Originally Published Deccan Herald Published on Sep 22, 2023 Commentaries 0 Hours ago
अटीतटीला पोहोचलेलं रशिया-युक्रेन युद्ध

रशियाच्या लष्करी विमानाने 14 मार्च रोजी काळ्या समुद्रावर अमेरिकेचा ड्रोन पाडला. यामुळे लगेचच नाटो आणि रशियामध्ये तीव्र संघर्ष निर्माण होण्याची भीती आहे.

अशा परिस्थितीत आता या टप्प्यावर सर्व बाजूंनी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पश्चिमात्य देश किंवा रशिया हे दोघेही सध्या एकमेकांशी थेट संघर्षासाठी तयार नाहीत किंवा तशी त्यांची इच्छाही नाही. तरीही या घटनेमुळे युक्रेनमधलं हे युद्ध आणखी किती टोकाला जाणार याबद्दल काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

रशियाचं नुकसान तरीही आक्रमक पावित्रा

युद्धामध्ये रशियाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरीही पूर्व युक्रेनमधले आपले स्थान पुढे नेण्यासाठी रशियाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या वर्षी युक्रेनच्या सैन्याने पूर्व आणि दक्षिण युक्रेनमधील काही गमावलेले प्रदेश पुन्हा ताब्यात घेतले होते. परंतु गेल्या पाच महिन्यांपासून युक्रेनची प्रगती थांबलेली दिसते.

त्याचबरोबर रशियाचीही या युद्धात फारशी प्रगती झालेली दिसत नाही. हे युद्ध आता स्थैर्याच्या टप्प्यात आले आहे, असे काही लष्करी निरीक्षकांचे मत आहे. पण रशियन सैन्याने आता नव्या दमाने आक्रमणाची तयारी केली आहे, असे काहींना वाटते. कोणत्याही प्रकारे पाहिले तरी असेच दिसते की या  रशियाने युक्रेनचा बचाव हाणून पाडल्यामुळे आता हे युद्ध आर या पार अशा अवस्थेला पोहोचले आहे.

युक्रेनमधील लष्करी परिस्थिती हळूहळू बदलू शकते. परंतु पश्चिमेकडील लोकांच्या युद्धाबद्दलच्या धारणाही हळूहळू बदलत चालल्या आहेत.

वाटाघाटींसाठी प्रयत्न

काहींना हे युक्रेनच्या लोकांचे दु:ख वाढवणारे युद्ध असे दिसते. आणि म्हणूनच आक्रमक लोकांना वाटाघाटीच्या टेबलावर आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांचे मत आहे. तथापि काही कट्टरतावादी गट युक्रेनला रणगाडे, विमाने आणि इतर प्रगत शस्त्रास्त्रे पुरवण्यासाठी दबाव आणत आहेत.

एक असाही दृष्टिकोन आहे ज्यामध्ये पुरेशी सहानुभूती आणि समर्थन आहे. युक्रेन संघर्षाचे परिणाम थेट नाटो आणि रशिया यांच्यातील थेट संघर्षात होणार आहेत.

हे धोके केवळ कोणत्या प्रकारची उपकरणे पुरवली जातील याविषयी नाही तर आणखीही स्वरूपात आहेत.  पश्चिमात्य देशांना युक्रेनला आधुनिक टाक्या आणि विमानांनी सुसज्ज करायचे असेल तर ही प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी किमान एक वर्ष लागेल. ही उपकरणे चालवण्यासाठी युक्रेनच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करावे लागेल. त्यामुळे एवढा कालावधी आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षातली परिस्थिती पाहता युक्रेनच्या पाठिराख्यांनी शांतता किंवा युद्धासाठी जलद हस्तक्षेपाची मागणी करते. म्हणूनच काही पूर्व युरोपीय देश संभाव्य रशियन प्रगतीला आळा घालण्याच्या आशेने जलद वितरणाचा सल्ला देत आहेत.

युक्रेनच्या सैन्याला हवे प्रशिक्षण

रशियाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर युक्रेनला काही डझन टाक्या किंवा विमाने पुरवल्यामुळे युद्ध युक्रेनच्या बाजूने झुकण्याची शक्यता नाही. उलट युक्रेनसाठी ते जास्त कठीण असले. परंतु अशी उपकरणे युक्रेनला लवकर पुरवली तर ती कशी चालवायची यासाठी त्यांच्या सैन्याला पुरेसा वेळ मिळेल.

उदाहरणार्थ वॉर्सा कराराच्या माजी सदस्यांच्या यादीत अजूनही काही जुनी सोव्हिएत लढाऊ विमाने आहेत आणि ती युक्रेनमध्ये त्वरीत हस्तांतरित केली जाऊ शकतात. युक्रेनच्या वैमानिकांना याआधी त्याचे प्रशिक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्यांचा वापर करताना समस्या येणार नाहीत.  परंतु ही विमाने प्रभावीपणे चालवण्यासाठी ती ज्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करतील तिथे मात्र पुरेशा क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची आवश्यकता असेल.

युक्रेनकडे अजूनही जुन्या सोव्हिएत तंत्रज्ञानावर आधारित क्षेपणास्त्राचे संरक्षण आहे पण युक्रेनच्या हवाई क्षेत्रांचा ऱ्हास करण्याच्या रशियन प्रयत्नांना रोखण्यासाठी ही क्षेपणास्त्रे परिमाणात्मक किंवा गुणात्मकदृष्ट्या पुरेशी नाहीत.

अत्याधुनिक पाश्चात्य क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींचा परिचय किंवा शेजारील देशांतील हवाई क्षेत्रांचा वापर हे दोन पर्यायी उपाय यावर आहेत. पाश्चात्य क्षेपणास्त्र प्रणाली लगेच तैनात करायच्या असतील तर युक्रेनच्या सैन्याव्यतिरिक्त परक्या लोकांद्वारे ती चालवली जाईल. अशा लष्करी कर्मचाऱ्यांकडे रशिया मात्र तटस्थ भाडोत्री म्हणून नक्कीच पाहणार नाही.

शेजारच्या देशांमधून आक्रमण?

युक्रेनच्या वायुसेनेसमोर एक दुसरा पर्याय आहे. तो म्हणजे शेजारच्या देशांमधल्या हवाई क्षेत्रांचा वापर करून रशियाच्या तळांवर बॉम्बफेक करण्याचा. पण हा प्रस्ताव त्या त्या देशांची सरकारं किंवा लोकांना मान्य होईलच असे नाही. अशा बऱ्याच कारणांमुळे युक्रेनच्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील समर्थकांना पेचप्रसंगाचा सामना करावा लागत आहे. युक्रेनच्या युद्धात उतरून रशियाशी थेट युद्धाचा धोका पत्करावा की युक्रेनच्या सैन्याला पाश्चात्य लष्करी उपकरणे वापरण्याच्या दृष्टीने प्रशिक्षित करण्यासाठी वेळ द्यावा हे ते प्रश्न आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष वाटाघाटींद्वारे संपवण्याची हीच वेळ आहे परंतु आतापर्यंत या युद्धाने पारंपारिक शहाणपणा म्हणून मानल्या जाणार्‍या अनेक गोष्टींचा अवमानच केला आहे.

हे विश्लेषण पहिल्यांदा  Deccan Herald मध्ये प्रसिद्ध झाले.

 

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.