Published on Sep 10, 2023 Commentaries 2 Days ago
सुधारित बहुपक्षीयतेच्या दिशेने: जागतिक संस्था आणि चौकट परिवर्तन

३० जानेवारी रोजी, पुण्यातील ‘सिम्बायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने, ‘बहुपक्षीयतेच्या दिशेने: जागतिक संस्था आणि चौकट बदलणे’ या विषयावर ‘थिंक२०’ या परिसंवादाचे आयोजन केले होते.

या परिसंवादात आंतरराष्ट्रीय संबंध आणि भू-राजकीय क्षेत्रातील चार प्रमुख तज्ज्ञांचा समावेश होता. चीन आणि भूतानचे माजी राजदूत आणि पाकिस्तानचे उच्चायुक्त अशी पदे भूषविलेले गौतम बंबवाले; ‘ओआरएफ’च्या ‘सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजी’च्या संचालक डॉ. राजेश्वरी पिल्लई राजगोपालन; ‘ओआरएफ’च्या अभ्यास आणि परराष्ट्र धोरण विभागाचे उपाध्यक्ष प्रा. हर्ष व्ही. पंत; आणि पुण्याच्या ‘सिम्बायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’च्या संचालक शिवाली लवाळे असे मान्यवर सहभागी झाले होते.

प्रस्ताव नाकारण्याच्या नकाराधिकारासंबंधित बहुपक्षीय संस्थांमधील सध्याच्या गतिशीलतेबाबत थोडक्यात स्पष्टीकरण देत ‘थिंक२०’ हा परिसंवाद सुरू झाला. या चर्चेत जागतिक संस्था आणि चौकट बदलण्यासाठी आव्हानांचा आणि संधींचा शोध घेण्यात आला. विशेषत: भारताच्या भूमिकेवर आणि सध्या सुरू असलेल्या जी-२०चे अध्यक्षपद भूषविण्याच्या भूमिकेअंतर्गत भारत प्रभावी योगदान कसे देऊ शकतो, यांवर चर्चेत भर देण्यात आला.

सुधारणांच्या निकडीसंदर्भात विचार मांडताना, परिसंवादातील वक्त्यांनी संयुक्त राष्ट्रे, जागतिक व्यापार संघटना, जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेची भारताची भूमिका स्पष्ट केली. या संस्था जागतिक घडामोडींच्या सद्यस्थितीचे प्रतिनिधित्व कसे करत आहेत आणि विकसनशील राष्ट्रांची भूमिका कशी कमी करत आहेत, यांवर बंबवाले यांनी मत व्यक्त केले. बहुपक्षीय संघटना आजही १९४५ सालच्या वास्तवात जगत असल्याने, ते पूर्वीसारखे काम करू शकत नाहीत, असा युक्तिवाद त्यांनी केला.

डॉ. राजगोपालन यांनी जागतिक संस्थांमध्ये सर्वसमावेशक निर्णय प्रक्रियेचे महत्त्व विशद केले आणि आकार व सामर्थ्य या बाबी विचारात न घेता, सर्व देशांना, जगाचे भवितव्य घडविण्याबाबत आपले म्हणणे मांडण्याची सुनिश्चितता असण्याची गरज व्यक्त केली. सद्य काळात होत असलेले जागतिक शक्तीसंदर्भातील बदल लक्षात घेता त्यांनी अशा संस्थांच्या कुचकामी स्वरूपाकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.

प्रा. पंत यांनी बहुपक्षीय संघटनांच्या सध्याच्या गतिशीलतेमध्ये भारताच्या भूमिकेचा शोध घेण्याकरता सुधारणांची अंमलबजावणी आणि कथन तयार करण्यात सरकार, नागरी समाज आणि खासगी क्षेत्रासह विविध संस्थांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले. कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तांत्रिक प्रगतीचा बहुपक्षीयता आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांवर होणार्‍या संभाव्य प्रभावावर त्यांनी विवेचन केले. शीतयुद्धानंतर कथनात झालेले बदल आणि त्या काळातील शक्तींच्या धारणा यापुढे उदयोन्मुख जागतिक व्यवस्थेला सामोरे जाणाऱ्या शक्ती गतिशीलतेचे प्रकार कसे ठरवू शकत नाहीत, याबद्दल त्यांनी वेधक विधाने केली.

Multilateralism, Think20, Security, Strategy, Technology, G20 Presidency, WTO, International Monetary Fund, artificial intelligence, Cold War, economy, Digital Era,

यावेळी सर्व शक्ती-समतोल विवादांमधील भारताच्या सद्य भूमिकेबाबतही चर्चा करण्यात आली आणि अशा गंभीर समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी चर्चेला उत्तेजन देण्याकरता जी-२०चे अध्यक्षपद भूषविणाऱ्या भारताची महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट करण्यात आली.

बंबवाले यांनी कोणत्याही वर्तमानातील आणि भविष्यातील जागतिक आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांची क्षमता बळकट करण्याची गरज व्यक्त केली. विशेषत: भारत ही पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, जी जागतिक व्यासपीठावर उत्तम प्रतिनिधित्व करू शकते, यांवर त्यांनी भर दिला.

Multilateralism, Think20, Security, Strategy, Technology, G20 Presidency, WTO, International Monetary Fund, artificial intelligence, Cold War, economy, Digital Era,

पुण्यातील १० शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी ‘सुधारित बहुपक्षीयता’ या विषयावर केलेल्या सादरीकरणानंतर परिसंवादात चर्चा झाली. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, फ्लेम युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, सिम्बायोसिस स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स, एमआयटी-डब्ल्यूपीयू स्कूल ऑफ मॅनेजमेंट पीजी, एमआयटी- स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, फर्ग्युसन कॉलेज आणि द सिम्बायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज या संस्था सहभागी झाल्या होत्या.

विद्यार्थ्यांनी ‘बहुपक्षीय संघटनांचे लोकशाहीकरण’, ‘सुधारित बहुपक्षीयतेसाठी १९७० च्या नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेविषयीच्या चळवळीचे धडे’ आणि ‘डिजिटल युगातील बहुपक्षीयता’ या विषयांवर सादरीकरण केले. सादरीकरणांमध्ये बहुपक्षीय सुधारणेतील स्थलांतर आव्हान आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारताच्या जी-२० संकल्पनेचा सर्व जगावर होणारा परिणाम यांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने या विषयाला एक अनोखा दृष्टिकोन जडला गेला आणि युवावर्गाच्या विचारांनी ही चर्चा अधिक समृद्ध झाली.

‘थिंक२०’ परिसंवाद प्रश्नोत्तर सत्राने संपला. या प्रश्नांमध्ये चीनशी संबंधित शक्ती संतुलन, द्विपक्षीय, त्रिपक्षीय आणि चार-पक्षीय संबंधांकडे वळणाऱ्या जगामध्ये बहुपक्षीय संघटनांची भूमिका, वेगाने बदलणाऱ्या शक्तीच्या गतिशीलतेचा होणारा संभाव्य परिणाम आणि निर्णयावर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचा होणारा परिणाम यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेने चीन-अमेरिका या शक्ती विवादालाही स्पर्श केला, ज्यान्वये युवा मनांना सध्याच्या जागतिक समस्यांबाबत त्यांची समज वाढवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले.

या कार्यक्रमाने युवा वर्गाशी चैतन्यदायी आणि आशावादी संवाद साधण्यासाठी कसे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, हे शेवटी शिवाली लवाळे यांनी सांगितले. जे उत्तम भविष्याकरता बदल घडवून आणतील आणि नेत्यांनी तसेच राष्ट्रांनी-राज्यांनी ‘राष्ट्रीय हित’ या संकल्पनेची जी पुनर्व्याख्या केलेली आहे, त्यात सुधारणा करतील, अशा देशातील युवा नागरिकांसोबतच्या अशा प्रकारच्या संवादात्मक सत्रांना प्रोत्साहन देण्यात आले.

या अहवालाचे संकलन ‘ओआरएफ मुंबई’चे उपाध्यक्ष धवल देसाई  आणि  संशोधन प्रशिक्षणार्थी समृद्धी दिवाण यांनी केले आहे.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.