Author : Aarshi Tirkey

Published on Mar 01, 2021 Commentaries 0 Hours ago

जागतिक व्यापार संघटनेच्या २५ वर्षांच्या इतिहासातील पहिली महिला व पहिली आफ्रिकन महासंचालक बनण्याचा बहुमान गोझी ओंकोजो–इव्हिला यांनी पटकाविला.

जागतिक व्यापाराचे नेतृत्त्व प्रथमच स्त्रीशक्तीकडे!

जागतिक व्यापार संघटनेच्या महासंचालक निवडणुकीतून, दक्षिण कोरियाची उमेदवार यू म्यांग हे ६ फेब्रुवारीला बाहेर पडल्यानंतर नायजेरियाच्या गोझी ओंकोजो–इव्हिला यांच्यासाठी जागतिक व्यापार संघटनेच्या महासंचालक पदापर्यंतचा मार्ग सुकर झाला. संघटनेच्या २५ वर्षांच्या इतिहासातील पहिली महिला व पहिली आफ्रिकन महासंचालक बनण्याचा बहुमान त्यांनी पटकाविला. वास्तविक पाहता जागतिक संघटनेच्या स्थापनेपासून म्हणजेच १९४५ पासून एकही महिलने या संघटनेतील हे सर्वोच्च पदावर अजून पर्यंत भूषविलेले नाही.

डॉ. ओकोंजो इव्हिला यांनी आधीच नायजेरिया या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ( सन २००३ ते २००६ आणि २०११- २०१५) आणि २००६ मध्ये विदेश मंत्रिपदाचा अतिरिक्त भार संभाळून इतिहास घडविला आहे. त्या एक अनुभवी अर्थशास्त्रज्ञ व आंतरराष्ट्रीय विकासातील तज्ञ आहेत. त्यांनी हावर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रातील पदवी आणि  स्थानिक अर्थशास्त्र व विकास या प्रबंधासाठी मॅस्च्युसेट तांत्रिक संस्थेतून प्राप्त केलेली आहे. जागतिक बँकेतील कामाचा त्यांना २५ वर्षांचा अनुभव आहे.

२००७मध्ये बँकेतील दुसऱ्या क्रमांकाचे असलेले व्यवस्थापकीय संचालक पदाचा भार सांभाळून आफ्रिका, दक्षिण आशिया, युरोप व मध्य आशियातील ८१ अब्ज अमेरिकन डॉलर च्या कार्यकारी खात्याचे आव्हान लीलया पेलले. डॉ. ओंकोजो इव्हिला या आपल्या कारकिर्दीत गरीब देशांना मदतीचा हात देण्यात अग्रभागी होत्या. अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या देशांना मदत करणा-या जागतिक बँकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेला २०१० मध्ये ५० अब्ज अमेरिकन डॉलर च्या देणग्या मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ऑगस्ट २०२० मध्ये साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या की, “जर तुम्ही नाकारात नसेल तर ज्या गोष्टी मी तुमच्या समोर मांडल्या त्या सुधारित होत्या आणि या सर्व धाडसी सुधारणा निर्भयपणे केल्या आहेत. “

जागतिक व्यापार संघटनेचे माजी महासंचालक श्री रोबेर्टो अझेवेडो यांनी आपला राजीनामा अधिकृतपणे ३१ ऑगस्ट २०१९ म्हणजे आपल्या कार्यकाल पूर्तीच्या एक वर्ष आधीच दिल्याने नवीन महासंचालकांची नेमणूक करणे अत्यंत आवश्यक झाले होते. आपला उत्तराधिकारी शोधण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यांना पुरेसा वेळ मिळावा असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते परंतु त्यांच्या राजीनाम्यामुळे संघटना कठीण काळात नेतृत्वहीन झाली होती.

अमेरिका आणि चीन यांच्यादरम्यान व्यापार-तंत्रज्ञानावरून चालू असल्या झगडयामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम झालेला आहे आणि उदारीकरण मागे पडले आहे. अपील मंडळावरील नेमणकीबाबत अमेरिकेच्या अनिच्छेमुळे सुद्धा वादग्रस्त व्यापार विवाद मिळविण्याच्या जागतिक व्यापार संघटनेच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. 

अन्नसुरक्षेसाठी सार्वजनिक साठवणूक कार्यक्रम सारख्या इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर डोहा डेव्हलपमेंट अजेंडयाची वाटाघाटी रखडल्यामुळे ठोस निर्णय होऊ शकला नाही. शिवाय विकसनशील देशांचा विरोध असतानाही विकसित देश गुंतवणूक, स्पर्धा धोरण, सरकारी खरेदी आणि व्यापार सुलभतेचा समावेश असलेल्या सिंगापूरच्या मुद्द्याबाबत वाटाघाटी करण्यास आग्रही होते. त्यातच ट्रम्प प्रशासनाने जागतिक व्यापार संघटनेच्या विकसनशील देशांच्या दर्जा ठरविण्याच्या स्वयंघोषित यंत्रणेला मोडीत काढणारा २०१९ चा प्रस्ताव औपचारिकपणे सादर केल्याने विकसनशील देश व विकसित देश असे दोन गट पडले. या प्रस्तावाचा परिणाम भविष्यात भारतालाही भोगावे लागणार आहे.

तथापि बहुस्तरीय व्यापार प्रणाली समोर सर्वात मोठे आव्हान आहे ते कोविड – १९ या संकटाचे ज्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या मंदीपेक्षा अधिक तीव्रतेच्या मंदीचा सामना जगाला करावा लागत आहे.  साथीच्या रोगांमुळे राष्ट्रीय लॉकडाऊन, निर्यात बंदी आणि व्यापारावरील बंधनामुळे वैद्यकीय वस्तू, उपकरणे आणि लसी सारख्या गोष्टींचाच व्यापार सुरू ठेवणे गरजेचे झाले आहे. आता तर लस आल्यामुळे विकसित देशांची स्वतःसाठी लसीचा साठा सुरक्षित करण्यासाठी ऍडव्हान्स खरेदी कराराचा वापर करण्यास केलेली सुरुवात कळीचा मुद्दा ठरला आहे. खरेदी व वितरण या मधील असमानता ओळखून दक्षिण आफ्रिका व भारत या देशांनी जागतिक व्यापार संघटनेसमोर कोविड – १९ संबंधित बौद्धिक संपत्ती हक्क निलंबित करून इतर देशांना वेळेवर आणि परवडणाऱ्या किमतीत लस निर्मिती करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

अॅझेवॅडो यांच्या  राजीनाम्यानंतर जागतिक व्यापार संघटनेच्या सर्वोच्च पदावर एक महिला व एक आफ्रिकन प्रथमच विराजमान होत आहे.  याआधी युरोप, ओशिनिया, आशियाआणि दक्षिण अमेरिका यांनी हे पद भुषविले आहे. तथापि विकसनशील देशांपैकी ३५% सदस्य असणाऱ्या आफ्रिकेने जागतिक व्यापार संघटनेत  २७% प्रतिनिधीत्व असताना देखील संघटनेचे नेतृत्व कधीही केलेले नव्हते. ज्यावेळी जगाचे रंग वंश आणि जात या मुद्द्यावरून धृवीकरण झालेले असताना डॉक्टर ओंकोजो इव्हिला यांची जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुख पदी झालेली नियुक्ती ही उल्लेखनीय कामगिरी म्हणावी लागेल.

सोमाली राष्ट्रपतीपदाच्या पहिला महिला उमेदवार पादुमो दाईब यांनी डॉ. ओंकोजो इव्हिला यांच्या नियुक्तीबद्दल आफ्रिकन महिलांनी अडथळे आणि अडचणीच्या डोंगराचा सामना करत कौशल्य व नेतृत्व गुणांचे दर्शन घडविल्याचे म्हटले आहे. डॉ. ओंकोजो इव्हिला यांनी याआधी या संघटनेत कधीही काम केले नसताना देखील आपल्या प्रभावशाली  कौशल्यामुळे एक नवीन दृष्टीकोन या संघटनेत घेऊन आल्या आहेत तसेच ग्लोबल अलायन्स फोर व्हॅक्सीन अँड इम्युनाजेशन (जी ए व्ही आय) च्या त्या अध्यक्ष असल्यामुळे आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड -१९ च्या विशेष दूत असल्यामुळे, सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विकसनशील आणि अविकसित देशांना कोविड -१९ च्या लसीचे उत्पादन व वितरण हे जागतिक अजेंड्यावर येईल अशी आशा आहे.

अमेरिकेचे दुहेरी नागरिकत्व असलेल्या डॉ. ओंकोजो यांनी आपल्या आयुष्यातला बराच काळ अमेरिकेत शिकण्यात व काम करण्यात व्यतीत केलेला आहे तसेच आफ्रिका, युरोपियन समुदाय आणि कॅरीबेन देशांचा पाठिंबा असून देखील अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने त्यांना पाठिंबा देऊ केला नाही. ऑक्टोबर २०२० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत प्रवक्ते किथ रॉकवेल म्हणाले होते की संयुक्त राष्ट्राच्या शिष्टमंडळाने आपला पाठिंबा हा डाॅ. गोजी यांना न देता दक्षिण कोरियाच्या मंत्री (यू म्यांग – हे) यांना देऊ केला होता. गेल्याच आठवड्यात  महिनाभराच्या मुत्सद्देगिरीच्या दबावाला बळी पडत यू म्यांग – हे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.

वास्तविक पाहता डॉ. ओंकोजो  इव्हिला या नायजेरिया या विकसनशील देशातील असल्यामुळे त्यांना कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांवर परिणाम करणारे सामाजिक,  आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विषयांबद्दल सखोल ज्ञान आहे. आय डि ए मध्ये एल डी सी (अल्प उत्पन्न देश) च्या उन्नतीसाठी काम केल्याने आणि विकसनशील देशांसमोर आवासून उभ्या असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपायांची जाणीव असल्याने डॉ. ओंकोजो इव्हिला यांची नियुक्ती या संघटनेत संतुलन साधेल. विकसित देशांची बाजू घेत जागतिक आरोग्य संघटना तटस्थ नसल्याचा आणि पक्षपाती भूमिका घेत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर डॉ. ओंकोजो इव्हिला यांची निवड योग्य असल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे.

नवनिर्वाचित महासंचालक विकसित देशांमुळे विवादास्पद ठरलेला विशेष आणि विविध उपचार तरतुदी सारखा मुद्दा कसा हाताळतात याकडे विकसनशील देशांचे लक्ष लागले आहे. काहींच्या मते महासंचालकांची भूमिका पूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाची असल्याने त्यांच्याकडे मर्यादित अधिकार आहेत व त्याची प्रचितीही २०१३ मध्ये बाली पॅकेजवर सर्व देशांमध्ये एक मत होण्यासाठी प्रयत्न करणारे श्री. अझेवेडो यांच्या प्रयत्नांना आलेल्या फलश्रुतीने स्पष्ट झाले आहे.

गेल्या ऑगस्टपासून नेतृत्वहीन असलेल्या व आतापर्यंत इतिहासातील सर्वात गंभीर परिस्थितीचा सामना करणाऱ्या या संघटनेची सूत्रे डॉ. ओंकोजो- इव्हिला आपल्या हाती घेतील. जागतिक व्यापार संघटना वर्षांनुवर्षे चालणारा बहुस्तरीय व्यापार करार टिकवू शकली नाही. तसेच ओवरफिशिंग अनुदानावरील तोडगा काढण्यासाठी २०२० पर्यंतची मुदत आधीच ओलांडली आहे. विशेष म्हणजे डब्ल्यूटीओ जागतिक व्यापार चर्चेच्या कोणत्याही व्यापार वाटाघाटीच्या फेर्‍या अंतिम टप्प्यापर्यंत आणू शकलेला नाही. परिणामी त्याच्या सदस्य देशांना त्याचा कोणताही लाभ झालेला नाही. २००१ पासून सुरू झालेल्या डोहाच्या फेऱ्यात अजून सुद्धा गरीब देशांना न्याय मिळवून देऊ शकलेल्या नाहीत. या देशांच्या यादीत बहुतेक आफ्रिकी देश आहेत.

२०१७ मधील व्यापारी सुलभीकरण करार वगळता १९९५ पासून आतापर्यंत एकही ठोस करार पूर्ण करण्यात संघटनेला यश मिळालेले नाही तसेच कोरोना विषाणू च्या महासाथीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पूर्णता बट्ट्याबोळ झालेला असून पुढील कित्येक वर्षे मंदीचा सामना करावा लागणार आहे. हावर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक केनिथ रॉगॉफ यांनी त्यांच्या लेखात नमूद केले आहे की, जागतिक उत्पन्नातील अल्प काळातील घसरणसुद्धा गेल्या १५०वर्षातील मंदी पेक्षा घातक स्वरूपाची असू शकते.

जागतिक व्यापार संघटनेसमोर कोरोना महासाथीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात झालेली पडझड रोखण्याचे मुख्य आव्हान आहे. त्यासाठी डॉ. ओंकोजो इव्हिला, ज्यांना व्यापार आणि वचन याबद्दल तळमळ आहे असे मार्गदर्शक नेतृत्व आवश्यक आहे. सध्या जग हे मंदीच्या चक्रव्यूहामध्ये अडकले आहे,ज्यामध्ये कोरोनाचा मोठा प्रभाव आहे. जुलै २०२०मध्ये आफ्रिका रिपोर्टर ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. ओंकोजो इव्हिला यांनी बहुस्तरीय व्यापाराची गरज अधोरेखित केली होती. सध्याच्या संकटावर तोडगा ठरेल व सगळ्यांना या मंदीच्या संकटातून बाहेर काढेल आणि या सर्वांमध्ये जागतिक व्यापार संघटनेची महत्त्वाची भूमिका असणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

जागतिक व्यापार संघटनेस पारदर्शक कारभार आणि भविष्यातील योग्य गोष्टींचे सूतोवाच करून व्यापारातील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने सर्वांच्या विकासासाठी एकमेकांस सहाय्य करण्यास उद्युक्त करणारे नेतृत्व लाभल्यास या संघटनेचे महत्त्व जगाला पुन्हा पटू लागेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.