Author : Sabrina Korreck

Published on Feb 10, 2020 Commentaries 0 Hours ago

कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्जयासारख्या चौथ्या औद्योगिक क्रांतीतील तंत्रज्ञानाने नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे.

नोकऱ्यांचे भविष्य काय?

चौथ्याऔद्योगिक क्रांतीशी संबंधित उगवत्या तंत्रज्ञानामुळे कामाचे मूलभूत स्वरूप बदलते आहे. त्यामुळे एकंदरितच आमूलाग्र सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडत आहे. कामाचे स्वरुप कसे बदलत आहे, किती आणि कोणत्या प्रकारच्या नोकर्‍या तयार होत आहेत किंवाकिती नोकऱ्या गायब झाल्या आहेत?या नव्या युगात कोणती नवीन कौशल्ये आवश्यक असतील आणि कार्यक्षेत्र कसे बदलत आहे? या प्रश्नांच्याभोवती चर्चा घडायला हव्यात.

या सगळ्यामुळे भारतासारख्या विकसनशील आणि उदयोन्मुख देशांसाठी आणखी एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे या सगळ्याचा अनौपचारिक रोजगारावर होणारा परिणाम. जिथे अनौपचारिक कार्यक्षेत्र हा देशाचा ‘आर्थिक कणा’ आहे, अशा भारतासारख्या देशात या तंत्रज्ञानाचा काय परिणाम होईल, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात आला आहे.

पारंपारिक अनौपचारिक रोजगार

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT)  यासारखे चौथ्या औद्योगिक क्रांतीतील तंत्रज्ञान भारतीय अर्थव्यवस्थेच्या संघटित क्षेत्रात, विशेषत: भांडवलकेंद्रीत उद्योगांमध्ये तसेच आर्थिक, कायदा क्षेत्रात , माहिती तंत्रज्ञान आणि बीपीओ सेवा या विशिष्ट क्षेत्रांमध्ये अवलंबण्यात येण्याची शक्यता आहे. तथापि, बहुतेक भारतीय कर्मचारी अनौपचारिक नोकरी करतात, ज्याची परिभाषा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) राष्ट्रीय कामगार कायदा, आयकर, सामाजिक संरक्षण किंवा काही विशिष्ट रोजगाराच्या पात्रतेच्या अधीन नसलेले रोजगार संबंध अशी केली आहे.

भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भरभराट आणि वार्षिक वाढीचे प्रमाण उच्च असूनही, अनौपचारिक क्षेत्राचे आकारमान सुमारे ९०% स्तरावर कायम आहे. अनौपचारिक रोजगाराचे प्रमाण विशेषतः तरुणांमध्ये, ग्रामीण भागात आणि कृषी क्षेत्रात जास्त आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीतील तंत्रज्ञानाचा प्रामुख्याने या नोकऱ्यांवर परिणाम होणार नाही, कारण आर्थिक भांडवल, पायाभूत सुविधा आणि आवश्यक कौशल्ये यांच्या कमतरतेमुळे या कामात अंगमेहनतीच्या श्रमांना अधिक महत्व असते.

गिग अर्थव्यवस्थेतील अनौपचारिकतेचे नवीन प्रकार

गेल्या दशकात  घडलेला आणखी एक मोठा तांत्रिक विकास म्हणजे, नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांना जोडण्यासाठी उदयाला आलेली  विविध डिजिटल व्यासपीठे. सर्वासाधारण कामगारांपासून ते उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांसाठी नोकऱ्यांची पूर्तता या डिजिटल व्यासपीठांवर होऊ लागली. अशा प्रख्यात डिजिटल व्यासपीठांमध्ये ओला आणि उबर या टॅक्सी सेवांचा,  फ्रिलान्स कामासाठी (आपल्या कौशल्यांचा वापर करून स्वतंत्र काम करणे) अपवर्क (Upwork), विविध स्थानिक सेवा सुविधा प्रदात्यांच्या सुविधांचा (उदा. फिटनेस ट्रेनर, सुतार, केशभूषाकार, स्वच्छता कामगार) लाभ घेण्यासाठी अर्बनक्लॅप, सल्लामसलतसाठी ‘फ्लेक्सिंगइट’ आणि छोट्या कामांसाठी ‘ऍमेझॉन मॅकेनिकल टर्क’ समावेश उदाहरण म्हणून करता येईल.

नोकऱ्यांसाठीच्या डिजिटल व्यासपीठांच्या उदयाबरोबरच रोजगाराचे नवे पर्याय विकसित होत आहेत, जे पारंपारिक रोजगारापेक्षा वेगळे आहेत, या कामाची व्याख्या असे काम जे पूर्णवेळ, अनिश्चित आहे आणि कर्मचारी आणिनोकरी देणारा यांच्यातील संबंधांचा एक भाग आहे. “गिग वर्क” म्हणजेच विशिष्ट कालावधीसाठी केलेले काम किंवा नोकरी, असे काम करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. हाच वाढता कल भविष्यातील नोकऱ्यांचे वैशिष्ट्य दर्शवतो.

हे अपारंपारिक रोजगार खालील प्रकारे पारंपारिक कामांच्या प्रणालीपेक्षा वेगळे आहेत:

>रोजगार हा कायमस्वरूपी नाही: कामगारांना तात्पुरती नोकरी दिली जाते. केवळ ठराविक, सामान्यत: अल्प मुदतीच्या किंवा विशिष्ट प्रकल्पाच्या लांबीसाठी करार केला जातो.

>रोजगार पूर्ण-वेळ नसतो: कामगार अर्धवेळ किंवा ऑन-कॉल रोजगार (या कर्मचाऱ्यांना गरज भासेल तेव्हाच कामावर बोलावले जाते) घेतात आणि बर्‍याचदा ते एका संस्थेसाठी पूर्णवेळ काम करण्याऐवजी अशा अनेक नोकर्‍या एकत्र करतात.

>रोजगार थेट परस्पर संबंधातून होत नाही: त्याऐवजी बहुपक्षीय रोजगार संबंध (कामगार समूह किंवा मध्यस्थांच्या मार्फत काम मिळते) आणि मोठ्या प्रकल्पाचा भाग म्हणून कंपनीसाठी काम पार पाडणे अधिक साहजिक झाले आहे.

>रोजगार थेट कर्मचारी आणि नोकरी देणारा यांच्या संबंधातून होत नाही. मोठ्या संख्येने लोक स्वतःला स्वयंरोजगारित आणि स्वतंत्ररित्या काम करणारे मानत आहेत. तथापि, छुपा रोजगार आणि कोणावर तरी अवलंबून असलेला स्वयंरोजगार ही ‘गिग अर्थव्यवस्थेत’ वारंवार समोर येणारी स्थिती आहे. जर कामगार एक किंवा काही ग्राहकांची कामे करत असतील, तर जे त्यांच्या कामावर बारकाईने लक्ष देत असतील आणि ते कामगाराचे उत्पन्नाचे स्रोत असतील तर त्या कामगारांचे ‘स्वयंरोजगारित’ म्हणून वर्गीकरण करणे चुकीचे आहे.

रोजगाराचे हे नवीन प्रकार अनौपचारिकतेचे उच्च प्रमाण दर्शवितात. कायमस्वरुपी कर्मचार्‍यांवर अवलंबून राहण्याऐवजी डिजिटल व्यासपीठांमुळे व्यवसायांना कामगार म्हणून प्रवेश मिळू शकतो. नवीन पद्धतीत मागणीनुसार कामे करण्यासाठी ते कामगारांना ऑनलाइन पद्धतीने रुजू करतात आणि काम झाल्यावर त्यांना पैसे देतात. विशेषतः स्टार्टअप्स आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी ठेवण्यासाठी बरेचसे काम आउटसोर्स करतात. कामगारांना थेट कामावर ठेवण्याऐवजी लोकांचे कौशल्य कामाला लावण्याची प्रक्रिया ही स्वस्त नवीन पद्धत वापरून कंपन्यांवर दबाव येत नाही, परंतु त्यामुळे कामगार संरक्षण देखील कमी होते.

आता “स्वतंत्र कंत्राटदार” म्हणून वर्गीकृत केले गेलेले कामगार नियमित कर्मचारी म्हणून समान लाभ (उदा. आरोग्य विमा, आजारी आणि सुट्टी वेतन, कौटुंबिक पाने) मिळविण्यास पात्र नाहीत. सुरक्षेची कमी आणि भेदभाव आणि जुलूम यांच्यापासून संरक्षण नसल्याने अनौपचारिकता दिसून येते.

भारतीय गिग अर्थव्यवस्थेच्या व्याप्ती आणि विकासाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी, त्यामुळे अपारंपारिक नोकऱ्यांची संख्या वाढत आहे. ही व्यवस्था रोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी निर्माण करते, विशेषतः तरुणांसाठी. तथापि, ‘गिग वर्कचा’ जसजसा आदरयुक्त व्यवसायांमध्ये जम  बसत जाईल, तसा पारंपारिक रोजगाराची जागा अपारंपारिक रोजगार घेईल. परिणामी, औपचारिक क्षेत्राचे अनौपचारिक क्षेत्रात होणारे रूपांतर आपण पाहू शकतो, ज्याचा अर्थ असा होतो की अनौपचारिकता कमी होण्याऐवजी वाढत जाईल.

अनौपचारिकतेचा अर्थ आणि सामाजिक-आर्थिक विकासावर त्याचे संभाव्य परिणाम विवादास्पद आहेत. मॅक्रो अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काहीजण असा तर्क करतात की अनौपचारिक क्षेत्र वाढीसाठी आणि नोकरीनिर्मितीसाठी एक इंधन  ठरू शकते.कारण औपचारिक आणि अनौपचारिक कंपन्यांमध्ये घनिष्ट संबंध आहेत, ज्यामुळे ते एकमेकांना फायदेशीर ठरतात. मायक्रो अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून रोजगाराच्या नवीन प्रकारामुळे कुठे आणि केव्हा काम करायचे हे ठरविण्यास स्वातंत्र्य कर्मचाऱ्यांना मिळते. शिवाय, काहींचा असा विश्वास आहे की गिग अर्थव्यवस्था मुबलक उद्योजकीय संधी देते आणि प्रयोगासाठी एक क्षेत्र उपलब्ध करुन देते, ज्यामुळे कामगारांना उत्पन्नाची कमी भरून काढता येते आणि विविध नोकऱ्यांचे रूपांतर करिअर मध्ये करता येते.

तर दुसऱ्या बाजूला, अनौपचारिकतेचा व्यक्ती, कंपन्या आणि समाज यांच्यावर नकारात्मक प्रभाव पडतो.  काही कंपन्या अनौपचारिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना काम आऊटसोर्स करून आपला खर्च कमी करतात. ते उद्योग कामगार कायद्यांचे पालन करणार्‍या कंपन्यांसाठी अन्यायकारक स्पर्धेचे स्रोत आहेत. काही व्यक्ती अधिक स्वतंत्रपणे काम करण्याच्या शक्यतेची प्रशंसा करतात आणि संधींचा फायदा घेतात आणि याच्या माध्यमातून ते यशस्वी होतात.

तथापि, बहुतेक कामगार अजूनही पारंपारिक कर्मचारी-नोकरी देणारे यांच्यातील संबंधांना प्राधान्य देतात, नोकरीच्या सुरक्षेचे महत्व कामाची लवचिकता आणि इतर कार्य मूल्यांपेक्षा अजूनही जास्त आहे. याव्यतिरिक्त, लाभार्थी कदाचित काही सुशिक्षित असतील, तर बहुतेक कामगार गिग अर्थव्यवस्थेकडे वळतात कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्यांच्यासाठी अपारंपारिक रोजगाराची वाढती अनौपचारिकता उच्च असुरक्षितता आणि अनिश्चितता दर्शवते. शेवटी, अनौपचारिकतेमुळे सरकारला कमी कर महसूल मिळतो, ज्यामुळे देशात गुंतवणूकीची आणि विकासास गती देण्याची आर्थिक क्षमता कमी होते.

नव्या युगातील कामगारांना सामोरे जावे लागणारी आव्हाने

शेवटी भारतात सध्याची अनौपचारिक रोजगाराची पोहोच आणि अपारंपरिक रोजगाराचा उदय गिग अर्थव्यवस्था काय आहे हे सांगते. यामुळे अनौपचारिकतेत आणखी वाढ होईल. कामगारांना कायद्याचे संरक्षण देण्यासाठी खर्च आणि कार्यालयीन अडथळे कमी करून औपचारिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यानी सतत प्रयत्न केले पाहिजेत.  परंतु त्याच वेळी, रोजगार निर्माण करण्याची राजकीय आवश्यकता आणि गिग अर्थव्यवस्थेची रोजगार निर्मितीची क्षमता पाहता, अनौपचारिकता हा एक आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर पर्याय आहे हे स्वीकारणे गरजेचे आहे.

एका बाजूला, कंपन्यांना वेगाने तांत्रिक बदलांना सामोरे जाणाऱ्या व्यावसायिक वातावरणात यशस्वीरित्या व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ते स्वातंत्र्य दिले पाहिजे. दुसऱ्या बाजूला, नव्या प्रणालीतील कामगार आपला उदरनिर्वाह करू शकतात याची खात्री करणे, असे दुहेरी आव्हान समोर आहे.

रोजगाराच्या भविष्याला आकार देण्यासाठी आणि अनौपचारिकतेच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सरकार, उद्योगसमूह आणि कामगार प्रतिनिधींनी एकत्र काम केले पाहिजे. गिग अर्थव्यवस्थेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल खात्रीदायक माहितीचा अभाव आहे. सरकारने विद्यापीठ आणि संशोधन संस्थांच्या सहकार्याने माहिती गोळा केली पाहिजे आणि किती लोक अपारंपारीक प्रकारच्या रोजगारामध्ये गुंतले आहेत याचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यांच्या कामकाजाच्या परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी संशोधन केले पाहिजे. तसेच रोजगाराच्या चुकीच्या वर्गीकरणाच्या मुद्द्याकडेही लक्ष द्यायला हवे. जे लोक कामासाठी कोणावर तरी अवलंबून असून दुय्यम संबंध प्रस्थापित करतात ते कर्मचाऱ्यांच्या व्याख्येत बसतात आणि समान वागणुकीस पात्र आहेत.

तिसरा मुद्दा असा की, अपारंपारिक रोजगाराची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन भारतीय कामगार आणि सामाजिक संरक्षण कायदे आणि योजनांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. एक संधी अशी आहे की, अनौपचारिक कामगार आता अदृश्य राहिलेले नाहीत, एकदा एखाद्या व्यासपीठावर त्यांची नोंदणी झाली की ते सामाजिक सुरक्षा प्रणालीशी जोडले जाऊ शकतात. चौथा मुद्दा, विविध व्यासपीठांच्या या अर्थव्यवस्थेत स्वयंरोजगार कामगारांना आपली सामूहिक शक्ती अधिक बळकट करण्यासाठी संघटनेचे नवे स्वरूप आणि प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. अंतिमतः, भारतीय कामगार समूहाला अधिक सुसज्ज करण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य या क्षेत्रात अधिक गुंतवणूकीची आवश्यकता आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Sabrina Korreck

Sabrina Korreck

Dr. Sabrina Korreck was a Senior Fellow at Observer Research Foundation. Her research focuses on the digital economy and she tracks developments in startup ecosystems ...

Read More +