Author : RAJEN HARSHÉ

Published on Oct 30, 2023 Commentaries 0 Hours ago

नायजर मधील लष्करी बंडाने नवीन राजवट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत. मात्र या परिस्थितीत अनेक शक्तींकडून विविध देशांनी खेचण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

नायजर मधील लष्करी बंड आणि राजवट स्थापनेच्या हालचाली

2023 च्या 26 जुलै रोजी नायजर मधील लष्कराने बंड केले आणि राष्ट्रपती मोहम्मद बझौम यांची लोकशाही पद्धतीची राजवट उलथून टाकली. या घटनेने संपूर्ण पश्चिम आफ्रिकेचा प्रदेश राजकीय अस्थिरता आणि लष्कराच्या बंडांना कसा बळी पडतो आहे याचे एक उदाहरणच जगासमोर मांडले आहे. जनरल अबौरहमाने त्चियानी हे नायजरच्या अध्यक्षीय गार्डचे प्रमुख आहेत. सत्ता पालटानंतर त्यांनी तातडीने सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.

सध्या सुरू असलेल्या नायजर मधील राजकीय गोंधळाला सर्वसाधारणपणे पश्चिम आफ्रिकन प्रदेशातील काही वैशिष्ट्यपूर्ण लक्षात घेण्यासारख्या घटना आहेत.

पश्चिम आफ्रिकन राज्यांच्या आर्थिक समुदायाच्या (ECOWAS) त्याबरोबरच पश्चिम आफ्रिका आणि सालेह येथील संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधीच्या शिष्टमंडळाने घटनात्मक सुव्यवस्था पुनर्संचाईत करण्यासाठी भेट दिली होती. या शिष्टमंडळाने घटनात्मक सुव्यवस्थेचे निराकरण करण्यासाठी दोन प्रतिस्पर्धी पक्षांची भेट घेतली आहे. आंतरराष्ट्रीय दबावांना न जुमानता लष्कराचे राज्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. नागरी शासन पुन संचलित करण्यासाठी त्यांना किमान तीन वर्षाचा कालावधी हवा आहे. या दरम्यानच्या काळामध्ये ECOWAS ने बॉझम राजवटीची पुनर्स्थापना करण्यासाठी कूटनीतीच्या माध्यमातून समस्याचे निराकरण करणे त्याबरोबरच लष्करी हस्तक्षेपाच्या माध्यमातून बळजबरीने व्यापार आणि आर्थिक निर्बंध लादण्याच्या पर्यायांचा शोध लावला आहे. नायजर बरोबरचे आर्थिक आणि इतर आर्थिक व्यवहार देखील स्थगित केलेले आहेत. ECOWAS लष्करी हस्तक्षेप करण्याचा पर्याय निवडला तर बुर्किना फासो आणि मालीने यांनी चेतावणी दिली आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार लष्करी हस्तक्षेप हे एक प्रकारे युद्ध घोषित करण्यासारखेच आहे. ज्याचे परिणाम संपूर्ण क्षेत्रासाठी विनाशकारीच असतील. यामध्ये एक योगायोग असा आहे की बुर्किना फासो आणि माली हे दोघेही लष्करी राजवटीमध्ये आहेत. युरोपियन युनियन ने (EU) नायजरला सुरक्षा संबंधातील निधीच्या बाबतीत निलंबित करण्याची घोषणा केलेली आहे. नायजर मधील सध्या निर्माण झालेला राजकीय गोंधळ विशेषता पश्चिम आफ्रिकन देशांसाठी काही विशिष्ट दृष्टिकोनातून लक्षात घेतला जाऊ शकतो.

नायजर आणि पश्चिम आफ्रिकेची ठळक वैशिष्ट्ये

नायजर ला राजकीय स्वातंत्र्य 1960 मध्ये मिळाले. त्यानंतर  नायजरने अनुक्रमे 1974, 1996, 1999 आणि 2010 मध्ये असे चार लष्करी उठाव पाहिले आहेत. 2020 पासून पश्चिम आफ्रिकेमध्ये राजकीय दृष्ट्या अस्थिरता पाहायला मिळत आहे.  नायजर (2021) आणि गिनी बिसाऊ (2022) आणि माली (2020 आणि 2021) गिनी (2021), चाड (2021) यांसारख्या देशांमध्ये यशस्वी सत्तापालटाचे प्रयत्न झाले आहेत. बुर्किना फासो (2022) आणि नायजर (2023). विशेष म्हणजे, फ्रान्सच्या पूर्वीच्या आफ्रिकन वसाहतींमध्ये, लष्करी जंटाने गिनी, माली, बुर्किना फासो, चाड आणि नायजरमध्ये सत्ता काबीज केली आहे. खरं तर, 1990 पासून, आफ्रिकेतील 27 कूपांपैकी 78 टक्के फ्रँकोफोन आफ्रिकेत घडले आहेत. फ्रान्सला लष्करी शासकांद्वारे आपल्या पूर्वीच्या वसाहतींवर नियंत्रण ठेवणे तुलनेने सोपे वाटले असावे.

नायजरच्या संपूर्ण प्रदेशाच्या राजकारणामध्ये आफ्रिकन युनियन (AU) आणि ECOWAS, युनायटेड स्टेट्स (US) यांच्यासह EU लोकशाहीला चालना देण्यासाठी त्याबरोबरच दहशतवादाशी लढा देण्याच्या उद्देशाने सक्रियपणे सहभाग नोंदवत आहेत.

नायजरमध्ये युरेनियम, सोने, कोळसा आणि जिप्सम हे प्रमुख खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. या प्रमुख खनिजांचा समावेश असलेल्या समृद्ध खनिज संपत्ती या सारख्या अनेक घटक या प्रदेशाला समृद्ध करतात. बुर्किना फासोमध्ये सोने, जस्त, फॉस्फेट, चुनखडी, तांबे आणि मॅंगनीज आढळतात. युरेनियम, हिरे, तांबे, व्हॅनेडियम आणि निकेल मालीमध्ये सापडले आहेत. या प्रदेशातील तीव्र गरीबी अतिरेकी इस्लामिक संघटनांच्या प्रसारण नायजर आणि संपूर्ण पश्चिम आफ्रिकन प्रदेशाच्या राजकीय अर्थव्यवस्थेला एक प्रकारे आकार दिला आहे. नायजरच्या संपूर्ण प्रदेशाच्या राजकारणामध्ये आफ्रिकन युनियन (AU) आणि ECOWAS, युनायटेड स्टेट्स (US) यांच्यासह EU लोकशाहीला चालना देण्यासाठी त्याबरोबरच दहशतवादाशी लढा देण्याच्या उद्देशाने सक्रियपणे सहभाग नोंदवत आहेत.

नायजरमधील लोकशाही आणि सामाजिक वास्तव

मोहम्मदु इस्सोफू हे पश्चिम देशांचे कट्टर मित्र असून त्यांनी सलग दोन टर्म (2011-2021) नायजरमध्ये राज्य केलेले आहे. 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर नायजरमध्ये प्रथमच सत्तेचे हस्तांतरण  शांततापूर्ण आणि लोकशाही पद्धतीने झाले होते. यानंतर नायजर मध्ये राष्ट्राध्यक्ष बझौम यांच्या कारकिर्दीचा उदय झाला होता. नायजर हळूहळू लोकशाही शक्तीचे आशास्थान बनत असताना लष्करी उठावाच्या भूताने त्याला पछाडणे सोडले नाही.

दुसरीकडे नायजर मधील मोहम्मदु इस्सोफौ हा हौसा वांशिक गटाशी संबंधित असल्याने त्याने वांशिक धरतीवर लष्करी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली परिणामी लष्करामध्ये त्याची शक्ती मजबूत झाली आहे.

इतर आफ्रिकन देशांमधील राजकारणाची नायजरशी तुलना केल्यास एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे येथील राजकारण वांशिक गटांमध्ये विभागले गेले आहे. ज्यामध्ये हौसाचे प्रबळ गट अधिक प्रबळ जवळपास 56% इतके आहेत. दुसरीकडे झार्मा-सोंघे एकत्रितपणे 22 टक्के आहेत आणि तुआरेग 8 आहेत. याबरोबरच इतर अनेक लहान सामाजिक गटांव्यतिरिक्त मोहम्मदु इस्सोफौ हा हौसा वांशिक गटाशी संबंधित आहे. त्याने वांशिक धरतीवर लष्करी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे त्यामुळे त्याची शक्ती अधिक मजबूत झालेली आहे. Issofou च्या उलट, Bauzoum वंशीय अरब वंशाच्या अल्पसंख्याक लोकसंख्येशी संबंधित आहे. त्याला अनेक वेळा परदेशी नागरिक म्हणून वागणूक मिळाली आहे. अल्पसंख्याक गटातील नेत्याला प्रामुख्याने हौसा राष्ट्र हाताळणे सोपे नव्हते. याशिवाय नायजर मधील सामाजिक आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसून निराशाजनक आहे. त्याबरोबरच येथील कृषी क्षेत्राशी संबंधित अर्थव्यवस्था फारशी वैविध्यपूर्ण नाही. नायजर ला विशाल भौगोलिक क्षेत्र लाभलेले आहे या जागेत 10 लक्षात हून अधिक लोक किंवा जवळपास 40% लोकसंख्या तीव्र दारिद्र्यात राहत आहे म्हणून या ठिकाणच्या विकासाची वाटचाल रोखली गेली आहे.

भौगोलिक राजकीय स्थान आणि सुरक्षिततेचा शोध

भौगोलिक दृष्ट्या पाहता नायजर सहारा आणि उपसहारा या प्रदेशांमध्ये स्थित आहे. याच्या दक्षिणेला नायजेरिया आणि बेनिन, पश्चिमेला बुर्किना फासो आणि माली, पूर्वेला चाड आणि उत्तरेला अल्जेरिया आणि लिबिया यांच्या सीमा आहेत. नायजर आणि त्याच्या आसपासचे देश विविध कट्टरपंथी इस्लामिक संघटनांच्या दहशतवादी कारवायांमुळे त्रस्त आहेत. या सर्व अशा संघटना आहेत ज्यांचा अलकायदा आणि इस्लामिक स्टेट्स (IS)सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांची  संबंध आहेत.  प्रादेशिक दहशतवादी संघटनांपैकी बोको हराम विशेषतः नायजेरिया, नायजर, चाड, कॅमेरून आणि मालीमध्ये सक्रिय आहे. G5 साहेल देशांमध्ये माली, चाड, मॉरिटानिया आणि बुर्किना फासो या देशांबरोबरच नायजर चा देखील समावेश होता. ज्याने संपूर्ण प्रदेशांमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्याबरोबरच दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बहुराष्ट्रीय टास्क फोर्स साठी संस्थात्मक फ्रेमवर्क प्रदान केले होते. यामध्ये 2013 पासून फ्रान्सचे सैन्य देखील सहभागी होते. 2022 मध्ये “ऑपरेशन बुरखाने” च्या माध्यमातून माली मध्ये दहशतवादाशी लढा देण्यासाठी फ्रान्सने प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले. अमेरिका, कट्टर इस्लामी संघटना या प्रदेशात फोफावत आहेत. या प्रक्रियेत, नायजरवर नायजेरिया आणि मालीमधील 245,467 निर्वासित आणि या प्रदेशातील सुमारे 350,000 विस्थापित व्यक्तींचाही भार पडला आहे. दुसरीकडे मोठ्या संख्येने लोक नायजर मार्गे EU देशांमध्ये स्थलांतरित होत आहेत. अधिक स्पष्टपणे सांगायचे झाल्यास नायजर मधील लष्करी राजवटीने युरोपियन युनियन देशांशी वाटाघाटी करण्याचा फायदा घेतला आहे.

2022 मध्ये “ऑपरेशन बुरखाने” च्या माध्यमातून माली मध्ये दहशतवादाशी लढा देण्यासाठी फ्रान्सने प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले.

लष्करी राजवटीला पाठिंबा देणाऱ्या जनतेने केवळ फ्रेंच साम्राज्यवादाचा निषेधच केला नाही तर रशिया आणि वॅग्नर गटाला त्यांच्या सुरक्षा संबंधित आवश्यकतांचे घटक म्हणून पाहतात हा एक नवीन लक्षणीय नमुना या प्रदेशाच्या सुरक्षारचनेत उदयास आलेला आहे. वॅग्नर ग्रुप ही क्रेमलिनच्या पाठीशी असलेली खाजगी सेना आहे. रशिया आणि वॅग्नर हे दोघेही माली, बुर्किना फासो आणि गिनीमध्ये फ्रान्सच्या पूर्वीच्या वसाहतींमधील पूर्व-प्रतिष्ठा बदलण्यासाठी कार्यरत आहेत. वॅग्नर प्रमुख, येवगेनी प्रीगोझिन आहेत ज्यांनी एका वेळी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अवहेलना केली होती. 23 ऑगस्ट 2023 रोजी एका हवाई अपघातात ते ठार झाले असले तरी, त्यांची संघटना रशियन राज्याच्या आश्रयाने खाजगी सैन्य म्हणून आपले कार्य चालू ठेवू ठेवण्याची शक्यता आहे. आफ्रिकन राज्यांच्या मनामध्ये फ्रांस बद्दल असलेली उदासीनता पुढील प्रकारे काही प्रमाणात स्पष्ट केली जाऊ शकते.

जरी फ्रान्स माजी वसाहतवादी शक्ती आणि कथित उपनिवेशीकरण असूनही पूर्वीच्या वसाहतीमध्ये तसेच साहेल प्रदेशात फ्रान्सला अजूनही प्रमुख स्थान आहे फ्रान्सला आफ्रिकेत विरोध होत असला तरी उप-सहारा आफ्रिकेतील खनिजांमध्ये त्याचा मोठा हिस्सा आहे. उदाहरणार्थ, कॉंपेन नॅशनल डेस माइन डी फ्रान्स (CMF) नावाच्या सरकारी मालकीच्या खाण कंपनीमार्फत आफ्रिकेत US$550 दशलक्ष गुंतवणूक करण्याची फ्रान्सची योजना आहे. याशिवाय नायजर हा जगातील सातव्या क्रमांकाचा युरेनियम उत्पादक देश आहे. अणुऊर्जेसाठी युरेनियम आवश्यक आहे. Société des Mines de l’Air (SOMSIR), जी नायजरची राष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीकडे कडे Orano नावाच्या फ्रेंच कंपनीची 63.4 टक्के मालमत्ता आहे,  उर्वरित 36.66 टक्के मालमत्ता नायजरच्या Société du Patrimoine des Mines due Niger (Sopamin) कडे आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास फ्रान्सने नायजरच्या अर्थव्यवस्थेशी संरचनात्मक संबंध विकसित केले आहेत, जे मोडून काढणे कठीण आहे.

नायजर हा जगातील सातव्या क्रमांकाचा युरेनियम उत्पादक देश आहे. अणुऊर्जेसाठी युरेनियम आवश्यक आहे.

जिहादी बंडखोर कारवायांविरुद्ध फ्रान्स आणि अमेरिका हे नायजरचे सहयोगी देश होते. अमेरिकेने जिबूतीमधील कायमस्वरूपी लष्करी तळाव्यतिरिक्त, अगाडेझ प्रदेशात नायजरमध्ये एक विस्तृत ड्रोन तळ स्थापित केला आहे. ज्याला नायजर एअर बेस 201 म्हणतात. नायजर एअर बेस 201 हा आफ्रिकेतील दुसरा सर्वात मोठा यूएस बेस आहे. पाश्चात्य जगाच्या विरोधात नियामीमधील नवीन राजवट फ्रान्स/ईयू आणि यूएसपासून सावध राहण्याची शक्यता आहे. या संदर्भात, रशियाची थेट मैत्री आणि वॅगनर गटाकडून मिळणारा पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे. त्याचप्रमाणे बीजिंगने नायजरमधील नेत्यांना सत्तापालटानंतरची अनागोंदी सोडवून सुव्यवस्था आणण्याचे आवाहन केले आहे. साहेल प्रदेशात चीनची मोठी गुंतवणूक आहे. या प्रदेशातील केलेल्या आपल्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्याबरोबरच चीनला नायजर मधील प्रचलित पाश्चात्य विरोधी भावनांमुळे या प्रदेशात विस्ताराच्या योजनांचा पाठपुरावा करण्याची संधी मिळणार आहे.

निष्कर्षाच्या अनुषंगाने विचार केल्यास सत्ता पालटानंतर नायजर चे राजकारण आणि समाज प्रवाहाच्या स्थितीत आहे. नवीन राजवट स्वतःला स्थापित करण्याचा प्रयत्न करत असताना ते नायजरच्या बाहेरील शक्तींकडून अनेक देशांना खेचले जाण्याची शक्यता आहे.

राजेन हर्षे हे अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठ, प्रयागराजचे संस्थापक आणि माजी कुलगुरू आहेत.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.