Published on Aug 09, 2023 Commentaries 0 Hours ago

उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या पार्श्वभुमीवर भारतातील आणि जागतिक स्तरावर पाण्याची असुरक्षितता वाढण्यास मदत होईल का ?

तंत्रज्ञान, पाणी आणि सुरक्षा यांच्यातील संबंध

कमी किंमतीच्या डिसॅलिनेशनपासून ते घरोघरी असणाऱ्या फिल्टर्सपर्यंत, तंत्रज्ञानाने स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या वापरात क्रांती घडवून आणली आहे व परिणामी, जगभरातील जीवनमान सुधारले आहे. उत्तम व सक्षम पायाभूत सुविधा उभारण्यात, नुकसानीचे प्रमाण कमी करण्यात आणि अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात तंत्रज्ञानामुळे करण्यात आलेली कामगिरी बहुमोल आहे. जसजशी जागतिक लोकसंख्येत वाढ झाली आहे व विशेषत: शहरी भागांमध्ये संसाधने कमी होत आहेत, तसतसे जलक्षेत्राची शाश्वतता आणि लवचिकता वाढवणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. यात वॉटर स्मार्ट बनणे, आपल्याकडे जी संसाधने आहेत त्यांची अधिकाधिक निर्मिती करणे आणि संसाधनांच्या अपव्ययाला आळा घालणे गरजेचे आहे.

जलाची कार्यक्षमता, सुरक्षितता, गुणवत्ता आणि वापर याच्या अंदाजामध्ये सर्व क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा समावेश करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), रोबोटिक्स आणि कंप्युटिंगमधील नवीन फ्रंटियर्समध्ये सर्वोत्कृष्ट नावीन्य आणणाऱ्या कंपन्या आणि लोकांसोबत काम केल्याने आपल्याला आपल्या वाढत्या पाण्याच्या असुरक्षिततेचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येणार आहे. परंतु हे करत असताना, तंत्रज्ञानावरील अवलंबित्वाची व्याप्ती, वर्तन आणि वापराच्या पद्धतींपासून विचलित होत नाही ना हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, संशोधन आणि विज्ञानाच्या तसेच इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच, तंत्रज्ञान आणि प्रणालींवर जास्त अवलंबून राहणे सुरक्षेसाठी धोका बनणार नाही ना याचीही आपल्याला खात्री करणे आवश्यक आहे.

उत्तम व सक्षम पायाभूत सुविधा उभारण्यात, नुकसानीचे प्रमाण कमी करण्यात आणि अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात तंत्रज्ञानामुळे करण्यात आलेली कामगिरी बहुमोल आहे.

पाण्याबाबतची असुरक्षितता हे मानवी आणि पर्यावरणीय सुरक्षेसाठी एक मोठे आव्हान आहे. स्वच्छ पाण्याची उपलब्धता हे सर्वात मोठे आव्हान असले तरी ही असुरक्षितता, आटत जाणारे भूजल, जलस्रोतांवर येणारे ताण, शाश्वत विकास आणि चोरी यासारख्या अनेक समस्यांमुळे उद्भवते याकडेही लक्ष द्यायला हवे. हवामान आणि परिसंस्थेतील बदलामुळे पाण्याच्या असुरक्षिततेचे निमित्त आणि परिणाम एकमेकांना जोडले जातात. जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे एक तृतीयांश लोक स्वच्छ पाण्यापासून वंचित आहेत आणि २०३० पर्यंत संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांनी दशकाच्या अखेरीस सर्वांसाठी सुरक्षित आणि परवडणारे पिण्याचे पाणी सुनिश्चित करण्यासाठी उच्च मर्यादा निश्चित केली आहे. खरेतर, ही बाब अजिबात सोपी नाही. विशेषत: आशियामध्ये, अंदाजे ३०० दशलक्ष लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही आणि शहरांमध्ये निर्माण होणारे सुमारे ८० टक्के सांडपाणी प्रक्रिया न करताच जलस्त्रोतात सोडले जाते.

ही उद्दिष्टे महत्त्वाकांक्षी आहेतच पण त्यासोबतच, या  उद्दिष्टांमुळे केवळ मानव, अन्न आणि आरोग्य सुरक्षेमध्येच नव्हे तर परिसंस्थांचे संरक्षण, वाढीच्या महत्त्वाकांक्षा, ऊर्जेच्या गरजा आणि हवामानातील बदल कमी करण्यातही पाणी कशी महत्त्वाची भूमिका बजावते हे चांगल्या प्रकारे समजून घेता येते. व्यावहारिक दृष्टीकोनातून, तंत्रज्ञान आणि जलसुरक्षा यांचा परस्परसंबंध ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केल्यास पाण्याचा वापर आणि पाण्याचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमपणे होऊ शकते. याचा वापर अचुक व सटीक अंदाज बांधण्यातही होऊ शकतो. तंत्रज्ञान, संशोधन, आणि जल व्यवस्थापन करण्यासाठी आणि पाणी प्रश्नावर उपाय शोधण्याचे अनेक मार्ग आहेत जे पुढे सामायिक संसाधनांवरील संघर्ष टाळण्यास उपयोगी ठरू शकतात.

व्यापक चित्रापासून लहान कल्पनांपर्यंत

अंतराळापासून ते स्मार्ट इन्फ्रापर्यंत, विज्ञानाने सिद्ध केले आहे की कार्यक्षमता वाढवणे शक्य असले तरी आपण ते कसे वापरतो हे अधिक महत्त्वाचे आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे पाण्याचे महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे आहे. २०२१ मध्ये, नासा आणि फ्रान्स यांनी एक संयुक्त उपग्रह मोहीम लाँच करण्यात आली. या सरफेस ओशन टोपोग्राफी मिशनद्वारे पृथ्वीवरच्या पाण्याचे जागतिक सर्वेक्षण करण्यासाठी रडार तंत्रज्ञान वापरण्यात आले. या उपग्रहाद्वारे सरोवरे, नद्या, जलाशय आणि महासागरांचा अभ्यास करणे शक्य होणार आहे तसेच जलस्रोतांना समजून घेणे, मोजणे आणि व्यवस्थापित करण्यासाठी पूर्वी अज्ञात असलेल्या डेटामध्ये संभाव्य ज्ञानाचा खजिना उघडला जाणार आहे. या ज्ञानाने आपल्याला पाण्याबद्दल अधिक माहिती मिळणार आहेच पण त्यासोबत नैसर्गिक संसाधनांवर विकासाचे होणारे परिणाम आणि हवामान व हवामानातील बदलांचे अधिक सूक्ष्म परिणाम समजून घेणे सोपे होणार आहे. अर्थात याचा फायदा अधिक उपयुक्त धोरण तयार करण्यासाठीही होणार आहे.

उपग्रहाद्वारे सरोवरे, नद्या, जलाशय आणि महासागरांचा अभ्यास करणे शक्य होणार आहे तसेच जलस्रोतांना समजून घेणे, मोजणे आणि व्यवस्थापित करण्यासाठी पूर्वी अज्ञात असलेल्या डेटामध्ये संभाव्य ज्ञानाचा खजिना उघडला जाणार आहे.

स्पेस टेकमुळे अधिक डेटा आणि ज्ञान मिळवणे शक्य असले तरी पाण्याचा वापर करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणणाऱ्या असंख्य छोट्या कल्पना आहेत. ज्यांचा विचार अधिक गंभीरतेने व्हायला हवा. उदाहरणार्थ, स्मार्ट मीटरिंगमध्ये वापरकर्त्यांना पाण्याची पातळी, गुणवत्ता, चोरी आणि गळतीबद्दल सावध करण्यासाठी पायाभूत सुविधांसह महत्त्वाच्या ठिकाणी स्थापित केलेल्या आयओटी सेन्सर्सचा वापर करण्यात येतो. या तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने मोठ्या सिस्टीममध्ये केला जाऊ शकतो. भारतातील वाढत्या शहरांमध्ये बांधण्यात येत असलेल्या नवीन गृहनिर्माण संकुलांसह घरगुती आणि समुदाय स्तरावर याचा वापर होऊ शकतो. ही प्रणाली चांगल्या धोरणांच्या निर्मितीसाठी देशांतर्गत वापराच्या नमुन्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासोबतच जलचक्राच्या शाश्वततेमध्ये नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी ही सुनिश्चित करते.

असे सेन्सर पाण्याची गुणवत्ता सुधारण्यात मोठी भूमिका बजावू शकतात. म्हणजेच जर पाण्यात अनपेक्षित किंवा धोकादायक रासायनिक पातळी दिसली आणि त्यावर ताबडतोब कारवाई केली जाऊ शकते. या उपकरणांद्वारे संकलित केलेल्या डेटाचे नंतर एआय अल्गोरिदमद्वारे विश्लेषण करून ऋतूंचा अंदाज लावला जाऊ शकतो. तसेच विशेषत: जल संस्था आणि जलप्रणालीशी निगडीत उद्योगांमध्ये रासायनिक स्पाइक दिसल्यास त्यावर योग्य ते उपचार केले जाऊ शकतात. पाण्याच्या एटीएमपासून ते पाईप्स आणि नाल्यांसाठी सेन्सर असलेल्या पाण्याखालील ड्रोनपर्यंत सांडपाण्याबाबतच्या सोल्युशनसाठी या क्षेत्रात अनेक संधी आहेत. भुवनेश्वरमध्यील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे संशोधक पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि ते पिण्यायोग्य करण्यासाठी जळलेली लाल माती वापरत आहेत आणि मध्य भारतात, नर्मदा नदीतील प्रदूषणावर उपचार करण्यासाठी ईसीओएसओएफटीटीने विकसित केलेल्या कमी किमतीच्या वेस्टवॉटर सोल्यूशन्सचा वापर केला जात आहे. विविध वापरकर्ते आणि उत्तम प्रशासन यांच्यातील परस्परसंबंध अत्यंत बहुमोल आहे.

पाण्याच्या एटीएमपासून ते पाईप्स आणि नाल्यांसाठी सेन्सर असलेल्या पाण्याखालील ड्रोनपर्यंत सांडपाण्याबाबतच्या  सोल्युशनसाठी या क्षेत्रात अनेक संधी आहेत.

हवामान बदल, शाश्वत विकास आणि कमी होत जाणारे जलस्रोत या धोकादायक त्रिकूटामुळे मानवी आणि पर्यावरणीय सुरक्षेला बाधा येत असल्याने विज्ञान, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नवकल्पना या त्रिकूटाला जलक्षेत्रात जवळ आणण्याची गरज आहे. भरीव गुंतवणुकीसह उत्तम सार्वजनिक-खाजगी भागीदारी लक्ष्यित अंदाज आणि साधनांचा अभ्यास केल्यास संभाव्य संघर्ष क्षेत्रांचा अंदाज लावता येऊ शकतो. २०२१ हे केवळ १९०१ नंतरचे पाचवे सर्वात उष्ण वर्ष तर २०१२-२०२१ हे रेकॉर्डवरील सर्वात उष्ण दशक होते, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या शेवटच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. तापमानात वाढ झाल्याने हवामान बदलाच्या घटना, शहरी बदल, कृषी उत्पादन, आरोग्य आणि ऊर्जा सुरक्षिततेवर मोठा परिणाम होऊ शकतो. अशा घटनांमुळे सध्याचा तणाव वाढुन आणि जोखीम अधिक तीव्र बनू शकते. एआय आणि मशीन लर्निंग संभाव्य जोखमी समजून घेऊन अंदाज लावू शकतात आणि लवकर चेतावणी देणारी साधने पाण्याचा पुरवठा, हवामानातील बदलांचे परिणाम आणि उद्भवू शकणारे संभाव्य व्यत्यय यांचा मागोवा घेण्यात मदत करू शकतात. संघर्ष समजून घेणे आणि संवाद आणि सहकार्याच्या उपायांमध्ये गुंतणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तापमान वाढीचे पृथ्वीला असणारे काही अज्ञात धोके आणि परिणाम यांचा प्रतिकार करण्यासाठी विचार, विश्लेषण आणि अंमलबजावणीमध्ये परिवर्तन आणणे आवश्यक आहे.

आव्हाने आणि पुढील वाटचाल

नियामक फ्रेमवर्क, कौशल्याचा अभाव, नवीन कल्पनांना समर्थन देण्यासाठी विद्यमान पायाभूत सुविधांची असमर्थता, आर्थिक अडथळे आणि उच्च ऊर्जा वापरासह तंत्रज्ञानाच्या व्यापक वापरासाठी अनेक मर्यादा आणि आव्हाने आहेत. बर्‍याचदा, नवीन पर्यावरणीय आणि पाण्याशी संबंधित तंत्रज्ञान आणि एआय किंवा मशीनचा वापर संशयाच्या नजरेतून केला जातो आणि त्यास सांस्कृतिक परंपरांना आव्हान म्हणून पाहिले जाते. यावर मात करण्यासाठी सुधारित पायाभूत सुविधा, नवीन तांत्रिक कौशल्ये, नवीन प्रशासन फ्रेमवर्क, शिक्षण आणि प्रभावी व्यवस्थापनासह व्यापक दृष्टीकोन आवश्यक आहे. या आव्हानांवर राजकीय इच्छाशक्ती, दूरगामी संस्था आणि धोरणे व महत्त्वपूर्ण सार्वजनिक-खाजगी भागीदारी यांच्याद्वारे त्यावर मात करता येऊ शकते. तंत्रज्ञानाच्या वापरासह येणारा एक अतिरिक्त धोका येथे नमूद करणे गरजेचे आहे. तो धोका म्हणजे सायबर हल्ला होय. यामुळे ग्राहकांवर प्रतिकूल परिणाम होतोच आणि लक्षणीय आर्थिक नुकसानही होते. हॅक्टिव्हिझम’ ही एक वाढती चिंता आहे. एकमेकांशी जोडलेले ग्रिड, धरणे, उपचार संयंत्रे आणि इतर पायाभूत सुविधा यामुळे असुरक्षित बनल्या आहेत. जसजसे विज्ञान आणि नवकल्पना यांवर आपले अवलंबित्व वाढत जाते, तसतसे आपण जलस्त्रोताचे अतिरिक्त धोक्यांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे.

यावर मात करण्यासाठी सुधारित पायाभूत सुविधा, नवीन तांत्रिक कौशल्ये, नवीन प्रशासन फ्रेमवर्क, शिक्षण आणि प्रभावी व्यवस्थापनासह व्यापक दृष्टीकोन आवश्यक आहे.

उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या पार्श्वभुमीवर भारतातील आणि जागतिक स्तरावर पाण्याची असुरक्षितता वाढण्यास मदत होईल का ? याचे उत्तर होय असे असले तरी, आपण दोन प्रमुख पैलूंकडे लक्ष दिले पाहिजे. आपण पाणी कसे वापरतो याची मानवी जबाबदारी तंत्रज्ञानावरील अवलंबित्वामुळे कमी होत नाही. यापुढे पाण्याचा अपव्यय होणार नाही याची खात्री करण्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही. दुसरा पैलू म्हणजे कोणत्याही उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा, नवकल्पनांचा आणि विज्ञानाचा वापर स्मार्ट धोरणे आणि जागतिक प्रशासन प्रणालींसह करताना आपल्याला सुरक्षितता मिळतेच पण त्यासोबत पाण्याचेही संरक्षण केले जाते. काही तंत्रज्ञान अनेक दशकांपासून पाण्याच्या प्रश्नांचा भाग आहे, तरीही ते सहयोगाचे एक नवीन क्षेत्र आहे. शेवटी, आपण ज्यावर अवलंबून आहोत त्या सुंदर नद्या आणि तलाव आणि इतर जलस्रोतांना पर्याय नाही.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.