-
CENTRES
Progammes & Centres
Location
रशिया-युक्रेन युद्ध आणि आनुषंगिक आर्थिक निर्बंधांचा नकारात्मक परिणाम जगाच्या विविध भागांमध्ये दिसून आला आहे, ज्यामुळे नवी आव्हाने वाढली आहेत.
हे भाष्य ‘युक्रेन संकट: संघर्षाचे कारण आणि मार्ग’ या लेखमालिकेचा एक भाग आहे.
_______________________________________________________________________________
नव्या महाशक्तीच्या प्रतिस्पर्ध्याने सुरू केलेल्या, साथीच्या रोगामुळे वाढलेल्या आणि त्यात रशिया-युक्रेन युद्धामुळे झपाट्याने वाढ होणाऱ्या- अशा अलीकडच्या काळातील जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावणाऱ्या घटकांचा जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये परिणाम होऊ लागला आहे. आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय मोठे ताण असूनही, इतर आव्हानांवर भौगोलिक राजकारणाचे वर्चस्व वाढले आहे. आगामी काळात काही प्रमुख अनिश्चितता आहेत, ज्यात रशिया-युक्रेन युद्धाचा कालावधी, आर्थिक निर्बंधांची पद्धत सुरू राहणे, गट राजकारणाचा पुन: उदय, व्यापक आर्थिक स्थिरता आणि व्यापार-नमुने व पुरवठा साखळी बदलणे यांसह काही प्रमुख अनिश्चिततांचा समावेश होतो.
युक्रेनच्या लष्करी कारवायांचे नियोजन आणि संचालन करण्यासाठी युक्रेनला पाठिंबा आणि मदत देण्याबाबतची पाश्चात्य रणनीती, उत्तर अटलांटिक करार संस्थेचा इतर सीमावर्ती राष्ट्रांवर मजबूत पवित्रा आणि रशियाविरूद्ध व्यापक, बहुपक्षीय आर्थिक निर्बंध यांमुळे दोन्ही बाजूंची स्थिती आणखी कठोर झाली आहे.
रशिया-युक्रेन युद्ध सहाव्या महिन्यात प्रवेश करत असताना, वाटाघाटींद्वारे तोडगा तर सोडाच, सहमती असलेल्या युद्धविरामाची शक्यताही कमी दिसत आहे. युद्धादरम्यान रशियाने आपली उद्दिष्टे आणि रणनीती बदलणे, जवळजवळ पूर्णत: पूर्व व दक्षिण युक्रेनवर लक्ष केंद्रित करणे आणि पूर्वी दिसलेल्या काही प्रमुख त्रुटी दूर करणे, यांमुळे युद्धाचा एक नवीन टप्पा सुरू केला. यामुळे रशियाला या दुसऱ्या टप्प्यात काही उल्लेखनीय फायदा मिळवता आला. समांतर रीत्या, युक्रेनच्या लष्करी कारवायांचे नियोजन आणि संचालन करण्यासाठी युक्रेनला पाठिंबा आणि मदत देण्याबाबतची पाश्चात्य रणनीती, उत्तर अटलांटिक करार संस्थेचा इतर सीमावर्ती राष्ट्रांवर मजबूत पवित्रा आणि रशियाविरूद्ध व्यापक, बहुपक्षीय आर्थिक निर्बंध यांमुळे दोन्ही बाजूंची स्थिती आणखी कठोर झाली आहे. युद्ध, लष्करी मदत आणि व्यापक निर्बंध यांच्या या संयोजनाने अनेक नवीन आव्हाने निर्माण केली आहेत, ज्याचे परिणाम जागतिक आहेत, ते केवळ पूर्व युरोपपुरते मर्यादित नाहीत. नवीन आव्हानांमध्ये, आर्थिक निर्बंधांचा समावेश आहे, ज्याचा जागतिक प्रभाव अधिक दृश्यमान आणि स्पष्ट आहे.
आर्थिक निर्बंधांची संकल्पना जुनी आहे आणि त्याच्या रचनेत व संरचनेत शतकानुशतके बरेच बदल झाले आहेत. राजकीय परिणाम साध्य करण्यासाठी निर्बंध प्रभावी ठरतात का, याबद्दल गेल्या बऱ्याच काळापासून वादविवाद होत आहेत. परिणामी, तज्ज्ञांमध्ये मतांचे विभाजन झाले आहे. तरीसुद्धा, शीतयुद्धाच्या समाप्तीपासून अमेरिकेद्वारे धोरणात्मक साधन म्हणून- प्रामुख्याने एकध्रुवीयता आणि जागतिकीकरणाच्या सह-अस्तित्व यांमुळे त्याचा वापर अनेक पटींनी वाढला आहे, एकतर्फी अथवा कधी इतर भागीदारांच्या समन्वयाने प्रतिबंधक तसेच दंडात्मक निर्बंधांचा वापर केला गेला आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेनेही संयुक्त राष्ट्र सनदीच्या कलम ४१ च्या तरतुदींनुसार, निर्बंधांच्या वापरात लक्षणीय वाढ केली आहे.
आर्थिक झळा कमी व्हाव्यात, याकरता रशियाने अनेक उपायांद्वारे पावले उचलली आहेत, ज्यात भांडवली नियंत्रणे, रशियन लोकांना परदेशात चलन हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंध करणे, काही वस्तू, कच्चा माल आणि उपकरणे यांच्या निर्यातीवर बंदी घालणे, इंधन रुबल्समध्ये खरेदी करण्याची सक्ती करणे, पर्यायी देय व्यवस्था अंगिकारणे आणि व्यापार व गुंतवणुकीचे विविधीकरण या गोष्टी समाविष्ट आहेत.
रशिया-युक्रेन संघर्षाच्या संदर्भात, २०१४ ते २०२१ या कालावधीत अमेरिकेने आणि युरोपियन युनियनने- आणि काही इतर भागीदार देशांद्वारे रशियावर निर्बंध लागू करण्यात आले होते. या निर्बंधांची व्याप्ती आणि त्यांच्या अमलबजावणीमुळे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत साऱ्याच बदलांना सामोरे जाण्याची तयारी झाली. अगदी अलीकडे, फेब्रुवारी २०२२ पासून रशियावरील निर्बंध अधिक तीव्र, मजबूत, अधिक व्यापक झाले आहेत आणि येत्या प्रदीर्घ काळाकरता रशियन अर्थव्यवस्था पांगळी करण्याचा हेतू त्यामागे आहे. यामध्ये व्यक्ती आणि संस्थांशी संबंधित निर्बंध, बँकिंग आणि वित्तीय सेवा, निर्यात आणि आयात, सेवा आणि तंत्रज्ञान, ऊर्जा (तेल, वायू आणि कोळसा, विशेषत: असुरक्षित युरोपीय युनियन देशांसाठी संरक्षण आणि सवलतींच्या उपायांसह), पोलाद, खाणकाम आणि शेती यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे समाविष्ट आहे. रशियाने आर्थिक झळा कमी व्हाव्यात, याकरता अनेक उपायांद्वारे पावले उचलली आहेत, ज्यात भांडवली नियंत्रणे, रशियन लोकांना परदेशात चलन हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंध करणे, काही वस्तू, कच्चा माल आणि उपकरणे यांच्या निर्यातीवर बंदी घालणे, इंधन रुबल्समध्ये खरेदी करण्याची सक्ती करणे, पर्यायी देय व्यवस्था अंगिकारणे आणि व्यापार व गुंतवणुकीचे विविधीकरण या गोष्टी समाविष्ट आहेत. रशियाने काही युरोपीय देशांनी लागू केलेल्या निर्बंधांना प्रतिसाद म्हणून निर्बंध लादले आणि त्या देशांचा इंधन पुरवठा कमी केला आहे. व्यापक स्तरावरील निर्बंध आणि प्रतिनिर्बंध यांच्या परस्परांवर होणाऱ्या जटिल परिणामांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे आणि त्यामुळे वस्तू, अन्नपदार्थ, ऊर्जा आणि खते महागली आहेत. अनेक क्षेत्रांमधली पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. चलन बाजारात गोंधळ उडाला आहे, राष्ट्रीय कर्ज पातळी वाढत आहे आणि अनेक अर्थव्यवस्थांचा परकीय चलन साठा कमी होत आहे. सरकारना तसेच मध्यवर्ती बँकांना कठोर आर्थिक कृती करण्यास भाग पाडले गेले आहे. युद्ध आणि निर्बंध सुरू राहिल्याने, जागतिक आर्थिक रागरंग सध्या निरुत्साही आहे. श्रीलंकेतील संकटाचे उदाहरण देताना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख अलीकडेच म्हणाले, “जागतिक आर्थिक रागरंग लक्षणीयरीत्या काळवंडला आहे आणि अनिश्चितता कधी नव्हे इतकी अधिक आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीने पूर्वी चेतावणी दिलेली नकारात्मक जोखीम आता प्रत्यक्षात आली आहे.”
अमेरिका आणि युरोपीय युनियनच्या निर्बंधांना जी-७ द्वारे पूर्णपणे समर्थन दिले गेले आहे आणि अनेक पाश्चात्य आघाडीतील देश व भागीदार देश रशियाविरोधातील निर्बंधांमध्ये सामील झाले आहेत. चीन, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, इंडोनेशिया, तुर्कस्थान आणि सर्बिया यांसह अनेक देशांनी निवेदने जारी केली आहेत, ज्यात असे सूचित करण्यात आले आहे की, अशा निर्बंधांमुळे कोणताही हेतू साध्य होऊ शकतो, यांवर त्यांचा विश्वास नाही आणि ते या निर्बंधांमध्ये सहभागी होणार नाहीत. इतर अनेक देशांनी तटस्थ भूमिका स्वीकारली आहे आणि त्याबद्दल कोणतेही अधिकृत विधान न करता निर्बंधांमध्ये सहभागी झाले नाहीत. ‘प्रेषक’ देशांवर आर्थिक परिणाम मर्यादित करण्यासाठी उचललेली पावले आणि विकसनशील देशांवरील प्रभाव मर्यादित करण्यासाठी समन्वयाचा अभाव यांमुळे प्रतिसाद यंत्रणेबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
रशियावरील आर्थिक निर्बंधांचा एकूण परिणाम अद्याप उलगडणे बाकी आहे. परंतु, या टप्प्यावर तीन कल सुस्पष्ट आहेत.
रशिया-युक्रेन युद्ध आणि आनुषंगिक आर्थिक निर्बंधांचा नकारात्मक परिणाम जगाच्या विविध भागांमध्ये दिसून आला आहे, ज्यामुळे वेगळी, नवी आव्हाने वाढली आहेत. आधुनिक निर्बंधांच्या संकल्पना आकार घेण्याची प्रक्रिया आणि अंमलबजावणीवर जागतिक मत विभागले गेले आहे. निर्बंधांच्या अनपेक्षित परिणामांमुळे- विशेषत: आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील आर्थिकदृष्ट्या कमी प्रगत देश आणि विकसनशील देशांकरता- मुत्सद्दी उपाय योजण्याची आणि निर्बंध मागे घेण्याबाबत मार्ग काढण्यासाठी कृती करण्याची आवश्यकता मोठ्या स्तरावर व्यक्त होत आहे. अनेक भू-राजकीय अनिश्चितता असताना, आर्थिक निर्बंध आणि प्रतिनिर्बंध याच्या प्रतिकूल परिणामांमुळे आणि संसाधनांविषयीच्या राजकीय पैलूंमुळे अर्थव्यवस्था बदलण्याची शक्यता आहे, असे काही कल दर्शवतात.
हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Vice Admiral Girish Luthra is Distinguished Fellow at Observer Research Foundation, Mumbai. He is Former Commander-in-Chief of Western Naval Command, and Southern Naval Command, Indian ...
Read More +