Published on Jun 04, 2019 Commentaries 0 Hours ago

पाच दशके सत्तेत असणाऱ्या काँग्रेससमोर आता मोठे आव्हान आहे. त्यांच्याकडे जर ठोस योजना नसेल तर त्यांचे पुनरुत्थान कठीणच नाही तर अशक्यही ठरू शकते.

काँग्रेससाठी ‘करो या मरो’!

लोकसभा निवडणुकीत अतिशय वाईट निकालाचा सामना करताना काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संकटात आले आहे. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसच्या या अस्तित्वाची लढाईमध्ये बदललेल्या राजकीय परिघाशी जुळवून घेण्यासाठी पक्षात आमूलाग्र बदल करावा लागेल.

देशात काँग्रेसच्या स्वीकारार्हतेत मोठ्या प्रमाणात झालेली घट समजून घेण्यासाठी, लोकसभा निकालात लागलेल्या उतरत्या कळेचा जवळून अभ्यास करण्याची गरज आहे. या निवडणुकीत काँग्रेसने ४२१ उमेदवार उभे केले होते आणि त्यातील फक्त ५२ उमेदवार जिंकले. हा आकडा २०१४ च्या तुलनेत चांगला आहे. २०१४ मध्ये फक्त ४४ उमेदवार जिंकले होते.

काँग्रेसच्या एकूण विजयी उमेदवारांपैकी ६० टक्के उमेदवार हे तामिळनाडू, केरळ आणि पंजाब राज्यातील आहेत. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, बिहार, झारखंड, राजस्थान, हरियाणा ही हिंदीभाषिक राज्ये आधी काँग्रेसचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जायची. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या उदयानंतर आता तिथे काँग्रेसचे स्थान नगण्य झाले आहे.

काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या, १९२ जागांवर त्यांना दुसरे स्थान मिळाले आणि उरलेल्या सर्व जागी त्यांना तिसरे किंवा त्याखालील स्थान पत्करावे लागले. हिंदू मतदार कमी असलेल्या मतदारसंघात काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे काँग्रेस बहुमतापासून दूर जात आहे असे म्हंटले गेले. मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत काँग्रेसने केवळ पाँडिचेरी मध्ये ५० टक्क्याहून अधिक मते मिळवली. भाजपने १७ राज्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवली. छत्तीसगढ, मेघालय, गोआ, नागालँड, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार मध्ये काँग्रेसला ४० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली.

उर्वरित सर्व राज्यांत काँग्रेसला मिळालेल्या मतांचे प्रमाण खूपच कमी होते, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला फक्त ६.३ टक्के मते मिळाली. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ राज्यात काँग्रेसने नोव्हेंबर – डिसेंबर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता, तिथेसुद्धा काँग्रेसला ६५ पैकी फक्त ४ जागा मिळवता आल्या. राहुल गांधी यांनी अमेठी मधली आपली जागा गमावली ही पक्षासाठी खूप धक्कादायक गोष्ट होती. अमेठी मतदारसंघ हा गेली चार दशके गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ला होता. त्यामुळे पाच दशके सत्तेत असणाऱ्या काँग्रेससमोर आता एक मोठे आव्हान आहे. त्यांच्याकडे जर काही ठोस दीर्घकालीन योजना नसेल तर त्यांचे पुनरुत्थान फक्त कठीणच नाही तर अशक्यही ठरू शकते.

काँग्रेस पक्ष ज्या आव्हानांचा सामना करत आहे ती आव्हाने वैचारिक आणि सैद्धांतिक आहेत. पक्षाची या समस्यांचा सामना करण्याची योजना उत्स्फूर्त असू शकत नाही तर पक्षाला आत्मपरीक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. गांधी – नेहरू यांचे स्वातंत्र्य चळवळीतले योगदान नष्ट करण्याचा निश्चय केलेल्या हिंदुत्ववादी सैन्याचा सामना करण्यासाठी काँग्रेसला एक प्रभावी आणि स्वीकारार्ह भूमिका उभी करावी लागेल. तसेच त्यांना आपले जाळे दूरवर आणि शेवटच्या स्तरापर्यंत पसरावे लागेल.

काँग्रेस पक्षाने एक लक्षात ठेवायला हवे, की सनातन धर्माने शतकानुशतके भारताचे विधिलिखित आखले आहे आणि या देशाची स्मृती घडवली आहे. त्यामुळे सनातन धर्माचे गहन ज्ञान असलेल्या विचारवंतांना आणि अभ्यासकांना काँग्रेसने सोबत घेतले पाहिजे.

फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सत्तारूढ भारतीय जनता पक्षच काँग्रेस पक्षावर घराणेशाही असल्याचा आरोप करत नाही, तर प्रसारमाध्यमेही काँग्रेसला घराणेशाहीचा दोषी ठरवत आहे. काँग्रेसकडे नेतेपदासाठी मर्यादीत पर्याय उपलब्ध असतील परंतु काँग्रेससारख्या जुन्या पक्षाकडे काही पर्यायच नाही असे होणार नाही.

घराणेशाहीच्या मुद्दयावर, राहुल गांधी यांच्या जागी नवा चेहरा उभा करण्याचा पर्याय काँग्रेसकडे आहे आणि त्यासाठी राहुल गांधीसुद्धा आपले पद सोडण्यास तयार आहेत असे वाटते. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की, पक्षात कोणीही असा नेता नाही की ज्याला राष्ट्रपातळीवर मान्यता आहे किंवा संपूर्ण भारतात त्याला ओळख आहे. पक्षाचे नेतृत्व केवळ अशाच व्यक्तीवर विश्वासाने सोपवले जाऊ शकते ज्याचे वैचारिक स्थान निर्दोष आणि सशक्त असेल.

काँग्रेसला सध्या राहुल गांधी यांचा पर्याय शोधण्याऐवजी, आपला वैचारिक पाया भक्कम करण्याची गरज आहे. हिंदुत्ववादाचा अपील आणि त्याबद्दलचे आकर्षण लोकांमध्ये वाढत आहे आणि रा.स्व.संघ आणि भाजपा सर्व स्तरांवरील शासनावर नियंत्रण ठेवत आहेत. काही प्रादेशिक पक्ष जे भाजपच्या भगव्या विचारधारेला पाठिंबा देत नाहीत तेसुद्धा सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपाला समर्थन देत आहेत.

स्वातंत्र्य चळवळीनंतर काँग्रेसने मांडलेल्या ‘भारताच्या’ विचाराने स्वातंत्र्यपूर्व सात दशकांमध्ये आपले महत्व गमावले आहे आणि समाजातील बहुसंख्यांना तो विचार स्वीकारार्ह वाटत नाही. त्या विचाराची जागा आता एका स्वप्नाने घेतली आहे. या स्वप्नात शक्तिशाली हिंदू राष्ट्र भारतातील रहिवाशांना आणि मुख्यतः हिंदूंना प्रतिष्ठा आणि समृद्धी मिळवून देऊ शकतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या विस्तृत हिंदुत्व परिवाराला गांधी घराण्याविषयी द्वेष आहे यात आता काही गुपित उरलेले नाही, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचासुद्धा यात समावेश आहे आणि त्यांच्यावरसुद्धा आपल्या भाषणांतून या लोकांनी हल्ले चढवले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेववक संघाच्या भारतावर सत्ता गाजवण्याच्या अंतिम ध्येयाच्या आड येणारा अडथळा हा गांधी परिवारच आहे. गांधी परिवाराने या सापळ्यात न अडकता वैचारिक प्रत्युत्तर निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच पक्षाच्या दैनंदिन घडामोडींकडे लक्ष देण्यासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांची एक कार्यकारी समिती तयार करावी, ज्यात गांधी कुटुंबीयांतील सदस्य असू शकेल किंवा नाही. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करावे आणि आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधासाठी एक सामान्य धोरण विकसित करावे.

देशाला पुढे नेण्यासाठी काँग्रेस जो प्रस्ताव मांडत आहे ती विचारधारा भक्कम करताना काँग्रेसला पक्षातील संघटनात्मक संरचना विकसित कराव्या लागतील ज्यामुळे समाजातील प्रत्येक विभागाच्या महत्वाकांक्षा त्यात दिसून येतील. काँग्रेस पक्षासाठी वैचारिक योजना आखण्याचा जबाबदारीतून गांधी कुटुंबीय बाहेर पडू शकत नाहीत. ही योजना अशी हवी की जिला अखिल भारतीय अपील असेल आणि बहुसंख्य समुदायासाठी ती योग्य असेल.

जगभरातील राजकीय पक्ष आणि संस्थांनी संकट निर्माण झाल्यानंतरच आपल्यापुढील आव्हानांचा सामना करण्याच्या प्रक्रियेत आपले पुनरुत्थान केले आहे. काँग्रेससाठी हीच वेळ आहे. काँग्रेसला अनंतात विलीन होण्याची परवानगी नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.