Authors : Aditi Madan | Arjun Dubey

Expert Speak Terra Nova
Published on May 07, 2024 Updated 0 Hours ago

महिला व मुलींच्या कल्याणासाठी व सक्षमीकरणासाठी सर्वसमावेशक धोरणांची तातडीने गरज आहे, हे देशातील उष्णतेच्या लाटांनी आणि पाण्याच्या तुटवड्याने अधोरेखित केले आहे.

उष्णतेच्या लाटा आणि पाण्याचा तुटवड्याचा महिलांवर होणारा परिणाम

हवामान बदलाच्या विशेषतः उष्णतेच्या लाटा किंवा पाण्याचे दुर्भिक्ष्य यांसारख्या परिणामांचा भारतातील स्त्रियांवर विषम परिणाम होत असतो. सध्या देशातील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या केवळ ३५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. उष्णतेच्या लाटांमुळे साठा आणखी कमी होत आहे. त्यामुळे एकूण दैनंदिन जीवनावर विशेषतः स्त्रियांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. अलीकडील अभ्यासानुसार, पुरुषांच्या तुलनेत भारतीय स्त्रियांवर टोकाच्या हवामानाचा अधिक परिणाम होतो. हे परिणाम लिंग असमानता, आर्थिक संधी आणि शिक्षणाची उपलब्धता यांसारखे आधीपासूनचे प्रश्न अधिकच तीव्र करतात.

अलीकडील अभ्यासानुसार, पुरुषांच्या तुलनेत भारतीय स्त्रियांवर टोकाच्या हवामानाचा अधिक परिणाम होतो. हे परिणाम लिंग असमानता, आर्थिक संधी आणि शिक्षणाची उपलब्धता यांसारखे आधीपासूनचे प्रश्न अधिकच तीव्र करतात.

लिंग असमानतेचा परिणाम

लिंगाधारित संबंध व संवाद, सामाजिक नियम आणि हवामानातील बदल यांच्यातील गुंतागुंतीचे परस्परसंबंध यांमुळे देशातील उष्णतेच्या लाटांचा स्त्रियांवर प्रतिकूल परिणाम होतो. अशा काळात स्त्रियांवरील पारंपरिक जबाबदारीमुळे त्यांचे शारीरिक कष्ट आणखी वाढतात. कारण त्यांना तीव्र उन्हात पाणी आणण्यासाठी लांबलांब भटकत बसावे लागते किंवा शेतात काम करावे लागते. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क संघटनेने प्रसिद्ध केलेल्या ‘पाण्याचा हक्क’ या अहवालात स्त्रिया पाण्याशी संबंधित गोष्टींसाठी दररोज चार तास खर्च करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येते. विशेषतः जलजन्य आजारांचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे, एकूण सांस्कृतिक स्थितीमध्ये महिलांचे आरोग्य हा विषय दुर्लक्षित राहिला आहे. त्याचा परिणाम म्हणजे त्यांना उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका निर्माण होतो. याशिवाय महिलांना घरामध्ये आणि सामुदायिक जलव्यवस्थापनात निर्णय घेण्याच्या क्षमतेवर मर्यादा असते. उष्णता आणि पाण्याचा तुटवडा यांसारख्या प्रश्नांशी सामना करताना आवश्यक स्रोत मिळवण्यात ही मर्यादा आड येते.

वाढलेल्या उष्णतेमुळे गर्भवती आणि वृद्ध महिलांच्या त्रासात भरच पडते. त्यामुळे मुदतपूर्व प्रसूती, प्रकृती बिघडणे आणि प्रसूतीपूर्व किंवा प्रसूतीवेळी अर्भकमृत्यूचे प्रमाण वाढणे यांसारख्या गुंतागुंतीच्या समस्या उद्भवतात. आशियायी विकास बँकेच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे, की तापमानाचा पारा एक अंश सेल्सियसने वाढला, तर मूदतपूर्व प्रसूतींमध्ये सहा टक्क्यांनी वाढ होते, तर उष्णतेच्या लाटांदरम्यान मूदतपूर्व प्रसूतींची संख्या सोळा टक्क्यांनी वाढते; तसेच प्रत्येक एक अंश सेल्सियस तापमानवाढीमागे प्रसूतीपूर्व किंवा प्रसूतीदरम्यान अर्भकमृत्यूचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढते.

उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळ यांमुळे महिलांच्या विशेषतः कृषी आणि अनौपचारिक क्षेत्रातील आर्थिक संधींवर गंभीर परिणाम होतो. हवामानातील बदलाचा सर्वाधिक मोठा फटका कृषीक्षेत्राला बसतो. अलीकडील अभ्यासाने उष्णतेच्या लाटा आणि कृषी उत्पन्न यांच्यातील नकारात्मक संबधांवर प्रकाश टाकला आहे. हवामानातील चढ-उतार या क्षेत्राची असंवेदनशीलता अधोरेखित करतात. नीती आयोगाच्या अहवालानुसार, भारतातील ८० टक्के ग्रामीण महिला कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत. उष्णतेच्या लाटा आणि पाण्याच्या तुटवडा या दोहोंचा एकत्रित परिणाम होऊन शेतीमध्ये विशेषतः सिंचनासारख्या कामांमध्ये सहभागी होण्याची त्यांची क्षमता घटते. कृषी उत्पन्नातील घट आणि जैववैविध्याचा ऱ्हास यांमुळे शेती किंवा नैसर्गिक स्रोतांवर उदरनिर्वाहासाठी अवलंबून असलेल्या महिलांवरील ताण आणखी वाढतो.

उष्णतेच्या लाटा आणि पाण्याच्या तुटवडा या दोहोंचा एकत्रित परिणाम होऊन शेतीमध्ये विशेषतः सिंचनासारख्या कामांमध्ये सहभागी होण्याची त्यांची क्षमता घटते. कृषी उत्पन्नातील घट आणि जैववैविध्याचा ऱ्हास यांमुळे शेती किंवा नैसर्गिक स्रोतांवर उदरनिर्वाहासाठी अवलंबून असलेल्या महिलांवरील ताण आणखी वाढतो.

भारतातील सुमारे ५४ टक्के महिला घराबाहेर पडत नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे, टोकाच्या उष्णतेपासून त्यांचे संरक्षण होते; परंतु घरामध्ये पुरेशी हवा खेळत नसल्याने आणि हवेत गारवा नसल्याने आरोग्यासंबंधात समस्यांचा धोका त्यांना असतोच. शिवाय, घरामध्येही तापमान वाढल्याने महिलांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्याचा परिणाम होऊन घरामधून काम करणाऱ्या कामगारांच्या उत्पन्नात ३० टक्के घट होते. पुरुषांच्या तुलनेत महिलांची आर्थिक प्राप्ती सरासरी वीस टक्क्यांनी कमी असते. ही दरी उष्णतेमुळे आणखी रूंदावते.

प्रभावी उपायांचा अवलंब

या आव्हानांना तोंड देण्यासाठी धोरण व नियोजनामध्ये लिंगसंवेदनशील दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. सामुदायिक जलव्यवस्थापनामध्ये निर्णय घेण्यात सहभाग नोंदवणे आणि उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी स्रोतांची उपलब्धता निश्चित करणे महत्त्वपूर्ण आहे. अशा कार्यक्रमांदरम्यान महिलांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी आरोग्य सेवांकडून काम व्हायला हवे. राज्य, शहर आणि गाव पातळीवर प्रभावी उष्णता कृती योजना आणि स्थानिक जल व्यवस्थापन धोरणे आवश्यक आहेत. मात्र, भारतातील उष्णता कृती योजना बरेचदा स्थानिक संदर्भांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे असुरक्षित समुदायाचे प्रश्न हाताळण्यात अयशस्वी ठरतात.

देशातील उष्णतेच्या लाटा आणि पाण्याच्या तुटवड्याचे लिंगाधारित परिणाम महिला आणि मुलींच्या कल्याणाला व सक्षमीकरणाला प्राधान्य देणाऱ्या सर्वसमावेशक धोरणांची तातडीची गरज असल्याचे अधोरेखित करतात. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे. या दृष्टिकोनात हवामानविषयक नियोजन व अंमलबजावणीच्या सर्व आयामांमध्ये लिंगाधारित दृष्टिकोनाचा समावेश होतो.

देशातील उष्णतेच्या लाटा आणि पाण्याच्या तुटवड्याचे लिंगाधारित परिणाम महिला आणि मुलींच्या कल्याणाला व सक्षमीकरणाला प्राधान्य देणाऱ्या सर्वसमावेशक धोरणांची तातडीची गरज असल्याचे अधोरेखित करतात.

महिला आणि मुलींवर उष्णतेच्या लाटा आणि पाण्याचे संकट यांचे होणारे विषम परिणाम कमी करण्यासाठी काही धोरणांची अंमलबजावणी करता येऊ शकते :

१.     महिला नेतृत्वाला चालना : जलव्यवस्थापन आणि हवामान बदलासंबंधातील निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महिलांना सक्षम बनवले, तर त्यांचा आवाज ऐकला जाईल आणि त्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जातील, याची खात्री देता येऊ शकेल.

२.     लिंगाधारित प्रतिसादात्मक धोरण व नियोजन : हवामानविषयक धोरणांमध्ये लिंगाधारित प्रतिसादात्मक अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. उष्णतेच्या लाटा आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य यांमुळे महिला व मुलींना निर्माण होणाऱ्या धोक्याची तीव्रता कमी करण्याच्या उद्देशाने विशिष्ट प्रयत्न करून स्रोतांची उपलब्धता केली, तर अधिक प्रभावी व यथायोग्य परिणाम मिळू शकतील.

३.     स्रोतांच्या उपलब्धतेत वाढ : महिलांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिल्याने पाण्याची साठवणूक आणि घरातील कामांचा त्यांच्यावरील भारही कमी होऊ शकतो. ग्रामीण भागांतील प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या जलजीवन मिशनसारख्या अलीकडील धोरणात्मक उपक्रमांमुळे महिलांवरील दैनंदिन भार कमी होण्याच्या दृष्टीने लक्षणीय प्रगती आहे.

४.     शिक्षण आणि रोजगाराच्या संधीमध्ये सुधारणा : हवामान बदलाशी संबंधित क्षेत्रांत महिलांना शिक्षण व रोजागाराच्या संधी वाढवल्या, तर हवामान बदलाशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या क्षमतेतही वाढ होऊ शकेल.

५.     लिंग-विभाजक माहितीचा साठा : माहितीपूर्ण धोरण व अंमलबजावणीसाठी हवामान बदलामुळे झालेल्या लिंगाधारित परिणामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी संशोधन आणि माहितीच्या साठ्यासाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. उष्णतेच्या लाटा आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य या दोहोंचा महिला व मुलींवर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून घेणाऱ्या लिंग-विभाजक माहितीच्या साठ्यामुळे पुरावाधारित धोरण आखता येऊ शकते आणि त्यांतील समस्यांवर प्रभावीपणे काम केले आहे, याची निश्चितीसुद्धा होऊ शकते.

६.     हवामानातील लवचिकता कृषी पद्धती : महिला शेतकऱ्यांना मदत, हवामान बदलाच्या स्थितीत शेती करण्याचे तंत्र आणि कृषीविषयक माहिती, तंत्रज्ञान व माहिती आणि पायाभूत विकास सर्वांना समान उपलब्ध होणे महत्त्वपूर्ण आहे. महिलांच्या विशिष्ट गरजा आणि क्षमता यांवर भर देऊन केलेल्या उपाययोजनांमुळे शेतकरी महिला बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यास सज्ज आहेत, याची खात्री करता येऊ शकते.

अखेरीस, हवामान बदलामुळे महिलांवर होणाऱ्या परिणामांवर विचार करताना सर्वसमावेशक दृष्टिकोनाची गरज असते. या दृष्टिकोनात हवामान बदलविषयक नियोजन व अंमलबजावणीच्या सर्व आयामांच्या लिंगाधारित दृष्टीचाही समावेश हवा. हवामानविषयक कृतीमध्ये लिंगसमानतेला प्राधान्य दिले, तर अधिक लवचिक आणि शाश्वत समाजाची निर्मिती होण्यास मदत होईल.


अदिती मदन या ‘इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डिव्हेलपमेंट’च्या फेलो आहेत.

अर्जुन दुबे हे ‘इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डिव्हेलपमेंट’मध्ये संशोधन सहयोगी आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Aditi Madan

Aditi Madan

Dr. Aditi Madan is Fellow and an ICSSR post-doctoral fellow at Institute for Human Development (IHD) with a PhD in Disaster Management from Asian Institute ...

Read More +
Arjun Dubey

Arjun Dubey

Arjun Dubey is a Research Associate at the Institute for Human Development. He did his post-graduation in Development Studies from Ambedkar University, Delhi. His areas ...

Read More +