हेन्री किसिंजर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात तर वादग्रस्त होतेच पण त्यांचा मृत्यूही तितकाच वादग्रस्त ठरला. त्यांच्यावर लिहिले गेलेले मृत्युलेख त्यांच्या कामाबद्दल आणि जगभरातील लोकांच्या निर्माण झालेल्या मतांच्या उत्कटतेचं टोक प्रतिबिंबित करतात. शैक्षणिक जगापासून ते धोरण जगतापर्यंत, सार्वजनिक विचारवंतांपासून मुत्सद्द्यांपर्यंत, पत्रकारांपासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या उत्साही लोकांपर्यंत - गेल्या अनेक दशकांपासून मुत्सद्देगिरी आणि राज्यकलेच्या जगावर विराजमान असलेल्या व्यक्तिमत्त्वासाठी प्रत्येकाची काही मतं आहेत. विशेषतः आजकाल प्रत्येक व्यक्तीचं मत असतं. अशात किसिंजरवर मत व्यक्त करणं कदाचित सर्वात सोपी गोष्ट आहे. आणि लोक त्याचा आस्वादही घेत आहेत.
हेन्री आल्फ्रेड किसिंजरची निंदा केली काय आणि त्यांना चांगलं म्हटलं काय, हे कोणालाच नाकारता येणार नाही की ते सर्वात प्रभावशाली पाश्चात्य मुत्सद्दी होते, ज्यांनी शीतयुद्धाला आकार दिला. त्यांनी ज्या प्रकारे याची रचना केली ते पाहता आजवरच्या जागतिक राजकारणाचा पाया रचला गेला. जुलै महिन्यात वयाची शंभरी गाठलेल्या कीसिंजर यांना चीनने निमंत्रण दिलं होतं. यावरून दिसतं की शक्तीच्या शिखरावर असलेल्या चीनने देखील मान्य केलंय की बिडेन प्रशासनाशी चर्चेचे मार्ग खुले करायचे असतील तर किसिंजरचा असामान्य प्रभाव कायम आहे.
विशेष म्हणजे या मुत्सद्दी व्यक्तीने 46 वर्षांपूर्वी आपलं पद सोडलं होतं. अमेरिकेत किसिंजर यांचा प्रभाव पक्षीय राजकारणापेक्षा वरचढ होता. सर्व प्रशासनाकडून त्यांची मतं जाणून घेतली जायची. शिवाय सर्व प्रमुख नेते त्यांचं ऐकत होते. अलीकडच्या काळातील नेत्यांनी त्यांना किती गांभीर्याने घेतलं हा वेगळा मुद्दा असला तरी वयाच्या 100 व्या वर्षीही त्यांची स्टार पॉवर कमी झाली नव्हती. आपल्या मूळ मुद्द्याला धरून बोलण्याच्या स्वभावाने आणि चपखल निरीक्षणांनी चकित करण्याची क्षमता त्यांच्यात कायम होती. बातम्यांमध्ये सतत चर्चेत राहण्याच्या त्यांच्या विलक्षण क्षमतेमुळे ते शेवटपर्यंत टिकून होते. त्यांचा राजकीय वारसदार म्हणून हिलरी क्लिंटन आणि जेम्स बेकर यांच्याकडे पाहिलं जायचं. ते त्यांना द्वितीय विश्वयुद्धानंतरचे महान परराष्ट्र सचिव मानतात.
किसिंजरसाठी यांच्यासाठी सत्ता म्हणजे सर्वकाही होतं. हा सत्तेचा शोध त्यांनी स्वतःसाठी असो, आपल्या राष्ट्रासाठी असो, तो अशा दिशेने नेला जिथे त्यांना संघर्ष करावा लागला. परंतु विचारधारा किंवा नैतिकतेच्या बंधनांशिवाय स्थिरता आणि सुव्यवस्थेचा शोध हाच तो आधार राहिला ज्याभोवती त्यांनी स्वतःचे राजनैतिक आणि बौद्धिक साम्राज्य उभे केले होते. त्यांनी केलेल्या युक्तिवादाप्रमाणे, "सत्तेच्या संतुलनाचे व्यवस्थापन हा कायमस्वरूपीचा उपक्रम आहे, हा लगेचच संपणाऱ्या कष्टाचा भाग नाहीये."
शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनबरोबरचे धोरण, चीनशी संबंध, 1973 च्या अरब-इस्त्रायली संघर्षाची समाप्ती आणि पॅरिस शांतता करार यामध्ये त्यांचा सहभाग दिसला. यामुळे अमेरिकेने विविध लष्करी राजवटींद्वारे मानवी हक्कांच्या गंभीर उल्लंघनाकडे डोळेझाक केली. चिली, अर्जेंटिना ते पाकिस्तानपर्यंत जगातील विविध भागांतील लष्करी बलाढ्य शक्तिंकडे अनेकदा दुर्लक्ष केलं. किसिंजरच्या अशा धोरणात्मक निवडीमुळे जगातील बर्याच लोकांसाठी ते आघाडीचे युद्ध गुन्हेगार बनले.
किसिंजर यांचा वास्तविक राजकीय दृष्टिकोन वेगळा वाटू शकतो परंतु त्यांनी असा दृष्टिकोन स्पष्टपणे मान्य करण्यापेक्षा त्यांच्या धोरण निवडींची माहिती दिली. बिस्मार्क आणि मेटर्निचचे विद्यार्थी या नात्याने, किसिंजर हे स्पष्टपणे सांगत की परराष्ट्र धोरण प्रभावी होण्यासाठी भावनेवर नव्हे तर सामर्थ्याच्या मूल्यांकनावर भर असला पाहिजे. जागतिक आव्हानांना आदर्शवादी निकषांचा पाठपुरावा करण्याऐवजी शक्तीच्या सतत विकसित होत असलेल्या समतोलामध्ये पूर्ण सहभागाची आवश्यकता आहे. ते स्पष्ट म्हणायचे की, ज्या देशाने आपल्या परराष्ट्र धोरणात नैतिक परिपूर्णतेची मागणी केली आहे तो देश कधीच सुरक्षितता प्राप्त करणार नाही.
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यासोबत किसिंजरची ही वास्तववाद-प्रेरित भागीदारी होती. जॉर्ज सी हेरिंग यांच्या मते, किसिंजरचं परराष्ट्र धोरण हे कधी धाडसी, कधी कल्पनारम्य, कधी कच्चं तर कधी सुधारित, तर कधी अंमलबजावणीत हुशार, कधी गोंधळात टाकणारं असं होतं. परंतु लष्करी शक्तीच्या वापरात वारंवार निर्दयीपणा दाखवणारं असं होतं. त्या काळात जागतिक व्यवस्थेत झालेल्या परिवर्तनवादी बदलांमुळे जग अजूनही आकाराला येत आहे.
किसिंजर यांनी चीन-सोव्हिएत युती तोडण्याची गरज ओळखली आणि अमेरिकेच्या बाजूने शक्ती संतुलन बदलून शीतयुद्धाचा मार्ग अवलंबला. शीतयुद्ध 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला संपले असेल पण किसिंजर यांनी 1970 च्या दशकात त्याची बीजे पेरली होती. आजच्या मध्यपूर्वेची स्थिती देखील किसिंजर यांच्या राजनैतिक धोरणातून झालेली आहे. कारण त्यांनी प्रादेशिक सुरक्षेसाठी अमेरिका महत्वाची आहे असं सांगण्याचं काम तर केलंच पण त्याचबरोबर त्यादृष्टीने प्रयत्न देखील केले.
शी जिनपिंग म्हणाले होते की, "चीन आणि युनायटेड स्टेट्सचे संबंध कायमचे 'किसिंजर' या नावाशी जोडले जातील." आणि त्यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन इस्रायलमध्ये प्रवास करत होते. ते म्हणाले की, "काही लोक इतिहासाचे चांगले विद्यार्थी होते. अगदी हेन्री किसिंजरपेक्षा फार कमी लोकांनी इतिहासाला आकार देण्यासाठी काम केलं." समकालीन जागतिक राजकारणावर किसिंजरचा ओव्हरहॅंग मोठा होता. किसिंजरच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने केलेल्या निवडींचे परिणाम अमेरिका आणि जग अजूनही स्वीकारत आहेत.
ऑक्टोबरमधील त्यांच्या शेवटच्या सार्वजनिक भाष्यात त्यांनी सुचवले होते की, आजची आव्हाने पाहता अमेरिकेने "आपण कुठे जात आहोत, पक्षपातळीवर आणि राजकीय मतभेदांद्वारे तिथे कसे पोहोचायचे आहे याची संकल्पना विकसित केली पाहिजे." हे थोडे शैक्षणिक वाटू शकते परंतु आज अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये स्पष्टतेचा अभाव असल्याचं किसिंजर सांगतात.
आणि शेवटी त्यांचा सर्वात मोठा वारसा असू शकतो. कारण जागतिक व्यवस्थेला आकार देण्यासाठी त्यांनी आपल्या मर्यादेकडे सतर्क राहून मूर्त परिणाम साध्य करण्यासाठी मुत्सद्देगिरीचा प्रभावीपणे वापर केलाय.
हा लेख मूळतः NDTV मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.