Author : Sauradeep Bag

Published on Sep 14, 2023 Commentaries 0 Hours ago

यूपीआयची (UPI) सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे परदेशातून भारतात पैसे पाठविण्याची प्रक्रियादेखील अधिक सोपी आणि सुलभ होणार आहे.

आखाती देशांमध्ये UPI सेवा : परदेशातून देशात पैसे पाठवण्याच्या प्रक्रियेत क्रांती

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेदरम्यान, २३ नोव्हेंबर २०२२ रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नह्यान यांच्यात चर्चा झाली. यावेळी या दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूकवृद्धी आणि सहकार्यासंबंधी कोणत्या नव्या शक्यता आहेत याविषयी चर्चाच केली. अर्थात यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय व्यापारासाठी भारतीय रुपया आणि संयुक्त अरब अमिरातीचे दिऱ्हम हे चलन वापरण्याविषयी, तसेच संयुक्त अरब अमिरातीत राहत असलेल्या भारतीय समुदायाला भारतात पैसे पाठविण्यासाठी (remittance – रेमिटन्स) भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसचा (यूपीआय – UPI) वापर करू देण्याविषयीदेखील चर्चा झाली. आणि याच मुद्याने सर्वाधिक लक्षही वेधून घेतले.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एन.सी.पी.आय. – NPCI) १० देशांमधील अनिवासी भारतीयांना (NRI) ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवण्याकरता युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सेवेचा लाभ उपलब्ध करून दिला आहे. या दहा देशांमध्ये  सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, ओमान, कतार, अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि ब्रिटन या देशांचा समावेश आहे. तसे पाहिले तर इतर देशांमधून आपल्या देशात पैसे पाठवण्याच्या बाबतीत (remittance – रेमिटन्स) अमेरिका आणि संयुक्त अरब अमिराती भारतासाठीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

यूपीआयची (UPI) आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने वाटचाल

सद्यस्थितीत ऑनलाईन पैसे पाठवण्याच्या बाबतीत यूपीआयची (UPI) देशांतर्गत स्विकारार्हता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केवळ एकाच संकेतचिन्हाचा (पिन – PIN)  वापर करून अनेक बँका तसेच वित्तीय व्यासपीठांशी संबंधीत ऑनलाईन पद्धतीच्या आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार एकसामाईक पद्धतीने करण्यासाठीची एक महत्वाची पायाभूत सुविधा म्हणूनही यूपीआयचा (UPI) विस्तार प्रचंड वाढला आहे. या सुविधेच्या बाबतीत भारताला मिळालेलं यश पाहूनच अनेक देशही यूपीआयचे (UPI) प्रारूप अवलंबण्यासाठी प्रवृत्त झाले. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एनपीसीआयची आंतरराष्ट्रीय शाखा असलेल्या एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडने (NIPL – एनआयपीएल) संयुक्त अरब अमिराती, नेपाळ आणि जपान यांसारख्या देशांमधील बँकांसोबत भागीदारीही केली आहे.

एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडने (NIPL – एनआयपीएल) संयुक्त अरब अमिरातीमधील अनिवासी भारतीय समुदाय आणि व्यवसाय तसेच इतर कारणांसाठी तिथे जाणाऱ्या २० लाख भारतीयांना मदत करता यावी म्हणून, मशरेक बँकेसोबत भागीदारीपूर्ण सहकार्य करणार असल्याची घोषणा केली.

उदाहरण म्हणून पाहायचे झाले तर, एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडने (NIPL – एनआयपीएल) संयुक्त अरब अमिरातीमधील अनिवासी भारतीय समुदाय आणि व्यवसाय तसेच इतर कारणांसाठी तिथे जाणाऱ्या २० लाख भारतीयांना मदत करता यावी म्हणून, मशरेक बँकेसोबत भागीदारीपूर्ण सहकार्य करणार असल्याची घोषणा केली. याचेच पुढचे पाऊल टाकत भूतानमध्ये युपीआय (UPI) आधारीत आर्थिक देवाण घेवाणीची पद्धत सुरू करता यावी या उद्देशाने, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एन.सी.पी.आय. – NPCI) जुलै २०२१ मध्ये, भूतानच्या रॉयल मॉनिटरी ऑथॉरिटीसोबतही भागीदारी केली. याशिवाय आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय पटलावर ज्या इतर यशस्वी भागीदारी केल्या गेल्या आहेत, अमेरिकेची डिस्कव्हर फायनान्शियल सर्व्हिसेस (US Discover Financial Services), जपानचा क्रेडिट ब्युरो (Japan Credit Bureau), चीनचे युनियन पे इंटरनॅशनल (China’s Union Pay International), ब्रिटनचे पीपीआरओ फायनान्शियल (UK’s PPRO Financial) आणि सिंगापूरचे नेटवर्क फॉर इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर अँड लिक्विड ग्रुप (Network for Electronic Transfers and Liquid Group) यांचा समावेश आहे.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये यूपीआय (UPI)

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एन.सी.पी.आय. – NPCI) मशरेक बँकेसोबत केलेल्या भागीदारीमुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये डिजिटल पेमेंटविषयक परिसंस्थेचा विस्तार तर झालाच, पण त्यासोबतच यूपीआयची (UPI) जागतिक स्तरावरची व्याप्तीही वाढली. आता यामुळेच संयुक्त अरब अमिरातीत येणारे भारतीय पर्यटक तसेच तिथे वसलेले अनिवासी भारतीय तिथली व्यापारी संकुले आणि दुकानांमध्ये यूपीआय (UPI) आधारित मोबाइल अॅप्लिकेशनचा वापर करून खरेदीचे पैसे देऊ शकतील. भविष्यातील यूपीआयच्या (UPI) वापराचे उपयोगमूल्य समजून घेण्यासाठी तसेच त्याचे मूल्यमापन करण्याच्यादृष्टीने, पी.टू.एम. [P2M (peer-to-merchant / पीअर-टू-मर्चंट)] व्यवहारपद्धती सुरू करणे हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. कारण  जेव्हा अशापद्धतीने आर्थिक व्यवहार सुरू होतील, तेव्हा दोन देशांमध्ये परस्परांमधल्या पी.टू.पी. [P2P (peer-to-peer / पीअर-टू-पीअर)] आर्थिक देवाणघेवाणीमुळे पारंपारिक पद्धतीने पैसे पाठवण्याच्या पद्धतीला निश्चितपणे बाधा पोहचू शकते.

आखाती देशांमधूल टपाली पद्धतीने भारतात पाठवले जाणारे पैसे

संयुक्त अरब अमिरातीमध्ये काम करणारे भारतीय आपल्या कमाईतील काही भाग भारतातील आपल्या कुटुंबियांना टपाली पद्धतीने (remittance) पाठवतात. टपाली पद्धतीने परदेशातून येणारी अशी रक्कम म्हणजे अनेक कुटुंबांकरता. त्यांच्या आर्थिक स्थीरतेला पाठबळ देणारा महत्त्वाचा स्त्रोत आहे. याशिवाय अशा रकमेमुळे भांडवलाचा ओघही वाढता राहतो, त्यातून बाजारात खर्च केला जातो, गुंतवणुकीत वाढ होते, थोडक्यात पर्यायाने भारताच्या आर्थिक प्रगतीतही ही रक्कम योगदानच देत असते. संयुक्त अरब अमिरातीमधील बांधकाम, आदरतिथ्य आणि किरकोळ व्यापारासारख्या विविध व्यवसाय उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय कामगारांची संख्या खूपच जास्त आहे, आणि त्यामुळेच संयुक्त अरब अमिरात हा भारतात टपाली पद्धतीने पाठवल्या जाणाऱ्या पैशांच्या दृष्टीने दुसरा सर्वात मोठा स्त्रोत आहे. आता अशावेळी जर का संयुक्त अरब अमिरातीमध्ये वसलेल्या भारतीय नागरिकांसाठी तसेच इतर आखाती देशांकरता आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकांद्वारे यूपीआयची (UPI) सेवा उपलब्ध झाली, तर त्यामुळे, भारतात पाठवल्या जाणाऱ्या परकिय चलनाच्या प्रमाणावर मोठा सकारात्मक परिणाम निश्चितच दिसून येईल.

यूपीआयचा (UPI) अवलंब केल्याने वैयक्तिक मोबाइल अॅप्लिकेशनचा वापर करून किंवा इतर ऑनलाइन व्यासपीठांचा वापर करून एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पी.टू.पी. [P2P (peer-to-peer / पीअर-टू-पीअर)] पैसे हस्तांतरित करता येतात.

परदेशातून पैसे पाठवण्यामागचे उद्देश, २०२०-२१

Purpose of Remittance Share in total Remittances (%)
Family maintenance (i.e., consumption) 43.6
Deposits in Banks 34.6
Investments (landed property /equity shares/etc.) 10.2
Others 11.7
Total 100.0

स्रोत: भारतीय रिझर्व्ह बँकेचे वार्तापत्र, कोविड १९ महामारीमुळे उलट्या दिशेने वाहू लागलेले वारे आणि परदेशातून भारतात हस्तांतरीत केल्या जाणाऱ्या पैशांचा ओघ. (RBI Bulletin, Headwinds of COVID-19 and India’s Inward Remittances)

टपाली पद्धतीने (remittance) पैसे पाठवणे म्हणजे एका व्यक्ती वा पक्षाने विशेषतः विदेशातील व्यक्तीने दुसऱ्या व्यक्ती वा पक्षाला पैसे पाठवणे. यालाच पैशांचे पी.टू.पी. [P2P (peer-to-peer / पीअर-टू-पीअर)] हस्तांतरण असेही म्हटले जाते. यूपीआयचा (UPI) अवलंब केल्याने वैयक्तिक मोबाइल अॅप्लिकेशनचा वापर करून किंवा इतर ऑनलाइन व्यासपीठांचा वापर करून एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पी.टू.पी. [P2P (peer-to-peer / पीअर-टू-पीअर)] पैसे हस्तांतरित करता येतात. अशातऱ्हेने यूपीआय (UPI) आधारीत पी.टू.पी. [P2P (peer-to-peer / पीअर-टू-पीअर)] हस्तांतरण अधिक जलद, सुलभ आणि सुरक्षितही आहे. महत्वाचे म्हणजे या पद्धतीचा वापर केल्याने, विदेशातून टपाली पद्धतीने पैसे पाठवण्याच्या प्रक्रियेतील आंतरराष्ट्रीय काल क्षेत्रात (टाइम झोन/time zone) फरक असणे, प्रक्रिया पूर्ण होण्यात विलंब होणे, आणि मूळातच पैशांचे हस्तांतरण पूर्ण होईल का याबद्दलच अनिश्चितता असणे अशा प्रकारच्या मूलभूत अडचणी आणि समस्यांपासूनही सुटका होते.

भारतात परदेशातून पाठवल्या जाणाऱ्या एकूण पैशांचा देशांनुसार वाटा, २०२०-२१

Source Country Share in Total Inward Remittance (%)
United States (G20) 23.4
United Arab Emirates (GCC) 18.0
United Kingdom (G20) 6.8
Singapore 5.7
Saudi Arabia (G20 and GCC) 5.1
Kuwait (GCC) 2.4
Oman (GCC) 1.6
Qatar (GCC) 1.5
Hong Kong 1.1
Australia (G20) 0.7
Malaysia 0.7
Canada (G20) 0.6
Germany (G20) 0.6
Italy (G20) 0.1
Others 31.6

स्रोत: भारतीय रिझर्व्ह बँकेचे वार्तापत्र, कोविड १९ महामारीमुळे उलट्या दिशेने वाहू लागलेले वारे आणि परदेशातून भारतात हस्तांतरीत केल्या जाणाऱ्या पैशांचा ओघ. (RBI Bulletin, Headwinds of COVID-19 and India’s Inward Remittances)

परदेशातून पैसे हस्तांतरीत करण्याच्या पद्धतींचे भविष्यातील स्वरूप

आखाती देशांमध्ये पैशांच्या हस्तांतरणासाठी यूपीआय (UPI) आधारीत पद्धत विकसीत करण्याकरता, एकात्मिकता आणि परस्पर कार्यान्वयनाची गरज असणार आहे. उदाहरण पाहायचे झाले तर, सिंगापूरमधील पे नाऊसोबत भारताच्या यूपीआयलाही (UPI) एकात्मिक पद्धतीने जोडून घेऊन, आता या पद्धतीचा लवकरच प्रत्यक्षातला वापर सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे पैसे पाठविण्याचा खर्च १० टक्क्याने कमी होणार आहे. अशाप्रकारच्या या एकत्रीकरणात तंत्रज्ञानापेक्षाही समोर आलेले मोठे आव्हान म्हणजे परस्परांना माहितीसाठा उपलब्ध करून देण्यासंबंधीचे नियमन, परस्परांसोबत जोडून घेताना येणाऱ्या खर्चाच्या उत्तरदायित्वाविषयीचे गोंधळ आणि काही एका प्रमाणात कायदेशीर बाबी. पैसे पाठवण्यासाठी यूपीआय (UPI) आधारीत व्यवस्था अमलात आणल्यामुळे वापरकर्त्यांना केवळ फोन क्रमांक आणि यूपीआय (UPI) व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (व्हीपीए – VPA) वापरून एका देशातून दुसऱ्या देशात लागोलाग निधी हस्तांतरीत करण्याची सोय उपलब्ध होऊ शकेल.

आता संयुक्त अरब अमिराती आणि आखाती सहकार्य परिषदेतील (GCC  – Gulf Cooperation Council) इतर काही देशांमध्ये यूपीआयची (UPI) सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे, तिथले अनिवासी भारतीय आता यूपीआय (UPI) आधारीत व्यासपीठांचा वापर करू शकणार आहेत. यामुळेच  येत्या काही महिन्यांत – वर्षांत तिथून भारतामध्ये पाठवल्या जाणाऱ्या पैशांचे प्रमाण वाढू शकते. यूपीआयची (UPI) सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे परदेशातून भारतात पैसे पाठविण्याची प्रक्रियादेखील अधिक सोपी आणि सुलभ होणार आहे. महत्वाची बाब अशी की, यामुळे पारंपारिक चलन विनिमय सेवांची गरजही हळूहळू कमी होत जाईल. डिजिटल पेमेंटच्या या बदलत्या परिसंस्थेमुळे पारंपारिक माध्यमांचा वापर करून देशात पैसे पाठवण्याचे प्रमाणही कमी होणार आहे.

यूपीआयची (UPI) सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे परदेशातून भारतात पैसे पाठविण्याची प्रक्रियादेखील अधिक सोपी आणि सुलभ होणार आहे. महत्वाची बाब अशी की, यामुळे पारंपारिक चलन विनिमय सेवांची गरजही हळूहळू कमी होत जाईल.

भारतातील डिजीटल आर्थिक व्यवहारांशी संबंधित (इंडिया स्टॅक / India Stack) उत्पादनांमध्ये यूपीआय (UPI) हे सर्वात लोकप्रिय उत्पादनांपैकी एक उत्पादन आहे. या व्यवस्थेचा वापर करून वापरकर्ते क्यूआर कोड आणि मोबाइल क्रमांकाद्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करू शकतात. एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडने (NIPL – एनआयपीएल) मशरेक बँकेसोबत केलेल्या भागीदारीच्या घोषणेमुळे संयुक्त अरब अमिरात आणि भारतातील व्यक्तींना परस्परांच्या देशातून पैसे पाठवण्याकरता युपीआयची (UPI) सेवा उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल. मात्र पैसे पाठवण्याचे असे माध्यम उपलब्ध करून देण्यासाठी, भारताच्या यूपीआय (UPI) व्यवस्थापनाने सिंगापूरच्या ‘पे नाऊ’सोबत ज्यारितीने काम केले, त्याच पद्धतीने संयुक्त अरब अमिरातीमधील पैसे हस्तांतरण पद्धतींच्या बाबतीतही काम केले पाहिजे. संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशात पैशांच्या आंतरराष्ट्रीय हस्तांतरणाची गरज वेगाने बदलत आहे. अशा वेळी ही गरज पूर्ण करता यावी यासाठी तत्काळ आणि विनंती केल्याकेल्या पैशांचे हस्तांतरण पूर्ण होईल अशी पद्धत विकसीत करण्यासाठी आवश्यक परवाने मिळवून देणे, तसेच प्रक्रियेकरता आवश्यक सल्लामसलतीची संधी उपलब्ध करून देण्यासारखे तांत्रिक सहाय्य एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडून (NIPL – एनआयपीएल) केले जाऊ शकते.

व्यक्ती आणि कुटुंबांमध्ये पी.टू.पी. [P2P (peer-to-peer / पीअर-टू-पीअर)] पद्धतीने पैशांचे हस्तांतरण होऊ लागले तर त्यामुळे आर्थिकवृद्धीला मोठी चालना मिळू शकते. महत्वाचे म्हणजे ही पद्धत मोठ्या अडचणीच्या काळात मदतीची ठरू शकते. या पद्धतीमुळे ज्यांना पैशांची सर्वाधिक गरज आहे अशांच्या हातीच पैशांचे थेट हस्तांतरण होऊ शकणार आहे, त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळू शकणार आहे. पैशांचे अशारितीने थेट हस्तांतरण होऊन लागल्याने विकसनशील देशांमधील व्यक्तींना मोठे आर्थिक पाठबळ लाभू शकते. खरे तर इथे एक बाब लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे, विकासकामांना अधिकृतरित्या केले जाणारे सहकार्य आणि खाजगी गुंतवणूक अशा स्वरुपातही भांडवली निधी उपलब्ध होत असतो, पण त्यातून व्यक्तीगत पातळीवर आर्थिक पाठबळ मिळवून देण्याची गरज पूर्ण होऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेऊनच जगभरातील देशांना आपले विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी यूपीआयसारख्या (UPI) तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. भारताने डिजिटल पेमेंटविषयक पायाभूत सुविधांच्या बाबतीतले आपले जागतिक नेतृत्व आणि सध्या आपल्याकडे असलेल्या जी-२० समुहाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळाचा लाभ घेत भारताने इतर देशांना तांत्रिक उपाययोजना उपलब्ध करून देण्यासाठी काम केले पाहीजे.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Sauradeep Bag

Sauradeep Bag

Sauradeep Bag is Associate Fellow at ORF. Sauradeep has worked in several roles in the startup ecosystem and in international development with the United Nations Capital ...

Read More +