Published on Oct 15, 2020 Commentaries 0 Hours ago

ज्या गोष्टी कालपर्यंत अशक्य होत्या, त्या आज अस्तित्वात आहेत. आज ज्या अशक्य वाटताहेत, त्या उद्या असतील. म्हणूनच कल्पनाशक्तीची ताकद समजून घ्यायला हवी.

माणसाच्या कल्पनेची भविष्यभरारी

आज कोरोनामुळे सारे जग बदलत चालले आहे, असे वाटू लागले आहे. या बदलाची नक्की दिशा कोणती आहे, याबद्दल अनेकजण बोलत आहेत, लिहीत आहेत. या सगळ्यात एक गोष्ट आपण विसरून चालणार नाही, ती म्हणजी माणसाची कल्पनाशक्ती. ज्या गोष्टी कालपर्यंत अशक्य वाटत होत्या, त्या आज अस्तित्वात आहेत. आज ज्या अशक्य वाटताहेत, त्या उद्या असतील. त्यामुळे माणसाच्या कल्पनाशक्तीची ताकद आपण माणसांनीच आधी समजून घ्यायला हवी.

गेल्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीने आपल्याला काय दिले, असा प्रश्न उपस्थित झाला तर सहजपणे तीन-चार गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात. त्यातील पहिली म्हमजे लोकांच्या जीवनशैलीत झालेला सुधार, त्यानंतर अनेक गोष्टींमध्ये विशेष प्राविण्य मिळवण्यात मनुष्यप्राणी यशस्वी ठरला, व्यापारात वृद्धी झाली आणि आरामदायी व्यापाराचाही विस्तार झाला त्याचबरोबर स्वतःच्या कामगिरीचे मोठ्या प्रमाणात आत्मपरीक्षण करण्यात मानवाने आघाडी घेतली.

विशेष प्रावीण्य आणि आरोग्याबद्दल जागरूकता आणि सहजसोबत घेता येणारे तंत्रज्ञान यांच्या एकत्रित येण्यामुळे ५ ट्रिलियन कल्याणकारी अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणे सुलभ झाले आहे. २०१०च्या अखेरपर्यंत आरोग्याविषयी आपल्याकडे प्रचंड प्रमाणात जागरूकता निर्माण होऊ लागली होती. लोक स्वतःच्या आरोग्याबद्दल कमालीचे सतर्क राहू लागले, डिजिटल डिटॉक्स, योगसाधना आणि शारीरिक व मानसिक आरोग्याला प्राधान्य इत्यादी मुद्दे लोकांच्या केंद्रस्थानी राहू लागले.

व्यावसायिक ऍथलिट्स आणि नेतृत्त्व करणाऱ्यांसाठी आता मनाची ताकद वाढविणे हे अत्यावश्यक ठरले आहे. २०१० मध्ये विशेषतः तुमची झोपेची तसेच मेंदूची कामगिरी कशी आहे, याला अधिकाधिक प्राधान्य दिले जाऊ लागले. निद्रा प्रशिक्षकांची मदत घेतलेली असली तरी व्यावसायिक खेळाडूंचा भरणा असलेल्या संघांनी त्यांचे लक्ष निद्रा विज्ञानावर केंद्रित करून त्यामुळे संज्ञानात्मक वाढीस लागून स्पर्धांदरम्यान शरीराची कामगिरी कशी वाढते याचा अभ्यास सुरू केला. अगदी त्याचप्रमाणे ज्यांची कामगिरी अतिशय उच्च दर्जाची आहे अशा वलयांकित व्यक्ती मेंदू प्रशिक्षकांची मदत घेऊन त्यांच्या मानसिक क्षमतांमध्ये अधिक वृद्धी होऊन त्यांच्या मेंदूचा अधिकाधिक वापर सुयोग्य पद्धतीने कसा होऊ शकेल, यावर लक्ष केंद्रित करू लागले.

गेल्या १०० वर्षांत झाले नाहीत, एवढे बदल होताना आपल्याला २०२०च्या या नव्या दशकात अनुभवायला येणार आहेत. कारण प्रत्येक उद्योगक्षेत्र स्वतःमध्ये बदल घडवून आणणार आहे. अर्थातच या दशकाची सुरुवात एका महासाथीने झाली आहे. एक अशी महासाथ की जिने जगातील प्रत्येक व्यक्ती, कंपनी, उद्योग आणि सरकारला स्पर्श केला. नव्हे व्यापून टाकले. कोरोना महासाथीमुळे अनेक कंपन्यांना टाळे लागले, अनेक कामगार बेरोजगार झाले, कॉर्पोरेट दिवाळखोरीचे प्रमाण वाढले, आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी मंदावली आणि लोकांच्या जगभरातील हालचालींवर कमालीच्या मर्यादा आल्या. या अशा अस्थिरतेतून तरून जाण्यासाठी, आता नव्या मानवी कार्यपद्धतीच्या नितांत गरज आहे.

या पार्श्वभूमीवर मी मानवी कामगिरीमधीलच एक उपविभाग असलेल्या – कल्पनाशक्तीची कामगिरी – विषयाचा प्रस्ताव मांडत आहे. या अशा प्रतिकूल परिस्थितीतही चपळाईने टिकून राहण्याची तसेच बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी नवसर्जनशीलतेची ऊर्जा आपल्याला या कल्पनाशक्तीच्या कामगिरीच्या जोरावरच प्राप्त करून घेता येणार आहे.

कल्पनाशक्तीची कामगिरी म्हणजे नक्की काय?

कल्पनाशक्तीची कामगिरी हे व्हिजन विशालतेच्या मानसिकतेवर आधारलेले आहे. अशी मानसिकता की जी शिकणे, विसरणे आणि पुन्हा शिकणे या निरंतर चालणा-या चक्रावर झाले आहे आणि जे सतत नाविन्यतेने सक्षम झाले आहे.

अनिर्बंध विचारांना अधिकाधिक वाव देण्यासाठी लोकांनी भीतीने भारलेल्या मानसिकतेचा जागरूकतेने त्याग करायला हवा. या व्यतिरिक्त विशाल मानसिकता असलेले लोक नवनव्या संधी तसेच शक्यतांना आपल्या मनात सामावून घेत त्या दिशेने कोणतेही पूर्वग्रह न ठेवता वाटचाल करत राहतात. त्यामुळे मन सतत ताजेतवाने राहून त्यामुळे मेंदू अधिकाधिक तरल आणि सक्रिय राहण्यास मदत होते.

विशाल मानसिकता हा केवळ पाया असून कल्पनाशक्तीसाठी तोच पुरेसा नाही. नवनवीन गोष्टी शिकण्याच्या तीव्र इच्छेद्वारे त्याची मशागत होणे गरजेचे आहे. ज्यांना सतत प्रश्न पडत असतात, ज्यांची निसर्गतःच चौकसबुद्धी अशा लोकांमध्ये शिकण्याची प्रक्रिया वेगाने होते. तर ज्यांची बालसुलभ चौकसबुद्धी लोप पावली आहे त्यांना प्रौढपणातही त्यावर मेहनत घेऊन ती अवस्था पुनःप्राप्त करता येऊ शकते.

अप्रचलित तत्त्वज्ञान न शिकण्याच्या आव्हानात्मक उद्दिष्टासाठी चौकसबुद्धी उत्प्रेरक ठरते. कारण त्यामुळे कालबाह्य ठरलेले उद्योग प्रारूपे आणि सामाजिक समतेच्या पुरातन कल्पनांचा पुनर्वापर करणे सोयीचे होते. अंतिमतः कल्पनाशक्ती कामगिरीच्या सर्वोच्च शिखरावर राहणे ही प्रत्यक्षात अनुभवायची गोष्ट आहे आणि त्यासाठी ते प्रत्यक्षात आणण्याची गरज आहे.

कल्पनाशक्तीची ताकद एकवटण्यासाठीची उद्योगक्षेत्रातील उदाहरणे

आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी काही विशिष्ट पदार्थांचे आपण जसे सेवन करतो त्याचप्रमाणे अचाट कल्पना या कल्पनाशक्तीसाठी पूरक अन्न ठरतात. पुढील कोष्टकात त्याचे वर्णन करण्यात आले आहे:

जैसे थे   परिवर्तन
The New Edge In Human Performance Imagination Performance75286

अंगात घालायचे कपडे

माणूस अंगावर कपडे घालतो.

डिजिटलकपडे

डिजिटल अवतारात डिजिटल कपडे घातले जातात. माणूस अंगावर कपडे घालतो. सध्या या युगाचा आरंभ होत आहे.

The New Edge In Human Performance Imagination Performance75286

तुम्ही चाकाचा पुनर्शोध लावू शकत नाही

माणूस अंगावर कपडे चाक कामगिरीच्या अशा उच्च अवस्थेला पोहोचले आहे की, त्याला डावलून आपण पुढे जाऊच शकत नाही.

त्याचा त्याग करा

जमिनीच्या खाली खोल अंतरावर एका भुयारी मार्गात मॅग्नेटिक लेव्हिटेशन यंत्रणेचा वापर करून माणसांची अत्यंत वेगवान वाहतूक करणारे हे तंत्रज्ञान हळूहळू जगात लोकप्रिय होऊ लागले आहे.

The New Edge In Human Performance Imagination Performance75286

वृद्धत्व अपरिवर्तनीय आहे

वय वाढणे हे जीवनातील सत्य आहे आणि कालक्रमानुसार संयोग असलेली ती दिशादर्शक प्रक्रिया आहे.

वृद्धत्व आजार आहे

वय दीर्घायुष्यावरील संशोधनाबरोबरच जीवशास्त्राच्या माहिती सिद्धांतानुसार वयोमान वाढणे वा वृद्ध होणे यात परिवर्तन करता येऊ शकते.

The New Edge In Human Performance Imagination Performance75286

अन्न जमिनीखाली उगवते

अर्थातच कायम मातीतूनच अन्न पिकवता येते.

अन्न हवेत उगवते

अर्थातच कायम मातीतूनच अन्न पिकवता येते. एअरोपोनिक यंत्रणा पाण्याच्या वापराचे प्रमाण ९८ टक्क्यांपर्यंत, खतांच्या वापराचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत आणि कीटकनाशकांचे प्रमाण १०० टक्क्यांपर्यंत घटवू शकते. मात्र, त्याचवेळी पीकवृद्धीचे प्रमाण वाढीस लागते.

The New Edge In Human Performance Imagination Performance75286

डिनर्ससाठी रेस्टॉरंट्सना टेबलांची गरज असते

लोकांना बाहेर जाऊन जेवता यावे, यासाठी रेस्टॉरंट्स असतात.

डार्क किचन– टेबल नाही

लोकांना घरपोच अन्न पोहोचवणारी ही सेवा आहे. येथे लोकांना येण्याची गरज नाही. फक्त त्यांनी त्यांची ऑर्डर नोंदवायची.

The New Edge In Human Performance Imagination Performance75286

जमिनीच्या वरती शहरांची निर्मिती होते

विद्यमान अवस्थेतील नागरी जीवन पारंपरिकरित्या जमिनीच्या वरतीच उभारले गेलेले आहे.

शहरे भूमिगत आहेत

हवामानातील बदलांमुळे जमिनीचा -हास होत आहे तर दुसरीकडे शहरांची बेसुमार वाढ होत आहे त्यामुळे अशा परिस्थितीत भूमिगत शहरे हाच त्यावर तोडगा असणार आहे. उदाहरणार्थ सिंगापूर.

ही उदाहरणे अशासाठी या ठिकाणी देण्यात आली की, यातून कल्पनाशक्तीचा कितपत विस्तार करता येणे माणसाला शक्य आहे, याची कल्पना यावी. तसेच माणसाच्या मनामध्ये अशक्य कोटीतील गोष्टी सहजसाध्य करण्याएवढी ताकद आहे, हे यातून दाखवून द्यायचे होते. फक्त तुमच्याकडे विधायक कल्पना असायला हव्यात आणि त्याला प्रयत्नांची जोड दिली जायला हवी. हे सर्व जमून आले की, सर्व गोष्टी साध्य होतात.

मेंदूतील न्यूरॉन्स या नव्या कल्पनांशी पटकन जुळवून घेत त्यानुसार काम करण्याचे आदेश मेंदू देतो. त्यामुळे बिंदू जुळवणीचा वेग वाढतो. जेव्हा एखादे कठीण गणित व तत्सम काम आपण करत असतो त्यावेळी हे बिंदू जुळवणीचे काम मेंदू करत असतो आणि त्यामुळे काही नवीन संकल्पना उदयाला येण्याच्या शक्यता बळावतात.

विरोधाभास : कोणत्याही बदलासाठी प्रतिकूल असणे हा माणसाचा स्थायीभाव आहे परंतु त्याचा विकास हा सर्जनशीलतेमुळेच होतो.

देश, प्रांत, जात, धर्म किंवा वंश हे काहीही असो कोणत्याही बदलाचा सहज स्वीकार करणे हे कोणत्याच माणसाला रूचत नाही. थोडक्यात बदलासाठी मानवप्राणी सहसा तयार नसतो. समजा एखादी गोष्ट समजली नाही तर ती सरळ धुडकावून लावण्याचा किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा लोकांचा कल असतो. इतिहासात त्याची अनेक उदाहरणे सापडतात. जर विविध देशांच्या लोकांना, सरकारांना आणि उद्योगांना पुढील दशकभरात होणा-या बदलांनुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा असेल तर त्यांना त्यांच्या कल्पनाशक्तींमध्ये वाढ करावी लागेल तसेच आता ते ज्या स्थितीत आहेत, त्याच्यात होणा-या बदलांची कल्पना समजून घ्यावी लागेल.

कोरोना विषाणू आणि त्यानुसार होणारे वेगवान तांत्रिक बदल यांतून मानवी कामगिरीचे महत्त्व समजण्यातील आपली आकलनशक्ती वाढविणे आणि कल्पनाशक्ती कामगिरीचा स्वीकार करणे, हे गरजेचे असल्याचे अधोरेखित झाले आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.