-
CENTRES
Progammes & Centres
Location
युक्रेनच्या संकटादरम्यान रशियन सैन्याच्या उघड झालेल्या त्रुटींतून भारताने त्वरित धडे घेऊन आपल्या संरक्षण सिद्धतेत अनुकूल बदल करायला हवे.
हा लेख ‘युक्रेन संकट: ‘संघर्षाचे कारण आणि मार्ग’ या मालिकेचा एक भाग आहे.
______________________________________________________
आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर भूकंपीय परिणाम करणारे तसेच देशाच्या सुरक्षेवर पद्धतशीर परिणाम घडविणारे आणि भविष्याकरता अनेक लष्करी धडे देणारे युक्रेनचे संकट खरोखरीच अनेक तऱ्हेने एक महत्त्वाचा निर्णायक टप्पा ठरले आहे.
या संघर्षाने आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विनातडजोड खेळल्या जाणाऱ्या जबरदस्त खेळीतील अनेक वास्तवांना अधोरेखित केले आहे. सर्वप्रथम, अण्वस्त्रांचा ताबा हा महत्त्वाचा मुद्दा आहे- पाश्चिमात्य राष्ट्रांना लष्करी हस्तक्षेप करण्यापासून रोखण्यासाठी तसेच शत्रूची गैरसोय करत वर्चस्व राखण्यासाठी अनेक मार्गांनी संघर्ष वाढविण्याच्या क्षमतेत, पुतिन यांनी अण्वस्त्रांचा वापर करण्याची दिलेली धमकी हा एक प्रमुख घटक आहे. दुसरी बाब म्हणजे आर्थिक निर्बंधांचा धोका (सामूहिक विनाशकारी शस्त्राच्या तोडीचा अत्यंत तीव्र प्रभाव) रशियाची आक्रमकता रोखू शकली नाही.
युद्धाची कला आणि आधुनिक काळातील बळाची उपयोगिता या विषयीच्या वादविवादालाही पूर्णविराम मिळाला आहे. पूर्ण संघर्षाचे दिवस संपले आहेत या दाव्यापासून, युद्ध न करता दुसऱ्या देशासाठी हानिकारक ठरणाऱ्या सैन्याच्या कुशल हालचाली करण्याच्या स्पष्ट उच्चारणापर्यंत, आपण आता सर्वांगीण शक्तीचे पुनरागमन पाहिले आहे. ताकदीच्या बळावर सत्तेच्या गणितात मध्यवर्ती स्थान पटकावले जात असताना, भारतानेही सुसज्ज, वापर करता येण्याजोग्या, मापन करण्याजोग्या, अद्ययावत, तांत्रिकदृष्ट्या-सक्षम संयुक्त सैन्याच्या जोपासनेवर आणि विकासावर आपले लक्ष नव्याने केंद्रित करणे आवश्यक आहे, ज्यात स्पर्धेतील समांतर क्षमता (युद्ध न करता दुसऱ्या देशासाठी हानिकारक ठरणाऱ्या अशा सैन्याच्या कुशल हालचाली करणे, मात्र ही एखाद्या देशाची कृती कायदेशीररीत्या युद्धाची कृती ठरत नाही) आणि संघर्ष (सर्वांगीण युद्ध) यांचा समावेश होतो. असे साधन शांततेची सर्वोत्तम आणि खात्रीशीर हमी देणारे असले तरी, त्याची रचना आणि निर्मिती हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोरील प्रमुख आव्हान असेल.
युक्रेनचे संकटही आपल्याकरता रशियाशी असलेल्या आपल्या संबंधांना योग्य आकार देण्याची, रशियावर आपले असलेल्या अवलंबित्वाचे पुनरावलोकन करण्याची आणि आपल्या अवलंबित्वाचे निराकरण करण्यासाठी अनेकांना समाविष्ट करून घेत विस्तृत पाया तयार करण्याची एक चांगली संधी आहे.
ताकदीच्या बळावर सत्तेच्या गणितात मध्यवर्ती स्थान पटकावले जात असताना, भारतानेही सुसज्ज, वापर करता येण्याजोग्या, मापन करण्याजोग्या, अद्ययावत, तांत्रिकदृष्ट्या-सक्षम संयुक्त सैन्याच्या जोपासनेवर आणि विकासावर आपले लक्ष नव्याने केंद्रित करणे आवश्यक आहे, ज्यात स्पर्धेतील समांतर क्षमता (युद्ध न करता दुसऱ्या देशासाठी हानिकारक ठरणाऱ्या अशा सैन्याच्या कुशल हालचाली करणे, ही एखाद्या देशाची कृती कायदेशीररीत्या युद्धाची कृती ठरत नाही) आणि संघर्ष (सर्वांगीण युद्ध) यांचा समावेश होतो.
२४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने रुबिकॉन ओलांडणे निवडले, तोपर्यंत रशिया युक्रेनमधील युद्ध जिंकत होते. जॉर्जिया, क्राइमिया आणि सीरियामध्ये मिळविलेल्या सापेक्ष यशासह, रशियन सैन्य एक वेगाने शिकणारी आणि अनुकूल बदल घडवणारी ताकद असल्याचे सिद्ध होत होते. गेरासिमोव्ह सिद्धांत उत्तम परिणाम साध्य करत होता आणि रशिया न लढताही जिंकत असल्याचे दिसत होते. जेव्हा त्यांनी लढून जिंकणे निवडले, तेव्हा त्यांच्या समस्या सुरू झाल्या.
युद्ध न करता दुसऱ्या देशासाठी हानिकारक ठरणाऱ्या अशा सैन्याच्या कुशल हालचाली करणे एक गोष्ट आहे आणि सर्वांगीण युद्ध करणे ही दुसरी बाब आहे. शीतयुद्धाच्या काळात रशियन आर्मर जुगरनॉटने अमेरिकेसोबत अधिकृतपणे सहयोग करणाऱ्या देशांच्या सैन्याला पुरते भयभीत केले होते; ४८ तासांत युरोपचा सपाट प्रदेश ओलांडून इंग्लिश खाडी ओलांडण्याची त्यावेळी त्यांनी दिली होती; तशाच प्रकारे रशियन रणगाडे युक्रेनला चिरडून टाकतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता- रणगाड्यांच्या आकडेवारीत, रशियाने युक्रेनला ६: १ असे मागे टाकले होते. अनेक रणगाड्यांसह तोफा, क्षेपणास्त्र अशी लष्करी विध्वंसक क्षमता असलेले रशियन सैन्य हे प्रचंड मोठे सैन्य आहे. या सैन्याने हवेत आणि जमिनीवर लढल्या जाणाऱ्या युद्धाच्या यांत्रिकीमध्ये एक निपुण लढाऊ सैन्य म्हणून मोठी प्रतिष्ठा संपादन केली आहे. त्यांच्या हवाई शक्तीद्वारे होणारे बॉम्बहल्ले अथवा डावपेच हेदेखील इतके गोंधळात टाकणारे आहेत, ते नाट्यमयरीत्या उलगडता यायला हवे.
अनेक कारणे असू शकतात, त्यातील प्रत्येकातून एकेक धडा शिकता येईल: अगदी अलीकडेपर्यंत रणभूमीवर कमांडरची अनुपस्थिती असणे, रशियामधून नियोजित आणि दूरस्थपणे लढाया नियंत्रित करणे; सैन्यात मोठ्या प्रमाणावर झालेली भरती (५० टक्के); कमकुवत नेतृत्व- लष्करी मोहिमेच्या नियमित व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नॉन-कमिशन्ड ऑफिसर कॉर्प्सची कमतरता; अनेक धोरणात्मक गृहितके चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली होती, उदाहरणार्थ, रशियन उच्चपदस्थांनी ‘विशेष लष्करी मोहीम’ ही संकल्पना केवळ २०१४ च्या कार्यवाहीचा एक मोठा भाग म्हणून मांडली होती, हे या विश्वासावर आधारित होते की थोडा विरोध होईल, जास्त हिंसाचार नाही- रशियन सैन्याला फक्त युक्रेनियन लोकांना ‘स्वतःची मुक्तता‘ करण्यास मदत करावी लागेल. प्रतिकाराचे प्रमाण, आणि लष्करी कार्यवाहीची जटिलता रशियाला पुरेशी समजली नाही किंवा त्याचे पुरेसे मूल्यांकन त्यांनी केले नाही. रसदीसंबंधातही गफलती झाल्या: रशियन रणगाड्यांमधला गॅस संपत होता; असंरक्षित दळणवळणामुळे संदेशवहन सहज पकडले जात होते. रशियन युद्ध तंत्रात ढोबळ दुर्लक्ष आणि घटउतरती कळा लागल्याची ही सर्व चिन्हे आहेत.
रशियन हवाई दल अजूनही युक्रेनला एक स्पर्धात्मक हवाई अवकाश मानत आहे असे दिसते- त्यांची रणनीती आणि युक्रेनची विमाने कमी उंचीवरून उड्डाण करत आहेत. यावरून असे दिसते की, युक्रेनचे हवाई संरक्षण जाळे अद्यापही अबाधित आहे.
दुसरीकडे, युक्रेनियन नागरिकांनी २०१४ पासून कसून तयारी केली होती आणि प्रशिक्षण घेतले होते. त्यांचे संरक्षण दृढ प्रकारे, चिकाटीने केले गेले आणि त्यात सूसूत्रीकरण होते.
साठ्याची जमवाजमव जलद होती, डावपेच कल्पक होते. युक्रेनचे मूल्य लक्ष्यीकरण उच्च क्रमाचे आहे, ज्यामुळे तब्बल १२ रशियन जनरल्सचा मृत्यू झाला आणि मॉस्कवा ही रशियन क्षेपणास्त्र युद्धनौका बुडाली. युक्रेनने युद्ध सुरू ठेवण्यासाठी ट्रॅक्टर ब्रिगेड्स, फेरफार केलेल्या कारखान्यातील उत्पादनाच्या जागा आणि संरक्षण व्यापार या सगळ्यात अनेक नाविन्यपूर्णता योजल्याचे आपल्याला दिसले आहे. बुद्धिमत्ता, पाळत, नियंत्रण आणि क्षेपणास्त्रांचा अचूक मारा अशी रशियाच्या यंत्रणांची प्रसिद्ध शस्त्रप्रणाली आतापर्यंतच्या युक्रेनविरोधातील माऱ्यात आपण पाहिली नाही— शहरे उद्ध्वस्त करण्यासाठी जड तोफखाना वापरत शत्रूच्या लढाऊ ठिकाणांवर अचूकतेने मारा करणाऱ्या विनाशकारी लष्करी माऱ्यापेक्षा हे खूप वेगळे आहे— अथवा रशियन लोकांना अभिमान असणारे शास्त्रीय डावपेचही दिसले नाहीत. शत्रूचे हवाई संरक्षण दडपून टाकणाऱ्या आणि शत्रूच्या हवाई संरक्षणाचा विनाश करणाऱ्या रशियन हवाई शक्तीचाही अभाव जाणवतो.
रशियन हवाई दल अजूनही युक्रेनला एक स्पर्धात्मक हवाई अवकाश मानत आहे असे दिसते- त्यांची रणनीती आणि युक्रेनची विमाने कमी उंचीवरून उड्डाण करत आहेत. यावरून असे दिसते की, युक्रेनचे हवाई संरक्षण जाळे अद्यापही अबाधित आहे. त्याचप्रमाणे, संयुक्त शस्त्रास्त्रांचे युद्धही तितक्या चांगल्या पद्धतीने अंमलात आणले गेले नाही.
दुसरीकडे, युक्रेनच्या सशस्त्र दलांच्या टेहळणी विमानांनी मात्र तंत्रज्ञानविषयक जादुई कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. उदाहरणार्थ, इलॉन मस्क यांनी दिलेल्या स्टारलिंक टर्मिनल्सचा (एलईओ उपग्रह मांडणीद्वारे सक्षम केलेल्या स्थिर दळणवळणासाठी उच्च माहिती दर उपलब्ध होणे) लाभ करून घेतला. रणगाडे, तोफखाना, हवाई संरक्षणाची आणि इतर रशियन लढाऊ उपकरणे या लढण्याच्या पारंपरिक साधनांपेक्षा शत्रूवर ड्रोन हल्ले करण्यासाठी ही प्रणाली अत्यंत प्रभावी ठरत आहे. तोफखान्यासह लक्ष्य नियुक्त करण्यासाठी ड्रोनवर थर्मल व्हिजन उपकरणे जोडण्याकरता स्टारलिंकचा वापर केला गेला.
स्टारलिंक टर्मिनल्स इतकी सामर्थ्यवान बनली आहेत की, ती आता रशियन प्रतिहल्ल्यांचे केंद्रबिंदू आहेत. रणांगणातील गतिशील आव्हानांना सामोरे जाण्यासाठीही स्टारलिंक्स लक्षणीयरीत्या चपळ आहेत. जगण्या-वाचण्याची क्षमता वाढविण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर्स अद्यवत वेगाने आणली गेली आहेत. टर्मिनल्सचा वापर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी धोरणात्मक दळणवळणासाठीही केला आहे. जागतिक परिषदा, संसद यांसारख्या अनेक लक्ष्यित प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि लोकमत तयार करण्यासाठी; स्थानिक नागरिकांचे संकल्प बळकट करण्यासाठी आणि युद्धात लढणाऱ्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठीही याचा उपयोग केला गेला.
ड्रोन्सची भूमिका पुन्हा महत्त्वाची ठरली आहे. कीव आणि विमानतळाजवळ आलेले रशियन रणगाडे ड्रोन हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त करण्यात आले आणि त्यांना रोखण्यात आले. व्यावसायिक ड्रोन्सनी रशियन तोफखान्याला हल्ल्याची तयारी करताना पाहिले आणि तेथील स्थानिक नागरिकांना सुरक्षित भागात आश्रय घेण्याचा इशारा दिला. बेरक्तार टीबी२ ड्रोन्स हे रशियन रणगाडे, तोफखाना, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे डागली जाण्याची जागा आणि रसद पुरवठ्याला लक्ष्य करण्यासाठी उपयुक्त ठरले. स्विचब्लेड-प्यूमा (रेक ड्रोन) दोन-व्यक्तींच्या संघ संयोजनाने ५-६ किलोमीटर इतक्या सुरक्षित अंतरावरून रशियन रणगाड्यांशी लढणे शक्य झाले. या ड्रोन हल्ल्यांपूर्वी आतमधील चार जणांच्या दलासह रणगाडे असहाय्य ठरले. लहान आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या (लॉइटर, ड्रोन्स, भाले, खांद्यावरून सोडले जाणारे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्री, आणि जॅमर) या संचापुढे रणगाडे, जड तोफखाना आणि हवाई व्यासपीठे आता कुचकामी ठरली आहेत.
याचे उत्तर कदाचित सामरिक-लष्करी कल्पनेच्या अभावामध्ये आहे आणि प्रामुख्याने आकलनविषयक आणि संरचनात्मकदृष्ट्या एकत्रित होत जाणाऱ्या क्षेत्रात सुधारणा हाती घेण्यास जो आपण नकार देत आहोत, त्यात आहे.
रणगाड्यांच्या युद्धाला रणगाडे-विरोधी प्रणाली आणि विविध ड्रोन्सच्या प्राणघातक संयोजनाद्वारे पुन्हा एकदा आव्हान दिले गेले आहे. रणगाडे काही प्रमाणात युद्ध लढण्याचे विसाव्या शतकातील व्यासपीठ आहे, एकविसाव्या शतकातील युद्धभूमीवर रणगाडे त्यांचे स्थान शोधण्याचा प्रयत्न करीत आहे; तात्काळ तांत्रिक सक्षमीकरण झाले नाही, तर या संदर्भातील अडचणी आणखी वाढतील, याचे पुरावे युक्रेन संघर्षातून आपल्याला पुरेसे मिळतात.
आपल्या ताफ्याच्या यादीतील महत्त्वपूर्ण भाग रशियन सैन्यासारखा आहे, हे लक्षात घेता- रशियन सैन्याच्या कामगिरीचा भारतीय सैन्यावर विशेष परिणाम होतो. उपकरणाच्या कार्यक्षमतेसह कृतीसंदर्भातील संकल्पना/रणनीती, तंत्रे आणि प्रक्रियांचे सखोल ऑडिट करणे शहाणपणाचे ठरू शकते.
सैन्याच्या कृतींतून भारतासाठी अनेक निष्कर्ष अगदी सहजरीत्या काढले जाऊ शकतात. ज्यांना जास्त महत्त्व आहे ते पुनरावृत्ती आणि सखोल चिंतन करण्यायोग्य आहे.
आपण आपला संरक्षण खर्च वाढवायला हवा. संघटनात्मक पुनर्रचना (सीडीएस/डीएमए) करताना, आपल्या धोरणात्मक दृष्टिकोनात (बालाकोट, कैलास श्रेणी) सद्य परिस्थितीतील कामगिरीही आपल्या संपादन प्रणालीत नवचैतन्य आणण्यासाठी (लष्करी-शैक्षणिक सहयोग, स्टार्ट-अप्स इत्यादी) अतिशय स्वागतार्ह उपक्रम ठरेल. आपल्या संरक्षण खर्चावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. असे करताना, आपण आता व्यापकरीत्या वापरात नसलेल्या कामकाज प्रणालीपेक्षा उदयोन्मुख तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्याचा विचार करू शकतो.
एकाच वेळी, समतोल साधण्यासाठी आपण आपल्या सामर्थ्याच्या मूल्याचे पुनर्मूल्यांकन करायला हवे. अर्थसंकल्पीय अटींमध्ये (१:३) अमेरिकी लोकांच्या तुलनेत अशाच प्रकारची असंतुलित प्रतिकूलता कशी आणि का आहे?, चिनी अजूनही पेंटागॉनमध्ये विस्थापनाची तीव्र चिंता निर्माण करत आहेत, तर भारत चीनमध्ये अशीच खळबळ का माजवत नाही? याचे उत्तर कदाचित सामरिक-लष्करी कल्पनेच्या अभावामध्ये आहे आणि प्रामुख्याने आकलनविषयक आणि संरचनात्मकदृष्ट्या एकत्रित होत जाणाऱ्या क्षेत्रात सुधारणा हाती घेण्यास जो आपण नकार देत आहोत, त्यात आहे. आपल्याला आपल्या रणगाड्यांच्या ताफ्याला सुसज्ज करणे आणि त्याचा लाभ करून घेणे आवश्यक आहे. फ्युज्ड सेन्सर्स, ड्रोन एकत्रिकरण, सक्रिय संरक्षण प्रणाली आणि अत्याधुनिक परिस्थितीजन्य जागरूकता या उपायांद्वारे यांत्रिक युद्धविषयक सुधारणा तातडीने करणे आवश्यक आहे. आपण आता व्यापकरीत्या वापरात नसलेली कामकाज प्रणाली टाकून देणे आवश्यक आहे.
विचारात आणि लढाऊ सज्जतेत एकरूपता आणण्यासाठी उच्च लष्करी अधिकाऱ्यांसह परिस्थिती मूल्यमापनाचा सर्वसमावेशक सराव व्हायला हवा आणि त्यानंतर तिन्ही-सेवांच्या गटांची विद्यमान धोरणविषयक प्रायोगिक दबाव चाचणी घेतली जाणे नितांत आवश्यक आहे.
पीपल्स लिबरेशन आर्मीच्या पाच थिएटर कमांडपैकी एक असलेल्या वेस्टर्न थिएटर कमांडमधील अत्यंत मजबूत असे संरक्षणात्मक साधन- जे प्रतिस्पर्ध्याला जमीन, समुद्र किंवा हवेच्या क्षेत्रावर कब्जा करण्यापासून किंवा त्यामधून जाण्यापासून रोखण्यासाठी वापरले जाते, त्या चिनी प्रणालीत प्रवेश करण्याचे सामर्थ्य, वास्तव क्षमता आपल्या हवाई दलात आहे का, याची वास्तववादी तपासणी करणे योग्य ठरेल. आधुनिक संघर्षात ड्रोन हे भविष्य असल्याचे दिसते. एका सुविचारित, एकात्मिक उपक्रमाचा भाग म्हणून, लष्कराच्या व्यवहार विभागाने तिन्ही सेवांमध्ये ड्रोन्स आणि संबंधित तंत्रज्ञानाचा समावेश करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून तिला चालना द्यायला हवी. त्याच बरोबर, भारतीय सैन्याचे डिजिटल लढ्यात संक्रमण होणे खूप लांबले आहे. त्याकरता क्लाउड आणि माहिती उपक्रम प्रणाली त्वरित तयार करणे आवश्यक आहे. खासगी क्षेत्रातील प्रतिभा, चपळता आणि तांत्रिक कौशल्ये यांचा केवळ आपल्या क्षमता निर्माण/अधिग्रहण प्रणालीमध्येच नव्हे तर आपल्या युद्धासंबंधीच्या संरचनांमध्येही नव्याने परिचय होणे आवश्यक आहे. सर्वात अलीकडील संघर्षांमधील एक स्पष्ट दिसून आलेली कमतरता म्हणजे राजकीय नेतृत्व आणि सर्वोच्च पदांवरील लष्करी व्यक्ती यांच्यात वैचारिक अंतर आहे. विचारात आणि लढाऊ सज्जतेत एकरूपता आणण्यासाठी उच्च लष्करी अधिकाऱ्यांसह परिस्थिती मूल्यमापनाचा सर्वसमावेशक सराव व्हायला हवा आणि त्यानंतर तिन्ही-सेवांच्या गटांची विद्यमान धोरणविषयक प्रायोगिक दबाव चाचणी घेतली जाणे नितांत आवश्यक आहे.
डिजिटल स्वरूपातील थिएटर कमांड्स तत्परतेने स्थापित करणे आवश्यक आहे; कमांड आणि एकात्मिक मोहिमांची एकता संस्थात्मक करणे आवश्यक आहे. आम्हाला वाळूच्या प्रारूप खोल्यांमधील प्रात्यक्षिके/कामकाजविषयक चर्चांपासून दूर जाऊन मोठ्या सैन्यासह सराव करण्याची गरज आहे. संयुक्त पद्धतीने मोठ्या प्रमाणावर व्यामिश्र योजनेचे गुप्त पद्धतीने काळजीपूर्वक आयोजन करणे हे एक विलक्षण आव्हान आहे- हा युक्रेन संघर्षामधून शिकावयाच्या मुख्य धड्यांपैकी एक आहे. नमूद केलेल्या परिमाणात स्वतःच्या तयारीची चाचणी घेणे आता लढाऊपणासाठी अनिवार्य आहे.
सैद्धांतिक दृष्टीने, भारतीय सैन्याने काय करायला हवे? भारताने सामरिक स्पर्धा, युद्ध न करता दुसऱ्या देशासाठी हानिकारक ठरणाऱ्या अशा सैन्याच्या कुशल हालचाली करणे, मर्यादित युद्धे किंवा सर्वांगीण संघर्ष कशावर लक्ष केंद्रित करावे? याचे साधे उत्तर आहे की, आपण स्पर्धेत आणि संघर्षातही तितकेच प्रवीण असणे आवश्यक आहे. होय, सर्वात प्रभावी वापर, संघटनात्मक पुनर्रचना, अर्थसंकल्पीय प्राधान्यक्रम, तंत्रज्ञानाचा लाभ इत्यादींद्वारे शत्रूचे आणि धोक्यांचे चलाखीने असमान संतुलन साधून आपण बरेच काही करू शकतो. मात्र, विविध प्रकारे सज्ज राहणे अटळ आहे.
हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Lt Gen Raj Shukla a recently retired Army Commander has an enviable operational service / record spanning forty three years. He also has an abiding ...
Read More +