Author : Hari Bansh Jha

Published on Sep 16, 2023 Commentaries 0 Hours ago

भारतीय चलनाचे नेपाळमध्ये घसरलेले मूल्य त्याबरोबरच सीमा शुल्क हे दोन विषय दोन्ही देशांसाठी चिंतेचे कारण बनले आहेत.

नेपाळ-भारत सीमावर्ती भागातील चिंतेचे कारण

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पत्रकारांशी नुकत्याच झालेल्या संवादात सांगितले की, बांगलादेश, भूतान आणि नेपाळ या तिन्ही देशांशी भारताचा संपर्क सुधारला आहे. भारतीय जनता पक्षाच्या उदया नंतर ही परिस्थिती आणखीनच सुधारली आहे. विशेषता नेपाळ आणि भारत यांच्यातील हवाई मार्ग रस्ते रेल्वे आणि क्रॉस बॉर्डर हे सहज सोपे आहेत. पेट्रोलियम उत्पादनाच्या संदर्भामध्ये पाईपलाईन द्वारे वाढणारी कनेक्टिव्हिटी आहे. वरील वस्तूंवर सीमा शुल्क आकारण्याची तरतूद, त्याबरोबरच INR 100 च्या वरच्या भारतीय चलनी नोटांवर बंदी, नेपाळमध्ये घसरलेले भारतीय चलनाचे मूल्य या गोष्टी दोन्ही देशातील कनेक्टिव्हिटी मुळे मिळणारे फायदे काही प्रमाणात कमी करत आहेत.

केपी शर्मा ओली हे 2019 मध्ये नेपाळचे पंतप्रधान असताना, नेपाळ राष्ट्रीय बँक देशाची मध्यवर्ती बँक यांनी नेपाळमध्ये भारताच्या INR 2000, INR 500 या चलनी नोटांवर बंदी घातली. याचा परिणाम असा झाला की भारतीय पर्यटकांसाठी आणि नेपाळी, भारतीय नागरिकांसाठी काही अडचणी निर्माण झाल्या आहेत.जे INR 100 च्या वरच्या भारतीय चलनी नोटा घेऊन नेपाळमध्ये प्रवेश करत होते. परंतु लोकांच्या जीवनावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही याचे कारण म्हणजे भारतीय चलन नेपाळमध्ये मागणीत असल्याने अनधिकृतपणे ते स्वीकार्य राहिले आहे.

नेपाळमधील नेपाळ-भारत सीमा क्षेत्रापासून जितके जास्त दूर जाते, तितकेच भारतीय चलनाचे मूल्य कमी होते.

नेपाळमध्ये भारतीय चलनाचे मूल्य घसरल्याने गेल्या काही काळापासून परिस्थितीत बदल झाला आहे. नेपाळमध्ये INR 100 चे मूल्य आता कमी झाले आहे, ते NPR 135 आणि NPR 150 मधील रकमेच्या समतुल्य झाले आहे. जेव्हा की दोन चलनांमधील अधिकृत दर अजूनही INR 100 NPR 160 च्या बरोबरीचा राहिला आहे. नेपाळ-भारतापासून अधिक दूर होईल तेव्हा नेपाळमधील सीमावर्ती भागात भारतीय चलनाचे मूल्य कमी होत जाते. 1963 मध्ये नेपाळी चलन भारतीय चलनाशी जोडले गेले तेव्हापासून चलनामधील अधिकृत विनिमय दर हा  INR 100 च्या समतुल्य NPR 160 वर अपरिवर्तित राहिला.

तसे पाहायला गेल्यास भारतीय चलन नेपाळसाठी अमेरिकन डॉलर पेक्षाही अधिक महत्त्वाचे होते. कारण नेपाळ राष्ट्र बँक भारतीय चलन खरेदी करण्यासाठी भारताला अमेरिकन डॉलर देत असे. नेपाळमध्ये भारतीय चलनाची मागणी वाढलेली होती. ही मागणी इतकी जास्त होती की, असंघटित बाजारपेठेत एखाद्याला INR 100 मिळवण्यासाठी NPR 165 किंवा त्याहूनही अधिक पैसे मोजावे लागत आहे.

आताच्या बदललेल्या परिस्थितीमुळे नेपाळी दुकानदार पेट्रोल पंपांनी देखील भारतीय चलन स्वीकार करण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे. किंवा जर भारतीय मूल्य स्वीकारायचे असेल तर ते सवलतीच्या दरात स्वीकारले जात आहे. एनपीआर 160 च्या अधिकृत विनिमय दराने INR 100 च्या समतुल्य झाले आहे. नेपाळी चलनात भारतीय चलनाची देवाणघेवाण करण्यासाठी नेपाळ भारत या देशांच्या सीमावरती भागामध्ये मोठ्या संख्येने अनधिकृत एजंट कार्यरत झालेले आहेत.

नेपाळमध्ये भारतीय चलनाचे मूल्य कमी होण्याचे घटक कोणते? या दृष्टीने विचार केल्यास प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे 2016 प्रमाणेच भारत सरकारने भारतीय चलनातील नोटा पुन्हा बंद केल्या जातील अशा संदर्भातील काही गोष्टी पसरल्या. याशिवाय सोन्यापासून मद्यापर्यंत तस्कराचे प्रमाण सीमा वरती भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे यामुळे देखील भारतीय चलनाचे अवमूल्यन झाले आहे. अशा वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत वाहिन्यांद्वारे भारतामध्ये खरेदी केल्या जात आहेत, आयात केल्या जात आहेत. त्यामुळे नेपाळमध्ये भारतीय रुपयांचा मोठ्या प्रमाणात ओघ सुरू आहे. थोडक्यात सांगायचे तर भारतीय चलनाचा नेपाळमध्ये पुरवठा जास्त आणि मागणी कमी यामुळे त्याचे सतत मूल्य घसरत आहे.

भारतीय चलन नेपाळसाठी अमेरिकन डॉलरपेक्षाही अधिक महत्त्वाचे होते कारण नेपाळ रास्त्र बँक भारतीय चलन खरेदी करण्यासाठी भारताला अमेरिकन डॉलर देत असे.

हे प्रकरण आणखी तेव्हा बिकट झाले जेव्हा नेपाळमधील पुष्प कमल दहल यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारने एक तरतूद आणली. या तरतुदी द्वारे भारतातून नेपाळमध्ये सीमा ओलांडणाऱ्यांना NPR 100 (INR 62.5) पेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंवर सीमाशुल्क भरावे लागणार आहे. या निर्बंधाचा परिणाम असा झाला की दोन्ही देशांमधील नागरिकांची सीमेपलीकडील होणारी व्यवहार करणे कठीण झाले आहे. या तरतुदीमुळे सीमावर्ती प्रदेशांमध्ये गंभीर गुंतागुंत निर्माण झाली आहे. विशेषता नेपाळच्या सीमा वरती भागात राहणाऱ्या रहिवाशांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे देखील अशक्य होत आहे. तांदूळ, गहू, डाळी, साखर, दूध, कपडे स्वयंपाकाचे तेल, डिटर्जंट, बटाटे इत्यादी करणे त्यांना अवघड होत आहे. या वस्तू खरेदी करण्यासाठी सीमेपलीकडून भारतात त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याचे कारण म्हणजे NPR 100 पेक्षा किमतीच्या वस्तू त्यांनी आणल्या तर त्यांना सीमाशुल्क भरावे लागत आहे.

नेपाळच्या सीमा वरती भागात राहणाऱ्या अनेक रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन वापरासाठी मूलभूत वस्तू सीमेपलीकडून म्हणजे भारतातून विकत घेणे आवश्यक मजबुरी बनली आहे. कारण दोन्ही बाजूंच्या किमतीमध्ये लक्षणीय तफावत पहायला मिळत आहे. उदाहरणार्थ, नेपाळच्या सीमावर्ती भागात प्रति लिटर दुधाची किंमत INR 5 किंवा त्याहूनही जास्त आहे. इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही फरक आहे.

भारतातून सीमेवरून नेपाळला जाणाऱ्या मालावर सरकारी अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून सीमाशुल्क लादून अनावश्यक अडचणी निर्माण केल्याचा सर्वसामान्यांचा समज आहे.

या मुद्द्यावर नेपाळमधील काही सरकारी अधिकाऱ्यांचे असे मत आहे की, जोपर्यंत सीमापार खरेदीला परावृत्त केले जात नाही तोपर्यंत या देशातील सीमावर्ती भागातील स्थानिक व्यवसाय भरभराटीस येणार नाहीत. दुसरीकडे, सामान्य लोकांचा असा समज आहे की सरकारी अधिकार्‍यांनी जाणूनबुजून भारतातून नेपाळला सीमेवरून येणाऱ्या मालावर सीमाशुल्क लादून अनावश्यक त्रास निर्माण केला आहे. नेपाळमध्ये भारतीय वस्तूंच्या किमती वाढवण्याच्या या हालचालीतून सीमाशुल्क अधिकारी आणि व्यापारी यांच्यात हातमिळवणी असल्याचा संशय नागरिकांमध्ये वाढत आहे.

वरीलपैकी काही घडामोडी या चिंतेचे कारण बनत आहेत. सीमापार लोकांच्या हालचालीवर तसेच रोटी-बेटी (आंतरविवाह) च्या भक्कम पायावर आधारित नेपाळ आणि भारत यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंधावर परिणाम होऊ लागले आहे. सीमावर्ती भागात असलेल्या दोन्ही बाजूच्या स्थानिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होत आहे त्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक नुकसान देखील होत आहे. त्यामुळे या प्रश्नावर कनेक्टिव्हिटी हाच रामबाण उपाय आहे, असे स्वप्न पाहत आत्मसंतृष्ट राहणे संबंधित संस्थांसाठी शहाणपणाचे ठरेल असे वाटत नाही.

हरी बंश झा हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे व्हिजिटिंग फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.