Author : Mandar Apte

Published on Jun 16, 2023 Commentaries 0 Hours ago

भारत, आपली संस्कृती आणि कल्याण, अहिंसा आणि सुसंवादी सह-अस्तित्व यासंबंधीच्या शहाणिवेसह, संघर्ष निराकरण आणि शांतता निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.

संघर्ष निराकरणासाठी आणि शांतता निर्माण करण्याकरता भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’चा वापर

आदर्श परिस्थितीत, आपण सर्वजण शांतता आणि सौहार्दाच्या जगात राहणे निवडू. मात्र, आज दुर्दैवाने, आपण जगभरातील हिंसाचारात आणि संघर्षांत चिंताजनक वाढ पाहात आहोत, ज्यामुळे आपल्या मानवी समाजाच्या जडणघडणीला धोका निर्माण झाला आहे. युद्धे आणि निर्वासितांच्या संकटांपासून, द्वेषातून जन्मलेले गुन्हे, अंमली पदार्थ, मानसिक आरोग्य समस्या, मानवी तस्करी आणि भेदभाव अशी आपल्यासमोर येणारी आव्हाने जटिल आणि बहुआयामी आहेत.

जागतिक स्तरावर, हिंसा वाढत आहे आणि ती कुठेही होऊ शकते आणि जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांवर याचा परिणाम होईल. उदाहरणार्थ, सीरिया, येमेन आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धांमुळे सर्व सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील लोकांचे लक्षणीय विस्थापन झाले आहे. प्रगत देशही हिंसाचारापासून मुक्त नाहीत. उदाहरणार्थ, अमेरिकेत २०२३ मध्ये आतापर्यंत सामूहिक गोळीबाराच्या २६८ घटना घडल्या आहेत आणि बंदुकीने झालेल्या हिंसा-संबंधित घटनांमध्ये ७,७०० हून अधिक लोक मरण पावले आहेत.

भारत, आपली संस्कृती आणि कल्याण, अहिंसा आणि सुसंवादी सह-अस्तित्व यासंबंधीच्या शहाणिवेसह, जगात शाश्वत शांतता आणि सामाजिक एकता वृद्धिंगत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.

जागतिक समुदायाने हिंसा आणि संघर्षाची मूळ कारणे दूर करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे आणि सर्वसमावेशक, न्याय्य आणि शांततापूर्ण जग निर्माण करण्याच्या दिशेने काम करणे आवश्यक आहे.

भारत, आपली संस्कृती आणि कल्याण, अहिंसा आणि सुसंवादी सह-अस्तित्वाच्या शहाणिवेसह, जगात शाश्वत शांतता आणि सामाजिक एकता वृद्धिंगत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. विश्वगुरू बनण्याच्या देशाची आकांक्षा आणि महात्मा गांधींचा वारसा जो अजूनही जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देतो, त्याचा वापर करीत ‘सिटीजफॉरपीस’द्वारे पार पडलेल्या कामांतून व्यावहारिक उदाहरणे उभी राहिली आहेत. ही कामे संघर्ष निराकरण आणि शांतता निर्माण कार्यक्रम वृद्धिंगत करण्यासाठी भारताच्या शहाणिवेला अर्थपूर्णरीत्या एकत्र आणण्याकरता एक वैश्विक चौकट प्रदान करतात.

शांतता निर्माण करण्याची धोरणे आणि मानवी परिमाण

शांतता निर्माण करण्याचे सद्य दृष्टिकोन पाश्चात्य प्रारूपे आणि सिद्धांतांवर आधारित आहेत, जे सांस्कृतिक व संरचनात्मक हिंसाचार यांसारख्या घटकांना प्राधान्य देतात आणि उत्तम काम करणार्‍या नागरी संस्था, भ्रष्टाचाराचा निम्न स्तर आणि संसाधनांचे न्याय्य वितरण यांसारखे संस्थात्मक उपाय सुनिश्चित करतात.

मात्र, शाश्वत शांतता निर्माण करण्याकरता, संघर्षाचा फटका ज्यांना बसला आहे, त्यांच्यावर झालेल्या संघर्षाच्या मानसिक आणि भावनिक परिमाणांनादेखील संबोधित करणे आवश्यक आहे. हिंसाचार आणि संघर्ष याचा फटका बसलेल्या व्यक्तींवर आणि गटांवर घडलेल्या आघातांकडे लक्ष दिले नाही, तर त्यातून निराशा आणि राग तयार होऊ शकतो आणि तो संभाव्यतः हिंसाचारात प्रकट होऊ शकतो.

त्यामुळे या ‘आंतरिक विकासाची’ गरज म्हणूनच भारताच्या अंतर्गत शांततामय शहाणिवेच्या अर्थपूर्ण एकत्रीकरणासाठी संदर्भ आणि कार्यवाही करण्याची क्षमता प्रदान करते, ज्यामुळे सध्याच्या संघर्षाचे निराकरण आणि शांतता निर्माण करण्याच्या धोरणांचा प्रभाव अधिक खोलवर रूजतो.

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमानेही (यूएनडीपी)) या अंतर्गत परिमाण संबोधित करण्याचे महत्त्व जाणले आहे आणि अलीकडेच संघर्ष निराकरण आणि शांतता निर्माण उपक्रमांमध्ये मानसिक आरोग्य आणि मनो-सामाजिक साह्याच्या (एमएचपीएसएस) एकत्रिकरणासाठी समर्थन देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये समुपदेशन, गट थेरपी आणि वैयक्तिक व सामूहिक आघात दूर करण्यात मदत करणारे कार्यक्रम, भावनांचे नियमन करणारे कार्यक्रम आणि रचनात्मक संवादामध्ये गुंतण्यासाठी लवचिकता आणि अहिंसक संवाद कौशल्ये विकसित करणारे कार्यक्रम समाविष्ट आहेत.

शहरी हिंसाचाराच्या संदर्भातही, ‘लॉस एंजेलिस काउंटी ऑफिस ऑफ व्हायोलेंस प्रिव्हेन्शन’सह अनेक संस्थांनी आघात बरे करण्यावर आणि लवचिकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणार्‍या कार्यक्रमांच्या गरजेचे समर्थन करण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे या ‘आंतरिक विकासाची’ गरज म्हणूनच भारताच्या अंतर्गत शांततामय शहाणिवेच्या अर्थपूर्ण एकत्रीकरणासाठी संदर्भ आणि कार्यवाही करण्याची क्षमता प्रदान करते, ज्यामुळे सध्याच्या संघर्षाचे निराकरण आणि शांतता निर्माण करण्याच्या धोरणांचा प्रभाव अधिक खोलवर रूजतो.

भारताचे आंतरिक शांतीचे शहाणपण

भारतीय संस्कृतीचा असा विश्वास आहे की, जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी समुदायांनी एकोप्याने राहणे आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी, व्यक्तींनी आंतरिक शांती, परस्पर आदर आणि एकमेकांसोबत सुसंवादी सह-अस्तित्वात कसे जगायचे हे शिकायला हवे.

आकृती १: जागतिक शांतता प्राप्त करण्यासाठी सार्वत्रिक चौकट

Source: Author’s research

शांतता म्हणजे केवळ संघर्षाचा अभाव नाही, तर संघर्षाला शांततापूर्ण पद्धतीने सामोरे जाण्याची क्षमता आहे. भारताच्या शहाणिवेच्या परंपरेनुसार, शांतता हा सर्व मानवांचा जन्मजात स्वभाव आहे. म्हणून, सर्व भारतीय शहाणिवेच्या परंपरा नकारात्मक भावना सकारात्मक भावनांमध्ये रूपांतरित करण्यासाठी आणि आंतरिक शांती विकसित करण्यासाठी योग, अहिंसा आणि ध्यानधारणाच्या सरावाचा पुरस्कार करतात. या प्रथांनी शतकानुशतके जगाच्या सर्व स्तरातील लोकांना मदत केली आहे. डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर आणि स्टीव्ह जॉब्स यांसारख्या अनेक दिग्गजांनी मान्य केले आहे की, भारतीय संस्कृती आणि शहाणिवेच्या प्रदर्शनामुळे त्यांना त्यांच्या नेतृत्वाचे उद्दिष्ट, दृष्टी आणि प्रभाव अधिक खोलवर रुजवण्यास मदत झाली.

सिटीजफॉरपीस: शांतता निर्माण करण्यासाठीचा एक नवा दृष्टिकोन

आंतरिक शांती आणि सुसंवादी सह-अस्तित्वाच्या भारताच्या शहाणिवेचा लाभ घेत, ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज’ या संघटनेचा ‘सिटीजफॉरपीस’ उपक्रम आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन- हिंसाचार कमी करण्यासाठी आणि जगभरातील संघर्षामुळे प्रभावित झालेल्या समुदायांमध्ये शांतता आणि सामाजिक एकसंधता वृद्धिंगत करण्यासाठी नागरी समुदायातील नेत्यांसोबत काम करतात. या उपक्रमाने अनेक स्थानिक, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सरकारी व स्वयंसेवी संस्थांसोबत समुदाय-विशिष्ट आव्हानांकरता अनोखे उपाय रचण्यासाठी स्थानिक नेत्यांच्या आणि बदल घडविण्याकरता काम करणाऱ्यांच्या क्षमता निर्मितीकरता काम केले आहे.

उदाहरणादाखल, लॉस एंजेलिसमध्ये, समुदाय सदस्य आणि पोलिस अधिकारी यांच्यात परस्परांवरील विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी कार्यक्रमाचा उपयोग केला गेला. या शहरात दरवर्षी सुमारे २५ हजार हिंसक गुन्हे घडतात, यांपैकी ७० टक्के घटना दक्षिण लॉस एंजेलिसच्या गरीब वस्तीत घडतात. अत्यंत हिंसाचाराने येथील रहिवाशांकरता तणाव निर्माण झाला आहे आणि समुदाय सदस्य आणि लॉस एंजेलिस पोलीस विभाग यांच्यातील तणाव वाढला आहे.

मार्च ते जून २०१९ दरम्यान, सिटीजफॉरपीस कार्यक्रमाने स्थानिक लॉस एंजेलिस पोलीस विभागातील पोलीस अधिकारी आणि विविध समुदाय भागधारकांना एकत्र आणले, ज्यात टोळ्यांचे माजी सदस्य, जोखीम असलेले युवक, शिक्षक आणि लॉस एंजेलिसच्या दक्षिणेकडील हार्वर्ड पार्क परिसरातील पालक सहभागी झाले होते. त्यांच्याकरता खास रचना केलेल्या ‘शांतता राजदूतांकरता प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्यांची क्षमता वाढवण्यावर, योग आणि सुदर्शन क्रिया श्वासोच्छ्वास आणि ध्यानधारणा पद्धती वापरून त्यांना त्यांच्या आघातातून बरे होण्यावर आणि अधिक करुणा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले.

शहर दर वर्षी अंदाजे २५ हजार हिंसक गुन्ह्यांचे साक्षीदार आहे, यांपैकी ७० टक्के घटना दक्षिण लॉस एंजेलिसच्या गरीब वस्तीत घडतात.

त्यानंतर, परस्परसंवादी चर्चेद्वारे, सहभागी झालेल्यांमध्ये मजबूत परस्पर संबंध तयार होण्याकरता आणि त्यांच्या परिसरातील शांततेसाठी सामायिक दृष्टी निर्माण करण्यासाठी जबाबदारी स्वीकारण्याकरता समर्थन देण्यात आले. जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीच्या या कार्यक्रमाच्या परिणामावरील संशोधनात असे दिसून आले की, कार्यक्रमाच्या दोन महिन्यांनंतर, ९० टक्क्यांपेक्षा जास्त सहभागी झालेल्यांनी आव्हानात्मक परिस्थितीत तणावात न राहण्याची, लक्ष केंद्रित करण्याची व शांत राहण्याची क्षमता, आणि सामाजिक संबंध विकसित करण्याची क्षमता वृद्धिंगत केली.

दुसरे उदाहरण म्हणजे, मार्च ते जून २०२२ दरम्यान सायप्रसमधील संयुक्त राष्ट्र शांतता सेनेने बेटावरील तुर्की आणि ग्रीक सायप्रियट समुदायातील नेत्यांमध्ये शांतता आणि सामाजिक सौहार्दाला प्रोत्साहन देण्याकरता ‘सीटीजफॉरपीस’ला आमंत्रित केले होते.

परस्पर चर्चा आणि गट प्रक्रियांद्वारे, ‘सीटीजफॉरपीस’ कार्यक्रमाने सहभागींना व्यवस्थेचे घटक परस्परांशी कसे संबंधित आहेत आणि व्यवस्था कालांतराने कसे कार्य करते यावर लक्ष केंद्रित करते याविषयीचा एक समग्र दृष्टिकोन विकसित करण्यास आणि विश्वासार्ह नेटवर्क तयार करण्यास सक्षम केले. त्यानंतर, सहभागींना बेटावरील रहिवाशांसाठी सकारात्मक फरक पडेल अशा ‘शांततामय कृती’ प्रकल्पाची रचना आणि अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या प्रकल्पांमध्ये विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या द्वि-सांप्रदायिक गटाकरता मानसिक तंदुरुस्तीचे सत्र आयोजित करणे, द्वि-सांप्रदायिक सामुदायिक संगीत मैफलीचे आयोजन, विभाजनाच्या दोन्ही बाजूंच्या मातांच्या पालकत्वाच्या भूमिकेवर पॉडकास्ट इत्यादी उपक्रमांचा समावेश होता.

निष्कर्ष

संघर्ष निराकरणाकरता आणि शांतता निर्माण करण्याच्या क्षेत्राने पारंपरिकपणे बाह्य घटक आणि संस्थात्मक उपायांवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, शाश्वत शांतता प्राप्त करण्यासाठी हिंसाचाराने प्रभावित झालेल्या सर्व भागधारकांचा अंतर्गत विकास महत्त्वपूर्ण आहे याला एक वाढती मान्यता मिळत आहे.

जबरदस्ती करण्याऐवजी आवाहन करून आणि आकर्षित करून भारताची मन वळवण्याची क्षमता (सॉफ्ट पॉवर) केवळ सांस्कृतिक वारसा (संगीत, नृत्य, कला इ.) आणि आर्थिक सामर्थ्य यातूनच प्राप्त होते, असे नाही तर तात्त्विक आणि शहाणिवेच्या परंपरांच्या समृद्ध इतिहासातूनही प्राप्त होते. ज्यातून अनेक शतकांपासून मनावर झालेला घाव भरून येण्याबाबत, दिलासा मिळण्याबाबत, आणि रूपांतरणाकरता आणि शांतपणे एकत्र राहायला शिकण्याबाबत जगभरातील लोक प्रभावित झाले आहेत.

‘सिटीजफॉरपीस’च्या कामातून दिसून येते की, आपण या शांतता राखण्याच्या व शांतता निर्माण करण्याच्या मोहिमांचा प्रभाव कसा वाढवू शकतो आणि याद्वारे संघर्षांचे निराकरण करण्यात व शाश्वत शांतता निर्माण करण्यात मदत करून, भारत ‘विश्वगुरू’ बनण्याच्या आकांक्षेला मदत करू शकतो.

संयुक्त राष्ट्रांच्या शांतता राखण्याच्या आणि संघर्ष व आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रांत विकासाकरता मदत प्रदान करून भारताने एक जबाबदार जागतिक राष्ट्र म्हणून आधीच एक मजबूत प्रतिष्ठा संपादन केली आहे. ‘सिटीजफॉरपीस’च्या कामातून दिसून येते की, आपण या शांतता राखण्याच्या व शांतता निर्माण करण्याच्या मोहिमांचा प्रभाव कसा वाढवू शकतो आणि याद्वारे संघर्षांचे निराकरण करण्यात व शाश्वत शांतता निर्माण करण्यात मदत करून, भारत ‘विश्वगुरू’ बनण्याच्या आकांक्षेला मदत करू शकतो.

देशाबाहेर असलेला भारतीय समुदायही स्थानिक आणि प्रादेशिक हिंसाचाराने प्रभावित आहे, उदाहरणार्थ, अमेरिकेतील सामूहिक गोळीबारात भारतीयांचा झालेला मृत्यू आणि रशिया-युक्रेन संघर्षाच्या सुरुवातीला भारतीय विद्यार्थ्यांचे दुःख. त्यामुळे, भारताच्या संस्कृतीचे आणि मूल्यांचे राजदूत म्हणून, स्थानिक आणि प्रादेशिक आव्हाने सोडवण्यासाठी भारताच्या शहाणिवेचा प्रसार करून, देशाबाहेर राहणाऱ्या भारतीय समाजाने ते राहात असलेल्या देशांमध्ये अधिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे आवश्यक आहे. यामुळे त्या विशिष्ट देशात स्थायिक झालेल्या भारतीय समाजाला त्यांचा प्रभाव मजबूत करण्यास आणि जागतिक स्तरावर भारताच्या विचार नेतृत्वाला प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल.

मंदार आपटे सध्या सीटीजफॉरपीस उपक्रमाचे व्यवस्थापन करतात. याआधी मंदार जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटी स्कूल फॉर कॉन्फ्लिक्ट अॅनालिसिस अँड रिझोल्युशन येथे व्हिजिटिंग अभ्यासक होते.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.