Image Source: Getty
२०१४ मध्ये बिजींगमधील सेंट्रल फॉरेन अफेअर्स मिटींगदरम्यान, जागतिक स्तरावर चीनची सॉफ्ट पॉवर बळकट करण्यासाठीचा संदेश प्रभावीपणे कसा दिला जाईल यावर चीनी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी भर दिला होता. त्यानंतरच्या वर्षांमध्ये, चीनी राज्य-नियंत्रित माध्यमांनी परदेशात विशेषतः आफ्रिकेमध्ये दर्जेदार सांस्कृतिक मालमत्तेचा विस्तार आणि विपणन नेटवर्क स्थापित करत, सांस्कृतिक गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
चीनचा आफ्रिकन आउटरीच
आफ्रिकेतील चीनच्या माहिती मोहिमा कपटावर आधारित आहेत. या मोहिमांमध्ये आर्थिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे तसेच मुख्यत: बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधील गुंतवणुकीबद्दल सकारात्मक कथनाचा प्रचार करण्यात येत आहे. शिन्हुआ, चायना डेली, चायना रेडिओ इंटरनॅशनल (सीआरआय), आणि सीजीटीएन (पूर्वीचे सीसीटीव्ही इंटरनॅशनल) यासारखी राज्य-नियंत्रित माध्यमे या कथनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
यादरम्यान, १३ दशलक्ष डिजिटल टीव्ही आणि २० दशलक्ष स्ट्रीमिंग सबस्क्रायबर्स असलेली, स्टारटाइम्स ही चीनी मालकीची मीडिया कंपनी ही आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाची डिजिटल टीव्ही प्रदाता बनली आहे. ३० आफ्रिकन देशांमध्ये या कंपनीने डिजिटल टीव्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये २ युएस बिलियन डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे.
चीनी राज्य-नियंत्रित माध्यमांनी परदेशात विशेषतः आफ्रिकेमध्ये दर्जेदार सांस्कृतिक मालमत्तेचा विस्तार आणि विपणन नेटवर्क स्थापित करत, सांस्कृतिक गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
याव्यतिरिक्त, चीन आपली सॉफ्ट पॉवर वाढवण्यासाठी सक्रियपणे आफ्रिकन्स इन येवू, टाझारा : अ जर्नी विदाऊट अन एण्ड, आणि बॉबीस फॅक्टरी यांसारखे माहितीपट तयार करत आहे. उदाहरणार्थ, “बॉबीज फॅक्टरी” हा माहितीपट आफ्रिकेतील एका चिनी कारखाना मालकावर आणि स्थानिक कामगारांशी त्याच्या सकारात्मक संवादावर केंद्रित आहे. “टाझारा : अ जर्नी विदाऊट अन एण्ड” या माहितीपटामध्ये बीआरआयखाली चीन-आफ्रिका सहकार्याचे प्रतीक असलेल्या टांझानिया-झांबिया रेल्वे (टाझारा) या प्रकल्पावर प्रकाश टाकण्यात आला आहे. “ए रेल्वे ऑफ फ्रेंडशिप”, “द लाइफ लाईन” आणि “लव्ह फॉर टाझारा” या तीन भागांचा समावेश असलेल्या माहितीपटात रेल्वे मार्गाशी लोकांचे असलेले भावनिक संबंध आणि त्याचा टांझानियन तरुणांवर झालेला सकारात्मक परिणाम मांडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, "आफ्रिकन्स इन यिवू-चायनीज मीट आफ्रिका" या माहितीपटात आफ्रिकेत राहणा-या कष्टाळू आणि उद्यमशील लोकांच्या कथा आणि चीन व आफ्रिका यामधील दरी कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे चित्रण करण्यात आले आहे. शेवटी, माय चायना स्टोरीमध्ये आफ्रिकन लोकांना त्यांच्या चीनमधील वास्तव्यात आलेले अनुभव रेखाटण्यात आले आहेत. याद्वारे आफ्रिकन युवा पिढीसमोर चीनची सकारात्मक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आफ्रिकेतील चीनचे माहिती धोरण
चीनने आफ्रिकेतील माहिती मोहिमेत त्रिसूत्रीचा अवलंब केला आहे. सर्वप्रथम, दरवर्षी चीन आफ्रिकेतील असंख्य माध्यमकर्मींना होस्ट करते आणि चीनी गुंतवणुकीला सकारात्मक शक्ती म्हणून प्रसार करण्याचे प्रशिक्षण देते. दुसरी बाब म्हणजे, चीनने स्थानिक आफ्रिकन मीडिया आउटलेट्समध्ये गुंतवणूक केली असून चीनी कथनाशी त्यांच्या संपादकीय पद्धती संरेखित करण्यासाठी त्यांच्यावर प्रभाव टाकण्यात येत आहे. उदाहरणार्थ, स्टार टाईम्सने झांबिया नॅशनल ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (झेडएनबीसी) सोबत एक संयुक्त उपक्रम स्थापन करून त्यात बहुसंख्य हिस्सा मिळवला आहे. शेवटची बाब म्हणजे, वेबसाइट अवरोधित करणे आणि इंटरनेट प्रवेश बंद करणे इ. बाबतचे तंत्रज्ञान आफ्रिकन सरकारांना विकण्याचेही काम चीन करत आहे. या तंत्रज्ञानामुळे डिजिटल माहितीवर सरकारचे कडक नियंत्रण राहते. २०२० मध्ये इथिओपियातील टीग्रे संघर्षादरम्यान, इथिओ टेलिकॉमने मतभेद दडपण्यासाठी आणि माहितीचा प्रवाह मर्यादित करण्यासाठी ह्युएई आणि झेडटीईसारख्या चिनी कंपन्यांचे तंत्रज्ञान आणि कौशल्य वापरले होते.
वेबसाइट अवरोधित करणे आणि इंटरनेट प्रवेश बंद करणे इ. बाबतचे तंत्रज्ञान आफ्रिकन सरकारांना विकण्याचेही काम चीन करत आहे.
कामगार विवाद, पर्यावरणीय समस्या आणि कर्जाची चिंता यांसारख्या बाबींमध्ये तसेच चीनी प्रकल्पांवरील टीका झाकण्यासाठी चीन आपल्या सामग्रीचा वापर करत आहे. यामुळे चीन आणि आफ्रिका यातील संबंध तणावाखाली आहेत. झांबियामधील २०१६ च्या निवडणुकांदरम्यान, चीनी मालकीच्या स्थानिक मीडिया आउटलेट्सने चीन समर्थक उमेदवार असलेल्या एडगर लुंगू यांच्या पारड्यात वजन टाकून झांबियाच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी चिनी गुंतवणूक फायदेशीर असल्याचे चित्रिण केले होते.
केनियामधील २०१७ च्या निवडणुकीत, पायाभूत सुविधाचा फायनान्सर म्हणून चीनची वाढती भूमिका ठळकपणे अधोरेखित करण्यात आली होती. सीजीटीएन आफ्रिकाने पूर्वीचे अध्यक्ष उहुरु केन्याटा यांना आधुनिकता आणि प्रगतीचे प्रतीक म्हणून चित्रित केले. तसेच, स्टँडर्ड गेज रेल्वेसारख्या प्रकल्पांसाठी त्यांच्या संमतीवर जोर देत, टिकाव आणि खर्चाबद्दलच्या सार्वजनिक चिंतेकडून लक्ष कमी केले आणि विरोधकांच्या टीकेची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला.
२०१७ च्या केनियामधील निवडणूकीमध्ये, पायाभूत सोयीसुविधांचा फायनान्सर म्हणून चीनची भुमिका अधोरेखित करण्यात आली आहे. सीजीटीएन आफ्रिकाने पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष उहुरु केन्याटा यांना आधुनिकता आणि प्रगतीचे प्रतीक म्हणून चित्रित केले. टिकाव आणि खर्चाबद्दलच्या सार्वजनिक चिंतेकडे दुर्लक्ष करत स्टँडर्ड गेज रेल्वेसारख्या प्रकल्पांना त्यांनी दिलेल्या संमतीवर जोर देण्यात आला आहे. झिम्बाब्वेमध्ये, नागरी समाजाच्या हालचाली आणि विरोध प्रतिबंधित करून तसेच राजकारण आणि व्यवसायात चीनच्या हितसंबंधांना अनुकूल कथन पुढे आणून चीनने झेडएएनयू-पीएफ या राजकीय पक्षाला सक्रियपणे पाठिंबा दिला आहे.
करार आणि व्यापार करारांची वाटाघाटी करण्यासाठी, चीनने नवे कथन तयार करण्यावर भर दिला आहे. एक प्रमुख तेल उत्पादक देश असलेल्या अंगोलाला भविष्यातील तेल निर्यातीच्या बदल्यात भरीव चीनी पायाभूत कर्जे देण्यात आली आहेत. चीनी माध्यमांनी या पायाभूत सुविधा प्रकल्पांना "तेलासाठीच्या पायाभूत सुविधा" म्हणून अधोरेखित केले आहे. तसेच दशकांच्या यादवीनंतर अंगोलाच्या पुनर्प्राप्तीसाठी ही बाब महत्त्वपूर्ण असल्याचे चित्रण करण्यात आले आहे. अशाप्रकारच्या रणनीतीमुळे अखेरीस चीनला अंगोलाच्या तेलसाठ्यात अनुकूल किमतीत दीर्घकालीन प्रवेश मिळवता आला आहे.
झिम्बाब्वेमध्ये, नागरी समाजाच्या हालचाली आणि विरोध प्रतिबंधित करून तसेच राजकारण आणि व्यवसायात चीनच्या हितसंबंधांना अनुकूल कथन पुढे आणून चीनने झेडएएनयू-पीएफ या राजकीय पक्षाला सक्रियपणे पाठिंबा दिला आहे.
झांबियामध्येही अशीच रणनीती पाहावयास मिळाली आली. चायना नॉनफेरस मेटल मायनिंग कंपनी (सीएनएमसी) ने झांबियातील तांबे खाणींमध्ये महत्त्वाचा हिस्सा मिळवला आहे. यामध्ये कामगार समस्या आणि पर्यावरणीय चिंतांकडे दुर्लक्ष करण्यासाठी अनुकूल मीडिया कव्हरेजची मदत घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, जिबूतीच्या चिनी कर्जावरील वाढत्या अवलंबनाविषयीची चिंता कमी करण्यासाठी चीनने त्याच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा एक भाग म्हणून जिबूतीच्या डोरालेह बहुउद्देशीय बंदरात उपस्थिती प्रस्थापित केली आहे. युगांडाचा एंटेबे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इथिओपियाचा अदिस अबाबा-जिबूती रेल्वे यासारख्या इतर धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रकल्पांनी चीनला कर्जाची चिंता कमी करून आणि चीन समर्थक कथनाला चालना देऊन महत्त्वपूर्ण आर्थिक आणि भू-राजकीय फायदे मिळवण्याची परवानगी दिली आहे.
चीनी माध्यमांच्या प्रभावावर टीका
अधिकाधिक आफ्रिकन राष्ट्रे चिनी कथा-बांधणीच्या प्रतिकूल परिणामांविरुद्ध बोलू लागल्याने स्थानिक धारणा विकसित होत आहेत. झांबियाचे राष्ट्राध्यक्ष हाकाइंडे हिचिलेमा यांनी प्रसारमाध्यमांमध्ये परकीय देशांच्या वाढत्या प्रभावाविषयी विशेषत: कथन तयार करण्यासाठी आणि विशिष्ट दृष्टीकोनांच्या बाजूने चीनचा हवाला देऊन चिंता व्यक्त केली आहे. नायजेरियातील माजी राजकारणी आणि जागतिक बँक आफ्रिकेचे विद्यमान उपाध्यक्ष असलेल्या ओबी इझेकवेसिली यांच्या मते, चीनी गुंतवणूक आणि कर्जे अनेकदा अवास्तवपणे दाखवली जातात. इझेकवेसिली यांनी चिनी उद्योगांसोबतच्या करारांमध्ये पारदर्शकतेच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी चीनी-समर्थित माध्यमांद्वारे महत्त्वपूर्ण वर्णनात्मक नियंत्रणाचा आरोप केला आहे.
चीनच्या प्रशासनाचे मॉडेल आणि कथानकांबाबत आफ्रिकन राजवटीतील अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन अधिक ग्रहणक्षम आणि सकारात्मक असतो.
राजकीय-चालित कृतींसाठी संवेदनशील मानल्या जाणाऱ्या टीकटॉकसारख्या चिनी-मालकीच्या सोशल मीडिया ॲप्सबाबतही चिंता वाढत आहे. सेनेगल आणि सोमालिया सारख्या अनेक राष्ट्रांनी सुरक्षा आणि नैतिक चिंतेचा दावा करत २०२३ मध्ये या ॲपला औपचारिकपणे प्रतिबंधित केले आहे. दक्षिण आफ्रिका आणि केनियासह इतरांनी वी चॅट आणि टीकट टॉक या ॲप्सच्या विरोधात याचिका दाखल केल्या आहेत.
अशा कथानकांवर नियंत्रण
चिनी कथानकाचा प्रभाव मिश्रित असला तरी, आफ्रिकन मीडिया लँडस्केपमधील सीसीपीच्या गुंतवणुकीमुळे माहितीच्या प्रवेशावर प्रभाव पडत आहे आणि मुख्य कथांना आकार दिला जात आहे. चीनच्या प्रशासनाचे मॉडेल आणि कथानकांबाबत आफ्रिकन राजवटीतील अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन अधिक ग्रहणक्षम आणि सकारात्मक असतो. लोकांच्या मतावर प्रभाव टाकण्यासाठी आणि सामाजिक एकसंधता नष्ट करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या परस्परविरोधी चुकीच्या माहितीचा कथनात्मक लढाईत वापर केला जात आहे व त्याचा थेट फटका सामान्य आफ्रिकन लोकांना सहन करावा लागत आहे. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला असलेल्या दीर्घकालीन धोक्यांबद्दल राजकारण्यांना शिक्षित करण्यासाठी जागरूकता मोहिमा आखण्याची नितांत गरज आहे.
समीर भट्टाचार्य हे असोसिएट फेलो आहेत आणि युवराज सिंग ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये रिसर्च इंटर्न आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.