फ्रान्समध्ये जिलेट जॉनस (gilets jaunes) म्हणजेच यलो व्हेस्ट्स (yellow vests) चळवळीने जोर धरला आहे. अंगात पिवळा अंगरखा घालून सुरु असेलेल्या या आंदोलनासाठी होत असलेल्या रॅलींमध्ये प्रत्येक आठवड्याला सुमारे ८०,००० लोक सहभागी होत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी “ग्रँड डिबेट” (“grand debate”) या नावाने एक मोठा चर्चांचा संवादाचा कार्यक्रमच हाती घेतला आहे. येत्या मे महिन्यात होत असलेल्या युरोपियन संसदेच्या निवडणुकीपूर्वी, या सर्व आंदोलनकर्त्यांच्या शंकांचे निरसन करावे, हा चर्चांचा कार्यक्रम हाती घेण्यामागचा हेतू आहे.
या चळवळीची सुरुवात १७ नोव्हेंबर २०१८ ला झाली. आता आगामी निवडणुकीत आपले उमेदार उभे करत चळवळीचा दुसरा टप्पा सुरु करण्याची तयारी आंदोलनकर्त्यांनी सुरु केली आहे. मात्र आंदोलनकर्त्यांचे हे प्रयत्न सध्या तरी स्थगित झाल्याचे चित्र दिसते. संख्याबळ आणि या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या वेगवेगळ्या राजकीय भूमिका हेच त्यामागचे कारण आहे. हे सर्व यलो व्हेस्ट्स आंदोलनकर्ते त्यांच्या राजकीय अवकाशाचा विस्तार नक्कीच करू शकतील शकतात. मात्र प्रस्थापित राजकीय व्यवस्थेलाच नाकारणे हेच या सगळ्यांचे एकसामायिक ध्येय आहे.
नवी दिल्ली इथे मागच्याच महिन्यात झालेल्या रायसिना डायलॉग या परिषदेत मी सहभागी झाले होते. त्यावेळी, या चळवळीचे नेमके स्वरुप आणि उद्दिष्ट याविषयी अनेकांनी माझ्याकडे विचारणा केली होती. पारंपरिक धोरणर्त्यांचा प्रभावामुळे अस्पृश्य – ठरवले गेलेले, समाज आणि धोरणकर्त्यांनी नाकारलेले, भेदभाव सहन करत असलेले, जगभरातले समुदाय, त्यांच्या समस्या मांडण्यासाठी सातत्याने करत असलेले उठाव आणि आंदोलने हाच या परिषदेत सर्वात चर्चिला गेलेला विषय होता. यलो व्हेस्ट्स हा अशाच प्रकारे संकटग्रस्त असलेला समुदाय आहे का? अशीही विचारणा माझ्याकडे अनेकदा करण्यात आली होती.
हे सर्व यलो व्हेस्ट्स आंदोलनकर्ते त्यांच्या राजकीय अवकाशाचा विस्तार नक्कीच करू शकतील. मात्र प्रस्थापित राजकीय व्यवस्थेलाच नाकारणे हेच या सगळ्यांचे एकसामायिक ध्येय आहे.
तरीदेखील ते अशाच प्रकारच्या एका सामाजिक वर्गातले आहेत, असेही म्हणावे लागेल. आपल्याला विषमतेची वागणूक मिळते असंच त्यांचं म्हणणे आहे. आपली सामाजिक हेटाळणी केली जाते, सामाजिक पातळीवर हीन दर्जाने पाहिले जाते असेही ते म्हणतात. अशा स्थितीत सहभागी लोकशाही व्यवस्थेची (participatory democracy) पुनर्रचना व्हावी आणि सामाजिक न्यायावर भर दिला जावा ही आपली मागणी ते करत आहेत.
ही चळवळ म्हणजे फ्रान्समधले राजकीय वर्ग ज्या नव्या आव्हानाला तोंड देत आहे, त्याच आव्हानाचा एक चेहरा आहे. व्यापक अर्थाने पाहिले तर असेही म्हणता येईल की, ही चळवळ म्हणजे राजकारणाच्या आजवरच्या पारंपरिक चौकटीनेच निर्माण केलेले हे आव्हान आहे. अशी परिस्थिती जगात इतरत्रही आहे.
तरीही फ्रान्समधल्या घटना अधिक चर्चेत आहेत. फ्रान्समधल्या राजकीय पक्ष, विविध संघटना, राजकीय संघटना आणि पारंपरिक प्रसारमाध्यम व्यवस्था अशा मध्यस्थ संस्थांची व्यवस्थाच कोलमडणे हे या मोठ्या प्रमाणावरच्या चर्चांमागचे कारण आहे. या व्यवस्थेला फ्रान्समध्ये लेस कॉर्प्स इंटरमेडिअरीज (intermediary bodies) असे म्हटले जाते.
सद्यस्थितीत या चळवळीचा प्रभाव लक्षणीयरित्या वाढला आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे वर उल्लेख केलेल्या, मोडकळीस आलेल्या मध्यस्थ संस्थांच्या व्यवस्थेला ही चळवळ कशी हाताळायला हवी, हेच नीटसे उमगलेले दिसत नाही. अगदी अलिकडेपर्यंत या संस्थांनी चळवळीचे नेतृत्व केले. त्यांनी चळवळींच्या प्रस्थापित नियमांचा वापर करत अनेक सामाजिक आंदोलनेही उभारली. सॅम्युएल हयात यांनी या आंदोलनाचे केलेले वर्णन रंजक आहे.
सॅम्युएल यांच्यानुसार “यलो व्हेस्ट्सच्या आंदोलनांमध्ये कोणतीही मिरवणूक नसते, कायदेशीररित्या या आंदोलनाला कोणीही व्यक्ती जबाबदर नसते, या आंदोलनात वाटाघाटींच्या मार्गाचाच अंतर्भाव नाही, आयोजकांकडून कोणतीही सुरक्षा व्यवस्था पुरवलेली नसते, आंदोलनासाठीची कोणतीही पत्रके, फलक, स्टिकर्स तयार केलेली नसतात, मात्र आंदोलनकर्त्यांनी घातलेल्या पिवळ्या अंगरख्यांच्या मागे (यलो व्हेस्ट्स / yellow vest ) असंख्य घोषणा लिहिलेल्या असतात.”
या चळवळीचे कामकाज भौगोलिक क्षेत्रांनुसार विभागलेले आहे. अशा भौगोलिक क्षेत्रांमधल्या लोकसंख्येच्या घनतेतील मोठी तफावत हे देखील ही चळवळ लोकप्रिय होण्यामागचे एक मोठे कारण आहे. यलो व्हेस्ट्स जमातीतील बहुसंख्य लोक हे दुर्गम ग्रामीण भाग आणि उपनगरांमधले आहेत. महत्वाचे म्हणजे या आंदोलनकर्त्यांची ही ठिकाणं फ्रान्सची राजधानी आणि मध्यवर्ती शहर असलेल्या पॅरिसशी अजूनही नीटशी जोडली गेलेली नाहीत.
ही चळवळ उभी राहण्यामागे जी काही कारणे आहेत, त्यातले एक महत्वाचे कारण म्हणजे राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेचे झालेले केंद्रीकरण. मॅक्रॉन यांनी सत्तेची सुत्रे स्विकारल्यानंतर या स्थितीत अधिकच भर पडली. राष्ट्राध्यक्षांकडेच सर्वाधिकार असावेत ही त्यांची महत्वाकांक्षा. या महत्वकांक्षेमुळेच, राजकीय व्यवस्था व्यक्तिकेंद्री करण्यासाठी त्यांचे सुरु असलेले प्रयत्न, हे त्यांच्या पूर्वसूरींच्या प्रयत्नांपेक्षाही अगदी वरच्या पातळीचे आहेत असे म्हणावे लागेल. मॅक्रॉन यांचे हेच धोरण आता एखाद्या दुधारी तलवारीसारखे झाल्याचे दिसते आहे. ते कसे, हे समजून घेण्यासाठी राजकीय वर्गासमोर असलेल्या आव्हानांच्या संदर्भाने हे धोरण तपासायला हवे. तसे केले तर लक्षात येते की, संघटनांचे वेगाने झालेले अधःपतन आणि याआधी नमूद केल्याप्रमाणे झालेले क्षेत्रीय विभाजन यामुळे, थेट राष्ट्राध्यक्षांनाच आव्हान देण्याचा पर्याय विरोधकांसमोर उरला आहे. नुकतेच ९ फेब्रुवारीला झालेल्या निदर्शनाच्यावेळी जी हिंसा झाली त्यामुळे ही चळवळ आणि त्यासोबतच या चळवळीला कारणीभूत ठरलेली मॅक्रॉन यांची भूमिका अधिक स्पष्टपणे जगासमोर आली.
यलो व्हेस्ट्स जमातीतील बहुसंख्य लोक हे दुर्गम ग्रामीण भाग आणि उपनगरांमधले आहेत. महत्वाचे म्हणजे या आंदोलनकर्त्यांची ही ठिकाणं फ्रान्सची राजधानी आणि मध्यवर्ती शहर असलेल्या पॅरिसशी अजूनही नीटशी जोडली गेलेली नाहीत.
या साऱ्याचा परिणाम असेल, पण मॅक्रॉन यांनी या सगळ्या घडामोडी वैयक्तिक पातळीवर घेतल्या आहेत. त्याच भूमिकेतून ते चळवळीला त्यांच्या परीने प्रतिक्रियावादी धोरण राबवत आहेत. मॅक्रॉन यांनीच ज्या मोठ्या स्वरुपातल्या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. त्याच चर्चासत्राचाच भाग म्हणून ते ठिकठिकाणचे महापौर – स्थानिक निर्वाचित सदस्य – अधिकारी यांच्या भेटी घेऊन त्यांच्यासोबत थेट बोलता यावं म्हणून ते देशभराचा दौरा करत आहेत.
खरं तर मॅक्रॉन यांनी सध्याच्या समस्येमुळे त्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे देणे, त्यावर तोडगा काढणे अपेक्षीत आहे. त्याअर्थाने मॅक्रॉन यांचा यापद्धतीचा दौरादेखील एखाद्या दुधारी तलवारीसारखाच आहे. कारण एका अर्थाने मॅक्रॉन हे स्वकेंद्रीपद्धतीनेच कारभार चालवत आहेत, आणि त्यामुळेच यलो व्हेस्ट्स त्यांना विरोध करत आहेत, या दाव्याला स्वतः मॅक्रॉन यांच्यामुळेच अधिक बळकटीही मिळू शकते. मात्र त्याचवेळी जर मॅक्रॉन यांनी आपल्या आजवरच्या राजकीय अनुभवाचा वापर केला, आणि हळू हळू या चळवळीचा जोर कमी करण्यात त्यांना यश आलं, तर मात्र मॅक्रॉन यांनी वेळ काढून मतदारांचे म्हणणे ऐकले, त्यांची मते जाणून घेतली हे योग्यच होते असे म्हटले जाईल आणि त्यांची प्रतिमाही अधिक बळकट होऊ शकेल.
मॅक्रॉन यांची आंतरराष्ट्रीय जगतातली प्रतिमा मोठी आहे, आंतराष्ट्रीय घडामोडींच्या पटलावर त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवणते. हीच बाब लक्षात आपल्या चळवळीलाचा विस्तार संपूर्ण युरोपरभर करण्याचे प्रयत्न यलो व्हेस्ट्स करत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. हे त्यांचे धोरणात्मक उद्दिष्टच असल्याचे वाटते, आणि त्याप्रमाणेच ते फ्रान्सच्या सीमेपलिकडे आपल्या चळवळीचा प्रसार करत आहेत. मात्र सद्यस्थितीत तरी त्यांनी त्यांच्या मागण्यांना युरोपीय जगताच्या मागण्यांसारखे स्वरुप दिलेले नाही. असे असले तरी यलो व्हेस्ट्स चळवळीमुळे युरोपाच्या राजकीय विश्वाला भूकंपाचे झटके बसले / बसत आहेत असे नक्कीच म्हणता येईल.
इटलीचे उप-पंतप्रधान आणि पंचतरांकीत चळवळीचे (फाईव्ह स्टार मुव्हमेंटचे) नेते लुईगी दि मेयो यांनी नुकतीच यलो व्हेस्ट चळवळीच्या प्रतिनीधींची भेट घेतली होती. या घटनेनंतर फ्रान्सने या वर्षी ७ फेब्रुवारीला इटलीमधल्या आपल्या राजदूताला माघारी बोलावले होते. या नाट्यमय घडामोडींमुळे इटलीचे अंतर्गत व्यवहार मंत्री माटिओ साल्व्हिनी यांनी फ्रान्सचे अंतर्गत व्यवहार मंत्री ख्रिस्तोफर कास्तानेर यांना त्याच्या पुढच्याच आठवड्यात इटलीच्या भेटीवर यावे असे निमंत्रण पाठवले होते. फ्रान्स आणि इटलीमधल्या आजवरच्या राजनैतिक संबंधांच्यादृष्टीने ही घटना दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात लाजीरवाणी घटना होती.
या नंतर डी मेयो यांनी ले माँडे या वृत्तपत्राला लिहीलेल्या पत्रातून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता. फ्रान्सने राजनैतिक आणि नागरी हक्कांसाठीच्या लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल इटलीला प्रचंड आदर आहे. मात्र युरोपाच्या राजकीय विश्वाचं भविष्य कोणत्याही डाव्या किंव्या उजव्या विचारांच्या हाती राहिलेले नाही. यामुळेच आपण यलो व्हेस्ट चळवळीच्या प्रतिनिधींची भेट घेतली अशी खुलासेवजा भूमिका मेयो यांनी या पत्रात मांडली होती.
एका अर्थाने यलो व्हेस्ट चळवळकर्त्यांनी आपल्या चळवळीचा संपूर्ण युरोपाची चळवळ म्हणून अजूनतरी विस्तारलेली नाही. मात्र सद्यस्थितीत या चळवळीचा युरोपीय संसदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या वाद – विवाद आणि चर्चांवर अपेक्षेपेक्षाही मोठा प्रभाव दिसू शकतो, हे मात्र खरेच.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.