हा लेख Pakistan: The Unravelling या मालिकेचा भाग आहे.
देशाचे अस्तित्व पणाला लागले आहे, अशा एकामागोमाग एक घटनांशी पाकिस्तान झुंजत असताना, ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) आणि सीमेपलीकडील अफगाणी तालिबान यांचे प्रतिसाद अंतर्गत अराजकतेच्या दूरगामी परिणामांबद्दल अतिरिक्त चिंता निर्माण करतात.
९ मे रोजी इम्रान खान यांना अटक झाल्यापासून पाकिस्तानात रस्त्या-रस्त्यांवर अराजकतेचे दृश्य पाहायला मिळत आहे. लष्कर आणि सरकार यांच्याशी संबंधित अनेक व्यवस्थांवर झालेल्या हल्ल्यांत पाकिस्तानचे २५० दशलक्ष पाकिस्तानी रुपये किमतीचे नुकसान झाले आहे.
निदर्शनांचा, आणि लष्कराच्या सामर्थ्यावर व प्रतिष्ठेवर करण्यात आलेल्या प्रतिकात्मक व शाब्दिक हल्ल्यांचा संदर्भ देत, झोब, बलुचिस्तानच्या ‘टीटीपी’ कमांडरने पाकिस्तानी सैन्याविरूद्ध केलेल्या संघर्षाबद्दल पाकिस्तानी जनतेचे अभिनंदन केले आणि काही लष्करी तळ व छावण्यांना लक्ष्य करण्याकरता आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी सदस्यांना प्रोत्साहन दिले. निदर्शनांना त्यांनी दिलेला हा पाठिंबा अफगाणिस्तानच्या अंतरिम सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानाच्या अगदी विरोधी होता, ज्यात संबंधित सर्वांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आणि सीमेपलीकडे पाकिस्तानमध्ये पसरलेल्या अस्थिरतेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. तोंडदेखली, ही शांत प्रतिक्रिया अपवादात्मक आहे, मात्र आश्चर्यकारक नाही. वैधतेकरता तालिबान आंतरराष्ट्रीय समुदायासमोर संघर्ष करत असताना आणि पाकिस्तानशी त्यांचे संबंध कठीण होत असताना, पाकिस्तानातील परिस्थितीबाबत प्रतीक्षा करा आणि देशातील परिस्थिती कशी उलगडते ते पाहा, अशा आशयाच्या या विधानातून अधिक व्यावहारिक प्रतिसाद दिसून येतो. पण पाकिस्तानात तालिबानच्या या वक्तव्याकडे तिरस्काराच्या रूपात पाहिले जात आहे.
अंतर्गत संकट आणि देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कर वळवल्यामुळे त्यांना देशांतर्गत धमक्या देण्यास अवकाश मिळाला आणि अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर आणि लष्करावर आक्रमण वाढवण्यासाठी तयार झालेल्या असंतोषाचा वापर करता आला.
‘टीटीपी’करता, निदर्शने आणि आनुषंगिक दंगली योग्य वेळी उद्भवल्या आहेत. उत्तर वझिरीस्तानातील अनेक गुप्तचर-आधारित कारवायांमध्ये, एक प्रमुख कमांडर आणि या गटाचे सुमारे ४० अतिरेकी सुरक्षा दलांनी मारले. अंतर्गत संकट आणि देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कर वळवल्यामुळे त्यांना देशांतर्गत धमक्या देण्यास अवकाश मिळाला आणि अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर आणि लष्करावर आक्रमण वाढवण्यासाठी तयार झालेल्या असंतोषाचा वापर करता आला. सरकार उलथून टाकण्यासंबंधी केलेल्या खुल्या आवाहनात, दहशतवादी गटाने लोकांना राजकीय घोषणांवर आणि शांततापूर्ण निदर्शनांवर अवलंबून न राहता, ज्या अफगाण प्रारूपात- बळाच्या जोरावर काबूल जिंकले गेले, ते अफगाण प्रारूप स्वीकारण्याचे आवाहन केले.
वेगवेगळ्या गटांद्वारे त्यांच्या स्वार्थासाठी निदर्शने होण्याची संभाव्यता आहे. पाकिस्तानसारख्या देशात, जिथे असंतोष आणि अविश्वास खोलवर रूजलेला आहे, तिथे वेगवेगळे वर्ग अनेकदा स्थैर्य आणि शांततेची किंमत चुकवत स्वतःच्या फायद्यांना प्राधान्य देतात. निदर्शनांवर ‘टीटीपी’ने केलेले वक्तव्य आणि देशावर ओढवलेल्या संकटाला सर्वशक्तिमान लष्कराच्या विरोधात उभे करण्याचे त्यांचे प्रयत्न पाकिस्तानला आणखी अस्थिर करू शकतात.
निदर्शनांच्या पूर्वनियोजित स्वरूपाच्या शक्यतेवर चिंता व्यक्त करून, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अंतरिम मुख्यमंत्र्यांनी निदर्शकांच्या हल्ल्याचे लक्ष्य बनलेल्या व्यवस्था ‘टीटीपी’च्या रडारखाली असलेल्या व्यवस्थांसारख्या कशा होत्या यांवर प्रकाशझोत टाकला. देशांतर्गत समस्या निर्माण करण्यासाठी या गटाचा अप्रत्यक्ष संबंध अजूनही विवाद्य असला तरी, संकटाचा फायदा उठवण्याच्या त्यांच्या छुप्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.