Author : Navdeep Suri

Published on Oct 23, 2023 Commentaries 0 Hours ago

1980 च्या सुरुवातीच्या काळामध्ये इस्राईलने हमासला दिलेला पाठिंबा विसरून जाण्याची आता फॅशनच झाली आहे.

इस्रायल-हमास संबंधांची रोलरकोस्टर गाथा

इस्रायलमध्ये हमासने 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या भीषण  हत्याकांडाच्या प्राथमिक अहवालात déjà vu ची (विस्मरणात गेलेली) अप्रिय भावना आली आहे. 2021 मध्ये गाझामध्ये झालेल्या शेवटच्या आगी नंतर एका दुर्दैवी शीर्षकासह मी एक लेख लिहिला.. ‘पुढच्या वेळेपर्यंत…’ हा एक सुरक्षित अंदाज म्हणता येईल कारण 2008 आणि 2014 च्या लढाईच्या जखमा अजूनही ताज्या होत्या आणि त्याची बीजे अजूनही होती. छोट्या युद्धविरामाने आता जोर धरायला सुरुवात केली असताना देखील युद्ध वाढीची पेरणी केली जात. होती

7 ऑक्टोबरला झालेला दहशतवादी हल्ला हा अभूतपूर्व होता. ऑक्टोबर 1973 मध्ये योम किप्पूर युद्धानंतर झालेल्या कोणत्याही घटनेपेक्षा जास्त इस्त्रायली लोकांची जीवितहानी झाली आहे. यामुळे मात्र अनेक कायदेशीर प्रश्नही निर्माण झाले आहेत: हे कसे घडले? आता  का? पुढे काय होईल? यासारख्या स्वरूपाचे.

या प्रश्नांची उत्तरे देण्यास निश्चितपणे थोडा वेळ लागू शकतो, परंतु सध्या आमच्याकडे जी माहिती आहे, त्यावर आधारित आम्ही अंदाज लावण्याचा प्रयत्न करू शकतो.

इस्रायली बुद्धिमत्तेला हमास कसे गुंडाळू शकेल आणि अशा प्रकारचे नरसंहार कसे करू शकेल? प्रतिस्पर्ध्याबद्दल तिरस्कारासह त्याच्या क्षमतांबद्दल हुब्रिस, हा एक उत्तराचा भाग असू शकतो. इस्राइल मधील काही समालोचकांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना न्यायव्यवस्थेशी छेडछाड करण्याच्या त्यांच्या प्रस्तावांद्वारे देशाच्या सुरक्षा आस्थापनामध्ये विसंवाद पेरल्याबद्दल दोष दिला आहे.  गेल्या काही महिन्यांतील अंतर्गत अशांततेवर लक्ष केंद्रित करून, कदाचित चूक होण्यासाठी योगदान देणारे घटक बनले आहेत. इराणने त्याच्या रणनीती, त्याच्या रॉकेटची श्रेणी, अचूकता, ड्रोन आणि पॅराग्लायडरच्या वापराच्या बाबतीत हमासच्या क्षमतांच्या स्पष्ट विस्तारात भूमिका बजावली असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

गाझामधील हमास प्रशासनाला निधी देण्यासाठी कतारमधील रोख रक्कम इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या नजरेतून जाते.

यामध्ये आणखी एक दुसरा परिणाम देखील आहे. इस्रायली देशांतर्गत सुरक्षा एजन्सी शिन बेट याने धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रवादी पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन ला कमकुवत करण्यासाठी एक साधन म्हणून पाहिले आहे. 1980 च्या दशकात हमासला इस्रायलकडून मिळालेला पाठिंबा विसरणे सहज सोपे आहे. यापैकी काही प्रवृत्ती आजपर्यंत चालू आहेत, कारण इस्रायली धोरणांनी पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास आणि पॅलेस्टिनी प्राधिकरणाला प्रभावीपणे कमी केले आहे.  हमासला वेस्ट बँकमध्ये वाढत्या पाऊलखुणासह गाझामधील प्रबळ राजकीय आणि लष्करी शक्ती म्हणून उदयास येऊ दिले आहे. हमासचा सध्याचा प्रमुख इस्माईल हनीयेह हे मुख्यतः कतारमध्ये आहेत. जसे की खालेद मशाल हे पूर्वीचे नेते कतार मध्ये आहेत. गाझामध्ये असलेल्या हमास प्रशासनाला निधी देण्यासाठी कतार कडून रोख रक्कम इस्रायली गुप्तचरांच्या चौकस नजरेतून जात आहे. हमास इस्रायल यांच्यातील संबंध काहीतरी अक्राळविक्राळ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हाताबाहेर जात आहे.

हत्याकांड का घडले याचे कारण शोधत असताना, हा प्रदेश पाहणाऱ्या प्रत्येकासाठी भडकणारा संताप आणि निराशा स्पष्ट करणारी गोष्ट आहे. कारण चांगल्या भविष्यासाठी या ठिकाणी आशेची स्पष्टपणे अनुपस्थिती जाणवत आहे. जेव्हा 2.2 दशलक्ष नागरीकांना 225-चौरस किमीच्या पट्ट्यामध्ये एका बाजूला भूमध्यसागरीय आणि दुसऱ्या बाजूला इस्त्रायली भिंत तसेच जगातील सर्वात मोठे ओपन-एअर तुरुंग तयार करण्यासाठी अडकवता, अशावेळी तुम्ही स्फोट होण्याची वाट पाहत पावडर केग तयार केले आहे; या तुरुंगातील निर्वासित रहिवासी म्हणजे 1948 आणि 1967 च्या युद्धानंतर त्यांच्या वडिलोपार्जित भूमीतून बेदखल झालेल्या निर्वासितांची दुसरी किंवा तिसरी पिढी आहे.  वेस्ट बँकमध्ये परिस्थिती फारशी चांगली नाही, जिथे बेकायदेशीर ज्यू वस्त्या अधिकृत मंजूरी अंतर्गत विस्तारल्या जात आहेत. नेतन्याहू सरकार हे इस्रायलच्या इतिहासातील सर्वात टोकाचे आहे. राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन ग्विर आणि अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच यांसारखे सदस्य व्यापलेल्या प्रदेशात राहणाऱ्या पॅलेस्टिनींना राजकीय वैधता नाकारण्यासाठी चिथावणीखोर बनले आहेत.  शांततेसाठी जमिनीची खरेदी विक्री करण्याचे तिसरायली जुने धोरण स्पष्टपणे इतिहासाच्या कचऱ्यात टाकले गेले आहे. सध्याच्या सरकारला असे वाटते की ताब्यात घेतलेल्या प्रदेशातील जमीन ही बळकवायची आहे, शांतता किंवा आवश्यकता वाटल्यास बंदुकीच्या नळीचा वापर करून देखील.

अधिकृत मंजूरी अंतर्गत विस्तारल्या जात आहेत. नेतन्याहू सरकार हे इस्रायलच्या इतिहासातील सर्वात टोकाचे आहे. राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन ग्विर आणि अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच यांसारखे सदस्य व्यापलेल्या प्रदेशात राहणाऱ्या पॅलेस्टिनींना राजकीय वैधता नाकारण्यासाठी चिथावणीखोर बनले आहेत.

मग आता हमासने हल्ला का केला? याचे कारण शोधताना सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यातील शांतता करारासाठी अमेरिकेतील बिडेन प्रशासनाच्या प्रयत्नांना हाणून पाडण्याच्या इराणच्या इच्छेशी त्यास जोडण्याचा मोह एक प्रकारे आहे. ही बाब क्वचित नक्कीच शक्य आहे. परंतु योम किप्पूर युद्धाच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त हल्ला सुरू करण्याचे प्रतीकत्त्वच तितके शक्य आहे. हा एक असा संघर्ष आहे, ज्यामध्ये इस्रायल आणि अरब दोघेही विजयाचा दावा करू शकतात. पुढे काय होईल हे आता सांगणे कठीण आहे. गाझामध्ये सामूहिक शिक्षेद्वारे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उघड उल्लंघन तसेच, मोठ्या प्रमाणात नागरि घातपात झालेला असला तरीही इस्रायल कठोर प्रतिशोध शोध घेण्यास कटिबद्ध आहे.

हवाई दल आणि तोफखान्यांद्वारे केलेल्या विनाशकारी बॉम्ब फेकीच्या लाटांनंतर गाझावरील इस्रायली भू-हल्ल्यातील सर्वात वाईट परिस्थिती समोर दिसेल. हमास मधील दुर्दैवी ओलिसांना मृत्यूच्या उंबरठ्यावर ढकलेल आणि मानवतावादी आपत्तीमध्ये अपरिहार्यपणे उद्भवणार आहे. हे प्रकरण आणखी वाईट करण्यासाठी लेबनॉन-आधारित हिजबुल्लाला संघर्षामध्ये आणू शकते. त्याबरोबरच धोकादायक दुसरी आघाडी देखील उघडू शकते. ही परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी प्रखर राजनीतिक प्रयत्न सुरू आहेत. परंतु पॅलेस्टिनी रक्ताच्या विपुल प्रमाणात देखील इस्रायलची सूड घेण्याची तहान पूर्ण होईपर्यंत ठोस परिणामांची अपेक्षा करणे योग्यच ठरेल.

त्यानंतर काय होते? इस्रायल पुन्हा गाझा ताब्यात घेईल का? हमासचा नायनाट करणे त्याचबरोबर वंचित असलेल्या पॅलेस्टिनी लोकांची प्रतिकार करण्याची इच्छा संपवणे हे त्याचे उद्दिष्ट खरोखरच साध्य केले जाऊ शकते का? अंधारलेल्या बोगद्याच्या शेवटी सध्या प्रकाशाची कोणतीही किरण दिसणे कठीण आहे. योम किप्पूर युद्धाने यथास्थिती हलवली. 1978 च्या कॅम्प डेव्हिड कराराला कारणीभूत ठरले तसेच इस्रायल-इजिप्त मध्ये दीर्घकालीन शांतता प्रस्थापित झाली आहे. 2023 चे हे योम किपूर हत्याकांड बदनाम नेतन्याहूच्या बाहेर पडण्यासाठी, इस्रायली राजकारणाला हादरवून सोडेल.  शांततेसाठी आपला जीव धोक्यात घालण्यास तयार असलेल्या यित्झाक राबिनसारखे मध्यवर्ती नेते निर्माण करेल का? वेस्ट बँक वरील अनावश्यक मेहमूद अब्बास आणि गाझामधील कट्टर हमास यांच्यापेक्षा चांगले नेतृत्व मिळविण्यासाठी पॅलेस्टिनी लोक एकत्र येतील का? ही गोष्ट सध्या तरी एक कल्पना रम्य वाटत आहे, पण कल्पनेला पर्याय म्हणजे पुढच्या काळातील अपरिहार्य वास्तव म्हणता येईल.

हा लेख मूळतः द ट्रिब्यूनमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.