Author : Oommen C. Kurian

Published on Aug 07, 2023 Commentaries 0 Hours ago

हिपॅटायटीसचे उच्चाटन करणे ही आधुनिक युगाची गरज आहे. त्यासाठी आरोग्य सेवा प्रदाते, सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या बहुक्षेत्रिय समन्वय साधून जागतिक स्तरावर सर्व समावेशक धोरण आखण्याची आवश्यकता आहे.

आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे हिपॅटायटीसचे उच्चाटन करणे शक्य

28 जुलै हा हिपॅटायटीस बी विषाणूचा शोध लावणाऱ्या डॉ. बारूच ब्लमबर्ग यांचा जन्मदिन. जागतिक आरोग्य संघटना (WHO) हा दिवस जागतिक हिपॅटायटीस दिवस म्हणून साजरा करते. हिपॅटायटीसचे उच्चाटन करण्यासाठी हा दिवस एक संधी म्हणून पाहिले जाते. अनेक स्तरांवरून, व्यक्तीपासून सरकारी कृतींपर्यंत, चांगल्या प्रतिसादासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. हिपॅटायटीस ही एक यकृताची सूज आहे जी हिपॅटायटीस विषाणूच्या पाच मुख्य प्रकारांमुळे उद्भवते. ज्याला A, B, C, D आणि E प्रकार म्हणून संबोधले जाते. गैर-संसर्गजन्य घटकांमुळे यकृताच्या समस्या उद्भवत असतात. तथापि B आणि C प्रकार हे यकृत सिरोसिस, कर्करोग आणि मृत्यूचे कारण बनणारे सर्वात सामान्य प्रकार आहेत. WHO नुसार जगभरातील जवळपास 354 दशलक्ष लोक हेपेटायटीस बी किंवा सी संसर्गाने ग्रस्त आहेत. बहुतेक रुग्णांना चाचणी आणि उपचारांची उपलब्धता नसते. योग्य लसीकरण, लवकर निदान आणि उपचार यामुळे अकाली मृत्यू टाळता येऊ शकतात.

हिपॅटायटीस ही एक यकृताची सूज आहे जी हिपॅटायटीस विषाणूच्या पाच मुख्य प्रकारांमुळे उद्भवते. ज्याला A, B, C, D आणि E प्रकार म्हणून संबोधले जाते. गैर-संसर्गजन्य घटकांमुळे यकृताच्या समस्या उद्भवत असतात.

एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की 2001 ते 2020 पर्यंत हिपॅटायटीस बी लसींनी 73 कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अंदाजे US $ 49 अब्ज आजार खर्च आला होता तसेच US $ 81 अब्ज आर्थिक आणि सामाजिक मूल्य वाचविण्यात मदत केली आहे. यामधून हिपॅटायटीसचे आर्थिक खर्च सूचित करण्यात आले आहेत. HIV/AIDS, क्षयरोग आणि मलेरिया यांसारख्या इतर प्रमुख संसर्गजन्य रोगांसह हा रोग, जागतिक सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी एक आव्हान म्हणून पाहिले जाते. SDG लक्ष्य 3.3 हिपॅटायटीस थांबवण्यासाठी विशिष्ट कृती करण्याची गरज स्पष्टपणे नमूद करते. तरीही, हिपॅटायटीस हा अशा आजारांपैकी एक आहे जो अनेकदा आरोग्याच्या संदर्भातील सर्वोच्च प्राधान्य म्हणून याकडे पाहिले नाही. पुढे डब्ल्यूएचओच्या अभ्यासानुसार वर्धित लस कव्हरेज, निदान आणि शैक्षणिक मोहिमेचा वापर करून अंदाजे ४.५ दशलक्ष हिपॅटायटीस-संबंधित मृत्यू टाळता येऊ शकतात.

एक समस्या अशी आहे की हिपॅटायटीस, एक महामारी म्हणून अनेक देशांमध्ये अपुरा अभ्यास केला गेला आहे. ज्यामुळे राष्ट्रीय आणि उप-राष्ट्रीय स्तरावर डेटाची उपलब्धता कमी आहे. यामुळे जाणीवपूर्वक लक्ष ठेवणे, कार्यक्रम तयार करणे आव्हानात्मक बनते. याव्यतिरिक्त लसींची सुलभता आणि परवडणारी क्षमता, विशेषत: LMIC मध्ये हे सर्वात मोठे आव्हान आहे. लसींच्या उत्पादनाशी संबंधित इतर जोखमींमध्ये संशोधन आणि विकास (R&D) मध्ये होणारा उच्च खर्च, लस विकसित करण्यासाठी आणि चाचणी करण्यासाठी लागणारा वेळ, अयशस्वी होण्याचा मोठा धोका यांचा समावेश होतो. आर्थिक आणि प्रक्रियात्मक अडथळ्यांमुळे स्थानिक पातळीवर लस उत्पादनास विलंब होत असला तरी देखील राजकीय अर्थकारण आणि भू-राजकीय फ्लॅशपॉईंटचे मुद्दे तंत्रज्ञानाचे हस्तांतरण किंवा गरज असलेल्या राज्यांमध्ये लसींची निर्यात रोखतात. हे सर्व एकत्रितपणे LMICs मध्ये रोगाचा भार कमी करण्यासाठी प्रतिबंध आणि नियंत्रण करण्याच्या प्रयत्नांना अडथळे आणताना दिसतात.

लसींच्या उत्पादनाशी संबंधित इतर जोखमींमध्ये संशोधन आणि विकास (R&D) मध्ये होणारा उच्च खर्च, लस विकसित करण्यासाठी, चाचणी करण्यासाठी लागणारा वेळ आणि अयशस्वी होण्याचा मोठा धोका यांचा समावेश होतो.

हिपॅटायटीसमुळे होणारे आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक परिणाम हेपेटायटीसवर उपचार करण्यासाठी सुरक्षित, परवडणाऱ्या लसींचा विकास, निर्मिती आणि वितरण करण्यासाठी मजबूत यंत्रणा तयार करण्याची गरज दर्शवित आले आहे. विशेषत: LMIC मध्ये, या संदर्भात जागतिक आरोग्य विधानसभा 2016 पासून हिपॅटायटीस नष्ट करण्याच्या दिशेने काम करत आहे, जेव्हा त्यांनी जागतिक आरोग्य क्षेत्र धोरण स्वीकारले; त्यानुसार, 2030 पर्यंत नवीन संसर्गामध्ये 90-टक्के आणि हिपॅटायटीस-संबंधित मृत्यूंमध्ये 65-टक्के घट करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. तथापि, 2020 चे लक्ष्य गाठण्यात बहुतांश राज्ये अपयशी ठरली आहेत. विविध एजन्सींकडून प्रयत्न होत असताना, राज्यांना हेपेटायटीसच्या जटिल ओझ्याला प्रतिबंध करण्यासाठी आणि सक्रियपणे प्रतिकार करण्यासाठी सामूहिक कृती योजना आवश्यक राहणार आहे. गुणवत्ता आणि समानतेशी तडजोड न करता गुंतलेल्या सर्व भागधारकांसाठी स्पष्ट उत्तरदायित्व, जबाबदारीसह पुढाकारांची स्थापना सुनिश्चित करण्यासाठी जागतिक स्तरावर सुसंगत आरोग्य धोरण चार्टर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहयोग हे एक महत्त्वाचे साधन आहे. विद्यमान आरोग्य सुविधा वाढविण्याचे राज्यांसाठी सहकार्य हे एक साधन आहे, कारण ते आरोग्य उद्दिष्टे एकत्रित आणि गतिमान करण्यात मदत करते. ही गती राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक हस्तक्षेप आणि सामंजस्यासाठी एक व्यासपीठ तयार करते. आंतरराज्यीय देवाणघेवाण प्रादेशिक स्तरावर संभाव्य एकात्मिक आरोग्य धोरण कृतीसाठी संधी प्रदान करते. हे आरोग्य धोरण आणि त्यातील मुद्दे राज्यांमधील संवाद आणि राजनैतिक संबंधांसाठी एक अभिसरण बिंदू देखील प्रदान करतात.

डब्ल्यूएचओने हायलाइट केलेल्या हिपॅटायटीस प्रकरणांचे ओझे जागतिक स्तरावर सर्वसमावेशक धोरणाची आवश्यकता आहे. हिपॅटायटीसला संबोधित करण्यासाठी, उपचारांमध्ये प्रवेश सुधारण्यासाठी यशस्वी आंतरराष्ट्रीय सहकार्य स्थापित केले गेले आहे. उल्लेखनीय म्हणजे, WHO चा ग्लोबल हिपॅटायटीस प्रोग्राम, द कोलिशन फॉर ग्लोबल हिपॅटायटीस एलिमिनेशन (CGHE), द क्लिंटन हेल्थ ऍक्सेस इनिशिएटिव्हचा (CHAI) हिपॅटायटीस उपक्रम, द वर्ल्ड हेपेटायटीस अलायन्स (WHA), डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स (MSF) हिपॅटायटीस कार्यक्रम आणि सहयोग गिलियड सायन्सेस आणि जगभरातील अनेक संस्थांमध्ये भरीव कार्य केले जाते. या भागीदारीद्वारे थेट अँटीव्हायरल औषधांची किंमत कमी केली गेली आहे, ज्यामुळे ती अधिक परवडणारी आणि व्यापक लोकसंख्येसाठी उपलब्ध झाली आहेत. ज्यामुळे हिपॅटायटीस दूर करण्यात प्रगती होण्यास हातभार लागला आहे.

आंतरराष्ट्रीय सहयोग हे जागतिक स्तरावर एक सुसंगत आरोग्य धोरण चार्टर करण्याचे एक माध्यम आहे. जेणेकरून गुणवत्ता आणि समानतेशी तडजोड न करता गुंतलेल्या सर्व भागधारकांसाठी स्पष्ट उत्तरदायित्व, जबाबदारीसह उपक्रमांची स्थापना सुनिश्चित केली जाईल.

हिपॅटायटीससाठी सामूहिक प्रतिसादाची रचना भूतकाळातील यशस्वी सहकार्य व्यवस्थेतून शिकता येणार आहे. 2003 चे गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम (SARS) आणि कोविड-19 साथीच्या रोगाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी सहकार्य महत्त्वपूर्ण होते अशी उदाहरणे यानिमित्ताने दिली जातात. या उद्रेकांना प्रतिसाद म्हणून सरकार, शास्त्रज्ञ, व्यवसाय, नागरी समाज, परोपकारी यांच्या सहकार्याने ग्लोबल आऊटब्रेक अॅलर्ट अँड रिस्पॉन्स नेटवर्क (GOARN) आणि अॅक्सेस टू COVID-19 टूल्स एक्सीलरेटर (ACT-A) सारख्या यंत्रणा स्थापन करण्यात आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटना, अशाप्रकारे या उपक्रमांनी जागतिक आरोग्य प्रणालींना समर्थन देऊन चाचण्या आणि लसींचा प्रवेश यासारख्या काही पैलूंना यशस्वीरित्या प्रोत्साहन दिले आहे. अशा रोगांचे निदान आणि लसींमध्ये प्रवेश सुधारण्यास मदत करत असताना, सततच्या उद्रेकाने आंतरक्षेत्रीय सहकार्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली आहे.

अशा प्रकारचे सहकार्य विकसित करण्यात नागरी समाज संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण ते प्रभावित लोकसंख्येच्या जवळ असल्याचे पाहिले जाते. जे जलद प्रतिसादासाठी एक मार्ग प्रदान करते. या भागधारकांची आणखी एक भूमिका म्हणजे अधिकारी आणि संस्था त्यांच्या वचनबद्धतेचे पालन करतात याची खात्री करणे ही आहे. नागरी समाजाची मध्यवर्ती भूमिका युक्रेनमध्ये आढळू शकते, जेथे सार्वजनिक आरोग्यासाठी आघाडीने जेनेरिक औषधांचा सल्ला देऊन HIV आणि हिपॅटायटीसच्या औषधांची किंमत प्रभावीपणे कमी केली गेली आहे. हे दर्शविते की नागरी संस्था विकेंद्रीकरणाद्वारे सहयोग सक्षम करतात, जे प्रभावी आरोग्य सेवा वितरणासाठी महत्त्वपूर्ण मानले गेले आहे.

2003 चे गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम (SARS) आणि कोविड-19 साथीच्या रोगाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी सहकार्य महत्त्वपूर्ण होते अशी उदाहरणे यानिमित्ताने दिली जातात.

हिपॅटायटीसचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्यामध्ये येणाऱ्या सामान्य अडथळ्यांची आणि आव्हानांची सखोल तपासणी यानिमित्ताने करणे आवश्यक आहे. भौगोलिक-राजकीय तणाव, संसाधन-सामायिकरणाचा अभाव, तंत्रज्ञान हस्तांतरण, मर्यादित डेटा-सामायिकरण करार यासारख्या घटकांना जागतिक आरोग्य सहकार्याच्या गुंतागुंतांवर प्रकाश टाकण्यासाठी विचार करणे आवश्यक आहे. असे असूनही, सर्वांसाठी आरोग्य साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य महत्त्वाचे आहे. डेटा शेअरिंग, R&D, उत्पादन आणि लसींचे वितरण सुधारणे आणि हिपॅटायटीसच्या जोखमीबद्दल जागरूकता निर्माण करणे यासारख्या यंत्रणेद्वारे हे केले जाऊ शकते.

रोगाचे उच्चाटन करण्यासाठी समाज, आरोग्य सेवा प्रदाते, सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांच्यातील संयुक्त आणि बहुक्षेत्रीय समन्वयाची आवश्यकता आहे. हिपॅटायटीस ही सार्वजनिक आरोग्याची चिंता म्हणून ओळखली जात असताना, भारतासारख्या राज्यांना जागतिक स्तरावर हिपॅटायटीसचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. जागतिक लोकसंख्येच्या एक-पंचमांश लोकसंख्येसह, हिपॅटायटीसच्या वाढत्या प्रश्नांमध्ये भारताचा मोठा वाटा आहे. याला सामोरे जाण्यासाठी भारताने हिपॅटायटीससाठी राष्ट्रीय कृती योजना आणली आहे,l. ज्यामुळे या प्रदेशात असे करणारा तो पहिला देश बनला आहे. सर्वसमावेशक कार्यक्रमाद्वारे या रोगाचा सामना करण्याचा अनुभव लक्षात घेता, भारत आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यात आणि हिपॅटायटीसचे उच्चाटन करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्यास नेतृत्व करू शकतो. हिपॅटायटीस प्रतिबंध आणि उपचारातील संभाव्य भविष्यातील ट्रेंड या घडामोडींवर दूरदर्शी दृष्टीकोन घेणे महत्वाचे आहे. उदयोन्मुख उपचारपद्धती, लसीतील नवकल्पन आणि आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याच्या धोरणांवर चर्चा केल्याने पुढील आव्हानांसाठी कृती आणि तयारीला प्रेरणा मिळेल. टेलीमेडिसिन, डिजिटल हेल्थ रेकॉर्ड्स आणि एआय-समर्थित डायग्नोस्टिक्समधील प्रगती हे हेपेटायटीसशी लढा देण्यासाठी हेल्थकेअर डिलिव्हरीत तंत्रज्ञान कसे क्रांती करू शकते हे दाखवू शकते.

किरण भट्ट हे सेंटर फॉर हेल्थ डिप्लोमसी, ग्लोबल हेल्थ विभाग, प्रसन्ना स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन येथे रिसर्च फेलो आहेत.

ओमन सी. कुरियन हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे वरिष्ठ फेलो आणि हेल्थ इनिशिएटिव्हचे प्रमुख आहेत.

संजय पट्टनशेट्टी ग्लोबल हेल्थ गव्हर्नन्स विभागाचे प्रमुख आणि सेंटर फॉर हेल्थ डिप्लोमसी, प्रसन्ना स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशनचे समन्वयक आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.