Published on Feb 07, 2024 Updated 0 Hours ago

इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा इतिहास प्रादेशिक संघर्षांनी भरलेला आहे. मात्र या दोन्ही देशात आजच्या घडीला असलेली अस्थिर परिस्थिती पाहता त्या दोघांनाही सध्या युद्धाची मोठी जोखीम पत्करणे परवडणारे नाही.

इराण आणि पाकिस्तानमध्ये आता नवा संघर्ष

इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने इराणशी आपले राजनैतिक संबंध कमी केले आहेत. त्यांनी आपल्या राजदूताला परत बोलावलं असून  इराणच्या राजदूताला पाकिस्तानातून हाकलून लावलं आहे. सोबतच पाकिस्तानने इराणसोबत होणाऱ्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाच्या भेटीही रद्द केल्या आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हा 'बेकायदेशीर' हल्ला असून पाकिस्तान याला प्रत्युत्तर देईल असं म्हटलंय. मध्यपूर्वेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने दिलेली प्रत्युत्तराची धमकी आणि तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.  पाकिस्तानचं लष्करी प्रत्युत्तर हे पाकिस्तानच्या आधीच ढासळत चाललेल्या अंतर्गत राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर आणि इम्रान खानच्या अटकेच्या निषेधाच्या संदर्भात लष्कराच्या भूमिकेवर परिणाम करू शकते.

हवाई सर्वेक्षणानंतर बलुचिस्तान लिबरेशन फोर्स आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी असलेल्या सात ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

इराणने पाकिस्तानवर हल्ला केल्यानं 48 तासांच्या आत  पाकिस्तानच्या सशस्त्र दलाच्या संयुक्त कर्मचारी मुख्यालयाने दक्षिण-पश्चिम इराणमधील सिस्तान प्रांतातील 'दहशतवादी लपलेल्या ठिकाणां'वर हल्ले सुरू केले. काही बातम्यानुसार, हे हल्ले इराणच्या हद्दीत अंदाजे 80 किमी अंतरावर करण्यात आले असून या हल्ल्यात सरवन शहरातील नऊ लोक ठार झाले आहेत. आणि हे सर्वच्या सर्व परदेशी नागरिक होते. हवाई सर्वेक्षणानंतर निवडलेल्या बलुचिस्तान लिबरेशन फोर्स आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या सात ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. अधिकृत निवेदनात इराणने केलेल्या हल्ल्यांचा उल्लेख न करता ही एक 'गुप्तचर-आधारित मोहीम' मानून पाकिस्तानने देशातील काही ठिकाणी बलुच दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. दहशतवाद्यांकडून त्यांच्या देशावर मोठ्या प्रमाणात होणारे संभाव्य दहशतवादी हल्ले हाणून पाडण्यासाठी केलेला हा स्ट्राइक होता असं म्हटलंय.

सशस्त्र दलांची 'व्यावसायिकता' प्रतिबिंबित करण्यासाठी स्ट्राइकचे यशस्वी संचालन करण्यात आले. आधीच तुरुंगात असलेल्या इम्रान खानच्या समर्थकांच्या दबावाखाली लष्करालाही अभूतपूर्व हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपली ताकद दाखवण्याची गरज होती. प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांमुळे लोकांमध्ये सैन्याविषयी निर्माण झालेला असंतोष शमला नसला तरी, तीव्र प्रतिसाद न मिळाल्याने अंतर्गत अडचणी आणखी वाढल्या आहेत. पुढील महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तान मध्ये सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू असताना, सुरक्षा स्थितीतील आणखी कोणतीही वाढ परवडणारी नाही. तहरीक-ए-तालिबान-ए-पाकिस्तान (TTP)चा धोका अद्यापही मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने देश अस्थिरतेकडे जाऊ शकतो.

या परिणामांबद्दल तणाव वाढत असताना, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की त्यांना परिस्थिती वाढू द्यायची नाही आणि त्यांच्या विरोधकांनीही असेच करावे अशी अपेक्षा आहे. इराणने पाकिस्तानचे प्रभारी यांना बोलावून या हल्ल्यांबाबत 'स्पष्टीकरण' मागितले. पाकिस्तानी सैन्य आता हाय अलर्टवर असताना, पाकिस्तानसाठी अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही आघाड्यांवर काम करावं लागणार आहे. अफगाणिस्तान आणि भारत यांच्याशी तणाव असतानाच इराणशी घेतलेलं वैर मानवणारं नाहीये. आपल्या देशाचं रक्षण करताना ज्या कृती कराव्या लागतात त्या गैर नसल्याचं भारताने म्हटलंय. पाकिस्तानमधून निर्माण होणाऱ्या दहशतवादाच्या धोक्याबद्दल इराणच्या कायदेशीर चिंतेचा सूक्ष्म संदर्भ इथेच लागतो. जरी सुरुवातीचे स्ट्राइक हे मध्य पूर्वेतील संकटाशी संबंधित नसले तरी सीमेपलीकडे दीर्घकाळ अस्तित्वात असलेल्या फरकांशी त्याचा अधिक संबंध असू शकतो. भविष्यात परिस्थिती कशी असेल याचा त्या संकटावर परिणाम होऊ शकतो.

मध्य पूर्वेत अस्थिर परिस्थिती असतानाच इराणने पाकिस्तानवर हल्ला केलाय. गाझामधील युद्धामुळे आणखीन मोठ्या कलाहाची भीती वाढली आहे. कारण इराण येमेनमधील हौथी लाल समुद्रातील  शिपिंगला लक्ष्य करत आहेत. प्रत्युत्तरादाखल, युनायटेड स्टेट्स (अमेरिका) ने येमेनमध्ये क्षेपणास्त्र लाँचर्सने हुथी लष्करी मालमत्तेवर हवाई हल्ले केले आहेत.

मात्र इराणने पाकिस्तानवर जो हल्ला केलाय त्याचा धोरणात्मक खेळाशी फारसा संबंध नाही. पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि इराणच्या सिस्तान सीमेवर अनेक वर्षांपासून असंतोष सुरू आहे. हा विवाद बऱ्याचदा समोर येत नाही, कारण भौगोलिक परिस्थितच्याही पलीकडे जाऊन याची मुळ सापडतात. मात्र जानेवारी महिन्यात इस्लामाबाद आणि तेहरान मध्ये जो तणाव होता तो अगदीच वरच्या पातळीवर गेला होता.

काही अहवालांनुसार, चीन आणि सौदी अरेबियाने मध्यस्थी करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. इराणी दृष्टीकोनातून या संकटाच्या केंद्रस्थानी जैश उल-अदल नावाचा एक गट आहे. हा सुन्नी-सलाफी बलुच अतिरेकी गट इराणच्या सिस्तान या भागात मोठ्या प्रमाणात उपद्रव करत आहे. या अतिरेकी गटाने इराणच्या भागात हल्ले केले.  जैशने दावा केलाय की त्यांनी इराणच्या उच्चभ्रू इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC), कर्नल हुसेन-अली जावदनफर यांची हत्या केली.

पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि इराणच्या सिस्तान सीमेवर अनेक वर्षांपासून असंतोष सुरू आहे. हा विवाद बऱ्याचदा समोर येत नाही, कारण भौगोलिक परिस्थितच्याही पलीकडे जाऊन याची मुळ सापडतात.

इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा इतिहास प्रादेशिक संघर्षांनी भरलेला आहे. मात्र या दोन्ही देशात आजच्या घडीला असलेली अस्थिर परिस्थिती पाहता त्या दोघांनाही सध्या युद्धाची मोठी जोखीम पत्करायची नाहीये. कारण याचा अतिरिक्त ताण त्यांच्या संसाधनांवर पडेल. मात्र या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर संघर्षाचा आणखीन एक रंगमंच तयार झाला आहे. त्यामुळे 2024 च्या पहिल्या महिन्यातच आव्हानांच्या मालिकेत याने भर पडली आहे.

शिवम शेखावत ह्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्राममध्ये ज्युनियर फेलो आहेत.

कबीर तनेजा हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामचे फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Shivam Shekhawat

Shivam Shekhawat

Shivam Shekhawat is a Junior Fellow with ORF’s Strategic Studies Programme. Her research focuses primarily on India’s neighbourhood- particularly tracking the security, political and economic ...

Read More +
Kabir Taneja

Kabir Taneja

Kabir Taneja is a Fellow with Strategic Studies programme. His research focuses on Indias relations with West Asia specifically looking at the domestic political dynamics ...

Read More +