Published on May 15, 2023 Commentaries 0 Hours ago

ईएसजी हे उद्योगाच्या प्रशासनास मदत करण्याचे साधन बनले आहे. मात्र ते उद्योगाचा व्यवसायही चालवत आहे.

ईएसजी पुढच्या पानावरून मागे की मागच्या पानावरून पुढे?

प्रशासनाच्या दृष्टीने; तसेच उद्योगाला चालना देण्यासाठी ईएसजी (पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय) हे उद्योगविश्वाच्या वातावरणास आकार देण्यासाठी एक शक्तिशाली औपचारिक ताकद म्हणून उदयास आले आहे. कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर, जोखीम व्यवस्थापनावर आणि दीर्घकालीन शाश्वततेवर परिणाम करू शकणारे महत्त्वाचे घटक म्हणून ‘ईएसजी’संबंधीच्या भूमिकांकडे पाहिले जाते. प्रशासन हे ‘ईएसजी’च्या पारंपरिकदृष्ट्या केंद्रस्थानी असले, तरी ईएसजी मूल्य आणि कल्पकता निर्माण करू शकते. आजच्या वेगवान व्यावसायिक वातावरणात कंपन्यांना स्पर्धात्मक लाभ मिळवून देऊ शकते, असा वाढता समज आहे.

गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शाश्वततेचे आणि नैतिक पद्धतींचे मूल्यमापन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निकषांचा एक भाग म्हणून ईएसजी हे पर्यावरणीय जबाबदार व्यवस्थापन, सामाजिक न्याय आणि सु-प्रशासन यांसारख्या मूल्यांसह गुंतवणुकीचे एकसंध साधन म्हणून पाहिले जात आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी, कामगार पद्धती सुधारण्यासाठी आणि वैविध्यात वाढ करण्यासाठी अनेक कंपन्यांनी ‘ईएसजी’चा विचार करीत आहेत. पृथ्वीवरील आणि एकूणच समाजावरील परिणामासाठी कंपन्यांना जबाबदार धरण्याचा आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याचा एक मार्ग म्हणून ‘ईएसजी’ची प्रशंसा करण्यात येत आहे.

जबाबदार गुंतवणुकीतील ‘पुढचे पाऊल’ म्हणून ‘ईएसजी’कडे पाहिले जात आहे. ते पृथ्वीसाठी आणि समाजासाठी उज्ज्वल भविष्यासाठी आश्वस्त करते. मात्र बारकाईने पाहिले, तर आपल्याला आश्चर्य वाटू शकते. कारण ईएसजी हे आपल्याला मागे नेण्याचे काम करते. खऱ्या अर्थाने शाश्वत उपाययोजना सुचवण्याऐवजी ते अशाश्वत गोष्टींचा नकारात्मक परिणाम करण्यास मदतच करते. चिंतेची बाब म्हणजे, ‘ईएसजी’ची मानके ही बरेचदा ऐच्छिक आणि स्वघोषित असतात. त्यामध्ये कंपन्यांना त्यांच्या कार्यपद्धतीतील चांगल्याच गोष्टी निवडण्याची व आशादायक बाबी नोंदवण्याची मुभा असते आणि नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचे व त्यांचा उल्लेख न करण्याचे स्वातंत्र्य असते. दर्जेदार अहवाल आणि पारदर्शकतेचा अभाव यांमुळे गुंतवणूकदारांना कंपनीच्या खऱ्या शाश्वत कामगिरीचे अचूक विश्लेषण करणे अधिक आव्हानात्मक ठरते.

आर्थिक बाजारपेठांचे अल्पकालीन लक्ष्य हे एक आव्हान आहे. बाजारपेठा अनेकदा दीर्घकालीन शाश्वततेपेक्षा तत्काळ आर्थिक नफ्याला प्राधान्य देतात. त्यामुळे ईएसजी संबंधीच्या घटकांकडे दुर्लक्ष करून अल्पकालीन आर्थिक कामगिरीला प्राधान्य देण्यासाठी कंपन्यांना प्रोत्साहन मिळू शकते. या व्यतिरिक्त सातत्यपूर्ण आणि प्रमाणित ईएसजी डेटा आणि अहवालाच्या अभावामुळे गुंतवणूकदार व भागधारकांना कंपनीच्या ईएसजी कामगिरीचे अचूक विश्लेषण करणे आणि समस्तरीय कंपन्यांशी तुलना करणे कठीण होऊ शकते.

‘ईएसजी’वरील आणखी एक टीका अशी, की ते बरेचदा सध्याच्या स्थितीत बदल करण्याऐवजी किंवा प्रणालीगत बदलांचा पुरस्कार करण्याऐवजी सध्याच्या प्रणालींमधील वाढीव बदलांनाच  प्राधान्य देते. उदाहरणार्थ, एखादी कंपनी तिचे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अक्षय्य उर्जेमध्ये गुंतवणूक करू शकते. पण त्याच वेळी आपल्या कामांच्या संदर्भाने अन्य कामगिरी बजावताना पर्यावरणाचा ऱ्हासही करू शकते. हवामान बदल, सामाजिक विषमता आणि कॉर्पोरेट उत्तरदायित्व यांसारख्या जागतिक आव्हानांची तीव्रता आणि तातडी पूर्ण करण्यासाठी असा निवडक दृष्टिकोन पुरेसा नसतो. पर्यावरणीय आणि सामाजिक समस्यांना कारणीभूत ठरलेल्या मूलभूत संरचनात्मक समस्या सोडविण्यासाठी ‘ईएसजी’ला मर्यादांशी सामना करावा लागतो. उदाहरणार्थ, पुरवठा साखळी पद्धती, उत्पादनाच्या निर्मितीपासून बाजारपेठेत नेण्यापर्यंतची प्रक्रिया किंवा कॉर्पोरेट लॉबिंग या घटकांशी संबंधित प्रणालीगत जोखीम ईएसजी पूर्णपणे हाताळू शकत नाही. याव्यतिरिक्त स्थानिक समुदाय, स्थानिक लोक किंवा उपेक्षित गट यांचे आवाज अनेकदा निर्णयप्रक्रियेत दुर्लक्षित राहतात, त्यांच्या गरजेच्या आणि प्राधान्याच्या गोष्टींवर ‘ईएसजी’कडून पुरेसे काम केले जात नाही.

हवामान बदल, सामाजिक विषमता आणि कॉर्पोरेट उत्तरदायित्व यांसारख्या जागतिक आव्हानांची तीव्रता आणि तातडी पूर्ण करण्यासाठी असा निवडक दृष्टिकोन पुरेसा नसतो. पर्यावरणीय आणि सामाजिक समस्यांना कारणीभूत ठरलेल्या मूलभूत संरचनात्मक समस्या सोडविण्यासाठी ‘ईएसजी’ला मर्यादांशी सामना करावा लागतो.

‘ईएसजी’चे लाभ

ईएसजी उद्योगविश्वाला मदत करू शकेल, असा एक मार्ग म्हणजे क्लपकतेचा पुरस्कार. उदाहरणार्थ, पर्यावरणीय शाश्वततेला प्राधान्य देणाऱ्या कंपन्या तंत्रज्ञान, नूतनीकरण करण्यायोग्य उर्जा उपाय आणि चक्रीय अर्थशास्त्राशी संबंधित घटक यांच्या संशोधन व विकासासाठी गुंतवणूक करीत आहेत. या प्रयत्नांमुळे नवी उत्पादने, सेवा आणि व्यापारी मॉडेल्सचा विकास होऊ शकतो. ती पर्यावरणीय आव्हानांशी संबंधित काम करतात आणि नव्याने उदयाला आलेल्या क्षेत्रांमधील संधींशी संबंधित असतात. उदाहरणार्थ, पॅटागोनिया आणि इंटरफेस यांसारख्या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या वैशिष्ट्यांमध्ये शाश्वततेचाही अंतर्भाव केला आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या ग्राहकांच्या निष्ठेबरोबरच बाजारपेठेतील हिस्साही वाढला आहे.

याशिवाय ‘ईएसजी’मधील सामाजिक विचार म्हणजे, विविधता, समाविष्टता आणि न्याय्य श्रम पद्धती यांमुळेही कल्पकतेला चालना मिळू शकते. वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक कर्मचारी वर्गाला प्रोत्साहन देणाऱ्या कंपन्या अधिक कल्पक आणि विविध प्रकारच्या ग्राहकांना समजावून घेण्यात आणि सेवा देण्यात सक्षम असतात, असे दर्शवले जाते. या व्यतिरिक्त, ज्या कंपन्या आपल्या पुरवठा साखळीमध्ये न्याय्य श्रम पद्धतींना प्राधान्य देतात त्या आपली प्रतिष्ठेसंबंधातील जोखीम कमी करू शकतात आणि शाश्वत पुरवठा साखळी निश्चित करू शकतात. उदाहरणार्थ, युनिलिव्हर आणि डॅनोन यांसारख्या कंपन्या सामाजिक कामांचा मिलाफ आपल्या व्यावसायिक धोरणांमध्ये करतात. त्यामुळे या कंपन्यांच्या ब्रँडची प्रतिष्ठा आणि ग्राहकांची निष्ठा या दोन्हींमध्ये वाढ होते.

ज्या कंपन्या सामाजिकदृष्ट्या असलेल्या जोखमीचे म्हणजे, कामगार कायद्याचे उल्लंघन, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि समुदायावरील परिणाम अशा प्रकारच्या घटकांचे व्यवस्थापन करतात, त्या कंपन्यांना महागड्या कायदेविषयक प्रकरणांना, दंडाला किंवा ब्रँडची हानी आदी गोष्टींशी सामना करावा लागत नाही. उदाहरणार्थ, नेस्ले आणि कोका कोला यांसारख्या कंपन्यांना पाणी व्यवस्थापनासंबंधात कायदेविषयक प्रकरणांना सामोरे जावे लागले. त्यामुळे कंपनीच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसला होता. या सर्वांचा परिणाम होऊन त्यांची चौकशी आणि आर्थिक जोखीमही वाढली.

जागतिक स्तरावरील अनेक गुंतवणूकदारांनी भांडवलाचा वापर आणि शाश्वत वाढीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ईएसजी धोरणे स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ, खासगी इक्विटी कंपनी ‘ब्लॅकरॉक’ने शाश्वतता या मूल्यावर आपले लक्ष्य केंद्रित केले आणि ईएसजी तत्त्वांशी जुळवून घेण्यासाठी आपली गुंतवणुकीची श्रेणी त्या पद्धतीने तयार करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले. त्यामध्ये कार्बनचे अधिक प्रमाणात उत्सर्जन करणाऱ्या कंपन्यांशी व्यवहार न करणे आणि हवामानविषयक जोखमीसंबंधात अन्य कंपन्यांशी व्यवहार करणे यांचा समावेश होतो.

‘ईएसजी’चे तोटे

मात्र ‘ईएसजी’च्या संबंधीत घटकांमध्ये अपयश आलेले दिसते. ईएसजी मापनाची मानके ठरवली गेली नसल्याने आणि आराखड्यांची नोंद घेतली जात नसल्याने ते करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे अशा कंपन्यांकडून विसंगत, तर कधीकधी दिशाभूल करणारे ईएसजी प्रकटीकरण केले जाते. याचा परिणाम ‘ग्रीनवॉशिंग’मध्ये (एखादी कंपनी पर्यावरणस्नेही आहे, असे सातत्याने सांगितले जाणे) झाला आहे. अशा कंपन्या कोणत्याही ठोस आधाराशिवाय आपण पर्यावरणस्नेही किंवा सामाजिकदृष्ट्या जबाबदार असल्याचे सांगतात. उदाहरणार्थ, २०१५ मध्ये झालेल्या फोक्सवॅगन उत्सर्जन घोटाळ्यात असे दिसून आले, की कंपनीने आपण पर्यावरणस्नेही, पर्यावरणाच्या दृष्टीने जबाबदार ब्रँड असल्याचा प्रचार करूनही नियामक गरजा पूर्ण करण्यासाठी उत्सर्जनविषयक डेटामध्ये फेरफार केला होता.

ईएसजी’चा अर्थपूर्ण कृतीशिवाय केवळ एक मार्केटिंगचे साधन म्हणून वापर केला जाण्याची शक्यता आहे. काही कंपन्या आपल्या व्यवसाय प्रक्रियेत ठोस बदल न करता केवळ जनसंपर्काचे उद्दिष्ट ठेवून ‘ग्रीनवॉशिंग’ करतात किंवा ‘ईएसजी’चा अवलंब करीत असल्याचा वरवर देखावा करतात.

आणखी एक अपयश म्हणजे, ‘ईएसजी विरोधाभास.’ म्हणजे, ज्या कंपन्या ईएसजी मापनासंबंधात चांगली कामगिरी बजावतात, त्या कंपन्या समाजाच्या व्यापक शाश्वतता उद्दिष्टांशी जुळवून घेतीलच असे नव्हे. उदाहरणार्थ, कर्मचाऱ्यांमध्ये स्त्रिया व पुरुषांचा समान तत्त्वावर अंतर्भाव करून ईएसजीसंबंधात चांगली कामगिरी बजावणाऱ्या कंपन्या पर्यावरणविषयक ऱ्हासाला जबाबदार ठरू शकतात किंवा व्यावसायिक अनैतिक कामेही करू शकतात. हे ‘ईएसजी’साठी सर्वांगीण दृष्टिकोनाची गरज अधोरेखित करते. या दृष्टिकोनात वैयक्तिक मापनावर मर्यादित लक्ष्य केंद्रित करण्याऐवजी पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासकीय या तिन्ही स्तंभांचा आणि त्यांच्या आपसातील संबंधांचा विचार केला जातो.

दुसरी मर्यादा म्हणजे, ‘ईएसजी’चा अर्थपूर्ण कृतीशिवाय केवळ एक मार्केटिंगचे साधन म्हणून वापर केला जाण्याची शक्यता आहे. काही कंपन्या आपल्या व्यवसाय प्रक्रियेत ठोस बदल न करता केवळ जनसंपर्काचे उद्दिष्ट ठेवून ‘ग्रीनवॉशिंग’ करतात किंवा ‘ईएसजी’चा अवलंब करीत असल्याचा वरवर देखावा करतात. यामुळे ठोस व पारदर्शी ईएसजी नोंदी, पडताळणी आणि उत्तरदायित्व यंत्रणेची गरज अधोरेखित होते. त्यामुळे कंपन्यांनी शाश्वत पद्धती खरेचच अवलंबिली आहे, हे दिसून येते; परंतु नंतर ईएसजी तत्त्वाचे पालन करणाऱ्या कंपन्यांच्या उत्तरदायित्वाबद्दल आणि अंमलबजावणीबद्दल चिंता निर्माण होते. याचे कारण म्हणजे, ईएसजी तत्त्वांनुसार चालणाऱ्या कंपन्यांसंबंधातील कायदेविषयक तरतुदी फारशा कठोर नाहीत आणि नियामक निरीक्षणही कमकुवत आहे. त्यामुळे ईएसजी कार्यक्षमता आणि नोंद यांच्यामध्ये विसंगती व परिवर्तनशीलता येऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांना व भागधारकांना कंपनीच्या खऱ्या कामगिरीबद्दल विश्लेषण करणे कठीण होऊन बसते.

निष्कर्ष

शाश्वतता, सामाजिक जबाबदारी आणि भागधारकांच्या सहभागाला प्रोत्साहन देऊन ईएसजी उद्योगाचे प्रशासन आणि उद्योगाच्या व्यवसायाला आकार देत आहे. आघाडीवर असलेल्या कंपन्यांकडून शाश्वतता पद्धतींचा अवलंब आणि परिणामांच्या गुंतवणुकीचा उदय यांसह ईएसजी तत्त्वांचे एकत्रीकरण करण्यात यश आले आहे. मात्र विसंगत अहवाल, ग्रीनवॉशिंग आणि ईएसजी विरोधाभास यांसारखे अपयशही आले आहे. पुढे जाण्यासाठी प्रमाणित ईएसजी मापन विकसित करणे, उत्तरदायित्वासंबंधीची यंत्रणा वाढवणे आणि पर्यावरणीय, सामाजिक प्रशासन घटकांच्या परस्परसंबंधांचा विचार करणारा सर्वांगीण दृष्टिकोन स्वीकारणे महत्त्वाचे आहे. ईएसजी हा व्यवस्थापनातील एक बदल आहे. हा बदल आपल्याला व्यवसाय संस्कृतीचा एक भाग म्हणून स्वीकारायचा आहे. मात्र टीका जास्त होत आहे आणि अपयशही लवकर येत आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.