Author : Deepak Sinha

Published on Oct 02, 2021 Commentaries 0 Hours ago

आपण नवी लष्करी रचना करण्याच्या वाटेवर असताना, अफगाणिस्तान आणि इराकमधील आपत्तींमधून धडे शिकण्याची गरज आहे.

आपल्या सैन्यासाठी अफगाणिस्तानचे धडे

अफगाणिस्तानमधील घडामोडींवरील भाष्य म्हणजे “मी आधीच सांगितले होते”चा प्रकार आहे असे वाटू शकते, पण अफगाणिस्तानात अमेरिकेचा पराभव होणार हे विधिलिखित होते. अर्थात, सैन्याची माघार घेताना अव्यवस्थितपणा होऊ शकतो, पण ज्या प्रकारे त्यांची अफगाणिस्तानात दाणादाण उडाली, त्याचे सैन्याची व्यावसायिकता आणि नेतृत्वावर, किंवा त्यांच्या अभावावर, गडद सावट नेहमी राहील.

कोरियामधील चोसीन जलाशयात पीपल्स लिबरेशन आर्मीकडून मोठ्या प्रमाणात प्रतिकाराला सामोरे जावे लागल्यानंतर यूएस प्रथम सागरी विभागाने लढाईतून माघार घेण्याचे उत्कृष्ट उदाहरण ते विसरलेले दिसतात. अर्थातच धीरोदात्त नेते आणि जनरल मॅकआर्थरच्या उंचीच्या व्यक्तीचा दबाव मान्य करण्यास नकार देताना तत्कालीन मेजर जनरल ओ पी स्मिथने दाखवलेले नैतिक धैर्य, या बाबी मुश्किलीनेच आढळतात. सैन्य हाताळताना मॅकआर्थरला हस्तक्षेप करू देण्यास त्यांच्या अनिच्छेनेच त्यांना संकटावर उपाय शोधता आला, त्यामुळे त्यांना आपल्या स्वतःला संघटित करणे आणि पराभव अटळ असलेल्या लढाईतून माघार घेणे शक्य झाले.

अमेरिकेतील पराभव हा सर्वत्र लागू होणाऱ्या साध्या सर्वपरिचित सत्याने स्पष्ट करता येतो, की, लोकशाही असो वा हुकुमशाही, किंवा त्यादरम्यानचे काहीतरी, लोकांना स्वतःचे नशीब स्वतःच्या हातात घ्यायला आवडते. ते कधीही कठपुतळीप्रमाणे काम करणारे, बाहेरील शक्तींकडे पाहत, स्वतःच्या स्वार्थ आणि महत्वाकांक्षांपुरताच विचार करणारे सरकार स्वीकारत नाहीत. ब्रिटिशांना भारतीय उपखंडात हा धडा मिळाला, दोनशे वर्षांनी का होईना, चीन आणि पाकिस्तानलाही येणाऱ्या काळात चांगलीच अद्दल घडेल यात शंकाच नाही.

युद्धे ही नेहमी मनामध्ये जिंकली किंवा हरली जातात. उदाहरणार्थ, व्हिएतनाम युद्ध अमेरिकी सैन्य व्हिएतनाममध्ये हरले नाहीत, तर ते स्वतःच्या देशातच हरले. अमेरिकी सिनेटर जॉन मॅककेन यांनी वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये लिहिल्याप्रमाणे, “अमेरिका उत्तर व्हिएतनाममध्ये एकही लढाई हरली नाही, पण ती युद्धात हरली. राष्ट्रांचे केवळ सैन्यच नव्हे तर राष्ट्र युद्धे जिंकत असतात. जियपना हे समजले. आम्हाला नाही. व्हिएतनामी नागरिकांपूर्वी अमेरिकी नागरिक मरण्याला आणि मारण्याला कंटाळले. या धोरणाच्या नैतिकतेचे समर्थन करणे अवघड आहे. पण ते यशस्वी झाले हे तुम्ही नाकारू शकत नाही.”

अफगाणिस्तानच्या बाबतीत न बदलणारे आणखी एक वास्तव असे होते की, तो देश सर्व बाजूंनी भूप्रदेशांनी, विशेषतः बहुतांशा प्रमाणात अमेरिकेविषयी वैरभाव बाळगणाऱ्या, बंदरांच्या माध्यमातून अफगाणिस्तानात प्रवेश देऊ शकणाऱ्या देशांनी, वेढलेला आहे. त्याचा परिणाम म्हणून अफगाणिस्तानातील वाढलेल्या मुक्कामाच्या काळात अमेरिकी लष्कर आपल्या मोठ्या प्रमाणात रसदीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून होते, ज्यामुळे तालिबानला आश्रय, संसाधने आणि प्रशिक्षणाच्या स्वरूपात निर्विवाद पाठिंबा देण्याच्या पाकिस्तानच्या लबाड कृत्यांकडे कानाडोळा करणे त्यांना भाग पडले.

विडंबन म्हणजे निव्वळ लष्करी दृष्टिकोनातून विचार करता, सोव्हिएत युनियनच्या विघटनामुळे, अमेरिका स्वतःच्याच अनपेक्षित आणि अतुलनीय यशांचा बळी आहे. शीतयुद्धाच्या अंतानंतर, तुलनेने दुबळे विरोधक आणि मोठ्या प्रमाणावर पारंपारिक युद्धांची शक्यतांमध्ये घट झाल्याने, अमेरिका एकमेव लष्करी महासत्ता उरली. धोरणात्मक अनिवार्यता कमीत कमी जीवितहानी होईल याची खबरदारी घेण्याची गरज स्पष्टपणे मांडत असताना आणि अमेरिकेच्या हितसंबंधांना बाधा आणणाऱ्या किंवा अमेरिकी हस्तक्षेपाची गरज असणाऱ्या कोणत्याही संकटाचे तातडीने आणि यशस्वीपणे निवारण करताना लष्कराने आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी त्याची आर्थिक आणि तंत्रज्ञानात्मक बाजूकडे लक्ष दिले.

१९९१ चे आखाती युद्ध चाचणी क्षेत्र म्हणून पाहिल्यास, तत्कालीन संरक्षणमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड यांनी “सैन्याच्या परिवर्तनाचा” अजेंडा म्हणून उल्लेख केला, उत्कृष्ट माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान (आयसीटी) यावर आधारित लष्करी व्यवहारांमधील क्रांती (आरएमए) आणि नेटवर्क केंद्रित युद्ध (एनसीडब्लू) याचा अमेरिकी सैन्याने कोनशिला म्हणून स्वीकार केला. याचा अर्थ अचूक युद्धसामग्री, शक्तिशाली आणि अत्यंत प्रभावी कमांड, नियंत्रण, दूरसंचार, संगणक, गुप्त माहिती, पाळत ठेवणे, लक्ष्य गाठणे आणि टेहेळणी (सी4एसटीएआर) क्षमतांच्या मदतीने उच्च गुणवत्तेचे आकाराने लहान सैन्यावरील अवलंबून राहणे. या नव्या प्रकारच्या लढाईमध्ये दूरचे अंतर जलद पार करण्याची क्षमता आणि त्याच वेळी शत्रूशी खोलवर दोन हात करणे आणि आनुषंगिक नुकसान टाळतानाच त्याचे आदेश आणि नियंत्रण घटक संपूर्ण नष्ट करणे किंवा त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणे आणि त्याची युद्ध करण्याची क्षमता नष्ट करणे याचा समावेश होतो.

अफगाणिस्तान आणि इराकमधील त्यानंतरच्या हल्ल्यांच्या प्रारंभिक टप्प्यांनंतरच्या निरंतर आणि प्रदीर्घ मोहिमांमध्ये या शिकवणीच्या मर्यादा उघड झाल्या नाहीत, तोपर्यंत त्या मोहिमांनी ही शिकवण अधिकच प्रमाणित केली. असममित किंवा अनियमित युद्धाच्या आव्हानाने “युद्धभूमीवरील सैनिकांची संख्या”, शत्रूबद्दल सामाजिक आणि सांस्कृतिक जागरुकतेचा अभाव आणि बंडखोरीविरोधी कारवायांची अपुरी समज आणि प्रशिक्षण, यांच्या अपुऱ्या उपलब्धतेवर जोर दिला.

तंत्रज्ञान आणि त्याची आरएमएची आवृती यांच्याबद्दल अमेरिकी लष्कराला असलेल्या आकर्षणाच्या जोडीला स्वतःच्या तिसऱ्या जगातील शत्रूंच्या क्षमतेविषयी कमालीचा अनादर, याचा परिणाम म्हणून “युद्धाव्यतिरिक्त इतर कारवाया” (ओओडब्लू) मधील कृत्यांच्या परिणामांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतरच्या घडामोडींमुळे अमेरिकील लष्कराला सुधारात्मक उपाय हाती घ्यावे लागले, त्यामध्ये स्पेशल ऑपरेशन्स फोर्सेसवर न टिकणारे अवलंबित्व आणि प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात फेबदलांचा समावेश होता.

या सर्व सुधारात्मक उपायांचा त्या वेळी फारसा परिणाम झाला नाही, कारण युद्ध योग्यपणे लढण्याची शिकवण विकसित करताना त्यामध्ये काही दोष किंवा पूर्वग्रह असला तर त्याचा कामगिरीवर विपरित परिणाम होतो. शस्त्रांची माहिती, सैन्याच्या रचना आणि युद्धनीती या गोष्टी एकमेकांशी निगडीत आणि परस्परावलंबी असतात. केवळ तंत्रज्ञानात्मक प्रगतीचे चित्र डोळ्यासमोर आणणे फारसे अवघड नसेल, तांत्रिक अप्रचलनाचा वेगवान दर आणि आर अँड डी आणि खरेदी चक्राशी संबंधित असलेला अटळ कालांतर, जो सरासरी साधारणपणे १५-२० वर्षे असतो, त्यामुळे समस्या निर्माण होतात.

अखेरीस, जेव्हा आपण स्वतःला नवीन लष्करी रचना आणि शिकवणीचे दृश्य डोळ्यासमोर आणण्याच्या आणि स्वीकारण्याच्या वाटेवर असताना, अफगाणिस्तान आणि इराकमधील आपत्तींमधून आपण जे धडे शिकण्याची गरज आहे, ते तेथील लष्करी कारवाईच्या आचरणाबद्दल नाहीत तर, त्यांचे लष्कर कोणत्या प्रकारचे युद्ध लढण्यासाठी प्रशिक्षित, सुसज्ज आणि सुसंघटित होती त्याविषयी धडा शिकणे अधिक महत्त्वाचे आहे.

हा लेख यापूर्वी इंडियन डिफेन्स रिव्ह्यूमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Deepak Sinha

Deepak Sinha

Brig. Deepak Sinha (Retd.) was Visiting Fellow at ORF. Brig. Sinha is a second-generation paratrooper. During his service, he held varied command, staff and instructional appointments, ...

Read More +