Author : Hari Seshasayee

Published on Aug 23, 2023 Commentaries 0 Hours ago

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून लुला यांचा कार्यकाळ अलीकडेच ८ जानेवारीला झालेल्या हल्ल्याप्रमाणेच दंगलीने भरलेला असेल का?

बोल्सोनारो सिद्धान्ताच्या समाप्तीचा प्रारंभ

२०२३ च्या पहिल्या दोन रविवारी ब्राझीलने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहे. १ जानेवारी रोजी ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनाचिओ लुला दा सिल्व्हा यांच्या शपथविधी समारंभाला देशोदेशींचे सर्वोच्च नेते आणि परराष्ट्र मंत्र्यांसह ६५ परदेशी शिष्टमंडळे उपस्थित होती, अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर लुला यांच्या पदग्रहणाची बातमी झळकली होती. यान्वये, सर्वसमावेशकतेच्या आणि शाश्वततेच्या नव्या युगाचा प्रारंभ झाला आणि जागतिक स्तरावर ब्राझीलला आघाडीवर आणले.

८ जानेवारी रोजी, अनपेक्षितरीत्या घडलेल्या कटू घटनेत, ४,००० दंगलखोरांच्या जमावाने ब्राझीलचे नेते, कायदेमंडळ आणि न्यायपालिकेचे निवासस्थान असलेल्या प्रासा डॉस ट्रेस पोडेरेस (थ्री पॉवर प्लाझा) या वास्तूवर आक्रमण केले, बहुतांश लोकांनी ‘ऑर्डेम ई प्रोग्रेसो’ (ऑर्डर आणि प्रोग्रेस- अर्थात सुव्यवस्था आणि प्रगती) हे ब्रीदवाक्य लिहिलेला ब्राझीलचा ध्वज स्वत:भोवती लपेटून घेतला होता. ब्राझीलचे अतिउजवे माजी अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांचे कट्टर अनुनयी असलेल्या हल्लेखोरांनी, खिडक्या आणि फर्निचर, पोट्रेट यांची तोडफोड केली. ऐतिहासिक कलाकृतींचे नुकसान केले, शस्त्रे चोरली आणि अगदी ब्राझीलच्या संविधानाच्या प्रतिकृतीभोवती परेड केली. त्याच संध्याकाळी ४०० हून अधिक लोकांना अटक करून ब्राझीलच्या लष्करी आणि सुरक्षा कर्मचार्‍यांनी सुव्यवस्था लवकरच स्थापन केली.

ब्राझीलचे अतिउजवे माजी अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांचे कट्टर अनुनयी असलेल्या हल्लेखोरांनी, खिडक्या आणि फर्निचर, पोट्रेट यांची तोडफोड केली. ऐतिहासिक कलाकृतींचे नुकसान केले, शस्त्रे चोरली आणि अगदी ब्राझीलच्या संविधानाच्या प्रतिकृतीभोवती परेड केली.

या हल्ल्यानंतर लगेचच, तीन विशिष्ट मुद्द्यांकडे लक्ष वेधले जाते.

प्रथम आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, हे आक्रमण म्हणजे बोल्सोनारो सिद्धान्ताच्या समाप्तीचा प्रारंभ आहे. बोल्सोनारो यांची रवानगी अमेरिकेमधील फ्लोरिडाच्या एका विचित्र उपनगरात- जिथे फारसे कुणी जात नाही अशा ठिकाणी करण्यात आली असले तरी, बहुतांशजण या माजी राष्ट्राध्यक्षांनाच तणाव निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे आदर्श डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखंच, मागील निवडणुका फसव्या होत्या यांसारख्या तथ्यांचे चुकीचे वर्णन पसरवण्यासाठी जबाबदार धरतात. २०१८ मध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आले असूनही, बोल्सोनारो यांनी अनेकदा ब्राझीलच्या पूर्वीच्या लष्करी हुकूमशहांचा गौरव करीत, लोकशाहीच्या संकल्पनेची थट्टा केली. बोल्सोनारो यांच्याकरता पुढील पेच, कदाचित त्यांना अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यासाठी किंवा ब्राझीलला परतल्यावर त्यांना अटक करण्यासाठी कायदेशीर संघर्षाच्या रूपात उद्भवू शकतो.

तरीही, या सर्वांतून विद्यमान राष्ट्राध्यक्ष लुला यांना सार्वजनिक विरोध संपल्याचे संकेत मिळत नाही. लूला यांच्या उर्वरित कार्यकाळात आपल्याला कदाचित अधिक जमाव दिसण्याची शक्यता आहे, परंतु त्यांचे व्यवस्थापन ‘गोमांस, बायबल आणि बंदुकीच्या गोळ्या’ या पुराणमतवादी चळवळीने केले जाईल, ज्यात बोल्सोनारोचे मंत्र कालांतराने कमी होत जातील.

दुसरे असे की, थ्री पॉवर्स प्लाझावरील आक्रमण हे तिरस्करणीय आहे, सुरुवातीला प्रभावी वाटलेल्या या आक्रमणाचा अंत नैराश्यपूर्ण होता आणि वर्तमान सरकारला त्यापासून कधीही गंभीर धोका निर्माण झाला नाही. चिलीचे राजकीय विश्लेषक पॅट्रिसिओ नेविया यांनी नमूद केल्यानुसार, हा “खेळण्यातील बंदुकीने खून करण्याच्या प्रयत्ना”पेक्षा थोडे अधिक होते.

दुसरे असे की, थ्री पॉवर्स प्लाझावरील आक्रमण हे तिरस्करणीय आहे, सुरुवातीला प्रभावी वाटलेल्या या आक्रमणाचा अंत नैराश्यपूर्ण होता आणि वर्तमान सरकारला त्यापासून कधीही गंभीर धोका निर्माण झाला नाही.

अखेरीस, १९८५ मध्ये ब्राझीलमध्ये लोकशाही परतल्यापासून अनेकांनी ज्याला सर्वात वाईट घटना म्हटले आहे, त्याबद्दल लुला सरकारची भूमिका आणि प्रतिक्रिया आपण लक्षात घ्यायला हवी, किंबहुना त्याचे मापन करायला हवे. ४,००० लोकांच्या जमावाला थ्री पॉवर्स प्लाझासमोर जमण्याची परवानगी देण्यात आली होती, कारण लुला सरकारने त्यांच्या नागरिकांच्या निषेधाच्या अधिकारावर विश्वास ठेवला होता. उघड विरोधाचे भडक जमावात रूपांतर झाल्यानंतरही, ब्राझीलच्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी संयमाने दंगल आटोक्यात आणली, ‘सुव्यवस्था आणि प्रगती’ हे ब्रीदवाक्य लिहिलेल्या या भागातील ब्राझीलच्या शेकडो ध्वजांना अर्थ दिला. जरी काहीजण जखमी झाले असले तरी, हल्ल्यादरम्यान किंवा नंतर एकाही ब्राझीलच्या नागरिकाचा मृत्यू झाला नाही. हे शेजारील पेरू देशातील घटनेच्या विरोधी आहे, जिथे अलीकडील निदर्शनांमध्ये ४५ जणांचा मृत्यू झाला किंवा अमेरिकन कॅपिटल हल्ल्यात २०२१ मध्ये पाचजण मृत्यू पावले.

अमेरिकेतील ६ जानेवारी विरूद्ध ब्राझिलियामधील ८ जानेवारी

अनेक निरीक्षकांनी ८ जानेवारी रोजी ब्राझिलियातील थ्री पॉवर्स प्लाझावरील हल्ल्याची तुलना अमेरिकन कॅपिटलवर ६ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्याशी केली आहे. बोल्सोनारो यांनी ट्रम्प व त्यांची धोरणे आणि रणनीती यांचा आदर केला, या वस्तुस्थितीमुळे दोन्ही घटनांमध्ये काही स्पष्ट समानता आहे. ब्राझीलमधील अमेरिकेचे माजी राजदूत थॉमस शॅनन यांनी टिप्पणी केली की, ‘बोल्सोनारो आणि त्यांच्या संघाने ६ जानेवारी रोजी जे घडले, ते खूप जवळून पाहिले आहे आणि निवडणुकीचे निकाल उलथवण्याच्या प्रयत्नात विद्यमान अध्यक्ष का अपयशी ठरले, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.’ हा क्वचितच योगायोग आहे की, हल्ला झाला तेव्हा बोल्सोनारो हे ट्रम्प यांच्या मार-ए-लागो येथील नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला सुट्टी व्यतीत करून फ्लोरिडात परतले होते.

हल्ल्यानंतर, ब्राझीलचे सर्वाधिक काळ परराष्ट्र मंत्री सेल्सो अमोरिम यांनी टोमणा मारला, “जसे बोल्सोनारो हे ट्रम्पची स्वस्त नक्कल आहे, त्याचप्रमाणे हा हल्ला [अमेरिकी] कॅपिटलच्या हल्ल्याची स्वस्त नक्कल होती [जानेवारी ६, २०२१ रोजीचे आक्रमण].”

Issues January 8 Praça dos Três Poderes attack in Brasilia January 6 US Capitol attack in Washington DC
Similarities
Political ideology The attackers in Brasilia and Washington DC were both instigated by far-right presidents who refused to concede their loss after free-and-fair, democratic elections, alleging fraud without providing any evidence
Vandalism Severe damage to public property, including buildings, artworks and offices
Armed threats Armed threats were found but thwarted in both instances, with two pipe bombs found in Washington DC and five abandoned grenades found in Brasilia
Complicity of security personnel Security personnel, supposedly loyal to Trump in DC and Bolsonaro in Brasilia, were found to be complicit at both events, allowing rioters to run amok
Differences
Context A week after the new president was sworn in, while former president Bolsonaro was in Florida Before newly-elected president Joe Biden’s inauguration, while Trump was still president and in Washington DC
Timing Took place on a holiday (Sunday), while Lula was in another city, Sao Paulo Took place during a joint session of Congress counting electoral college votes
Arrests More than 400 people have been arrested in the immediate aftermath of the event About a dozen insurrectionists were arrested in the immediate aftermath of the event
Deaths 5 deaths during the attack 0 deaths during the attack

दोन्ही हल्ल्यांमध्ये सारखेपणा असला तरी महत्त्वपूर्ण तफावतही आहे. संदर्भ आणि वेळ या कदाचित सर्वात महत्वाच्या तफावती आहेत. यूएस कॅपिटलवरील हल्ल्याचा हेतू अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पदभार स्वीकारण्यापासून रोखण्यासाठी होता आणि तो कामकाजाच्या दिवशी झाला, ज्यामुळे काँग्रेसमध्ये आश्रय घेतलेल्या शेकडो निवडून आलेल्या प्रतिनिधींचा जीव धोक्यात आला. ब्राझिलियामध्ये हा हल्ला नव्या राष्ट्राध्यक्षांच्या पदग्रहणानंतर एका आठवड्यानंतर- सुट्टीच्या दिवशी झाला, जेव्हा बहुतांश कार्यालये सुनसान होती.

परिणामी, अमेरिका, इंग्लंड, युरोपीय युनियन, भारत, रशिया आणि लॅटिन अमेरिकी नेत्यांसह जगभरातील जवळपास प्रत्येक देशाच्या प्रमुखांनी ब्राझिलियातील हल्ल्याचा निषेध केला. या सर्वांनी लुला यांना जाहीरपणे पाठिंबा दर्शवला— अगदी इटलीतील अतिउजव्या सरकारने आणि जर्मनीतील उजव्या विचारसरणीच्या वर्तमानपत्रांनीही ब्राझिलियातील हल्ल्याचा निषेध केला. हल्ल्याच्या काही तासांनंतर, ब्राझीलच्या कार्यकारी, कायदेमंडळ आणि न्यायपालिकेने ‘शांतता आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी’ ‘दहशतवादी कृत्यांविरुद्ध’ त्यांची एकजूट दर्शवणारे संयुक्त विधान केले.

परिणाम

थ्री पॉवर्स प्लाझाचा हल्ला हे लुला सरकारसाठी अखेरचे आव्हान असेल, अशी शक्यता नाही. आधीच, भविष्यातील हल्ले रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना अंमलात आणल्या गेल्या आहेत: हल्ल्याच्या एका दिवसानंतर १,५०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आणि दंगलखोरांना जास्तीत जास्त कायदेशीर शिक्षा ठोठावण्यात यावी असा मतप्रवाह वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच ब्राझिलियाच्या गव्हर्नरना तात्पुरते पदमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत आणि ज्यांनी दंगलखोरांना घुसखोरी करण्यास आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यास मुभा दिली, असे मानले जाते, त्या सुरक्षा कर्मचार्‍यांवर लुला सरकार दबाव आणत आहे.

हल्ल्याच्या काही तासांनंतर, ब्राझीलच्या कार्यकारी, कायदेमंडळ आणि न्यायपालिकेने ‘शांतता आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी’ ‘दहशतवादी कृत्यांविरुद्ध’ त्यांची एकजूट दाखवणारे संयुक्त विधान केले.

हल्ल्यानंतर, येत्या काही महिन्यांत विकसित होणार्‍या दोन विशिष्ट घडामोडींकडे लक्ष देणे उपयुक्त ठरू शकते.

प्रथम, या हल्ल्याने लुला आणि त्यांचे संरक्षण मंत्री जोसे मुसिओ यांना बचावात्मक पवित्रा घ्यायला भाग पडले. भविष्यात अतिउजवे असे आणखी हल्ले करतील किंवा सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करणारे छुपे हल्ले करतील का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सर्व सुरक्षा कर्मचार्‍यांना त्यांच्या गोटात आणण्यासाठी लुला आणि मुसिओ यांना कधी बाबापुता करावा लागेल तर कधी शिक्षेचा आसूड उगारावा लागेल.

शेवटी, म्हणीनुसार, प्रत्येक संकटसमयी मोठी संधी दडलेली असते. ब्राझिलियन पत्रकार थॉमस ट्रौमन यांनी नमूद केल्याप्रमाणे, ‘जर लूला यांनी या संधीचा उत्तम उपयोग केला, तर ते काँग्रेसमधील आपली आघाडी वाढवू शकतात आणि नवीन नातेसंबंधाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, जेव्हा तुमचे तुमच्या जोडीदाराशी बंध जुळतात, तेव्हा प्रत्येक गोष्ट रोमांचक वाटते, अशा वेळी असा टप्पा संपादन करू शकता, जो एका आठवड्याभरापूर्वी अशक्य वाटत होता.”

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Hari Seshasayee

Hari Seshasayee

Hari Seshasayee is a visiting fellow at ORF, part of the Strategic Studies Programme, and currently serves as an advisor to the Foreign Ministry of ...

Read More +