Author : Seema Sirohi

Published on Apr 12, 2021 Commentaries 0 Hours ago

अमेरिका -चीन संबंध पूर्ववत होण्याची शक्यता, जी आशा ट्रम्प प्रशासनाच्या आक्रमक भूमिकेनंतर चीनला होती, ती दोन दिवसांच्या अलास्का बैठकीनंतर मावळली आहे.

थंडगार अलास्कात अमेरिका-चीनमध्ये गरमागरमी

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, पहिल्यांदाच अमेरिकी आणि चिनी मुत्सद्यांमध्ये अलास्का येथे बैठक झाली. या बैठकीत दोन्ही बाजूंनी जोरदार खडाजंगी झाली. बायडन हे अध्यक्ष झाल्यानंतर वादावर तोडगा काढण्यासाठी झालेल्या या पहिल्याच बैठकीत मात्र, उभय देशांच्या मुत्सद्यांमध्ये वाकयुद्ध झाले. त्यामुळे अशांततेच आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे.

अलास्कामध्ये झालेल्या या बैठकीत सचिव अॅन्टोनी ब्लिंकेन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्यासोबत चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे परराष्ट्र व्यवहार प्रमुख यांग जियची आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात जी चर्चा झाली, त्यात मुत्सद्दीपणाचा अभाव, विस्कळीतपणा होता. विशेषतः मुद्द्याला सोडून ही चर्चा झाली.

चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये अधिक आत्मविश्वास असण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका आणि त्यांच्या भागीदार-सहकाऱ्यांमध्ये बैठक झाल्यानंतर ही बैठक झाली. त्यात ‘क्वाड’ परिषदेचाही समावेश आहे. यामध्ये एकसारखाच संदेश देण्यात आला. तो म्हणजे, चीनवर दबाव आणणे किंवा त्याला रोखणे हेच प्रमुख देशांचे मुख्य लक्ष्य आहे.

यांग यांनी १७ मिनिटांचा तक्रारीचा पाढा वाचणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यात अमेरिकी समुदायाच्या दुर्बलतेवर ब्लिंकेन यांनी भाष्य केले होते. देशातील प्रेक्षक आणि इतर देशांनी तो पाहावा, त्यांच्यापर्यंत तो पोहोचावा हा त्यामागचा उद्देश होता. त्याचा अर्थ असा की, चीन आता स्वत:ला अमेरिकेच्या बरोबरीचा मानत असल्याचे संकेत होते. आलास्कामध्ये यांग यांनी कॅमेऱ्यासमोर जे शाब्दिक हल्ले केले. यावरून असे स्पष्ट होते की, या महाशक्ती होण्याच्या तीव्र स्पर्धेत चीनचे स्थान स्पष्ट करण्यासाठी ‘वुल्फ वॉरिअर डिप्लोमसी’ कायम ठेवण्यासह आगामी काही काळासाठी आंतरराष्ट्रीय विचारधारेला आकार देण्याचे काम सुरूच राहील.

चीन हा बायडन यांच्या “अमेरिका इज बॅक” धोरणाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील नवा चीन हा लढवय्या आणि सहनशील नाही. यांग यांच्या या आक्रमक पवित्र्यावरून स्पष्ट होते की, अमेरिकेचे ‘अच्छे दिन’ आता संपले आहेत, असे चीनला वाटू लागले आहे. किमान चीनकडून तसा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे.

चीनने जर कधीही न संपणाऱ्या चर्चेत अमेरिकींना गुंतवून ठेवण्यापूर्वी सूट देणे टाळले आणि आपल्या ‘वुल्फ वॉरिअर रणनिती’तील डावपेच मर्यादित केले तर, त्यांनी अमेरिकेची मान्यता असूनही मानवाधिकार, हाँगकाँग, तैवान आणि तिबेट या ‘रेड लाइन’ मुद्द्यांवर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे संकेत दिले आहेत. त्यापैकी काहींनी अलास्कातील बैठकीपूर्वी अमेरिकेचा हेतू जाहीर केला.

अमेरिका -चीन संबंध पूर्ववत होण्याची शक्यता, जी आशा ट्रम्प प्रशासनाच्या आक्रमक भूमिकेनंतर चीनला होती, ती दोन दिवसांच्या या बैठकीनंतर मावळली आहे. ‘आम्ही स्पष्ट विचार घेऊन आलो आहोत, आणि स्पष्ट विचारांनी बाहेर पडलो आहोत’ आणि यापुढे आम्ही भागीदार आणि सहकाऱ्यांसोबत सल्लामसलत सुरूच ठेवणार आहोत, असे ब्लिंकेन यांनी स्पष्टपणे सांगितले.

महासत्ता आणि महत्वाकांक्षा यांच्यातील संबंध हे वैरभावाचे असतील आणि साऱ्या जगाला ते आहे तसेच चालवून घ्यावे लागतील. मग कधी खुलेपणाने, तर कधी अगदी सावधपणे. मूळत: बायडन प्रशासनाने चीनबाबत ट्रम्प प्रशासनाची असलेली धोरणे कायम ठेवली आहेत, ज्यामुळे स्पर्धा आणखी तीव्र होईल, विशेषत: संरक्षण क्षेत्रामध्ये. अलास्कामधील बैठक पाहिली तर, अमेरिकेचे धोरण, त्यांच्या अपेक्षा आणि प्रशासनातील लवकर आयोजित केलेल्या बैठकीच्या वेळापत्रकाबाबतची गणिते आणि त्यापूर्वी त्याचा पुरेसा फायदा उठवणे आदींबाबत काही प्रश्न उपस्थित होतात. केवळ वादग्रस्त मुद्द्यांवर अमेरिकेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतून कोणताही ठोस लाभ झालेला यातून तरी दिसून आलेला नाही.

त्याउलट, चीनला आपला डाव साधण्याची, ब्लिंकेन आणि सुलिवन यांना अपमानित करण्याची आयतीच संधी मिळाली. एकच परिणाम, तो म्हणजे जो उद्देश होता, तो इमेलची देवाणघेवाण करून साध्य करता आला असता आणि हा जाहीर वाद टाळता असता. आपल्या भागीदार आणि सहकाऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा अथवा सल्लामसलत न करताच, कोणतीही योजना न करता, टीम बायडनला या बैठकीसाठी फूस लावली गेली का? नक्कीच, चीनकडून जे जाहीर भाष्य करण्यात आले, ते त्यांना अपेक्षितच नव्हते.

चीनच्या धोरणाचा आढावा पूर्ण झाल्यानंतर या मोसमात प्रशासनाची बैठक झाली असती तर, ते अधिक चांगल्या प्रकारे काम करता आले असते. विशेषत: चीनच्या आक्रमक हालचाली रोखण्याच्या उद्देशाने नव्या रणनीतीचा आढावा घेतला असता तर. चीनची आणखी काही महिने प्रतीक्षा केली असती आणि त्यांचा अंदाज घेतला असता तर, ही एक चांगली रणनीती ठरू शकली असती. ही ओबामा प्रशासनाची दुसरी आवृत्ती नाही, हे सांगण्याची सुद्धा आता बायडन प्रशासनाची विशेष जबाबदारी आहे.

ज्याने चीनला एकत्रीकरण आणि विस्ताराच्या त्यांच्या अजेंड्यापासून मागे ढकलले. चिनी पुन्हा तोच खेळ खेळत आहेत. अलास्कामध्ये ते स्पष्टपणे लेनिनवादाचे परीक्षण करत होते. ते मानतात की, ‘खोलवर चौकशी करा. जर तुम्ही भावविवशतेने सामोरे जाल तर, पुढे जा; जर तुम्ही आक्रमकपणे भिडाल तर, माघार घ्या.’ यांग आणि वांग यांचे भिडणे नरमाईचे होते की आक्रमक? तंत्रज्ञान किंवा भूप्रदेशीय असो, चिनी विस्ताराकडे ते कसे पाहतात, यावर ब्लिंकेन आणि सुलिवन यांच्या बोलण्यात स्पष्टता होती. पण त्याचवेळी त्यांचे चिनी विरोधक हे पाहू शकतात की, युरोपातील बडे देश हे आधीपासूनच वेगळाच सूर आळवत होते. असेच काहीसे बायडन यांनी कार्यालयाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी चीनने करायला हवे होते, असे त्यांना खात्रीशीरपणे वाटत होती.

जर्मनी आणि फ्रान्सने अमेरिकेत रचनात्मक परिवर्तन झाल्याचा दावा आपल्या स्पष्टीकरणात केला असला तरी, दोन्ही देश चीनमधील आपल्या नफ्यावर पाणी सोडण्यास तयार नसल्याचे दिसते; तसे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी आखलेल्या गणितानुसार, जर अमेरिकी नागरिक एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करू शकतात, तर ते त्यांना किंवा त्यांच्यासारख्या एखाद्याला पुन्हा मतदान करू शकतात. ते अशा शक्यता किंवा बचावात्मक कारणांचा विचार करतात. मात्र युरोपियन हे चीनशी संबंधित मुद्द्यांवर अमेरिकी काँग्रेसमधील द्विपक्षीय सहमतीकडे कानाडोळा करतात. बायडन प्रशासनाने प्रमुख युरोपीय भागीदारांवर नव्याने सुरुवात करण्यासह गेल्या चार वर्षांतील नुकसानीबाबत चर्चेच्या काही फेऱ्यांमध्ये विश्वास ठेवला होता का?

यांग आणि वांग हे कमकुवत बाजू चांगल्या रितीने जाणतात. त्यांच्यात काही प्रमाणात आलेला अहंकार आणि आत्मविश्वास हा त्यांच्यात विषयांचा परिपूर्ण अभ्यास आणि दबावच्या मुद्द्यांच्या जाणीवेतून आला होता. अलास्कामध्ये त्यांनी आपल्या अभ्यासाचा आणि ज्ञानाचा संपूर्ण वापर हा पुरेपूर फायदा उठवण्यासाठीच केला.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Seema Sirohi

Seema Sirohi

Seema Sirohi is a columnist based in Washington DC. She writes on US foreign policy in relation to South Asia. Seema has worked with several ...

Read More +