Published on Jan 19, 2024 Updated 0 Hours ago

छत्तीसगढमधील महासमुंद जिल्ह्यातील एकात्मिक कोविड कॅम्पसचे यश हे जागतिक स्तरावरील साथीच्या पार्श्वभूमीवर समर्पित आणि एकात्मिक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करते.

छत्तीसगढच्या महासमुंद जिल्ह्याचा कोविड-19 चा सामना करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन

कोविड-१९ साथीच्या रोगाने जागतिक स्तरावर आरोग्य सेवा प्रणाली कशा भेदल्या जाऊ शकतात, ते उघड केले आहे. विशेषत: ग्रामीण भागात आरोग्य विषयक संकटांचा सामना करण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि लवचिक उपायांची आवश्यकता सुस्पष्ट केली आहे. भारतात, संकटाला मिळालेल्या प्रतिसादाने शहरी आरोग्य सेवा प्रणालींवरील दबाव कमी करण्यासाठी कोविड उपचार केंद्रांची निर्मिती करण्यास प्रवृत्त केले गेले. मात्र, रसद पुरवठयातील आणि तांत्रिक अंमलबजावणीच्या आव्हानांमुळे धोरणांचे पुनर्मूल्यांकन झाले आहे. हा लेख एकात्मिक कोविड आवाराच्या संकल्पनेचा शोध घेतो, छत्तीसगढ राज्यातील महासमुंद जिल्ह्याच्या केलेल्या तपशीलवार अभ्यासाचा वापर करून एकात्मिक दृष्टिकोन तळागाळाच्या स्तरावर आरोग्य विषयक संकटांचा सामना करण्याची क्षमता आपण कशी वाढवू शकतो हे दाखवून देता येईल.

पार्श्वभूमी

साथीच्या रोगाच्या आव्हानांना प्रतिसाद म्हणून, भारतासह जगभरातील सरकारांनी कोविड उपचार केंद्रांची स्थापना केली. लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी विलगीकरण सुविधा उपलब्ध करून देत, रुग्णालयांवरील ओझे कमी करण्याचा या केंद्रांचा उद्देश होता. मात्र, कोविड उपचार केंद्रांच्या अंमलबजावणीमुळे रसद पुरवठाविषयक आणि तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागांत- प्रभावी रुग्ण विलगीकरणाचे आणि व्यवस्थापनाचे अडथळे निर्माण झाले.

महासमुंद जिल्ह्याचा सक्रिय एकात्मिक दृष्टिकोन

भारतातील छत्तीसगडमधील महासमुंद या जिल्ह्याने एकात्मिक कोविड आवाराची स्थापना करून साथीच्या रोगाने निर्माण केलेल्या आव्हानांना सक्रिय प्रतिसाद दिला. या प्रारूपाचा उद्देश एकाच सुविधेमध्ये तीन प्रकारची केंद्रे एकत्रित करून कोविड-१९ प्रकरणांचे व्यवस्थापन सुव्यवस्थित करणे होते: लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी एक कोविड उपचार विलगीकरण केंद्र, लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी एक समर्पित कोविड रुग्णालय आणि आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांसाठी निवासी व अलग राहण्याचे वसतिगृह.

एकात्मिक कोविड आवाराची जागा म्हणून जिल्हा रुग्णालयाची निवड केली गेली, हा एक महत्त्वपूर्ण निर्णय होता. जिल्हा रुग्णालय, मुख्य शहराच्या बाहेरील भागात, दाट लोकवस्तीच्या निवासी भागांपासून दूर पुरेशी जागा देऊ करते. त्यात विद्यमान कर्मचारी वसतिगृहे होती जी पुन्हा उभारली गेली, आणि कोविड नसलेल्या सुविधांसह संसाधने शेअर केली गेली, ज्यामुळे ते एक आदर्श स्थान बनले. मात्र, या निर्णयाने विशेषत: जिल्हा रुग्णालयाद्वारे प्रदान केलेल्या कोविड व्यतिरिक्त  सेवा अखंडपणे सुरू ठेवणे सुनिश्चित करण्याबाबत आव्हाने उभी राहिली.

एकात्मिक कोविड कॅम्पससाठी जिल्हा रुग्णालयाची (DH) जागा निवडणे हा एक महत्त्वपूर्ण निर्णय होता.

जिल्हा रुग्णालय आवार, पूर्वी दुय्यम देखभाल सामुदायिक रुग्णालय म्हणून कार्यरत होते. नियमित कोविड नसलेली प्रकरणे आणि आपत्कालीन रुग्णालय सेवा हाताळण्याची जबाबदारी पार पाहत होते. या महत्त्वाच्या सेवांमध्ये व्यत्यय आणणे हा पर्याय नव्हता. त्याच आवारात कोविडच्या आणि कोविडेतर सुविधा सामावून घेण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन करणे आवश्यक होते. कोविड-१९ रूग्णांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची स्थापना करताना प्रसुती आणि नवजात शिशु देखभाल विभाग यांसारख्या सेवांची देखभाल करणे आणि एकापासून दुसऱ्याला कोविडची लागण होण्यापासून रोखण्याकरता स्वतंत्र प्रवेश सुविधेची रचना करणे ही आव्हाने होती.

महासमुंदने एकात्मिक दृष्टिकोन अवलंबून आपल्या आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये यशस्वी परिवर्तन केले. जिल्हा रुग्णालय आवार दोन विभागांमध्ये विभागले गेले: नियुक्त कोविड-१९ आवार आणि कोविड नसलेले आवश्यक सेवा क्षेत्र. या धोरणात्मक विभागणीने महामार्ग कोविड-१९ आवाराला जोडणारा स्वतंत्र प्रवेश/निर्गमन रस्ता तयार केला, ज्यामुळे अत्यावश्यक कोविडेतर सेवांचे कार्य सुरळीत सुरू राहील. जिल्हा रुग्णालय परिसरातील विद्यमान सुविधांचा पुनर्वापर करण्यात आला, जसे की दोन वसतिगृहे कोविड विलगीकरण केंद्रात रूपांतरित करण्यात आली आणि आरोग्यसेवा कर्मचार्‍यांसाठी निवासी व विलगीकरण वसतिगृह सुरू करण्यात आले.

संसाधनांचा वापर आणि सुविधांचे कमाल व्यवस्थापन

एकात्मिक दृष्टिकोनाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे उपलब्ध संसाधनांचा कमाल वापर. महासमुंद जिल्हा प्रशासनाने विद्यमान संसाधनांचा विवेकपूर्वक वापर करण्यासाठी मानक कार्यप्रणाली आणि एक सर्वसमावेशक करावयाच्या कामांची यादी तयार केली. आवारातील विद्यमान सुविधांचा आणि संसाधनांचा लाभ घेत, जिल्हा रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना दर्जेदार उपचार प्रदान करण्याची क्षमता वाढवली.

जिल्हा रुग्णालय परिसरातील विद्यमान सुविधांचा पुनर्वापर करण्यात आला, जसे की- दोन वसतिगृहे कोविड विलगीकरण केंद्रात रूपांतरित करण्यात आली आणि आरोग्यसेवा कर्मचार्‍यांसाठी निवासी व विलगीकरण वसतिगृह बांधण्यात आले.

आवारातील रुग्णांची काळजी आणि सुविधा व्यवस्थापन सुव्यवस्थित करण्याकरता स्थानिक पातळीवर विकसित कोविड-१९ सुविधा व्यवस्थापन प्रणाली महत्त्वपूर्ण होती. या सॉफ्टवेअरने खाटांच्या उपलब्धतेवर तात्काळ अपडेट्स मिळण्याची सुविधा दिली आणि रुग्णांचे डिजिटल रेकॉर्ड राखले गेले, सॉफ्टवेअरमुळे कार्यक्षम देखरेख आणि व्यवस्थापन सुनिश्चित केले गेले. भारत सरकारने निश्चित केलेल्या कोविड-१९ व्यवस्थापन शिष्टाचाराचे पालन करून, या प्रणालीने वय, लिंग आणि वैद्यकीय इतिहास यांवर आधारित रूग्णांकरता डॉक्टरांनी दिलेले विशिष्ट औषधपत्र (प्रिस्क्रिप्शन) तयार करण्यात आले.

आरोग्य सेवा कर्मचार्‍यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करणे

परिवर्तित जिल्हा रुग्णालय आवारात आरोग्यसेवा कर्मचार्‍यांच्या (HCWs) कल्याणाला आणि सुरक्षिततेला सर्वतोपरी महत्त्व दिले गेले. कोविड-१९ सुविधांमध्ये काम करणाऱ्या आरोग्यसेवा कर्मचार्‍यांचे व्यवस्थापन करण्यासाठी एक समर्पित कोविड -१९ टीम तयार करण्यात आली. कामाचे समान वितरण सुनिश्चित करण्यासाठी, कामाचे केंद्रिय वाटप करण्यात आले आणि कोविड-१९ च्या विविध सुविधांमध्ये थकवा टाळण्यासाठी आणि कोविड काळजीच्या विविध क्षेत्रांमध्ये अनुभव वाढविण्यासाठी आरोग्यसेवा कर्मचार्‍यांचे काम फिरते ठेवले गेले.

आरोग्यसेवा कर्मचार्‍यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांचा (पीपीइ) योग्य वापर आणि कठोर स्वच्छता पद्धतींचे पालन यावर प्रशिक्षण सत्र आयोजित केले गेले. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने पीपीइ किट घालणे आणि काढणे, हाताची स्वच्छता, श्वसन स्वच्छता आणि जैव वैद्यक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्वसमावेशक प्रशिक्षण प्रारूप तयार केले. या प्रशिक्षण सत्रांनी आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि कोविड-१९ प्रकरणांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त झाली.

परिणाम

महासमुंद जिल्ह्यात एकात्मिक कोविड आवाराची स्थापना केल्याने कोविड-१९ रूग्णांचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि काळजी घेतली गेली. एकात्मिक कोविड आवाराने रूग्ण बरा होण्याच्या ८३.१८ टक्के उच्च दरासह कोविड-१९ प्रकरणे हाताळण्यातील आपला प्रभाव दाखवून दिला आहे. कोविड आवारात अंमलात आणलेल्या व्यवस्थापन पद्धतीमुळे सुव्यवस्थित काळजी आणि बरे होण्याचा उच्च दर प्राप्त झाला. कोविड विलगीकरण केंद्रात दाखल झालेल्या रुग्णांपैकी केवळ काही टक्के रुग्णांना (५.३६ टक्के) ऑक्सिजन सहाय्यासाठी समर्पित कोविड रुग्णालयात हस्तांतरण आवश्यक होते, जे रुग्णाच्या परिस्थितीच्या तीव्रतेवर आधारित योग्य काळजी प्रदान करण्याच्या एकात्मिक दृष्टिकोनाचा प्रभाव दर्शवते.

कोविड काळात अंमलात आणल्या गेलेल्या व्यवस्थापन पद्धतीमुळे सुव्यवस्थित काळजी घेतली गेली आणि रूग्ण बरे होण्याचा उच्च दर प्राप्त झाला.

प्रभावी आरोग्यसेवा सज्जतेसाठी शिकलेले धडे आणि प्रारूप

महासमुंद जिल्ह्याचा अनुभव हा आरोग्यविषयक संकटांचा सामना करण्याची क्षमता आणि प्रभावी आरोग्यसेवा सज्जता निर्माण करण्याबाबत मोलाचे धडे देतो. मुख्य धोरणांमध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागात मजबूत आरोग्य सेवा पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे, सार्वजनिक प्रशासन कार्यसंघ आणि आरोग्यसेवा व्यावसायिक यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करणे, आरोग्यसेवा कर्मचार्‍यांकरता सातत्याने प्रशिक्षण आयोजित करणे व त्यांच्यात क्षमता निर्माण करणे आणि कोविड-१९ सुविधा व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे यांचा समावेश आहे.

आरोग्य सेवा कर्मचार्‍यांकरता सतत प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण हे प्रभावी आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. भविष्यातील उद्रेकांना संबोधित करण्यासाठी आणि आरोग्य सेवा प्रणालीवरील त्यांचे परिणाम कमी करण्यासाठी तयारी करण्याच्या योजना बनवायला हव्या. वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांचा (‘पीपीइ’चा) योग्य वापर आणि कठोर स्वच्छता पद्धतींचे पालन करण्याबाबत प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्याची वचनबद्धता ही आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना स्वत:चे संरक्षण करण्याकरता व कोविड-१९ प्रकरणांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांसह सुसज्ज बनवते.

खाटांची उपलब्धता, रुग्णांचे डिजिटल रेकॉर्ड आणि रुग्णांच्या हस्तांतरणासाठी अंगभूत सूचना प्रणालीचे तात्काळ अपडेट्स, कार्यक्षम देखरेख आणि व्यवस्थापन सुनिश्चित केले गेले.

याशिवाय, कोविड-१९ सुविधा व्यवस्थापन प्रणालीचा विकास आणि अंमलबजावणी यांनी आवारातील रुग्ण सेवा आणि सुविधा व्यवस्थापन सुव्यवस्थित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या डिजिटल व्यवस्थापन प्रणालीमुळे आरोग्य सेवा विषयक टीम्समधील एकूण समन्वय व संवाद सुधारला आणि रुग्णांच्या उपचारांची गुणवत्ता सुधारली. खाटांची उपलब्धता, रुग्णांचे डिजिटल रेकॉर्ड आणि रुग्णांच्या हस्तांतरणासाठी अंगभूत सूचना प्रणालीचे तात्काळ अपडेट्स, कार्यक्षम देखरेख आणि व्यवस्थापन सुनिश्चित केले गेले.

निष्कर्ष

अखेरीस, एकात्मिक कोविड आवाराची स्थापना करण्याचा छत्तीसगढ राज्यातील महासमुंद जिल्ह्याचा अनुभव जागतिक साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विषयक संकटांचा मुकाबला करण्याची क्षमता निर्माण करण्याबाबत एक दीपस्तंभ म्हणून काम करतो. जिल्ह्याच्या एकात्मिक पध्दतीने कोविड-१९ प्रकरणांचे प्रभावीपणे व्यवस्थापन केले गेले आणि अत्यावश्यक कोविडेतर सेवांचे सातत्य सुनिश्चित करण्यात आले. महासमुंद जिल्ह्याच्या अनुभवातून शिकून आणि या धोरणांची प्रतिकृती करून, इतर जिल्हे त्यांची तयारी वाढवू शकतात आणि भविष्यातील आरोग्य संकटांना प्रतिसाद देऊ शकतात व त्यांच्या समुदायांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करू शकतात.

दिसून आल्यानुसार, आरोग्यविषयक संकटांचा सामना करण्याची क्षमता ही सद्य आव्हाने आणि भविष्यातील अनिश्चिततेचा सामना करण्यास सक्षम अशी एक मजबूत आरोग्य सेवा प्रणाली निर्माण करण्याची कोनशिला आहे. महासमुंद जिल्ह्यातील एकात्मिक कोविड आवाराचे यश हे कोविड-१९ रूग्णांचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन आणि उपचार प्रदान करण्यासाठी समर्पित आणि एकात्मिक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करते. यांतून शिकलेले धडे हे समान प्रकारच्या आव्हानांना तोंड देत असलेल्या इतर प्रदेशांकरता एक मोलाचे उदाहरण म्हणून काम करू शकते. कोणत्याही आरोग्यसेवा विषयक आणीबाणीचा सामना करण्यासाठी समन्वित प्रयत्न आणि सर्वसमावेशक उपचारांच्या महत्त्वावर हे उदाहरण जोर देते. आरोग्यविषयक संकटांचा मुकाबला करण्याची क्षमता निर्माण करणे हा केवळ संकटाला प्रतिसाद नाही; ही आरोग्यसेवा प्रणाली तयार करण्याची सतत वचनबद्धता आहे, जी समाजाच्या नव्याने विकसित होत असलेल्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करू शकते, नवनिर्मिती करू शकते आणि गरजांना प्रभावीपणे संबोधित करू शकते. महासमुंद जिल्ह्याचा प्रवास ही क्षमता प्राप्त करण्यासाठी एक योजना सादर करते. प्रभावी आरोग्यसेवा सज्जतेचे हे एक प्रारूप आहे.

रवी मित्तल हे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत, जे सध्या छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त आहेत.

सुरभि जैन ह्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो-सायन्सेस, बंगळुरू येथे न्यूरोलॉजी विषयातील डॉक्टर ऑफ मेडिसीन आहेत.

कार्तिकेय गोयल हे आयएएस अधिकारी आहेत, जे सध्या छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

 

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Ravi Mittal

Ravi Mittal

Dr Ravi Mittal is an Indian Administrative Services (IAS) officer currently posted as the District Collector of the District Jashpur Chhattisgarh. He has an academic ...

Read More +
Surbhi Jain

Surbhi Jain

Dr Surbhi Jain is a DM Resident in Neurology at the National Institute of Mental Health and Neuro-Sciences (NIMHANS) Bangalore. She did her post-graduation in ...

Read More +
Kartikeya Goel

Kartikeya Goel

Kartikeya Goel is an IAS officer of the 2010 batch from Chhattisgarh cadre. He has served in different field positions as SDM (Sub Divisional Magistrate), ...

Read More +