मे महिन्याच्या सुरुवातीलाच इस्रायली पोलीस अल-अक्सा मशिदीच्या परिसरात घुसले आणि तेथील जमावाला नियंत्रित करण्यासाठी त्यांच्यावर मोठी कारवाई केली. रमजानचा महिना होता आणि साहजिकच तिथे मोठी गर्दी झाली होती. तिथल्याच प्रार्थनागृहाच्या परिसरात प्रार्थना करणाऱ्या ज्यू भाविकांवर जमावाने कथितरित्या दगडफेक केल्याचे सांगण्यात आले. त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात, हे त्यांना माहीत नव्हते, अशातला भाग नाही.
त्यांची ही कारवाई हमाससारखीच होती. हमास एक पॅलेस्टिनी गट आहे, त्याचे एक सशस्त्र दल आणि एक राजकीय संघटना देखील आहे. इस्रायल, अमेरिका आणि युरोप यांनी या गटाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केला आहे. पॅलेस्टिनीं सहकाऱ्यांच्या अंदाजानुसार तिच्या उदयाची अत्यंत गरज होती.
हमासने पहिल्यांदा तेल अविवच्या आतल्या भागांसह इस्रायलमधील शहरे आणि जेरूसलेमवर हजारो रॉकेट डागले. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ला चढवला आणि त्यात वीस पटीने अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. त्यात ६६ मुलांचाही समावेश होता. अनेक इमारती उद्ध्वस्त केल्या गेल्या. परिणामी हजारो लोक बेघर झाले.
मात्र, पॅलेस्टिनींच्या दृष्टीने हमासच एक अशी संघटना आहे, जी आताही इस्रायली शक्तीला आव्हान देऊ शकत होती. पॅलेस्टिनींचे प्रमुख नेते महमूद अब्बास हे बहुतांश वेळा यापासून दूरच राहिले आणि अनेकदा शांतता प्रक्रियेत इस्रायली वरचढ ठरल्याचे बऱ्याचदा दिसून आले. गेल्या काही वर्षांत त्यांच्या विश्वासार्हतेलाही तडा गेल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यांच्यावर वेस्ट बँकेत अकार्यक्षम आणि भ्रष्ट प्रशासनाचे नेतृत्व केल्याचा आरोप आहे.
इजिप्तच्या मध्यस्थीने शस्त्रसंधीवर स्वाक्षऱ्या केल्यानंतर लगेचच अल-अक्सा मशिदीत नमाज अदा करतेवेळी आपला झेंडा फडकावला आणि हमासची भरभरून स्तुती केली. तसेच निवडणुकीत आपला पाठिंबा जाहीर केला. प्रख्यात पॅलेस्टिनी सेंटर फॉर पॉलिसी अॅण्ड सर्व्हे रिसर्चने १५ जून रोजी जारी केलेल्या अंदाजानुसार, हमासने मे २०२१ मध्ये इस्रायलविरुद्धची लढाई जिंकली. या दृष्टीकोनामुळे अब्बास यांच्या नेतृत्वाखालील पॅलेस्टिनी गटाचा विरोध तसेच हमासच्या बाजूने आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी सशस्त्र संघर्ष करण्याच्या कल्पनेच्या बाजूने जनतेचा असलेला दृष्टिकोन बदलला.
सर्वेक्षणानुसर, अलीकडेच जो संघर्ष झाला, त्यात इस्रायलचा पराभव झाल्याचे मानणारे तीन चतुर्थांश पॅलेस्टिनी इस्लामिक गटाकडे आहेत. हा गट आपल्या राज्याची भविष्यातील राजधानी जेरुसलेमवरील पॅलेस्टिनींच्या दाव्याचा बचाव करण्यात यशस्वी झाल्याची त्यांची भावना झाली. कारण पूर्व जेरुसलेमच्या शेजारच्या शेख जराहमधून इस्रायलींनी पॅलेस्टिनींना हटवण्याचा प्रयत्न केला होता. इस्लामचे पवित्र स्थळ अपवित्र करणाऱ्या इस्रायलला धडा शिकवला. याशिवाय, या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५३ टक्के पॅलेस्टिनींना वाटते की, हमासने पॅलेस्टिनी नागरिकांचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व करावे. तर केवळ १४ टक्के पॅलेस्टिनींनी अब्बास यांच्या फतेह पार्टीची निवड केली.
हमासच्या उदयाचं श्रेय मुख्यत्वाने इस्रायलवर डागलेल्या चार हजारांहून अधिक रॉकेटना दिले जाऊ शकते आणि पॅलेस्टिनींना त्यांच्या नेत्यांनी, आंतरराष्ट्रीय समुदाय, इतकंच काय तर प्रमुख अरब राष्ट्रांनी वाऱ्यावर सोडले तेव्हा, हमासच त्यांच्यासाठी उभा राहिला याची जाणीव त्यांना करून दिली.
हमासच्या उदयाची पार्श्वभूमी म्हणजे, ट्रम्प यांच्या सत्ताकाळात पॅलेस्टिनींमध्ये हतबलतेची भावना निर्माण झाली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी केवळ अमेरिकी दूतावास वादग्रस्त जेरूसलेममध्ये स्थलांतरित केला नाही तर, एका शांततेची योजना समोर ठेवली. जी या शतकातील सौदा आहे, असे म्हटले गेले. त्यातून दोन राज्यांमध्ये समाधानकारक तोडगा निघाला नाही. तर पॅलेस्टिनींची भविष्यातील राजधानी म्हणून पूर्व जेरूसलेम करण्याच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच लक्षावधी पॅलेस्टिनी निर्वासितांच्या वापसीच्या बरोबरच, वेस्ट बँकमधील इस्रायलच्या अनेक बेकायदा नागरिकांच्या वापसीला नकार देण्यात आला.
मे मध्ये होणाऱ्या निवडणुका घेण्यास महमूद अब्बास यांनी दिलेल्या नकारामुळे त्यांच्या विश्वासार्हतेला धक्का बसला. अब्बास यांनी १५ वर्षांतून होणाऱ्या निवडणुका रद्द केल्या. त्याचे कारण अब्बास यांनी स्पष्ट केले. पूर्व जेरूसलेममध्ये इस्रायल मतदान घेण्यास परवानगी देणार नाही, असे कारण त्यांनी दिले. त्यांच्या टीकाकारांनी मात्र, ते निरंकुश असल्याची टीका केली. ते निवडणुकीत पराभूत होऊ शकतात अशी भीती त्यांना आहे. हेच यामागचे मूळ कारण असल्याचे ते म्हणाले.
मार्चमध्ये केलेल्या मागील सर्वेक्षणामध्ये पॅलेस्टिनी सेंटर फॉर पॉलिसी अॅण्ड सर्व्हे रिसर्चने, जर निवडणुका झाल्या तर, हमासच्या तुलनेत अब्बास यांच्या फतहला काही प्रमाणात त्याचा फायदा मिळेल, असे म्हटले होते. बदल आणि सुधारणांच्या बाबतीत हमासला ३४ टक्के, फतहला ३८ टक्के आणि २००६ मध्ये निवडणुकीत उतरलेल्या इतरांना एकूण आठ टक्के फायदा होईल, तर २० टक्के लोकांनी अद्याप याबाबत निर्णय घेतला नाही, असेही सर्वेक्षणातून स्पष्ट करण्यात आले होते.
हमासचा उदय हा केवळ पॅलेस्टिनी संघटनेलाच नाही, तर इस्रायल आणि अमेरिकेलाही हादरा असल्याचे मानले जाते, ज्यांनी शांतता कायम राहावी यासाठी अब्बास यांच्यावर विश्वास ठेवला आहे. मात्र, परिस्थिती आहे तशीच ठेवण्याचा आणि ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली पॅलेस्टिनींच्या इच्छा-आकांक्षांना पूर्णपणे नाकारण्याचा त्यांचा आग्रह यामुळे अब्बास कमकुवत झाले आणि हमासच्या उदयाला आणखी बळकटी मिळाली.
सद्यस्थितीत, बायडन प्रशासन पॅलेस्टिनी संघटनेच्या माध्यमातून गाझासाठी पुनर्निमाण मदत देऊन अब्बास यांची प्रतिमा पुन्हा उजळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अमेरिका कधी आणि कशाच्या माध्यमातून राजनैतिक तोडग्यावर जोर देईल, हे अद्यपि स्पष्ट झालेले नाही. जितक्या लवकर संवाद सुरू होईल, तितके अब्बास यांच्यासाठी गमावलेली पत पुन्हा मिळवणे अधिक चांगले होईल.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.