Author : Aditya Bhan

Published on Oct 20, 2023 Commentaries 0 Hours ago

अभिनव तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये पाकिस्तानचे स्वारस्य लक्षणीय असले तरी, भारताकडे संख्यात्मक श्रेष्ठता आणि अधिक चांगली क्षमता असल्याचे अरबी समुद्रात पार पडलेल्या सरावाच्या वेळी दिसून आले.

भारतीय नौदलाच्या अरबी समुद्रातील सरावाची पाकिस्तानला सतर्कता

अलिकडच्या वर्षांतील कार्यक्षमतेच्या सर्वात व्यापक प्रदर्शनात, भारतीय नौदलाने गेल्या महिन्याच्या सुरुवातीला जो सराव केला, त्याचे वर्णन “अरबी समुद्रात ३५ हून अधिक विमाने समन्वितरीत्या तैनात केली” असे करता येईल. या मोहिमेत दोन विमानवाहू युद्धनौका, अनेक युद्धनौका, पाणबुड्या आणि हिंदी महासागरातील चीनची वाढती घुसखोरी लक्षात घेता, ३५ पेक्षा अधिक लढाऊ विमाने समाविष्ट होती.

हा सराव म्हणजे हिंदी महासागराच्या क्षेत्रात आणि त्यापलीकडे- भारतीय नौदलाच्या वाढीव सागरी सुरक्षेच्या शोधातील आणि बळ दाखवून देण्याच्या क्षमतेतील एक प्रमुख मैलाचा दगड आहे. मात्र, भारतीय नौदलाच्या सामरिक गुणवत्तेचे खरोखर कौतुक करताना, अलिकडच्या वर्षांत पाकिस्तान नौदलाने आपल्या भूपृष्ठावरील ताफ्यात केलेली वाढही लक्षात घ्यायला हवी.

पाकिस्तानची उभारणी

भारताच्या सागरी वर्तुळात पाकिस्तानच्या पाणबुडी संपादन करण्याच्या योजनांची वरचेवर चर्चा होत असताना, हिंदी महासागरात आपल्या नौदलाची क्षमता वाढवण्याची महत्त्वाकांक्षा पाकिस्तान नव्याने दाखवून देत आहे, त्यांनी आपल्या नौदलाच्या भूपृष्ठावरील ताफ्यात केलेल्या वाढीने भारतीय नौदलाचे लक्ष वेधले आहे.

हा सराव म्हणजे हिंदी महासागराच्या क्षेत्रात आणि त्यापलीकडे- भारतीय नौदलाच्या वाढीव सागरी सुरक्षेच्या शोधातील आणि बळ दाखवून देण्याच्या क्षमतेतील एक प्रमुख मैलाचा दगड आहे.

उदाहरणार्थ, झुल्फिकार-प्रवर्गातील फ्रिगेट्स युद्धनौका- जिला एफ-२२पी फ्रिगेट्सही म्हणतात- जी पाकिस्तान नौदलात २००९ मध्ये दाखल झाली होती. पीपल्स लिबरेशन भूदल-नौदलाद्वारे संचालित, २२००-२५०० टन वजनाच्या- चिनी प्रवर्गातील ०५३एच३ फ्रिगेटवर प्रारूप केलेल्या, या युद्धनौका पाकिस्तानच्या नौदलासाठी नंतर तयार करण्यात आलेल्या तुघ्रिल-प्रवर्गातील (चिनी पद्धतीच्या ०५४ए) फ्रिगेट्सच्या आधीच्या आहेत. पाकिस्तान नौदलात सध्या चार झुल्फिकार-प्रवर्गातील फ्रिगेट्सचा समावेश
आहे. त्यातील पहिल्या तीन युद्धनौकांची उभारणी चीनमध्ये केली गेली आहे आणि पाकिस्तानी नौदलाच्या असलत या उर्वरित युद्धनौकेची उभारणी तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाद्वारे पाकिस्तानमध्ये केली गेली आहे (आकृती १ पाहा). त्यांची रचना कोणत्याही विशिष्ट भूमिकेसाठी करण्यात आलेली नाही, या विविध प्रकारच्या मोहिमांसाठी क्षेपणास्त्रे तैनात केलेल्या- ज्यांचा मार्ग उड्डाणादरम्यान बदलता येऊ शकतो अशा फ्रिगेट्स आहेत, पाणबुडीविरोधी युद्धात तसेच भूपृष्ठविरोधी युद्धात- कोणतेही शस्त्र, सेन्सर्सद्वारे करण्यात येणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी आणि हल्ल्यांचा प्रभाव मर्यादित करण्यासाठी अशा फ्रिगेट्स वापरल्या जातात. त्या हवाई संरक्षणाकरताही वापरल्या जाऊ शकतात.

आकृती १: फेब्रुवारी २०१८ मध्ये सौदी अरेबियाला सदिच्छा तसेच प्रशिक्षण भेटीवर गेलेली पाकिस्तान नौदलाची युद्धनौका असलत

Source: Business Recorder

तांत्रिकदृष्ट्या उत्तम, चार हजार टन विस्थापित करणाऱ्या तुघ्रिल-प्रवर्गातील स्टेल्थ फ्रिगेट्समध्ये विविध मोहिमांकरता आवश्यक असणारी सर्व वैशिष्ट्ये आहेत, यांत वर्धित हवाई संरक्षण क्षमताही समाविष्ट आहे. यांपैकी तुघ्रील आणि तैमूर या दोन युद्धनौका २०२२ मध्ये पाकिस्तानी नौदलात दाखल झाल्या, आणि उर्वरित टिपू सुल्तान आणि शाहजहाँ या दोन युद्धनौका मे २०२३ मध्ये पाकिस्तान नौदलात दाखल झाल्या

(चित्र २ पाहा).
आकृती २: जून २०२३ मध्ये औपचारिक भेटीवर कोलंबो बंदरावर आलेली पाकिस्तान नौदलाची युद्धनौका टिपू सुल्तान

Source: Colombo Gazette

अलीकडेच लेखकाने लिहिलेल्या एका भाष्यपर लेखात याची चर्चा केली होती की, तुघ्रील प्रवर्गातील युद्धनौका- चीनने हवाई संरक्षण तसेच भूपृष्ठविरोधी युद्धात क्षमता दोन्ही वाढवण्यासाठी विकसित केल्या होत्या. या युद्धनौकांमध्ये लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, सुधारित रडार यंत्रणा आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध संच आणि सेन्सर्स बसविण्यात आले आहेत. पाकिस्तान नौदलाच्या मिल्गेम/जिना-प्रवर्गाच्या कॉर्वेट्स, गस्ती जहाजे (ओपीव्ही १९००), आणि सीएच-४ मध्यम-उंचीच्या लांब- दीर्घकाळ क्षमतेच्या ड्रोन्ससह कार्यान्वित केल्यावर, सागरी युद्धादरम्यान तटीय संरक्षण आणि शत्रूची समुद्राचा वापर करण्याची क्षमता नाकारण्यापुरते आपले धोरण मर्यादित न ठेवता, तुघ्रिल-प्रवर्गाच्या युद्धनौका दाखल करण्याचा उद्देश हिंदी महासागर क्षेत्रात पाकिस्तानी नौदलाचा ठसा वाढवण्यावर आहे.

अरबी समुद्रातील कवायती

भव्य प्रमाणात झालेला हा सराव भारतीय नौदलाची विमानवाहू युद्धनौका विक्रमादित्य आणि अलीकडेच दाखल झालेली विक्रांत युद्धनौका यांच्या प्रमुख आधारावर यशस्वी झाला. या आघाडीच्या युद्धनौकांनी मिग- २९के लढाऊ विमाने (आकृती ३ पहा) आणि एमएच६०आर, कामोव्ह आणि प्रगत हलक्या वजनाची हेलिकॉप्टर्स यांसारख्या विविध प्रकारच्या विमानांसाठी ‘मोबाइल एअरफील्ड’ म्हणून काम केले.

आकृती ३: या भव्य सरावात दोन विमानवाहू युद्धनौका, अनेक युद्धनौका, पाणबुड्या आणि ३५ पेक्षा अधिक लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला होता.

Source: Hindustan Times

सागरी क्षेत्रात भारताची तांत्रिक कुशाग्रता दर्शवून, युद्धनौका, पाणबुड्या आणि विमानांच्या विविध लढाऊ ताफ्यासह कार्यरत असलेल्या दोन विमानवाहू युद्धनौकांचे सुरळीत एकीकरण या कवायतींमध्ये दिसून आले. उल्लेखनीय बाब अशी की, सप्टेंबर २०२२ मध्ये स्वदेशी बनावटीची विक्रांत ही युद्धनौका भारतीय नौदलात समाविष्ट झाल्यानंतर या दोन विमानवाहू युद्धनौकांसोबत पहिल्यांदाच या भव्य कवायती करण्यात आल्या होत्या (चित्र ४ पाहा).

आकृती ४: भारतीय नौदलाच्या दोन्ही विमानवाहू युद्धनौका- समान लांब पल्ल्याची रडारे, समान लढाऊ विमाने, सेन्सर्स आणि साजेसे विमान वाहतूक संकुल अशा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कार्यान्वित आहेत.

Source: The Tribune

या कवायतींनी भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकांना हिंदी महासागर क्षेत्रात आणि त्यापलीकडे असलेल्या व्यापक क्षेत्रात स्थित करण्याची लवचिकता प्रमाणित केली. यामुळे वर्धित कार्यान्विततेसाठी आवश्यक तिथे त्या हलवणे आणि निर्देशित करणे सोपे बनले आहे, त्यांच्याद्वारे उदयोन्मुख आव्हानांना त्वरित प्रतिसाद देत, जगभरातील भारतीय हितांचे संरक्षण करण्यासाठी हवाई शक्ती सतत तैनात करण्याची क्षमता भारताला प्राप्त झाली आहे; समुद्र क्षेत्रावरील नियंत्रण टिकवून ठेवण्यासाठी समुद्र-आधारित हवाई शक्तीच्या आवश्यक आणि महत्त्वाच्या गुणवत्तेचा हा एक खात्रीलायक पुरावा आहे. या संदर्भात, भारतीय नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल यांनी समर्पकपणे नमूद केले की, भारताच्या गरजा आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन, सुरक्षाविषयक रचना मजबूत करत असताना, ‘राष्ट्राच्या संरक्षण धोरणाला आकार देण्यासाठी आणि प्रादेशिक स्थिरतेला प्रोत्साहन देण्यासाठी विमानवाहू युद्धनौकांचे महत्त्व सर्वोच्च राहील.’

निष्कर्ष

पाकिस्तानने आपल्या नौदलाच्या भूपृष्ठावरील लढाऊ ताफ्यात केलेली वाढ लक्षणीय असली तरी, प्रादेशिक नियंत्रणापलीकडच्या महासागराच्या खुल्या भागावर भारतीय नौदलाच्या असलेल्या नियंत्रणाला विश्वासार्ह आव्हान देण्याइतपत पाकिस्तानी नौदलाच्या ताफ्यातील संख्या आणि क्षमता अद्याप पुरेशी नाही. जरी अभिनव तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये पाकिस्तानी नौदलाचे स्वारस्य लक्षणीय असले तरी, भारतीय नौदलाकडे संख्यात्मक श्रेष्ठता आणि अधिक चांगली क्षमता असल्याचे अरबी समुद्रात पार पडलेल्या सरावाच्या वेळी दिसून आले.

कौशल्यपूर्ण प्रदर्शनाने भारताच्या राष्ट्रीय हितांचे संरक्षण, प्रादेशिक स्थिरता जपण्यासाठी आणि सागरी क्षेत्रात सहयोगी संबंध वाढवण्याची भारताची वचनबद्धता अधोरेखित केली.

आपल्या सर्व वाढत्या महत्त्वाकांक्षांसाठी, म्हणून, पाकिस्तान नौदल दीर्घकाळापासून बचावात्मक शक्ती राहिले आहे आणि नजीकच्या भविष्यातही ते असेच राहील. पाकिस्तानी सागरी हितसंबंधांचे रक्षण करणे, समुद्री आक्रमणास प्रतिबंध करणे, आपत्ती निवारण करणे, किनारी समुदायांच्या विकासात सहभागी होणे आणि सागरी व्यवस्था चोख राखण्यासाठी जागतिक प्रयत्नांमध्ये योगदान देणे ही उद्दिष्टे लक्षात घेता, पाकिस्तानी नौदलाच्या दृष्टिकोनाचा गाभा त्यांच्या विरोधी शक्तीला कार्यान्वित क्षेत्रात प्रवेश करण्यापासून रोखण्याची क्षमता वाढवण्याकडे राहील. तुघ्रिल प्रवर्गातील व्यासपीठाचा वापर करून शत्रूला सीमेवर रोखणे व शक्य तितक्या अधिक काळ शत्रूशी लढणे आणि शत्रूला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाकारणे हे त्यांचे लक्ष्य असेल. असे असले तरी, भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाच्या सागरी रणनीतीतील बदलाचे निरीक्षण करायला हवे, कारण पाकिस्तानने अलिकडच्या वर्षांत तटीय संरक्षण आणि युद्धादरम्यान शत्रूची समुद्राचा वापर करण्याची क्षमता नाकारण्यापुरते आपले धोरण मर्यादित न ठेवता, ते हिंदी महासागराच्या क्षेत्रात वाढीव आणि चिरस्थायी उपस्थितीची आकांक्षा बाळगू लागले आहेत. पाणबुड्या आणि क्षेपणास्त्रे वाहून नेणाऱ्या सागरी गस्ती विमानांचे वर्चस्व राखण्याच्या आक्षेपार्ह सागरी नकारात्मक धोरणाचा अवलंब करून, आता हिंदी महासागराच्या क्षेत्रात उच्च विस्थापनाच्या आणि आवश्यक त्या क्षमतेच्या भूपृष्ठावरील युद्धनौका नियमितपणे नव्याने दाखल करण्याच्या प्रक्रियेसह सैन्य तैनात करण्याच्या वाढत्या बळाचे प्रदर्शन करण्याच्या दिशेने पाकिस्तानची तयारी सुरू आहे.

आदित्य भान हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे फेलो आहेत.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.