Published on Aug 08, 2023 Commentaries 0 Hours ago
जिनपिंग यांनी केलेल्या वक्तव्याची जगाला चिंता

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या महाअधिवेशनाचे उद्घाटन केले. या अधिवेशनात पुढील पाच वर्षांच्या धोरणाचा मार्ग आखला गेला आणि भविष्यातील राष्ट्र नेतृत्वाला अंतिम रूप दिले गेले. या महाधिवेशनात जिनपिंग यांनी केलेल्या सुमारे पावणेदोन तासांच्या भाषणात पक्षातील विश्वासू कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.

चिनी अर्थव्यवस्थेवर कोविड-१९ साथीने आलेल्या बंधनांमुळे अथवा धोरणातील बदलांमुळे- स्थावर मालमत्ता, उत्पादन आणि किरकोळ बाजारपेठ यांसारख्या महत्त्वाच्या विभागांची अवस्था बिकट झालेली असताना चिनी अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आलेला असताना, या दरम्यान यंदा चिनी कम्युनिस्ट पक्षाची नेतृत्व परिषद होत आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय नाणे निधी’च्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूक’मध्ये, यंदा चीनच्या ‘जीडीपी’ वाढीचा अंदाज ३.२ टक्के इतका व्यक्त करण्यात आला आहे; याउलट, भारत आणि ‘आसियान-५’ या राष्ट्र समूहांत अनुक्रमे ६.८ टक्के आणि ५.३ टक्के ‘जीडीपी’ वाढ अपेक्षित आहे. कोविड-१९ साथीमुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांविरोधात तुरळक निदर्शने होत आहेत. आणखी एक चिंतेची बाब म्हणजे चीनचे रशियाशी असलेल्या घनिष्ट संबंधांमुळे व युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्रमणाबाबत टीका करण्यास चीनने दिलेल्या नकाराने आणि तैवानवर आक्रमण करण्याच्या धोक्यामुळे चीनचे अमेरिकेशी असलेले संबंध बिघडले आहेत. शी जिनपिंग यांच्या भाषणात, २०१२ मध्ये त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून, बजावलेल्या ‘कामगिरीं’सोबतच अशा अनेक चिंता प्रतिध्वनित झाल्या. २०२१ मध्ये, चिनी सरकारने घोषित केले की, १० कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले गेले आहे, ज्याला शी जिनपिंग यांनी एक मोठा विजय म्हणून घोषित केले. हाँग काँगच्या मुद्द्यावर, शी जिनपिंग यांनी समाधान व्यक्त केले की, या हाँग काँगच्या कारभाराचे अध्यक्षस्थान ‘देशभक्त’ भूषवत आहेत आणि देशाची प्रतिष्ठा राखण्याची उत्कृष्ट कामगिरी तेथील राजनैतिक दले करत आहेत.

शी जिनपिंग यांच्या भाषणात, २०१२ मध्ये त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून बजावलेल्या ‘कामगिरीं’सोबतच अशा अनेक चिंता प्रतिध्वनित झाल्या. २०२१ मध्ये, चिनी सरकारने घोषित केले की, १० कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले गेले आहे, ज्याला शी जिनपिंग यांनी एक मोठा विजय म्हणून घोषित केले.

कोविड-१९च्या साथीला तोंड देताना चीनने शहरांत कडकडीत बंद पाळले आणि जनतेची मोठ्या प्रमाणावर चाचणी सुरू केली, ज्यामुळे जनतेत काही प्रमाणात मतभेद निर्माण झाले. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘एपिडेमिक रिस्पॉन्स अँड डिस्पोजल लीडिंग ग्रूप’ या समितीचे प्रमुख लियांग वॅनिअन यांनी अधिवेशनाच्या तोंडावर प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना हे मान्य केले की, कोविडच्या साथीपूर्वी अर्थव्यवस्था रूळावर परतण्याची अपेक्षा होती, परंतु संकटातून बाहेर पडण्याचे कोणतेही धोरण नव्हते, याची कबुली दिली.

चीनमध्ये कोविड साथीच्या सुरुवातीपासून सुमारे २० लाख कोविड प्रकरणे आढळली आहेत, जी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सुमारे ०.०७ टक्के इतकी आहेत. चीनच्या आरोग्य अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, पाश्चात्य राष्ट्रांशी तुलना केली असता, संसर्गाचा दर आणि एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या (अंदाजे ५,२००) कमी आहे, परंतु लियांग यांनी भीती व्यक्त केली की, ‘उपचाराचे उत्तम साधन’ नसताना, अचानकपणे हे धोरण बंद केल्याने आरोग्य सेवा प्रणालीवर भार येऊ शकतो आणि अधिक मृत्यू संभवतात. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत चीनच्या सुमारे ९० टक्के लोकसंख्येचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे आणि ६० वर्षांहून अधिक वयोगटातील सुमारे ८६.३ टक्के जनतेचे ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत लसीकरण पूर्ण झाले आहे.

जिलिन प्रांतातील अधिकार्‍यांनी अलीकडेच भाजीपाला आणि काही वैद्यकीय साहित्यासह कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आणि गरीब रहिवाशांना २०० युआन (३१.५ अमेरिकी डॉलर्स) वितरित करण्यास सुरुवात केली.

परंतु, संकटाला संधीत रूपांतरित करण्याचा ‘चिनी कम्युनिस्ट पार्टी’चा ध्यास पाहता, शी जिनपिंग यांनी चीनचे शून्य कोविड-१९ धोरण हे नागरिकांच्या जीवनाच्या संरक्षणाला प्राधान्य देणारे धोरण म्हणून सादर केले आहे. ‘चिनी कम्युनिस्ट पार्टी’चे मुखपत्र असलेल्या ‘पीपल्स डेली’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अलीकडच्या लेखाने शून्य कोविड-१९ धोरण सुरू ठेवण्याचे समर्थन केले आहे. या लेखात, कोविडमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असतानाही ‘विषाणूसह जगणे निवडले’, अशा काही राष्ट्रांच्या दृष्टिकोनाचा निषेध केला आहे, हा दृष्टिकोन चीनच्या दृष्टिकोनाशी विसंगत आहे. चीनच्या दृष्टिकोनाने ‘जीव वाचवले’, परंतु आर्थिक नुकसान केले.

मात्र, बारकाईने परीक्षण केल्यास, शी जिनपिंग यांच्या कर्तृत्वाभोवतीची चमक संपलेली दिसून येते. शून्य कोविड रणनीतीमुळे अचानक टाळेबंदी लागू करावी लागली, त्याचा गरिबांना मोठा फटका बसला आणि चीनच्या गरिबी निर्मूलन कार्यक्रमातून मिळणारे लाभ धोक्यात आले आहेत. ज्याला चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने ‘मानवी इतिहासात पूर्ण न केलेले’ असे पराक्रम म्हटले आहे.

शी जिनपिंग कोविड साथीच्या रोगाशी लढा देण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करत असल्याचे चित्रण सरकारी माध्यमांनी केल्याने, त्यांना चीनच्या कोविड-१९ नियंत्रण प्रयत्नांशी जवळून जोडले गेले आहे.

२०२२ मध्ये, १ कोटीहून अधिक विद्यार्थी पदवीधर होतील आणि नोकऱ्यांची शर्यत तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे दीर्घ काळात चीनच्या विकासावर परिणाम होऊ शकेल अशा बेरोजगारीचे प्रमाण उंचावण्याची शक्यता वाढते. पेकिंग विद्यापीठातील शिक्षणतज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, अजूनही साथ प्रतिबंधक उपायांनुसार कामकाज सुरू असल्याने चीनचा बेरोजगारीचा दर २०२० च्या स्तरापर्यंत पोहोचू शकतो. संशोधनानुसार, २०२० च्या मध्यात बेरोजगार चिनी लोकांची संख्या ९२ दशलक्ष असू शकते, जी कार्यरत लोकसंख्येच्या सुमारे १२ टक्के आहे. शी जिनपिंग कोविड साथीच्या रोगाशी लढा देण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करत असल्याचे चित्रण सरकारी माध्यमांनी केल्याने, त्यांना चीनच्या कोविड-१९ नियंत्रण प्रयत्नांशी जवळून जोडले गेले आहे. अशा प्रकारे, महाअधिवेशनानंतर जर कोविडविषयक नियम सैलावल्यास, चिनी जनतेच्या जीवनाला आणि आरोग्याला प्राधान्य देण्याकरता चीनने कठोर नियम लागू केल्याच्या त्यांच्या दाव्याचे खंडन होऊ शकते.

भविष्यात काय सूचित होते?

तैवानवर शी जिनपिंग यांनी केलेल्या घोषणेवर प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटाची डेसिबल पातळी, कदाचित, चीन-तैवान संबंध आणि चीन-अमेरिका संबंध यांची दिशा दर्शवणारी आहे.

शी जिनपिंग यांनी पक्ष आणि जनतेला आश्वासन दिले की, बेटावरील फुटीरतावाद आणि परकीय हस्तक्षेपाच्या शक्तींना तोंड देण्याचे आव्हान ते पेलत आहेत. ऑगस्टमध्ये अमेरिकी संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिल्यानंतर चिनी कम्युनिस्ट पार्टीने कठोर शक्तिप्रदर्शन केले आहे; चीन अमेरिकी आणि तैवानच्या नेतृत्वांमधील संपर्क वाढवण्याकडे, चीन त्यांच्या एकछत्री अंमलाच्या कल्पनेपासून दूर जाणे आणि त्याच्या सार्वभौमत्वाचे मोठे उल्लंघन होणे या दृष्टिकोनातून पाहतो. त्यानंतर, ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने लष्करी सराव केला, जो आंशिक नाकेबंदीसारखाच होता आणि तैवान सामुद्रधुनीतील सागरी सीमेच्या नियंत्रणाची अस्तित्वात असलेली पद्धती ओलांडून अधिक सातत्याने युद्धनौका आणि लढाऊ विमानांसह सराव केला. आपल्या कामाच्या अहवालात, शी जिनपिंग यांनी तैवानचे शांततापूर्ण मार्गाने एकीकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले, परंतु लष्करी कारवाईचा पर्यायही पक्षाकडे आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. या व्यतिरिक्त, शी जिनपिंग यांनी वचन दिले आहे की, चीनचे संपूर्ण पुनर्एकीकरण लवकरच यशस्वी होईल आणि चिनी सैन्याने प्रादेशिक युद्ध जिंकण्याची क्षमता असलेले एक श्रेष्ठ युद्धयंत्र बनण्याच्या प्रयत्नांना वेग दिला आहे. तैवानवरील वक्तृत्व आणि ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ला आपली शक्ती वाढवण्याच्या उपदेश लक्षात घेता, त्यांच्या कार्यकाळाच्या तिसऱ्या मुदतीत, शी जिनपिंग तैवानला आघाडीवर ठेवण्याची शक्यता आहे, ज्याची जागतिक समुदायाला चिंता करावी लागेल.

शी जिनपिंग यांनी वचन दिले आहे की, चीनचे संपूर्ण पुनर्एकीकरण लवकरच यशस्वी होईल आणि चिनी सैन्याने प्रादेशिक युद्ध जिंकण्याची क्षमता असलेले एक श्रेष्ठ युद्धयंत्र बनण्याच्या प्रयत्नांना वेग दिला आहे.

जिनपिंग यांच्या भाषणात तंत्रज्ञान-राष्ट्रवादही डोकावला आहे. अधिवेशनाच्या तोंडावर, बायडेन प्रशासनाने चीनच्या विकासात भूमिका बजावलेल्या- भांडवल आणि तंत्रज्ञान या दोन प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये उपयोजन असलेले उत्तम प्रतीचे सेमीकंडक्टर्स चीनला न मिळण्याची तजवीज केली आहे आणि काळ्या यादीत आणखी काही चिनी कंपन्या समाविष्ट केल्या आहेत, ज्यात अमेरिकी नागरिकांना गुंतवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. आपल्या भाषणात शी जिनपिंग यांनी अंतराळ संशोधन, आण्विक तंत्रज्ञान, वैद्यक प्रगती आणि महासागरांचा शोध या क्षेत्रांतील चीनच्या वैज्ञानिक विकासाचा वारंवार उल्लेख केला. चीनने २०२१ मध्ये संशोधन आणि विकासासाठी विक्रमी २.७९ ट्रिलियन युआन (US$388 अब्ज) खर्च केले, ही रक्कम २०२० च्या तुलनेत १४ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. चीनला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक नाविन्यपूर्ण आणि स्वयंपूर्ण बनवण्यावर त्यांनी दिलेला जोर हा बायडेन प्रशासनाच्या कृतींना दिलेला प्रतिसाद आहे.

निष्कर्षापर्यंत येताना असे म्हणता येईल की, शी जिनपिंग यांनी भविष्याचे चित्र असे रंगवले आहे की, ते संधी आणि धोका यांनी परिपूर्ण आहे, कारण ‘बाह्य शक्ती’ चीनला ‘ब्लॅकमेल करण्याचा, ताब्यात ठेवण्याचा आणि नाकेबंदी’ करण्याचा प्रयत्न करू शकतात, हे त्यांनी दिलेल्या चेतावणीवरून दिसून येते. यांतील अंतर्निहित संदेश स्पष्ट आहे, तो असा की, त्यांच्या कारभाराखालीच चीन समस्यांवर ताबा मिळवू शकला आहे आणि त्यांचे मजबूत नेतृत्वच बदल घडवू शकले आहे. मात्र, शी जिनपिंग यांनी दुर्लक्षित केलेला एक पैलू म्हणजे उत्तराधिकारीचे नाव.

चीनसारख्या मोठ्या देशाला उत्तराधिकाराच्या परिभाषित ओळीची आवश्यकता आहे आणि कोणतेही रिकामपण राजकीय तणावाच्या शक्यतांचा धोका निर्माण करू शकते.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.