म्हणजे “दोन्ही देशांच्या तोफखान्याची संयुक्त मारक क्षमता तसेच नियोजन, अंमलबजावणी आणी वापरचे” दर्शन घडवण्याची एक संधी होती. या सरावादरम्यानच्या संयुक्त प्रशीक्षण सत्रात दोन्ही देशांच्या सैन्यानं त्यांच्याकडेचे विशिष्ट तंत्रज्ञान आणि तोफखाना नियंत्रण व्यवस्थेचाही वापर केला होता.

या द्विपक्षीय सरावाबाबत सिंगापूरनेही निवेदन जारी केले होते. त्यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार दोन्हीकडच्या सैन्यातले एकूण २७० लष्करी जवान या सरावात सहभागी झाले होते. सिंगापूरच्या सशस्त्र दलातले तोफखान्याचे मुख्य अधिकारी कर्नल देविश जेम्स यांनीही या सराव महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.  या सरावामुळे तोफखान्यातील बंदुकधारी जवानांना (गनर /gunner) एकत्रित प्रशिक्षण घेता आले . . . सिंगापूरच्या तोफखाना विभागासाठी गुंतागुंतीचे आणि वास्तववादी प्रशिक्षण आयोजित करण्याकरता, आम्हाला प्रशिक्षण क्षेत्राची आवश्यकता आहे, आणि दीर्घकाळापासून प्रशिक्षणाची अशी संधी उपलब्ध करून दिल्यबद्दल आणि त्यासाठी सातत्याने सहकार्य केल्याबद्दल आम्ही भारतीय सैन्याचे मनापासून कौतुक करतो” असे देविश यांनी म्हटले आहे. भारत आणि सिंगापूरमध्ये झालेल्या लष्कराच्या द्विपक्षीय करारानुसार   २००४ साली या द्विपक्षीय सरावाला सुरुवात झाली होती. आता या सरावाने दोन्ही देशांमधल्या लष्करी सहकार्याचा प्रदीर्घ इतिहास रचला आहे, आणि त्यात लष्करी सरावाच्या माध्यमातून होत असलेली नियमीत देवाणघेवाण, लष्करातील वाटाघाटी, कर्मचाऱ्यांसोबतचा संवाद आणि परस्परांकडून पुरवले जाणारे अभ्यासक्रम अशा मोठ्या घटकांचा वाटा आहे.

भारताने आग्नेय आशियातील इंडोनेशिया या आपल्या आणखी एका शेजारी देशाबरोबरही लष्करी सरावात भाग घेतला होता. “एक्सरसाईज गरुड शक्ती” हे या सरावाचे नाव. इंडोनेशियातील करवांग येथील संग्गा बुआना प्रशिक्षण क्षेत्रात आयोजित केलेला हा सराव २१ नोव्हेंबरपासून सुमारे दोन आठवडे सुरू होता.

भारताने आग्नेय आशियातील इंडोनेशिया या आपल्या आणखी एका शेजारी देशाबरोबरही लष्करी सरावात भाग घेतला होता. “एक्सरसाईज गरुड शक्ती” हे या सरावाचे नाव. इंडोनेशियातील करवांग येथील संग्गा बुआना प्रशिक्षण क्षेत्रात आयोजित केलेला हा सराव २१ नोव्हेंबरपासून सुमारे दोन आठवडे सुरू होता. भारत आणि इंडोनेशियाच्या विशेष दलांनी या सरावात भाग घेतला. दोन्ही देशांच्या द्विपक्षीय सराव मालिकेतली ही या आठवी आवृत्ती होती. परस्परांमधले लष्करी सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांमधील जीवनशैली आणि संस्कृतीचे आकलन करत, इतर धोरणात्मक भागीदारांप्रमाणेच, परस्पर समजूतदारपणा, सहकार्य आणि परस्परक्रियाशीलता अधिक बळकट करणं हा गरुड शक्ती या सरावाचा उद्देश आहे. या सरावातून दोन्ही देशांमधील सौहार्दपूर्ण संबंध सुनिश्चित होण्याच्यादृष्टीनेही आणखी एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आणि त्यासोबतच प्रादेशिक सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेनेही आणखी एक पुढचे पाऊल पडले. याआधी जूनमध्ये दोन्ही देशांनी अंदमानचा समुद्र आणि मलाक्काच्या सामुद्रधुनीमध्ये ३८व्या परस्पर समन्वयीत टेहळणी आणि दखरेख उपक्रमात  (इंडिया इंडो कॉरपॅट)भाग घेतला होता.  या उपक्रमात अंदमान आणि निकोबार कमांडच्या  (एएनसी) भारतीय नौदलाच्या तुकड्या आणि इंडोनेशियाचे नौदल सहभागी झाले होते. १३ जूनला सुरू झालेला हा संयुक्त उपक्रम दहा दिवसांपेक्षा जास्त काळ सुरू होता. तीन वर्षांपूर्वी कोविड महामारीची सुरुवात झाल्यानंतरचा हा पहिला कॉरपॅट उपक्रम होता. ही घडामोड म्हणजे एकीकडे भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील वाढत्या परस्पर विश्वासाचेच आणखी एक प्रतिबींबच होते, पण त्यासोबतच दुसरीकडे ही घटना म्हणजे आता भारतही अशाप्रकारच्या सुरक्षा आणि लष्कराशी संबंधीत परस्पर संपर्कविषयक उपक्रमांच्या बाबतीत अधिक स्विकारार्ह होत असल्याचेही निदर्शक आहे.

एकूणात गेल्या काही महिन्यांतल्या या सगळ्या घडामोडींच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यात आग्नेय आशिया हा आघाडीवरचा प्रमुख प्रदेश होता असे नक्कीच म्हणता येईल. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारताने आग्नेय आशियातील मलेशिया या तिसऱ्या  देशाबरोबर संयुक्त लष्करी सरावात भाग घेतला होता. २०१२ मध्ये सुरू झालेला हा सराव २८ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत मलेशियातील क्लुआंग इथल्या  पुलाई इथे आयोजित करण्यात आला होता. भारतीय लष्कराची गढवाल रायफल्स रेजिमेंट आणि मलेशियाच्या लष्कराची रॉयल मलाय रेजिमेंट यांनी या सरावात भाग घेतला. जंगल भूप्रदेशातील विविध मोहीमांचे नियोजन आणि अंमलबजावणीविषयक परस्पर कार्यक्षमता मजबूत करणं हे या सरावाचं उद्दिष्ट होतं.  याअंतर्गत बटालियन स्तरावर कमांड प्लॅनिंग एक्सरसाइज (सीपीएक्स / CPX) आणि जंगल भूप्रदेशातील अर्ध-पारंपारिक मोहीमांसाठी कंपनी स्तरावरील प्रत्यक्ष क्षेत्र प्रशिक्षणाचा सराव अशा घटकांचा समावेश केलेला होता.भारतीय लष्कर आणि मलेशियाच्या  लष्करातील परस्पर संरक्षणविषयक सहकार्याला वरच्या स्तरावर नेणं हा एक्सरसाईज हरिमाऊ शक्ती या सरावाचा उद्देश होता असं या सरावाबाबात भारतीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

याशिवाय देखील भारताने ज्या ज्या इतर लष्करी सरावांमध्ये भाग घेतला त्यात, मध्य आशियातील कझाकस्तान या आणखी एका महत्त्वाच्या भागीदारासोबतच्या ‘एक्स कझइंड’ या लष्करी सरावाचा समावेश आहे. २०१६मध्ये या सरावाला सुरूवात झाली होती. आता ही या सरावाची सहावी आवृत्ती होती. मेघालयातील उमरोई इथे १५ ते २८ डिसेंबर दरम्यान या सरावाचे आयोजन केले केले होते. इतर अनेक सरावांप्रमाणेच, एक्स काझइंडमध्ये संयुक्त नियोजन, संयुक्त नियोजित कवायती, विशेष शस्त्रास्त्र कौशल्यविषयक मूलभूत बाबी, नैसर्गिक आपत्तीच्या काळात “जलद आणि समन्वयाधारीत मदत पोचवण्यासाठी मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणशी (एचएडीआर) संबंधीत मोहीमा, विरोधी गटाच्या ठिकाणार धाड टाकणे अशा घटकांचा समावेश होता. यासोबच १६ ते २९ डिसेंबर या काळात नेपाळसोबतच्या सोळाव्या सूर्य किरण या वार्षिक लष्करी सरावतही भारत सहभागी झाला होता.  नेपाळमधील सालझंडी इथल्या नेपाळ आर्मी बॅटल स्कूलमध्ये आयोजित केलेल्या या जंगली प्रदेशाचे संवर्धन, डोंगराळ प्रदेशातील दहशतवादविरोधी कारवाया आणि संयुक्त राष्ट्रांच्या उद्दिष्टांअर्गतनैसर्गिक आपत्तीच्या काळात “जलद आणि समन्वयाधारीत मदत पोचवण्यासाठी मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणशी (एचएडीआर)संबंधीत मोहीमा अशा घटकांवर भर दिला गेला.

मलबार सरावाची प्रत्येक आवृत्ती म्हणजे परस्परांच्या कार्यान्वयन पद्धती आणि डावपेचांविषयीचे आकलन अधिक दृढ करण्याच्यादृष्टीने पुढच्या पातळीवर गेलेली आवृत्तीच आहे. स्वाभाविकपणे या लाभ घेत या देशांना भारत प्रशांत क्षेत्रातील सागरी आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्याची आपापली क्षमता अधिक वाढवता येणार आहे.

अशा प्रकारच्या द्विपक्षीय लष्करी सरावांसोबतच जपानच्या समुद्रात  बहुराष्ट्रीय मलबार सरावही पार पडला. २०२२मध्ये झालेला सराव म्हणजे मलबारचा ३० वा वर्धापन दिनही होता. भारत आणि अमेरिकेच्या नौदलांच्या द्विपक्षीय सरावाने मलबार सरावाला सुरूवात झाली होती. या सरावात जपान २०१५ पासून कायमचा भागीदार म्हणून सहभागी झाला, तर २०२० पासून ऑस्ट्रेलियानेदेखील या सरावात भाग घ्यायला सुरूवात गेली. यंदाच्या आवृत्तीत ईस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर अॅडमिरल संजय भल्ला यांच्या नेतृत्वात भारताच्या ईस्टर्न फ्लीटमधली शिवालिक आणि कमोरटा या नौका सहभागी झाल्या होत्या. हा सरावामुळे इतर सदस्य देशांसोबत भारताने स्वाक्षरी केलेल्या दळणवळणाशी संबंधीत अनेक द्विपक्षीय सहकार्य करांरांना मान्यता मिळवून देण्याची संधीदेखील दिली.  मलबार सरावाची प्रत्येक आवृत्ती म्हणजे परस्परांच्या कार्यान्वयन पद्धती आणि डावपेचांविषयीचे आकलन अधिक दृढ करण्याच्यादृष्टीने पुढच्या पातळीवर गेलेली आवृत्तीच आहे. स्वाभाविकपणे या लाभ घेत या देशांना भारत प्रशांत क्षेत्रातील सागरी आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्याची आपापली क्षमता अधिक वाढवता येणार आहे.

आपल्या धोरणात्मक भागीदारांसह भारतानं सहभाग घेतलेल्या या असंख्य लष्करी सरावांमधून सुरक्षेच्या बाबतीतल्या भारताच्या नव्या दृष्टिकोनाविषयीचे काही वेगळे पैलू दिसून येतात. एक म्हणजे, अशा प्रकारच्या लष्करी सरावांमध्ये सहभागी होण्यात हात आखडता घेण्याची भारताची पारंपारिक सवय आता भूतकाळातली गोष्ट झाली आहे. त्यासोबतच चीनसोबतच्या समस्यावर उपाययोजना करण्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या वाटत असलेल्या नव्या सुरक्षाविषयक भागीदारांसोबत जाण्याविषयी भारताचा स्वतःचा विश्वास आणि सुलभताही वाढली आहे. भारताने ज्या काही नव्या सुरक्षाविषयक  भागीदार जोडले आहेत, त्याचा डावपेचाच्या अंगाने विचार केला तर त्यात धोरण, सुत्रबद्धता आणि जटीलताही दिसून येते. दुसरी गोष्ट अशी की अशा प्रकारच्या बाहेरील सरावात साधारणतः भारताचे नौदल सहभागी होत असे, पण आता बदललेल्या सुरक्षा परिस्थितीचे प्रतिबिंब म्हणून, भारताचे सैन्य आणि हवाई दल देखील आपल्या समविचारी भागीदारांसोबत अशा लष्करी सरावांच्या सहभागाबद्दल सक्रिय झालेले दिसतात. उदाहरण घ्यायचं झालं तर चार एसयू-30 एमकेआय आणि दोन सी -17 विमानांचा समावेश असलेल्या भारतीय हवाई दलाच्या तुकडीने ऑस्ट्रेलियात झालेल्या एक्सरसाइज पिच ब्लॅक २०२२ या सरावात भाग घेतला होता. २०२२ च्या या आवृत्तीत १०० पेक्षा जास्त विमाने आणि १७ भागीदार देशांमधल्या हवाई दलांचे २५०० कर्मचारी सहभागी झाले होते. ऑस्ट्रेलियाच्या रॉयल ऑस्ट्रेलियन हवाई दलाने या द्वैवार्षिक बहुराष्ट्रीय सरावाचे आयोजन केले होते.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.