Published on Nov 08, 2023 Updated 21 Days ago

नैसर्गिक आपत्ती आणि पूर, वणवा आणि दुष्काळ यांसारख्या अत्यंत टोकाच्या हवामानासंबंधित घटनांच्या संदर्भात आर्थिक बाजारातील वाढती अस्थिरता, हवामान बदलाच्या वेगवान गतीशी निगडीत आहे.

प्रगत विश्लेषणाद्वारे हवामान बदलाच्या परिणामांचे यशस्वीपणे व्यवस्थापन करणे

१. हवामानाच्या जोखमीची किंमत चुकवण्याची वाढती गरज

नैसर्गिक आपत्ती आणि पूर, वणवा आणि दुष्काळ यांसारख्या अत्यंत टोकाच्या हवामानासंबंधित घटनांच्या संदर्भात आर्थिक बाजारातील वाढती अस्थिरता, हवामान बदलाच्या वेगवान गतीशी निगडीत आहे. गेल्या काही दशकांमध्ये, गुंतवणूकदारांच्या दीर्घकालीन मालमत्तेच्या विस्तृत श्रेणीमधील आर्थिक प्रारूपांमध्ये अशा घटनांचा क्वचितच समावेश करण्यात आला होता, कारण महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी संबंधित माहिती एकतर विरळ पद्धतीने उपलब्ध होती अथवा अजिबातच उपलब्ध नव्हती.

आपल्या नैसर्गिक वातावरणाची पूर्वसूचना, जी आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक आणि व्यावसायिक निर्णयांमध्ये एके काळी गृहीत धरत होतो, तशी ती आता वैध राहिली नाही. जगभरात, आम्ही याआधी भौतिक वस्तूंच्या वितरणाच्या अखेरच्या टप्प्यातील ग्राहकांना ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधने सातत्याने उपलब्ध व्हावीत, या गृहितकेअंतर्गत काम केले आहे, परंतु अलीकडील घटनांनी या गृहितकांना धक्का दिला आहे. उदाहरणार्थ, २०२२ च्या उन्हाळ्यात, चीनच्या सिचुआन प्रांतातील औद्योगिक उत्पादनाला यांगत्झी नदीची पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे फटका बसला. शिवाय, जुलै २०२३ मध्ये आलेल्या  पुराने भारतातील विविध प्रदेशांना उद्ध्वस्त केले, ज्यामुळे लक्षणीय नुकसान झाले. बियास, यमुना आणि ब्रह्मपुत्रा यांसारख्या प्रमुख नद्यांनी विक्रमी उच्च पातळी गाठली आणि एकट्या हिमाचल प्रदेशचे १ अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक नुकसान झाले. अनेक पूल, महामार्गांची हानी झाली आणि घरांची पडझड झाली. जुलै २०२३ मध्ये ईशान्य अमेरिका, दक्षिण कोरिया, तुर्कस्थान, कॅनडा आणि ग्रीस या देशांमध्येही असेच पूर, उष्म्याची लाट आणि वणव्याचे परिणाम दिसून आले.

पर्यावरणीय संकटामुळे उद्भवणाऱ्या असंख्य परिणामांमुळे होणारे आर्थिक आणि मानवी नुकसान, हे दीर्घकालीन पद्धती अनुसरल्यामुळे होणाऱ्या कोणत्याही अल्पकालीन फायद्यांपेक्षा जास्त आहे.

या मोठ्या प्रमाणावरील आपत्तींमुळे शहरी आणि ग्रामीण पायाभूत सुविधांवर हवामान बदलाचे भयावह परिणाम होत आहेत. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासंबंधातील  गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा गेला आहे, विमा कंपन्यांना हवामान बदलाचा निर्माण झालेला धोका आणि समुदायांच्या स्थैर्यावर झालेले परिणाम यांचीही झलक दिसून येते. व्यवसाय करणाऱ्यांना, पुरवठा शृंखलेत व्यत्यय येणे, कामकाजाचा खर्च वाढणे आणि भांडवल गमावणे, दंड सहन करावा लागणे इत्यादी हवामान बदल-संबंधित जोखमी सहन कराव्या लागतील, असा अंदाज आहे. हवामान बदलामुळे कामगारांच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर होत असलेल्या विनाशकारी प्रभावांनाही कंपन्यांना सामोरे जावे लागेल. पर्यावरणीय संकटामुळे उद्भवणाऱ्या असंख्य परिणामांमुळे होणारे आर्थिक आणि मानवी नुकसान, हे दीर्घकालीन पद्धती अनुसरल्यामुळे होणाऱ्या कोणत्याही अल्पकालीन फायद्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे माहितीच्या मोठ्या संचाचे अचूक विश्लेषण करण्याची प्रक्रिया आणि गणिती सूत्रांसह माहिती संचाचा अर्थ लावण्याचा सराव या दोहोंद्वारे नैसर्गिक आपत्तीच्या संभाव्यतेचा आणि तीव्रतेचा अंदाज वर्तवणाऱ्या आणि त्या आपत्तीचे विश्लेषण करणाऱ्या उपायांची गरज आहे.

२. ‘ब्लूस्काय अॅनालिटिक्स’चे उपाय

‘ब्लूस्काय अॅनालिटिक्स’ने आर्थिक, विमा, स्थावर मालमत्ता, सरकारी आणि स्वयंसेवी क्षेत्रातील जगभरातील ग्राहकांना सातत्यपूर्ण, विश्वासार्ह आणि उपलब्ध होईल अशा योग्य माहितीचे एकात्मिकीकरण आणि विश्लेषण करून, संबंधित निर्णय घेणाऱ्यांना ती माहिती उपलब्ध करणे आणि हवामानाशी जुळवून घेत अथवा लवचिक बदल करीत परिणामांत सुधारणा करण्यासाठी एक व्यासपीठ, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. आमचे व्यवसाय प्रारूप तीन प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते: १) मालमत्ता देखरेख २) कार्बन बाजारपेठ आणि ३) डिजिटल सार्वजनिक वस्तू आणि तंत्रज्ञान पायाभूत सुविधांद्वारे सहाय्याने हवामान जोखीमेचे विश्लेषण करणे. आमच्या कामाच्या आजवरच्या प्रवासात वापरकर्त्यांचा अनुभव आणि निर्णय प्रक्रिया वृद्धिंगत करण्यासाठी विविध भागधारकांसोबत आम्ही सहयोग केला आहे.

मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली- ऊर्जेसंबंधित पायाभूत सोयीसुविधा, पारेषण वाहिन्या, तेलवाहिन्या किंवा कार्बन क्रेडिटसाठी निकृष्ट जमीन यांसारख्या विशिष्ट मालमत्तेशी संबंधित समस्या निराकरणाची क्षमता प्रदान करते.

आमच्या पहिल्या वर्षात, आम्ही आमची उत्पादने- स्पेसटाइमटीएम आणि क्लायमेट डेटा हब यांसारख्या अल्गोरिदमद्वारे अंदाज प्रारूप तयार करण्यासाठी उपग्रहाद्वारे माहिती गोळा करण्यावर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित केले. आमच्या उपाययोजनांमुळे वापरकर्त्यांना जंगलातील कार्बन साठा, नदीच्या पाण्याची पातळी आणि आगामी सात दिवसांच्या वणव्याच्या अंदाजांसह विविध पर्यावरणीय आणि हवामान विषयक माहितीची मिळण्यास मदत होते. मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली- ऊर्जेसंबंधित पायाभूत सोयीसुविधा, पारेषण वाहिन्या, तेलवाहिन्या किंवा कार्बन क्रेडिटसाठी निकृष्ट जमीन यांसारख्या विशिष्ट मालमत्तेसंबंधित समस्या निराकरणाची क्षमता प्रदान करते. ग्राहक ‘डेटा अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस’ (एपीआय)द्वारे त्यांच्या पसंतीची ‘फ्रीक्वेन्सी’ आणि ‘रिझोल्यूशन’चा वापर करू शकतात.

३. प्रमुख कंपन्यांपुढील आकारमानाची आव्हाने आणि शिफारसी

आम्ही ज्या प्रमुख आव्हानांचा सामना केला आहे, त्यापैकी एक म्हणजे कमाईचा मुद्दा, दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, या हवामान जोखीमेसंदर्भातील माहितीसाठी पैसे देण्यास तयार असलेल्या ग्राहकांना सुरक्षितता प्रदान करणे. उदाहरणार्थ, आमचे तंत्रज्ञान पुराचा अंदाज लावण्यास, पावसासंबंधित प्रक्रियांचे मूल्यांकन करण्यास, नद्यांमधील पाण्याच्या पातळीचा अंदाज घेण्यास आणि संभाव्य आपत्तींसाठी आगाऊ सूचना देण्यास सुसज्ज आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने अपघात टळू शकतात, आपत्तीतून वेळेवर सुटका होण्यासाठी मदत होऊ शकते आणि कर्ज उपलब्ध करून देणाऱ्यांना व विमा कंपन्यांना मौल्यवान माहिती मिळू शकते, परंतु ही महत्त्वाची माहिती उपलब्ध करून देण्यासंबंधीचा खर्च कोणी उचलावा असा प्रश्न निर्माण होतो. कर्जाला अंतिम मंजुरी देण्यासाठी उत्पन्न, मालमत्ता, कर्ज आणि मालमत्तेच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी बँकांना विशिष्ट माहितीचे उपसंच आवश्यक असतात आणि विमा कंपन्या एक वर्षाची संभाव्यता शोधतात. सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारकडे दीर्घ आणि प्रदीर्घ प्रक्रिया असते, ज्यामुळे जलद अंमलबजावणी मर्यादित होते. आवश्‍यक कमाई करता येण्याजोगे मापदंड मिळवण्यासाठी अनेक अतिरिक्त निकष निर्माण करणाऱ्या विस्तृत प्रारूपाची आवश्‍यकता असते. जर ते सर्व लोकांना उपलब्ध असले, तर असंख्य जीव वाचू शकतात.

या उलट, आम्ही त्याच अभियंत्यांसह आणि उत्पादन खर्चासह दुसरे उत्पादन एकाच वेळी विकसित केले आहे, जे आधीच अनेक ग्राहकांनी स्वीकारले आहे आणि त्यात सातत्याने मोठी वाढ होत आहे. त्यात शाश्वत महसूल निर्माण करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे आम्ही त्या उत्पादनाची कार्यक्षमता, गुणवत्ता आणि विश्वासार्हता वर्षानुवर्षे वाढवत आहोत. या माहिती संचाचा हवामान, समाज आणि मानवी जीवनावर होणारा परिणाम स्पष्ट आहे, परंतु ही उत्पादने अनेकदा कमी निधीची असतात आणि शुल्क भरलेल्यांपुरती ती प्रणाली उपलब्ध असल्याने तिचा वापर कमी प्रमाणात होतो.

सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारची दीर्घ आणि प्रदीर्घ प्रक्रिया असते, ज्यामुळे जलद अंमलबजावणीला मर्यादा येते.

अशा अनेक नवकल्पनांना अनेकदा अनुदानांद्वारे निधी प्रदान केला जातो, तरीही पुनरावृत्ती करता येण्याजोग्या आणि खात्रीशीर कमाईच्या स्रोतांशिवाय अशा प्रयत्नांतील सातत्य आव्हानात्मक राहते. याचा परिणाम म्हणजे विविध सरकारे, अंतराळ संस्था, स्वयंसेवी संस्था, सल्लागार कंपन्या आणि कंपन्यांचे सामाजिक दायित्व विभागांचे असंख्य अर्धवट सोडलेले आणि कालबाह्य प्रकल्प जे सर्व- बंद आणि कमी वापरात आहेत. पृथ्वीसाठी तंत्रज्ञान विकसित करणे महत्त्वाचे आहे, परंतु हवामान जोखीमेची जाणीव करून देणाऱ्यांसाठी शाश्वत महसूल मिळविण्याचा मार्ग, प्रमाण आणि संभाव्यता धूसर आहे.

त्यामुळे, विविध हवामानांतील नाविन्यपूर्ण कल्पनांकरता लवचिक अनुदान उपलब्ध होणे महत्त्वाचे ठरते, मग त्या स्वयंसेवी संस्था असो लघु किंवा मध्यम उद्योग असोत, किंवा एकल व्यवसायिक असोत. मात्र, अनुदान अनेकदा ओपन-सोर्स किंवा ‘क्रिएटिव्ह कॉमन्स’ विशेषता परवाने यांसारख्या जबाबदाऱ्यांसह येतात. शिवाय, या उत्पादनांचे, प्रकल्पांचे आणि सेवांचे दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी देखभाल महत्त्वाची ठरते. यामध्ये वापरकर्त्याची प्रतिबद्धता आणि मालमत्तेत सुधारणा समाविष्ट आहे, ज्यामुळे शाश्वत महसूल प्रवाहांचा शोध घेणे आवश्यक आहे. त्यामुळे, लवचिक अनुदान निधी महत्त्वाचा ठरतो आणि संशोधन व विकासाकरता प्रारंभीच्या कालावधीत अनुकूल वातावरण निर्मितीसाठी तंत्रज्ञान स्टार्टअप्सना अनुदान निधीचे वाटप केले जावे, ज्यामुळे बाजारपेठेसाठी योग्य अशा उत्पादनाच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञानाच्या प्रयोगांना मुभा मिळेल. तसेच, उत्पादनाच्या एखाद्या कल्पनेपासून स्टार्टअप कंपनीला प्रक्रिया विकसित करण्याच्या स्थितीकरता आणि त्या पुढील टप्प्यात बाजारपेठेपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचण्याकरता निधी आवश्यक असतो.

अतिरिक्त आव्हानांमध्ये ग्राहकांना त्यांच्या गरजा, प्राधान्यक्रम आणि पूर्वाग्रहांबाबत दिशा दाखवण्यासाठी शिक्षित करणे समाविष्ट आहे, जे वेळखाऊ असू शकते. उपग्रहांद्वारे माहिती संपादन वाढवणे हा आणखी एक अडथळा आहे; छोट्या अधिग्रहणांमुळे सामान्य पातळीहून कमी दर्जाच्या सेवेसह महाग उत्पादने मिळतात, तर मोठी उत्पादनांना उत्तम ग्राहक सेवा, दर आणि प्रक्रिया जलद पूर्ण करणे आवश्यक  असते. या शिवाय, हवामानातील जोखीम, कार्बन मार्केट आणि ‘ईएसजी मेट्रिक्स’मधील विवादांसह माहितीतील अचूकता आणि प्रारूपाच्या विश्वासार्हतेविषयी सुरू असलेल्या वादविवादांमुळे माहिती आणि विश्लेषणासंदर्भात विश्वासार्हता सुनिश्चित करणे हे एक जटिल कार्य आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ही आव्हाने केवळ आमच्या संस्थेसाठी नसून ती संपूर्ण क्षेत्रालाच भेडसावत आहेत.

पुरेसे सरकारी सहाय्य योग्य धोरणाचे संकेत देऊ शकते आणि हवामानासंदर्भातील माहिती व विश्लेषणाची वचनबद्धता दर्शवू शकते, शेवटी खासगी क्षेत्राला या महत्त्वाच्या उपायांचा अवलंब करण्यास प्रवृत्त करता येईल.

अशा पर्यावरणीय तंत्रज्ञान प्रकल्पांच्या प्रसाराला प्रोत्साहन देण्यासाठी, ज्यांनी शाश्वत वाढ आणि महसूल मिळवला आहे, अशा हवामान तंत्रज्ञान कंपन्यांच्या उदाहरणांतून इतर स्टार्टअप्सना आणि संस्थापकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळू शकते. पुरेसे सरकारी सहाय्य योग्य धोरणाचे संकेत देऊ शकते आणि हवामानासंदर्भातील माहिती व विश्लेषणाची वचनबद्धता दर्शवू शकते, शेवटी खासगी क्षेत्राला या महत्त्वाच्या उपायांचा अवलंब करण्यास प्रवृत्त करता येईल. योग्य पेमेंट क्षमतेसह अंतिम खरेदीदार हा उद्योग बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील असताना, विश्वास निर्मितीसाठी, विश्वासार्हता प्रस्थापित करण्यासाठी, खासगी क्षेत्राला शिक्षित करण्यासाठी आणि वापराला गती देण्यासाठी तर्क व माहितीने प्रेरित असा पहिला खरेदीदार सरकारला होता येईल. बँका आणि विमा कंपन्यांसाठी धोरण किंवा अनिवार्य अहवालाची मार्गदर्शक तत्त्वे अनुसरण्यास आणि परिणाम साधण्यात सरकार लक्षणीय मदत करू शकते.

४. निष्कर्ष

हवामान बदल आणि पर्यावरणीय ऱ्हास या समस्यांचा सामना करण्यासाठी हवामान जोखीमेविषयक माहिती व विश्लेषण क्षमता विकसित करणे हे एक मोठे आव्हान आहे, ज्याकरता सार्वजनिक, खासगी, अनुदान, भागभांडवल व कर्ज असे विविध भांडवली स्रोत आवश्यक आहेत आणि विद्यमान व्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर नवी व्यवस्था तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मानवी कौशल्ये निर्माण करणे आवश्यक आहे. स्वयंसेवी संस्था आणि ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थांमधील सहकार्य महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या संशोधन व विकास  आणि प्रारंभीचा नमुना तयार करण्याकरता लवचिक अनुदान महत्त्वपूर्ण ठरते, जे नफ्यासाठीच्या प्रारूपाच्या बाबतीत कमाई देऊ करतात. उत्तम प्रकारे अंमलात आणल्यास, हवामान जोखीम विश्लेषणे आणि माहिती तयार करणाऱ्या कंपन्यांकरता नाविन्यपूर्ण निधी यंत्रणा दीर्घकालीन मूल्य निर्मितीस चालना देऊ शकतात आणि आपल्याला कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या भविष्याकडे नेऊ शकतात.

अभिलाषा पुरवार या ‘ब्लू स्काय अॅनालिटिक्स’च्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.