सुमारे वर्षभरापूर्वी २०२३च्या पहाटे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी प्रभावीपणे घोषित केले की, युक्रेन रशियन फेडरेशनच्या विरोधात फेब्रुवारी २०२२च्या उत्तरार्धात सुरू केलेल्या युद्धाच्या ‘विजयी वर्षा’च्या मार्गावर आहे. युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्रमणाला जवळपास २४ महिने उलटल्यानंतरही, युक्रेन आणि त्यांचे नाटो सहयोगी विजय म्हणजे काय, हे परिभाषित करण्याच्या आसपासही पोहोचलेले नाहीत. युक्रेनच्या ढासळत्या लष्करी मोहिमेत तीन प्रमुख घटकांचे योगदान आहे: पहिला घटक म्हणजे, अस्पष्ट किंवा चुकीची-परिभाषित उद्दिष्टे; दुसरा घटक म्हणजे, युक्रेनियन, ज्याला पूर्णपणे जबाबदार धरता येत नाहीत, त्यांच्या लष्करी सामर्थ्याचा अपुरा वापर आणि मोहीम साध्य करण्यासाठी लागू करण्यात आलेली रणनीती ज्यामध्ये दोषपूर्ण प्रतिहल्ल्याचा समावेश आहे, त्याचा निषेध केला गेला आहे; अखेरीस, अंतर्गत जो विरोध होत होता, त्यावर मात करण्यासाठी अलीकडे प्रयत्न करण्यात आले असतानाही, युक्रेनचे सहयोगी युद्ध आणि युक्रेनला वाढवल्या जाणाऱ्या समर्थनाच्या प्रमाणात अधिकाधिक विभागले गेले आहेत.
युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्रमणाला जवळपास २४ महिने उलटल्यानंतरही, युक्रेन आणि त्यांचे नाटो सहयोगी विजय म्हणजे काय, हे परिभाषित करण्याच्या आसपासही पोहोचलेले नाहीत.
गोंधळलेली उद्दिष्टे
सुरुवातीपासूनच अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन अर्थात नाटो देश- युक्रेनवर केलेल्या आक्रमणाबद्दल, व्लादिमीर पुतीन यांच्या नेतृत्वाखालील रशियन फेडरेशनवर सुस्पष्ट विजय मिळवण्यात कमी पडले आहेत. अमेरिकेची गोंधळलेली उद्दिष्टे एप्रिल २०२२ मध्ये अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉइड ऑस्टिन यांच्या विधानातून पूर्णपणे प्रतिबिंबित झाली: "युक्रेन हा सार्वभौम देश, लोकशाही देश राहील (हे पाहणे), हे यशाबाबतचे अमेरिकेचे ध्येय आहे. ऑस्टिन यांनी ठामपणे सांगितले की, त्यांना रशियाला ‘कमकुवत’ झालेला पाहायचे आहे. ठोस लष्करी अटींमध्ये, त्यांच्या टिप्पण्यांचा अर्थ नगण्य होता, कारण त्यांनी हे स्थापित केले नाही की, युक्रेनला २०१४ मध्ये रशियाने त्यांच्या वतीने काम करण्यास जे अधिकृतरीत्या नेमले गेले होते, त्यांच्याद्वारे ताब्यात घेतलेल्या युक्रेनच्या डॉनबास आणि क्रिमियासह युक्रेनचा प्रदेश रशियन नियंत्रणापासून सुरक्षित करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व सैन्य समर्थन अमेरिका देईल. २०१४ पूर्वी अस्तित्त्वात असलेली स्थिती पुनर्संचयित करायची असेल, तर युक्रेनचा भूभाग पुन्हा प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली लष्करी साधने लक्षणीयरीत्या अधिक असणे आवश्यक ठरते, जे युद्धाच्या प्रारंभापासूनच- फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियन आक्रमण झाल्यानंतर घडले नाही.
पर्यायाने, जर २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाच्या आक्रमणापूर्वी अस्तित्त्वात असलेली स्थिती पुनर्संचयित करणे हा उद्देश असेल तर, युक्रेनची उद्दिष्टे संपूर्णत: पूर्ण झालेली नसली तरी रशियाने २०१४ मध्ये मिळवलेल्या प्रादेशिक नफ्यापुरती मर्यादित आहेत. युक्रेन आणि रशिया यांच्यातील लष्करी शत्रुत्व आज संपुष्टात आले तर रशिया किमान डोनबास आणि क्रिमियावर वास्तविक नियंत्रण ठेवेल. पुतिन यांनी अलीकडेच स्पष्ट केले आहे की, युक्रेन आणि त्याच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांना युक्रेनमध्ये रशियाने आक्रमणातून कमावलेला सर्व लष्करी नफा परत मिळवणे ‘अशक्य’ आहे. येथे अधोरेखित करण्याचा मुद्दा असा आहे की, युक्रेनचे किंवा त्या बाबतीत नाटोचे कोणतेही उद्दिष्ट- २०१४ पूर्वी अस्तित्त्वात असलेल्या स्थितीच्या पुनर्स्थापनेचे किंवा फेब्रुवारी २०२२ची आक्रमणापूर्वीच्या स्थितीबाबतचे उद्दिष्ट- संपूर्णतः पूर्ण झाले नाही किंवा उद्दिष्टे फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियन आक्रमणानंतर लगेचच स्पष्टपणे परिभाषित केली गेली नाहीत.
पुतिन यांनी अलीकडेच स्पष्ट केले आहे की, युक्रेन आणि त्याच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांना युक्रेनमध्ये रशियाने आक्रमणातून कमावलेला सर्व लष्करी फायदा परत मिळवणे ‘अशक्य’ आहे.
आणखी काही असल्यास, रशियाला ‘कमकुवत’ करण्यासारखे अनिश्चित स्वरूपाचे आणि अस्पष्ट असे काहीतरी... युक्रेनला लष्करी समर्थन करण्याचा आधार बनला आहे. या प्रक्रियेत, युक्रेनचे नागरीक निराश झाले आहेत आणि पाश्चात्य शक्तींचा स्पर्धा हा त्यांचा हेतू असून त्यांनी युक्रेनवासियांना तोफेच्या तोंडी दिले आहे. ऑस्टिन यांच्या विधानात सुचवल्यानुसार, एकत्रितपणे, डॉनबास आणि क्रिमियासह सर्व युक्रेनचे प्रदेश परत मिळविण्यासाठी प्रत्यक्षात कृती न करता, युक्रेनच्या नागरिकांना संपूर्ण लष्करी मदत देण्याकरता पाश्चिमात्य देशांनी वचनबद्धता दर्शवली आहेत. परिणामी, ते युक्रेनच्या नागरिकांना पाश्चात्यांच्या चंचलपणा आणि उलटसुलट विचारांचे बळी बनवतात.
अपुरी साधने आणि युक्रेनच्या मोहिमांतील त्रुटी
उद्दिष्टे गडबडली असली तरी ती साध्य करण्यासाठी साधने अथवा लष्करी बांधिलकीही तितकीच अपुरी आहे. जरी आपण असे गृहीत धरले की, युक्रेनने आज मोठ्या प्रमाणात जे काही साध्य केले आहे, त्यात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो शक्तींचा वाटा आहे. फेब्रुवारी २०२२ पासून गमावलेला सर्व प्रदेश परत मिळविण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो शक्तींनी युक्रेनला सर्वोत्कृष्ट लष्करी सहाय्य केले आहे आणि करत आहेत, मात्र संपूर्ण युद्धादरम्यान यात सातत्य राहिलेले नाही. युक्रेनला उच्च गतिशीलता तोफखाना रॉकेट प्रणालीसारख्या उच्च दर्जाच्या आणि शक्तिशाली शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यावरून अमेरिका डळमळीत झाली. रशियाच्या आक्रमणानंतर काही महिन्यांपर्यंत खरोखरच उच्च गतिशीलता तोफखाना रॉकेट प्रणालीचा पुरवठा झाला नाही. युक्रेनला एफ-१६ लढाऊ विमाने पुरवणे आणि वैमानिकांना ते उडवण्याचे प्रशिक्षण देणे या बाबतीतही हेच घडले, जे आता सुरू आहे. स्कायनेक्स हवाई संरक्षण प्रणाली, लेपर्ड-आय रणगाड्यांसाठी दारूगोळा, आर्मर्ड पर्सोनेल कॅरियर्स (एपीसीज), ५० मोबाइल सॅटेलाइट टर्मिनल्स, १६ झेट्रोस टँकर ट्रक, २५ हायड्रन रीकन्नायसन्स ड्रोन्स आणि १८४० हेल्मेट्स यांसारखा अतिरिक्त रसद पुरवठा युक्रेनला त्यांचा मित्र देश आणि नाटोचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सदस्य जर्मनीकडून केला जात आहे. क्षमतांची हा नवी कुमक युक्रेनच्या बाजूने युद्धाचा मार्ग निर्णायकपणे बदलेल का, हे अस्पष्ट आहे. युद्धाची व्याप्ती वाढण्याच्या भीतीपोटी युक्रेनला अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो सहयोगी देशांकडून आतापर्यंत कुमक पुरवली जात असून त्यांनी क्षमतेची कक्षा आणि व्याप्ती निश्चित केली आहे आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन यांनी स्पष्टपणे सांगितले की, युद्धविराम लवकर होण्याची शक्यता नाही. युक्रेनच्या युद्धविषयक मोहिमेतील रणनीतीच्या चुकांमुळे त्यांच्याकरता परिस्थिती आणखी वाईट झाली आहे. जून २०२३ मध्ये क्रिमियामध्ये प्रति-संरक्षणात्मक हल्ला करण्याऐवजी रशियाचा रसद पुरवठा खंडित करून, युक्रेनने दक्षिणेकडे लष्करी सामर्थ्य केंद्रित करायला हवे.
युक्रेनला उच्च गतिशीलता तोफखाना रॉकेट प्रणालीसारख्या उच्च दर्जाच्या आणि शक्तिशाली शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यावरून अमेरिका डळमळीत झाली. रशियाच्या आक्रमणानंतर काही महिन्यांपर्यंत खरोखरच उच्च गतिशीलता असलेल्या तोफखाना रॉकेट प्रणालीचा पुरवठा झाला नाही.
अमेरिकेचे मतविभाजन आणि मित्र देशांचे मतविभाजन, मात्र प्रगती सुरू आहे. रशियाविरोधात युक्रेनच्या लष्करी मोहिमेवर परिणाम करणारा अंतिम घटक म्हणजे अमेरिका आणि अटलांटिक युतीच्या युरोपीय सदस्यांमधील विभाजन. युक्रेनच्या युद्ध प्रयत्नांसाठी ११० अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या निधीच्या उपायावर जानेवारी २०२४ च्या अखेरीस अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये प्रगती होऊ शकते, असे ताजे पुरावे सूचित करतात- जे काँग्रेसनल हाऊस रिपब्लिकनने त्यांचा रस्ता रोखल्यामुळे अमेरिकेच्या संसदेत ते ठप्प झाले आहे. नाटोच्या युरोपीय बाजूने, हंगेरी युक्रेनसाठी ५० अब्ज युरोच्या मदत पॅकेजवर आपला व्हेटो मागे घेण्यास सहमत होऊ शकतो. युक्रेन आणि त्याच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांना युक्रेनला नाटोची अतिरिक्त लष्करी मदत वाहताना, रशियन-नियंत्रित युक्रेनियन प्रदेशात खोल मुसंडी मारणाऱ्या आक्षेपार्ह कारवाईच्या पुढे जाण्याचे परिणाम विचारात घ्यावे लागतील. या टप्प्यावर युद्धविराम अशक्य असल्यास, युक्रेनियन नागरिकांना लष्कराच्या सहाय्याने त्यांचे विद्यमान संरक्षण बळकट करण्यासाठी प्रभावित करणे आवश्यक आहे, ज्याकरता जून २०२३ मध्ये सुरू केल्या प्रकारे अतिमहत्त्वाकांक्षी आणि चुकीचे प्रतिक्रियात्मक न वागता, अत्यंत मर्यादित किंवा लहान मोहिमा हाती घेता येतील. सर्व व्यावहारिक हेतूंसाठी युक्रेनने प्रमुख प्रादेशिक यश मिळवण्यासाठी जोखीमेची रणनीती आखल्यास, झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाखालील सरकारला २०१४ मध्ये रशियाकडून गमावलेला सर्व प्रदेश परत मिळवण्याचा प्रयत्न सोडून द्यावा लागेल. एकीकडे, युक्रेनने संरक्षण मजबूतपणे स्थापित केले आहे आणि रशियाला उत्तर आणि पश्चिम युक्रेनमधील अधिक प्रदेश बळकवण्याचे उद्दिष्ट सोडण्यास भाग पाडले आहे. दुसरीकडे, युक्रेनियन आणि त्यांच्या नाटो सहयोगींकरता, २०१४ पूर्वीची पूर्वस्थिती पुनर्संचयित करण्यासाठी रशियाच्या संरक्षणाविरोधात यशस्वी होण्याकरता भरीव आणि शिस्तबद्ध लष्करी प्रयत्नांची आवश्यकता असेल. युक्रेनच्या रशियासोबतच्या २०१४ पूर्वीच्या सीमा पुनर्संचयित करण्याची नकारात्मक बाजू म्हणजे युक्रेन आणि नाटो हे युद्ध लांबणीवर टाकतील, ज्याचा परिणाम काय होईल, हे या टप्प्यावर अनिश्चित आहे.
कार्तिक बोम्मकांती हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे वरिष्ठ फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.